भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताने किमान ५०० धावा केल्या पाहिजेत. या खेळपट्टीवर काही थोड्या चेंडूंचा अपवाद वगळता कांगारूंची गोलंदाजी फारशी प्रभावी पडलेली दिसत नाही. लायन अगदीच फुसकी गोलंदाजी टाकतोय. हिल्फेनहॉसही निष्प्रभ आहे. त्यातल्या त्यात सीडलनेच बरी गोलंदाजी केलीय. उद्या द्रविडचे या वर्षातले ६ वे शतक लागायला पाहिजे.

भारताचे किमान ३५० पर्यंत होणार..........त्यांच्या डावात परत ते २५० पर्यंत तरी जातिलच......
मग राहीलेले.....सचिन सेंचुरी करुन पार... Happy

साहेब बाद होण्याच्या आधीची ३-४ षटकं पाहा, एकदम Defensive Mode मधे खेळत होते.....सिडल ची आधीची over पहा...
५०० होणे मुश्किल आहे.....कमीत-कमी ४०० करायला हवेत....
द्रविड आज पुर्ण वेळ चाचपडत होता.....एकटा तो आणि लक्ष्मणचं काय ते करु शकतात.....

खुदा जाने शतकांच्या शतकाची अजून किती प्रतीक्षा करायला लागणार! >>>
मास्तुरे १०० १०० करतानाची ही जर्नी पण मला आवडत आहे. सच्या कसला खेळतोय अश्यात. अर्थात ते १०० होणे आवश्यकच पण आजचे पहिले ५० कसले होते. ऑसीजना आज पहिल्या चौघांनी बॅटीतून उत्तर दिले की इंग्लंड फक्त एकदाच, नेहमी नेहमी नाही. जय हो. १०० काय होतीलच. (रादर होणारच)

नं ३ कोण ? >> चिकणे (म्हणजे नावच चिकणी आहे तर म्हणून घेतो. Happy त्याला लोक " द वॉल" म्हणून ओळखतात.

महाशतकाचा विचार डोक्यातून काढून टाकून सचिनचा खेळ आज पाहिला व निर्भेळ आनंद मिळाला.
द्रविडला लय सांपडत नसूनही तो 'निश्चयाचें बळ' म्हणजे काय तें प्रभावीपणे दाखवतोय. पण, सेहवाग, सचिन, द्रविड व लक्ष्मण यांच्या कामगिरी इत़कंच महत्वाचं आहे गंभीर, कोहली इ. च्या नांवावर मोठी धांवसंख्या दिसणं, निदान मोठ्या भागीदारीत त्यांचा सहभाग असणं; नुसतं भविष्याच्या दृष्टीनेच नव्हे तर सिनीयर फलंदाजांचा खेळ मोकळेपणाने बहरून येण्यासाठीही !
सुरवातीला चांगली गोलंदाजी केल्यावर मग चेंडू स्विंग होत नसल्याने ऑसीजनी आंखूड ट्प्प्याच्या गोलंदाजीवर भर दिला असावा. पण, मला वाटतं गांगुलीने म्हटल्याप्रमाणे, पुढे पाऊल टाकून फलंदाजाना चेंडू खेळण्यास भाग पाडण्यात व त्यातून चूका घडवून आणण्यात ऑसीज अयशस्वी झाले. म्हणूनच ते प्रभावी वाटले नसावेत.
सचिन स्लिपच्या डोक्यावरून 'अपर कट' लिलया मारतो; आज सचिनच्या या फटक्याबद्दल गांगुली म्हणाला, प्रत्येक दौर्‍यासाठी सचिन तिथं उपयुक्त ठरणार्‍या फट़क्यांचा कसून सराव करतो; या दौर्‍यासाठी निवडलेल्या फटक्यांत या 'अपर कट' चा निश्चित समावेश आहे ! 'बाऊन्स' नसलेल्या घरच्या खेळपट्ट्यांवर तो हा फटका कुलूपबंद करून ठेवतो !! इति सचिन महात्म्यम !! Wink
हा सामना रंगतदार होणार असं मला अगदीं आंतून वाटतंय; सहसा माझा हा आंतला आवाज चुकत नाही !!

२७९-९.
सकाळचं सत्र बहुधा तेज गोलंदाजांसाठीच राखीव असावं ! सामना रंगणार यावर मात्र माझा आंतला आवाज अजूनही ठाम आहे !!

<< 7 जनांनी नुसते िदवे लावले... >> अश्विनचा दिवा त्यातल्या त्यात जरा मंद होता !! Wink
पण सिरीयसली, काल देखील सकाळचा ऑसीज तेज गोलंदाजांचा 'स्पेल' प्रभावी होताच; खंदे फलंदाज व नशीबाची साथ काल होती एवढाच फरक ! शिवाय, मेलबोर्नची सकाळ किती आल्हाददायक असते याचा अनुभव आपल्या यादवनेही घेतलाच ना !!

पाहिलंत ! यादवला पन लईच आवडाया लागलीय तिथली सकाळची हवा ! नवीन चेंडू नाचतोय त्याच्या तालावर !! Wink

पाँट्या व हसी यांचा अनुभव व कसब यांची खरी कसोटी. दोघेही या कसोटीला उतरणारे फलंदाज आहेत . ही जोडी मात्र लवकर फुटलीच तर सचिनच्या महाशतकाची शक्यता या कसोटीत तरी नाहीच; कदाचित त्याला खेळायलाच यावं लागणार नाही !!

पाँटींग आणि हसी सध्या तरी टिकलेत.. पण चहापानानंतर उडायला पाहिजेत दोघेही म्हणजे जिंकणार नक्की.. नाहीतर काहीही होऊ शकतय..

नाहीतर काहीही होऊ शकतय..
>>>
बघु काय होत ते? भारतासाठी सामना कठीण आहे.

आपला स्कोअर पाचशे-बिचशे झाला असेल या अपेक्षेने सकाळी टीव्ही लावला तर ऑसिज १६/२!
असो... आपली बॉलिंग कधी नव्हे ती भेदक्-बिदक वाटत होती Happy

गेला रे गेला.. पाँटींग गेला.. लिहिपर्यंत हॅडीन पण गेला.. गुंडाळा गुंडाळा शेपूट लवकर गुंडाळा... १४८/६

मी पण आज सकाळी द्रविडचे १०० झाले का बघू म्हणून टीव्ही लावला, तर ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग सुरूही झालेली होती.
आत्ता पुन्हा ऑस्ट्रेलियाचं कितीचं लीड झालंय बघू म्हणून पाहिलं तर त्यांचे ६ आऊट!!
धमाल चाललीय. उमेश यादव जोरात आहे.
नवोदितांनी चांगली कामगिरी केली की मला आनंद होतो नेहमीच.
असंच, वेळ पडल्यास कोहलीनं दुसर्‍या इनिंगमधे केलं पाहिजे.

Pages