भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
कर्मगती की कुर्मगती >>> आता
कर्मगती की कुर्मगती >>> आता कूर्मगतीनं खेळण्याचीच गरज आहे. नांगर टाकला तरच अनिर्णित राखण्याची जरा तरी, किंचित, शक्यता निर्माण होईल.
>>नांगर टाकला तरच अनिर्णित
>>नांगर टाकला तरच अनिर्णित राखण्याची जरा तरी, किंचित, शक्यता निर्माण होईल.
हे भारीये
>>> वीरू गेला.. त्याच्या
>>> वीरू गेला.. त्याच्या खेळाबद्दल कितीही बोलले गेले असले तरी तो एक बेजबाबदार क्रिकेटर आहे हे त्यानं बर्याचदा सिद्ध केलंय..
सहमत. आज पुन्हा एकदा आणि जेव्हा संघाला तब्बल १४-१५ तास फलंदाजी करणे आवश्यक होते, तेव्हा, सेहवागने ऑफच्या २ फूट बाहेर असलेला व अजून बाहेर जात असलेला चेंडू अजिबात आवश्यकता नसताना जागेवर उभा राहून व पाय एखादा मिलिमीटरसुद्धा न हलवता टोलवण्याचा आत्मघातकी प्रयत्न केला व स्वतः बाद होऊन संघाला केवळ ४ थ्या षटकातच संकटात टाकले. सेहवागचा हा बेजबाबदारपणा संतापजनक आहे. १९८४ मध्ये इंग्लंडविरूद्ध बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याबद्दल संदीप पाटील व कपिलदेवला पुढच्या कसोटीतून डच्चू दिला होता. सेहवागला उर्वरीत मालिकेतून डच्चू द्यायला पाहिजे.
>>> शास्त्रीने आत्ता त्यांच्याशी "हाय ज्युलिया..." टाईप गप्पा चालू केल्या.
त्यांना पटवायचा प्रयत्न करत असणार.
>>> रवी शास्त्री हा प्रॉब्लेम समजतच नाही आपल्याला तरी! आता स्टॅटिस्टिक्स काहीही दाखवोत, पण इतके खरे की तो अतिशय बोअर खेळायचा. कित्येकदा तर त्याने काहीच केलेले नाही.
चूक. त्याने काहीच केले नसते तर तेसुद्धा चालले असते. पण अनेकवेळा आपल्या अत्यंत संथ आणि स्वार्थी फलंदाजीने त्याने भारताचा पराभव व्हायला मदत केली आहे. शास्त्रीचा विषय काढू नका. तो माणूस माझ्या डोक्यात जातो.
>>> ८ ओव्हर्स मध्ये एकही धाव नाही! ते ही तेंडल्या अन रन अ बॉल करणार्या गंभीर कडून. झेपत नाही. मॅच स्टॅन्ड स्टिल.
हरकत नाही. चेंडू मारायला गेले की स्लिपमध्ये, गलीमध्ये किंवा यष्टीरक्षकाकडे झेल जातो. किंवा बॅटला लागून चेंडू स्टंपवर आदळतो. शेवटच्या २ षटकात सचिन चेंडू मारताना केवळ काही मिलिमीटरच्या अंतराने त्याचा त्रिफळा वाचला, तर गंभीरचा झेल यष्टीरक्षक व पहिल्या स्लिपमधून गेला. त्यामुळे चेंडू सोडून देत आहेत ते योग्यच आहे. ऑफच्या बाहेरचे चेंडू सोडून दिले की बाद व्हायची भीतिच नाही.
एकंदरीत सामना वाचविणे अत्यंत अवघड आहे. जर उद्याचा संपूर्ण दिवस खेळून काढला तर भारतीय संघ पास, ४६८ च्या पुढे धावा केल्या तर फर्स्ट क्लास आणि सामना वाचवला तर भारताला डिस्टिंक्शन!
तोपर्यंत आकाशातल्या बापाकडे हीच प्रार्थना -
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
आमेन!
ललिता, जहाज पार अर्धं
ललिता, जहाज पार अर्धं बुडाल्यावर नांगर टाकून काय होणार?
अरे तुम्ही आणि मी बघत होतो ती
अरे तुम्ही आणि मी बघत होतो ती मॅच एकच होती का? आठ ओव्हर्स मेडन हे खरे, तेंडल्या जेव्हा वेळ काढायला खेळतो तेव्हा फार बोअर करतो आणि आणि आउट होण्याचे चान्सेस जास्त असतात, हे ही खरे.
