भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
साहेब दुसर्या डावात फारसे
साहेब दुसर्या डावात फारसे खेळत नाहीत. तेव्हा महाशतक नाही.
लक्ष्मणच्या आवडीची सिच्युएशन आहे.. तो नक्की खेळेल..
विकेट फलंदाजीला अनुकूल पण २२ पैकी एकही फलंदाज टिकू शकत नाहीय.. २+२ = ६?
सेहवाग गेला; वास्तविक आधीच
सेहवाग गेला; वास्तविक आधीच जायचा, स्विंग होत असलेल्या चेंडूचा पाठलाग करतच होता ! पहिलं सत्रच सामन्याच्या निकालासाठी महत्वाचं ठरणार हे सेहवागला सांगायला << ११०० सल्लागार >> तरी कशाला जातील !!
द्रिवड गेला...
द्रिवड गेला...
द्रविड म्हणायचंय का तुम्हाला?
द्रविड म्हणायचंय का तुम्हाला? मग तो गेला !!
भारत ६९/५
भारत ६९/५
मॅच संपल्यातच जमा....
मॅच संपल्यातच जमा.... साहेबांच्या बरोबरीने कोणीच उभं राहात नाहीये... चेन्नैला मोंगिया होता.. आज धोनी उभा राहिला पाहीजे.. साहेब शतक मारायच्याच मूड मध्ये आहेत.. फक्त आता मॅच वाचवणे वगैरे मोड मधे न जाता खेळायल पाहिजे..
लक्ष्मण, कोहली पण....... गेले
लक्ष्मण, कोहली पण....... गेले !!!!!
साहेब व धोनी सामना जिंकून देणार !! महाशतकासाठी इतका चांगला शुभमुहूर्त सगळे पंचांग शोधूनही नाही सांपडायचा !!!!!!!!
िटव्ही चे चँनल
िटव्ही चे चँनल बदला.......
डोरेमॉन लावा...
साहेब व धोनी सामना जिंकून
साहेब व धोनी सामना जिंकून देणार >>> येस्स!
अत्यंत भंगार शॉट खेळून साहेब
अत्यंत भंगार शॉट खेळून साहेब तंबूत परत...
गेले की हो साहेब. आता ढोणी -
गेले की हो साहेब.
आता ढोणी - अश्विन के हाथ में. दोघांनाही शतक झळकावण्याची संधी.
साहेबांच्या पहिल्या आणि दुस र्या डावातल्या धावा एकत्र करून १०० रावं शतक झालं असं डिक्लेर करायला पाहिजे. :-
व्हाय धिस टेस्ट मॅच सीइंग
व्हाय धिस टेस्ट मॅच सीइंग सीइंग डी?
काय बोलणार ? आमचे फॅमिली
काय बोलणार ? आमचे फॅमिली डॉक्टर म्हणतात, या वयात बी. पी. संभाळा ! मग काय क्रिकेट बघायचंच बंद करायचं ? आणि बी.पी. संभाळून मग करायचं तरी काय !!!!!
भारताच्या पराभवाची औपचारिकता
भारताच्या पराभवाची औपचारिकता उरलीय.. साधारण १४०-१५० धावांनी पराभूत होणार!!
उद्याच्या वर्तमानपत्राचा मथळा - "गोलंदाजांनी कमावले(?) फलंदाजांनी गमावले " किंवा "कांगारूंसमोर भारतीय फलंदाजांची हाराकिरी"
धोनी म्हणणार आम्हाला वर्चस्व मिळवण्याची संधी होती पण ती आम्ही गमावली. अजून तीन सामने बाकी आहेत. आम्हाला क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत सुधारणा करायला हवी. यादवचे कौतुक होणार.
आणि बी.पी. संभाळून मग करायचं
आणि बी.पी. संभाळून मग करायचं तरी काय !! >>>
आता किमान ऑस्ट्रेलियाला फ्रस्ट्रेट तरी करा हरण्यापूर्वी...
बाकी, टेस्ट मॅचमधे रन-आऊट हा फाऊल धरला पाहिजे; एक सामन्याची बंदी घातली पाहिजे फलंदाजावर
कोहलीला आज काहीतरी करून दावण्याचा चानस होता...
मथळा
मथळा
<<<<<व्हाय धिस टेस्ट मॅच
<<<<<व्हाय धिस टेस्ट मॅच सीइंग सीइंग डी?>>>>>
द्रविड बोल्ड तेंडल्या आउट आउट लक्ष्मन आल्सो गोन
<<<<<व्हाय धिस टेस्ट मॅच सीइंग सीइंग डी?>>>>>
गंभीर, कोहली आणि लक्ष्मण
गंभीर, कोहली आणि लक्ष्मण दोन्ही डावात अपयशी ठरले. लक्ष्मण संपला की काय अशी एक कुशंका मनात डोकावू लागली आहे. भारताला आता कसोटी सामने खेळणारे खेळाडू मिळतच नाहीत. युवराजला अनेक वर्षे संधी देऊन उपयोग झाला नाही. रैना ३-४ सामन्यानंतर बाहेर गेला. कोहलीला कसोटीचे तंत्र अजून उमगलेले दिसत नाही. एकंदरीत गांगुलीची जागा भरून काढणारा ६ व्या क्रमांकाचा फलंदाज अजून मिळालेला नाही. लक्ष्मण, सचिन व द्रविड बाहेर गेल्यावर तर अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. आता पुढच्या सामन्यात रोहीत शर्माला संधी देऊन बघावी.
