भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ़ज अजून किमान १ गडी तरी बाद व्हायला पाहिजे.

गंभीर व लक्ष्मण ला संघात जागा टिकविणे अवघड आहे. अजिंक्य रहाणे सराव सामन्यांच्या तीनही डावात अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे द्रविडला आघाडीला पाठवून रोहीत शर्माला आत आणले पाहिजे. लक्ष्मणच्या जागी कोणाला घ्यायचे हा प्रश्नच आहे. पहाटे ४.५० ला उठून सामना बघण्याचे श्रम वाया गेले.

गंभीर इंग्लंडच्या दौर्‍यावर, भारतात विंडीजविरूद्ध आणि आता ऑस्ट्रेलियात संपूर्ण अपयशी ठरलेला आहे. त्याला काही काळ विश्रांती द्यायला हवी.

मास्तर चुकीच्या घोड्यावर बेटिंग घेत आहेत>>>>>>. ते त्यांची सवयच आहे............तरी पण अजुन त्यांनी भाजपा ला सोडले नाही.... Happy दिवे घेतात की देउ ? Happy

""VVS Laxman needs to set more realistic targets. Like scoring more than the number of letters in his name.""

ट्विटरवर कोणीतरी लिहिलेले.

>> लक्ष्मण कधी ब्रॅडमनसारखी तर कधी मॅग्रा सारखी बॅटिंग करतो" - स्टीव वॉ
म्हणजे बघा तो किती व्हर्सटाईल आहे ते. Wink

ऑसीजचा डाव नाही पाहूं शकलो. पण उद्या सकाळच्या सत्रात आपलेही गोलंदाज सामना खेंचून घेवूं शकतील, नव्हे घेतलाच पाहिजे !!!

नव्हे घेतलाच पाहिजे !!!
बSSSSरंSSS.
तसे कठीण दिसते आहे, पण बघतो जमते का? त्यातून आज रात्री जंगी पार्टी! भारतातून आमच्या लाडक्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणे. म्हणजे उद्या डोळे उघडे ठेवणे कठीण. एकंदरीत कुणीतरी मुहुर्त बघून मायबोलीवर दुसरा धागा उघडला तर जरा मदत होईल!
मला वाटलं तीन विकेटी सस्त्यात काढल्या, अजून किती यजमानांचा अपमान करायचा? शिवाय दिवसभर फलंदाजी करून सगळे थकलो होतो हो!! होत नाही आताशा एव्हढे श्रम करणे दहा पंधरा वर्षापूर्वी जमायचे तसे. नाही म्हंटले तरी पस्तिशी उलटली! जरा दमाने घेऊ द्या की. सामने काय, बरेच जिंकले आत्तापर्यंत, अगदी विश्वचषक सुद्धा जिंकला की मागल्याच वर्षी! आणखी किती करायचे माणसाने? त्यातून मायबोलीवर लोक लेख लिहू लागले आहेत की क्रिकेटला अवाजवी मह्त्व दिल्या जाते!! अश्याने आमचे सामने बघायला लोक आले नाहीत तर आम्हाला पैसे कसे मिळणार? नतद्रष्टांनी मॅच फिक्सिंग हि बंद केले!! आजकाल एक दोन कोटी रु. त भागते का? आम्हाला तर दुसरे काहीच करता येत नाही!!

>>> भारताच्या पहिल्या डावात किती धावा झाल्या बरे?

भारताने पहिल्या डावात १९१ धावांचा डोंगर उभा केला आहे. Biggrin

उद्या आपल्यासारखीच कांगारूंचीही पडझड होणार हे निश्चित. या मैदानावर चौथी फलंदाजी ऑस्ट्रेलियाला करायची आहे हे लक्षात घेतले तर आपल्याला अजूनही बर्‍यापैकी संधी आहे.

आणखी किती करायचे माणसाने? त्यातून मायबोलीवर लोक लेख लिहू लागले आहेत की क्रिकेटला अवाजवी मह्त्व दिल्या जाते!! अश्याने आमचे सामने बघायला लोक आले नाहीत तर आम्हाला पैसे कसे मिळणार? नतद्रष्टांनी मॅच फिक्सिंग हि बंद केले!! आजकाल एक दोन कोटी रु. त भागते का? आम्हाला तर दुसरे काहीच करता येत नाही!!>>>>

Lol

झक्कींच्या पोस्ट्स वाचण्यासाठी किती थांबावे लागते Sad

<< झक्कींच्या पोस्ट्स वाचण्यासाठी किती थांबावे लागते >> सचिनच्या 'महाशतका'सारखंच आहे ते प्रकरण ! Wink

उद्या आपल्यासारखीच कांगारूंचीही पडझड होणार हे निश्चित.
मी दोन तास सामना बघत होतो, तिथे कुठे कांगारू दिसले नाहीत. पण सामना खेळणारे कुणीच पडले नाहीत. सगळे स्वतःच्या दोन पायावर व्यवस्थित उभे होते, काहीजण तर धावत होते. ऑस्ट्रेलियाचे लोक मात्र तिथल्या तिथेच धावत होते, भारतीय कसे मैदानात सगळीकडे धावत होते, तरी पडले नाहीत!