पण "कूर्मगती" म्हणजे नक्की काय? तेंडल्याला आलेले ८०% बॉल्स ऑफ च्या चांगले बाहेर होते. प्लॉट असा की ४-५ बाहेर टाकून एक थोडा आत घ्यायचा म्हणजे बॅट्समन मारायला जाउन चूक करेल. पण कमी ओव्हर्स बाकी असल्याने दोघेही ते बॉल्स सोडून देत होते. शेवटच्या एक दोन ओव्हर्समधे दोघांचाही पेशन्स कमी झाला होता आणि दोघेही एकेकदा बीट झाले. पण तोपर्यंत ऑसीज च्या प्लॅनला बरोबर ओळखून खेळत होते.
मला स्वतःला असे वेळकाढू खेळणे आवडत नाही. पण कूर्मगतीचे कारण सांगितले.
अरे अजून आपण हरलो नाही? कमाल
अरे अजून आपण हरलो नाही? कमाल आहे! ऑस्ट्रेलियाने अति बचावात्मक खेळ केलेला दिसतोय!
कोण म्हणालं होतं की आपण पण त्यांच्या विकेटी काढू पटापट ते? :डोकं खाजवणारा बाहुला:
>> वीरू गेला.. त्याच्या खेळाबद्दल कितीही बोलले गेले असले तरी तो एक बेजबाबदार क्रिकेटर आहे हे त्यानं बर्याचदा सिद्ध केलंय..
अरे असं म्हणू नका! सेहवाग हा इथल्या अनेक तज्ज्ञांच्या मते गोलंदाजांचा कर्दनकाळ आहे.
उदा.. ही मास्तुरेची भारत वि. इंग्लंड २०११ बाफ वरची पोष्ट --
मास्तुरे | 21 July, 2011 - 07:01
सेहवाग नसल्याची आपल्याला कसोटी सामन्यात खूप उणीव जाणवेल. धावांचा कितीही मोठा डोंगर पार करायचा असला तरी, सेहवाग आपल्या अत्यंत वेगवान व स्फोटक फलंदाजीने त्याचे दडपण नाहीसे करतो. त्याची फलंदाजी बघायला खूप मजा येते. ४ थ्या डावात धावांचा पाठलाग करायचा असेल तर, सचिन, लक्ष्मण, द्रविड इ. नांगर टाकून खेळतात. अशा वेळी सेहवाग पाहिजेच.
अरे तुम्ही आणि मी बघत होतो ती
अरे तुम्ही आणि मी बघत होतो ती मॅच एकच होती का? .....
मला स्वतःला असे वेळकाढू खेळणे आवडत नाही. पण कूर्मगतीचे कारण सांगितले.
>> +१ .. ... "जिंकले कि मॅच फिक्स होती नि हरले कि 'साले माजलेत, पैशासाठी खेळतात फक्त, देशासाठी खेळा म्हणावे' " त्याची हि सौम्य बाजू.
चिमण्या तुझे हे काय झाले आहे रे ? seriously ? ...
भारताचे रँकिंग शेवटचे हवे,
भारताचे रँकिंग शेवटचे हवे, मार्क वॉची खिल्ली
चला आज नि उद्या रात्री
चला आज नि उद्या रात्री महाजागरण.
सचिन, लक्ष्मण, गंभीर मिळून नेत्रदीपक फटकेबाजी करून हा हा म्हणता सहाशे हून अधिक धावा करून टाकतील नि मग पाचव्या दिवशी दिवस संपायला ५ मिनिटे राहिली असे पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना बाद करून सामना जिंकणार!!
असे आपले मला वाटते.
भारताचे फलंदाज म्हणत असतील च्यायला, आजच आटोपली मॅच तर उद्या दिवसभर झोप काडून रात्री एकदम रेव्ह पार्टी! मोराल बिल्ड अप करायला, पराभवाचे दु:ख (???!) विसरायला!! आज युवीची उणीव भासते आहे, तो नेहेमी मोबाइलवरून मैत्रिणींना बोलावून घेतो. सामना चालू असला तरी. बरे तर बरे आज क्षेत्ररक्षण नाहीये, इथे आरामात बसून फोन करता येतील.
१० ओव्हर्स मेडन काढल्या तर
१० ओव्हर्स मेडन काढल्या तर इतका तळतळाट करायला काय झालंय कळत नाही! शेवटच्या सत्रात ड्रिंक्सनंतर त्यांची बोलिंग जबरदस्तच होती. द्रवीड गेल्यानंतर आता दिवस संपता संपता आणखी विकेट नको जायला म्हणून झाले डिफेन्सिव्ह. त्यात काय एवढं? तसंही मॅच वाचवायला लांबच्या लांब खेळींची गरज आहे. परिस्थितीनुरूप तो अप्रोच योग्यच होता मात्र उद्या दिवसभर असंच डिफेन्सिव्ह खेळत राहायचा प्रयत्न केला तर खरंच अवघड आहे. मग उद्याच 'जय हिंद जय महाराष्ट्र!' होणार! (लॉर्ड्स कसोटीही आपण अति डिफेन्सिव्ह खेळून घालवली. अॅटॅकिंग खेळून वाचवू शकलो असतो असं माझं मत आहे.)