सेहवाग आज पहिल्या चेंडूपासून बाद व्हायचा जोरदार प्रयत्न करत होता. त्याला लवकरच यश मिळाले. सचिन तर अत्यंत खराब पद्धतीने बाद झाला. आता झोप यायला लागली आहे. पहाटे ५ ला उठण्याचे श्रम या अवसानघातकी फलंदाजांनी (आणि त्याआधी सुमार गोलंदाजी करणार्या गोलंदाजांनी) वाया घालवले.
आजच सामना संपणार. भारत किमान १२५ धावांच्या फरकाने हरणार.
ऑस्ट्रेलियाच्या व द.
ऑस्ट्रेलियाच्या व द. आफ्रिकेच्या दौर्यावरच्या बहुसंख्य मालिकेत पहिला कसोटी सामना भारत हरतो व नंतर बरोबरी करण्याकरता घाम गाळावा लागतो.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर १९८६ व २००४ मध्ये पहिली कसोटी व नंतर मालिका अनिर्णित राहिली होती. पण १९७७, १९८१, १९९२, २००० व २००७ मध्ये मालिकेतली पहिली कसोटी आपण हरलो होतो. यातली फक्त १९८१ ची मालिका बरोबरीत सुटली होती व बाकी मालिका आपण हरलो होतो. त्यामुळे आपण मालिकेतली पहिली कसोटी हरलो तर मालिका हरण्याची शक्यता ८० टक्के इतकी आहे.
यावेळी तसंच होणार बहुतेक!
आज सकाळीच न्यूज मध्ये बघत
आज सकाळीच न्यूज मध्ये बघत होतो कि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फलंदाजीच प्रशिक्षण देणार आहेत खराब फलंदाजी केली म्हणून त्यात आपल्या पण फलंदाजांना पण पाठवा फुकटात काम होईल.
लोक्स ठंड रखो.. आपण २५०+
लोक्स ठंड रखो..
आपण २५०+ पाठलाग करू शकू का याबद्दल आधीपासूनच शंका होती.. धापा टाकण्याएव्हडे देखिल धावलो नाही, गुदमरलो
ऑस ची गोलंदाजी अतीशय अप्रतिम झाली आहे यात वादच नाही, टिच्चून, अचूक, भेदक, वेगवान..
तेव्हा त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे. आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवर आपल्या फलंदाजांनी पुन्ह एकदा पाणी टाकले.
वस्तूस्थिती अशी आहे की: गंभीर फॉर्मात नाही (ऑफ च्या बाहेर हमखास बाद होतोच.. हा तांत्रिक दोष!)
सेहवाग हा जुगार आहे
धोणी कडे अशा गोलंदाजीला खेळायचे (एकंदरीतच बाहेरच्या देशातील खेळपट्ट्यांवर कसोटी खेळायचे) तंत्र नाहीच..
कोहली बेभरवशाचा आहे.
ऊरले द्रविड, लक्षमण, सचिन त्रीकूट. पैकी द्रविड दोन्ही डावात ऊत्कृष्ट चेंडूवर बाद झालाय.. लक्षमण चं घोडं अडलय.. सचिन एकटा किती लढवणार आहे? अश्विन ची फलंदाजी सामना जिंकू देवू शकत नाही.
थोडक्यात आपल्या संघाला सुरूवातीपासून ऊगाच जास्त रेटींग दिले गेले आहे. पहिला सामना हरून मग मालिका बरोबरीत सोडवण्याचा आपला ईतीहास आहे. तसे झाले तर बरे होईल. अन्यथा द्रविड अण्णांची डगमग व लक्षमण ची गळचेपी बघता या मालिकेत एकंदरीत कुछ खैर नही.. (मला ऊगाच असं वाटतय की ईंग्लंड मध्ये जसे ब्रॉड व अँडरसन चे भूत आपल्या संघाच्या मानगूटीवर बसले होते तसे ईथे पॅटीनसन व सिडल चे बसेल)
असो. आपल्या पहिल्या डावात सचिन, द्रविड नंतर कोसळलेली फलंदाजी, हसी चा दुसर्या डावत सोडलेला झेल आणि त्यांचे शेपूट जास्त वळवळले या तीन गोष्टी सामन्याला कलाटणी देणार्या वाटतात.
त्यांचे शेपूट जास्त वळवळले
त्यांचे शेपूट जास्त वळवळले >>> हो. पहिल्या डावात त्यांच्या शेपटानं १००+ रन्स केल्या. तितक्याच फरकाने हरलो आपण शेवटी.
>>> पैकी द्रविड दोन्ही डावात
>>> पैकी द्रविड दोन्ही डावात ऊत्कृष्ट चेंडूवर बाद झालाय..