बाकी दोन तासात १०७ वरून २३६, २७ ओव्हर्स मधे १२९ . म्हणजे जवळपास ४.८ असा रन रेट. याचा अर्थ ऑस्ट्रेलियन फलंदाजांना काही अडचणी येत नाहीत असे दिसते.

डाव आणि २०० + धावांनी हरू असे दिसते. हसीच्या सेंच्युरी नंतर एकुण ६०० + करून ते डिक्लेअर करतील. निव्वळ पाटा विकेट. आणि ते लोक वनडे पेक्षा चांगले आपल्या मारत आहेत. टेस्ट म्हणन्यापेक्षा एझ्टेंडेड वनडे म्हणावा Happy

सेहवाग २००, द्रविड १००, सच्या १०० असे झाले तरच टेस्ट वाचेल. ते अवघड आहे.

क्लार्क त्रिशतक करून ४०० टार्गेट ठेवेल.
तेंडूलकर ७० एक रन करून out होईल. बाकी खेळाडू १५-२० मिनिटे हजरी लावून out होतील.
पण द्रविड आणि लक्ष्मण टेस्ट draw करतील. मग पर्थची टेस्ट आपण जिंकू.

उद्या आपल्यासारखीच कांगारूंचीही पडझड होणार हे निश्चित.
मी दोन तास सामना बघत होतो, तिथे कुठे कांगारू दिसले नाहीत. पण सामना खेळणारे कुणीच पडले नाहीत. << Rofl Lol

डावाने हार निश्चीत...:अरेरे:

पारच वाट आणली या लोकानी. काय वनडे समजून मारत होते का २०-२० समजून? आं? पाहुण्या बॉलर्सचा जरातरी मान राखावा. काय पद्धत नाहीच या लोकाकडे. कायम यांचं असं हे. वळणच नाहीये या लोकाना.

पुरती वाट लागली. आपल्या महान गोलंदाजांनी क्लार्क, हसी आणि पाँटिंगला पॅडवर फुलपीच गोलंदाजी करून चौकारासाठी लोण्याचे गोळे दिले.

काल फलंदाजांनी दिवे लावले होते आणि आज गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी!

पॉटिंगने ९९ वर असताना शतकासाठी उतावीळ होऊन शॉर्ट मिडविकेटला चेंडू ढकलून १ धाव घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा चेंडू थेट झहीरच्या हातात गेला. तिथून केवळ ८-१० फुटावर असलेले स्टंप त्याला उडवता आले नाहीत. त्याने फेकलेला चेंडू जेव्हा स्टंपाच्या जवळून गेला तेव्हा पाँटिंगची बॅट क्रीजपासून ३-४ फूट लांब होती. झहीर लहानपणी बैदूल खेळला नसावा बहुतेक. आता आपल्या खेळाडूंना रोज अर्धा तास बैदूल खेळण्याचा पण सराव द्यावा. इतक्या जवळून नेम चुकवणारा झहीर धन्य आहे.

पाँटिंगला बाद केल्यावर हसी खेळायला आला. आल्याआल्या इशांतने त्याला पहिलाच चेंडू हाफव्हॉली ऑफच्या बाहेर टाकला. अशी सुवर्णसंधी हसी कसा सोडेल! त्याने पाय पुढे टाकून कव्हरमधून खणखणीत चौकार हाणला. नवीन आलेल्या फलंदाजाला लॉलीपॉप देणारा इशांत धन्य आहे.

आज क्षेत्ररक्षण करताना चेंडू जवळ आल्यावर काही क्षेत्ररक्षक वाकून चेंडू अडवायचा प्रयत्न न करताच थेट चेंडूच्या मागे धावायला सुरूवात करत होते. ऑसीजना आरामात चौकार देणारे सर्व क्षेत्ररक्षक धन्य आहेत.

भारताचे मात्र एका बाबतीत कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. आजच्या सामन्यातली फलंदाजी म्हणजे भारताचा ३०० चा आत आटोपलेला परदेशातला लागोपाठ ११ वा डाव. याआधी इंग्लंडमधल्या ८ डावात व ऑस्ट्रेलियातल्या आतापर्यंतच्या ३ डावात भारत ३०० चा आकडा पार करू शकलेला नाही. असे कमालीचे सातत्य इतर संघ क्वचितच दाखवितात. यातून भारत धावांसाठी हपापलेला नाही हेही सिद्ध होत आहे.

तसेच फॉर्मात नसलेल्या फलंदाजाना फॉर्मात येण्यासाठी भारतीय गोलंदाज नेहमीच मदत करतात हे पाँटिंग, हसी, क्लार्क इ. च्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

भारतीय गोलंदाज आज कमाल करतील असे वाटत होते. पण त्यांनी संपूर्ण निराशा केली. हा सामना हरल्यातच जमा आहे. आता ०-४ अशी नामुष्की होऊ नये एवढीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! Angry

आमेन!

Pages