बाकी
३०० धावांच्या भागीदार्या ही ऑस्ट्रे. विरूद्धच्या सिरीज मधली आपली मक्तेदारी होती.
याच्याशी जोरदार सहमती. होपफुली आठवण होईल!
>> चिमण्या तुझे हे काय झाले
>> चिमण्या तुझे हे काय झाले आहे रे ? seriously ?
आयला असाम्या! इथे आपले सोकॉल्ड खंदे फलंदाज ३०० च्या वर धावा करू शकलेले नाहीत देशा बाहेरच्या गेल्या कित्येक सामन्यात आणि तू म्हणतोस माझं काय झालं आहे?
आणि तू म्हणतोस माझं काय झालं
आणि तू म्हणतोस माझं काय झालं आहे?>>आणि दर पोस्टमधे तू मास्तराच्या नावाने तळपट मोडलेस कि तिकडे ते तीनशे करणार असे वाटतेय का तुला ? तसे असेल तर मास्तरच काय माझ्याने नावाने केलस तरी चालेल
डावाने हरू बहुतेक पण पाचव्या दिवसापर्यंत नेली मॅच तरी मिळवली. baby steps मांजरेकर म्हणतो तसा aging ने खरच फरक पडला असावा असे मला प्रामाणिकपणे वाटू लागलेय. Slower reflex by fraction of second can make huge difference on faster pitches such as in down under. तशात स्टॅमिना नि concentration पण कमी झाला असणार. पुढच्या मॅचमधे शर्मा नि राहणे ला आणायला हरकत नसावी. खेळतोय त्याहून अजून काय वाईट खेळू शकतो. परत fielding agility पण वाढेल. पुढच्या दौर्यापर्यंत तेही तयार होतील. भाऊ Time for gradual phase out.
असाम्या, मला मालिकेबद्दल काय
असाम्या, मला मालिकेबद्दल काय वाटतं आहे ते मी सुरुवातीलाच लिहीलंय. मास्तरला नेमकं उलटं वाटतंय म्हणून त्याला चाव्या मारतोय मी!
शिवाय, सेहवागबद्दल काही महिन्यातच त्यानं किती पलटी मारली आहे तेही मला हायलाईट करायचं होतं.
मला वाटते सेहवाग, द्रवीड,
मला वाटते सेहवाग, द्रवीड, तेंडूलकर, लक्ष्मण, यांच्या ऐवजी रहाणे, रोहित शर्मा, नि आणिक कोण दोन तरुण लोक मिळाले तर बरे. गंभीर आत्ता खेळतो आहे तर फार तर एक अजून सामन्यात संधि द्यावी, पण नाहीतर त्यालाहि घरी बसवावे,
मला असे नक्कीच वाटते आहे, की हे सर्व खेळाडू खेळायचे म्हणून खेळतात, हरणे जिंकणे याच्याशी त्यांना कर्तव्य नाही. इतर ठिकाणी म्हातारे लोक जसे पगार मिळतो म्हणून दिवस रेटत असतात, काम होण्या न होण्याशी त्यांचा संबंध नसतो.
तरुण लोकांना अनुभव नसला तरी एकदम कसोटी सामन्यात खेळवले तर धीमेपणे, विकेट जाउ न देता धावा करायचा सराव होईल. एक दिवशीय काय नि २०-२० मधे काय, बेसबॉल खेळल्यासारखे खेळतात, आला चेंडू की फिरव बॅट, बाद झालो तरी पर्वा नाही, असले खेळण्यातून फलंदाजीचे तंत्र शिकणे कसे जमेल? त्यातून संघात नेहेमी घ्यावे असे वाटत असेल तर मन लाऊन जोमदारपणे क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करणे सुद्धा जमेल त्यांना!!
अरे चिमण, भारताने विश्वचषक
अरे चिमण, भारताने विश्वचषक जिंकल्यावर केवळ काही महिन्यातच शिखरावरून जी तळाला पलटी मारली ती माझ्या सेहवागबद्दलच्या पलटीपेक्षा कितीतरी जास्त खतरनाक होती.