दुसर्या डावात द्रविडच्या बॅट व पॅडमध्ये जवळपास फूटभर अंतर होते.
>>> पहिला सामना हरून मग मालिका बरोबरीत सोडवण्याचा आपला ईतीहास आहे.
१९७७ पासून ऑस्ट्रेलियातल्या मालिकेतला पहिला सामना हरल्यावर फक्त एकदाच (१९८१ मध्ये १-१ अशी बरोबरी) आपण मालिका बरोबरीत सोडविली होती . उरलेल्या ४ वेळा (१९७७ : २-३, १९९२ : ०-४, १९९९-०० : ०-३, २००६-०७ : १-२) आपण मालिका हरलेलो आहोत. त्यामुळे आता पहिला सामना हरल्यावर मालिका जिंकण्याची शक्यता शून्य टक्के व अनिर्णित ठेवण्याची शक्यता फक्त २० टक्के आहे.
>>दुसर्या डावात द्रविडच्या
>>दुसर्या डावात द्रविडच्या बॅट व पॅडमध्ये जवळपास फूटभर अंतर होते.
नक्कीच! ऑस च्या भेदक गोलंदाजीमूळे आपल्या फलंदाजांच्या मानसिकतेवर निश्चीत परिणाम झाला आहे. द्रविड व लक्षमण दडपणाखाली खेळले असे वाटते. अन्यथा द्रविड च्या भिंतीतून एरवी मुंगीलाही आत शिरायला वाव नसतो.
रच्याकने: पाँटीग च्या दोन्ही डावात मिळून १२०+ धावा आहेत. आपण नेमकी तेव्हड्याच फरकाने हरलो आहोत..
आपली टीम येवढी वाइट नाहीये.
आपली टीम येवढी वाइट नाहीये. होत अस कधी कधी. चांगली टीम जिंकतेच असे नाही.
ही सिरीज आपण जिंकणार असे माझे अजूनही मत आहे. रोहित शर्माला दुसर्या टेस्टला खेळवल पाहिजे.
सेहवागला पहिल्या डावात पण तीन चान्सेस मिळाले होते. द्रविडने खरोखरच काल मॅच टाकली. झहिरने पण एक अवघड कॅच सोडला. दोन्ही डावात त्यांची शेपूट वळवळली. मॅच दिसते त्याच्या पेक्षा टफ झाली. आज लंचला सुद्धा टॉम मूडी भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे असे म्हणत होता. शेवटी आपण ढेपाळलो.
असो.
यावर्षी वर्ल्ड कप जिंकल्याने व टेस्ट मधे काही दिवस का होइना पहिला नंबर मिळवल्यामुळे सर्व माफ.
२०१२ जगबुडी झाली नाही तरीपण त्रिकूट रिटायर झाले तर जगबुडी सारखेच वाटेल. पण तसे होणार नाही.
सर्व क्रिकेट प्रेमींना नव वर्ष शुभेच्छा. नविन वर्षी १०० होणारच. चारशे ही होवोत.
हम्म.. हारलोच. हरायला नको हवे
हम्म.. हारलोच. हरायला नको हवे होते. पण फलंदाजानी माती खाल्ली.
टीम वाईट नाहीये पण वाईट खेळल्याचं दु:ख झालं. इतका मोठा फरकाने हरायला नको हवं होतं.
एक मॅच हरली तर काय येवढं...
एक मॅच हरली तर काय येवढं... लोकहो मथळ्यातून कोथळा बाहेर काढण्याची वर्तमानपत्रांची जुनी सवय आहे. असो.
आपण वाईट खेळलो आणि हरलो. साहेब फॉ र्मात आहेत. अश्विन पण!
काय खेळलेत राव..........
काय खेळलेत राव.......... पहिल्या इनिंग मधे ६० वर ७ विकेट्स... एकदम जबराट...
तोडच नाही काही
दुसर्या डावात मात्र नजर लागली....... १६९ केलेत सगळ्यांनी
आपण हरलो त्याचे कारण आपल्या
आपण हरलो त्याचे कारण आपल्या गोलंदाजांनी धावा केल्या नाहीत हे आहे. हसताय काय? त्यांच्या गोलंदाजानी आपण हरलो तेवढ्या रन्स केल्या आहेत.
सेहवागने ' डावाची स्थिती
सेहवागने ' डावाची स्थिती कांहीही असो, मी माझा स्वैर खेळच खेळणार' ही वृत्ती सोडणं आवश्यक आहे; तो आतां एक ज्येष्ठ खेळाडू आहे व वेळ पडलीच तर जबाबदारीने खेळणं त्याच्याकडून अपेक्षित आहे. आज चेंडू स्विंग होत असताना जपून खेळणं डाव उभारण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक होतं व तो नेमका उलटंच करत होता. मीं मागेही म्हटलं होतं कीं गंभीर व सेहवाग ही कसोटीसाठी आदर्श 'ओपनींग' जोडी असण्यापासून खूपच दूर आहे !
Pages