च्यायला . . . सेहवाग, झहीर, लक्ष्मण, सचिन, धोनी, गंभीर . . . सगळ्यांनी तोंडघशी पाडलं आणि भारताचं तोंड काळं केलं. हे कुठे फेडतील ही पापे!
>>> मास्तरला नेमकं उलटं वाटतंय म्हणून त्याला चाव्या मारतोय मी!
तू कितीही चाव्या मार रे, माणूस फक्त आशेवर जगतो असं कोणतरी सांगून गेलं आहे. ३०० धावांची लक्ष्मणरेषा निदान या डावात तरी ओलांडणार का?
अजून एक गोष्ट सिद्ध झाली आहे.
अजून एक गोष्ट सिद्ध झाली आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड हे सर्वजण आपापल्या गल्लीत शेर आहेत हे या मालिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
<< ३०० धावांची लक्ष्मणरेषा
<< ३०० धावांची लक्ष्मणरेषा निदान या डावात तरी ओलांडणार का? > > लक्ष्मण येण्यापूर्वीच ही रेषा ओलांडली जाईल, या आशेवर जगायला काय हरकत आहे !!!
>> ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड
>> ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड हे सर्वजण आपापल्या गल्लीत शेर आहेत हे या मालिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
नो नो, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी जाऊन हरवलं आहे नुकतंच!
>> ३०० धावांची लक्ष्मणरेषा निदान या डावात तरी ओलांडणार का?
मला नाही वाटत तसं!
नो नो, इंग्लंडने
नो नो, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी जाऊन हरवलं आहे नुकतंच!>>For that purpose, Aus, England, SA, NZ इथल्या खेळपट्ट्ञांचे बेसिक रुपडे सारखेच आहे ना ? फरक म्हणायचा तर बॉल किती स्विंग कधी होईल नि बाऊन्स किती ह्यात फरक ना रे.
एक अत्यंत आनंदाची बातमी
एक अत्यंत आनंदाची बातमी -
उद्या सिडनेला पहाटे ४ ते १० वाजेपर्यंत पावसाची दाट (७०-८० टक्के) शक्यता आहे. सामना १०:३० ला सुरू होतो. त्यावेळी मैदान ओले असले तर सामना उशीरा सुरू होईल. ११ पासून २ वाजेपर्यंत पावसाची ४०-६० टक्के शक्यता आहे. २ नंतर ढगाळ वातावरण असेल.
चला मग मेघदेवतेला आवाहण करू
चला मग मेघदेवतेला आवाहण करू या.
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा ( ह्या ओळीवरून झक्की आता १ कोटी की किती हे विचारतील अन गणू बघा मॅच फिक्सींग केली असे म्हणेल. )
२ नंतर ढगाळ वातावरण असेल. >>
२ नंतर ढगाळ वातावरण असेल. >> बोंबला ! अहो बॉल स्विंग होउ लागला कि मग काय ? Swing and Indian batsmen don't go well together.
पाऊस पडला तर पूर्ण दिवसाचा खेळ वाया जावा नि संध्याकाळी लखलखीत उजेड पडून दुसर्या दिवशीपर्यंत खेळपट्टी ठणठणीत व्हावी अशी प्रार्थना करा.
Swing and Indians batsmen
Swing and Indians batsmen don't go well. >> असाम्या तुला नसलेल्या स्विंगची काळजी, अरे इथे फास्टच झेपेना आधी गेले ११ इनिंग्स. दोन्ही दिवस वाया जाऊदे.
दोन्ही दिवस वाया जाऊदे >>
दोन्ही दिवस वाया जाऊदे >> आमेन.
दोन्ही दिवस वाया जाऊदे >>
दोन्ही दिवस वाया जाऊदे >> आमेन
उद्या पहाटे उठून मॅच बघणार नाही, हे मात्र नक्की!!!!
मरण कसे येणार हे बघायचे आहे..
मरण कसे येणार हे बघायचे आहे..
आज महाशतक होणार आहे. कृपया
आज महाशतक होणार आहे. कृपया नोंद घ्यावीत सर्वांनी
पोस्ट टाकल्या टाकल्य हुकलं
पोस्ट टाकल्या टाकल्य हुकलं
८० वर गेला. सचिन लक्ष्मण
८० वर गेला. सचिन लक्ष्मण मस्त खेळले. आता लक्ष्मण-विराट खेळूदेत.
आज महाशतक होणार आहे. कृपया
आज महाशतक होणार आहे. कृपया नोंद घ्यावीत सर्वांनी
हा हंत हंत. तसे आज होणे नव्हते! हे तो त्या विधात्याची इच्छा!
हटकेश्वर, हटकेश्वर! आजचा दिवस खेळून काढणार का
Pages