कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन येणारया स्विफ्ट बद्दल काही माहीती हवी आहे...
मुख्य म्हणजे प्राइज काय असेल.. आत्ताच्या सेम व्हर्जन पेक्षा कीती जास्त असेल...
बुकींग नंतर कीती वेळ लागेल ... (मिळायला)

२५ ते ४० हजारांनी जास्त किंमत असणार आहे जुन्या स्विफ्टपेक्षा. बुकिंग सुरू झाले आहे. डिलीव्हरीज मात्र अजून नाही. वेटिंग पिरियड शोरूमलाच विचारणे सोपे होईल. बर्‍याच वेळा शोरूम बदलले की तोही बदलतो.

बजेट: ६ लाख (मॅक्स)
रनिंग: अंदाजे ५०० ते ६०० किमी महीना

पोलो, डिझायर, फॅबिया, इटिऑस, आय१०, आय२०, रिट्झ या सगळ्या गाड्या कंपेअर करुन डिझायरVXI आणि आय२० स्पोर्ट्झ शॉर्टलिस्ट केल्यात!

पण या दोन्हीत सोल्लिड कन्फ्युजन आहे... दोन्हीच्या किमती जवळपास ६ लाख ऑन रोड आहेत... फिचर्सही बरेचसे सारखे आहेत.... फक्त आय२० ला ड्रायव्हर सीटला एअरबॅग आहे जी डिझायरला नाहीये.... बाहेरुन डिझायर जास्त चांगली वाटते पण इंटेरीअरच्या बाबतीत आय२० ला तोड नाही!
ड्रायव्हिंग कंफर्ट ही दोन्हीचे जवळपास सारखेच ... डिझायर आकाराने जरा बोजड वाटते (शहारात फिरवायला) पण दिसायला भारी आहे.... आय२० फॅशनेबल वाटते तर डिझायर रुबाबदार Happy

कारवाले आणि तत्सम साईट्सवर फार संमिश्र मते आहेत... ज्याने अजुनच कन्फुज व्हायला होते!
आय्२०चे मायलेज १६(हायवे) आणि १२(सिटी) च्या आसपास जाते.... डिझायरVXIचे मायलेज नक्की कुणी सांगू शकेल का?
जाणकारहो... सल्ला द्या!

अजुन एक... दुसर्‍या सीटला Airbag, ABS, rear window wiper, fog lamps या फीचर्ससाठी ५० हजार अजुन देवुन आय२० अ‍ॅस्टा (टॉप एन्ड) घेणे वर्थ आहे का?

डिझायरचे मायलेज किंचित जास्त आहे. पण लुक्स मात्र 'डिस्प्युटेड' आहेत. पण ते तुम्हाला आवडले आहेत, तर बिन्धास्त घ्या. कारण स्विफ्ट डिझायर ही भारतातली सध्या तरी 'मोस्ट प्रॅक्टिकल एंट्री लेव्हल सेदान कार / सलून' आहे. आय२० ही डिझायरसारखी सेदान (म्हणजे नॉचबॅक) कार नसून 'हॅचबॅक' कार आहे. (म्हणजे लौकिकार्थाने 'स्मॉल कार'). पण इतर स्मॉल कार्सपेक्षा ती बरीच मोठी आणि इंप्रेसिव्ह आहे. आय२० ही सध्या तरी भारतातली 'हॉटेस्ट लुकिंग हॅचबॅक' आहे.

दुसर्‍या सीटला Airbag, ABS, rear window wiper, fog lamps या फीचर्ससाठी ५० हजार अजुन देवुन आय२० अ‍ॅस्टा (टॉप एन्ड) घेणे वर्थ आहे का? >> अर्थातच, हो. Airbag, ABS सारख्या सेफ्टी फीचर्सचा आता आपण सिरियसली विचार करायला सुरूवात करायला हवी.

साजिरा,
मला होन्डा सिटी, वेन्टो (पेट्रोल) ह्या दोन्ही कार्स छान वाटत आहेत.
अजुन १-२ महिन्यात घ्यायची आहे. होन्डा वाले बरेच मित्र आहेत, त्या सगळ्यान्चे म्हणणे, होन्डाच घे.
तुमचे काय मत आहे? वरना हा पण एक पर्याय आहे. पण अजुन तरी त्याचा फारसा विचार नाही केलाय.

धन्यवाद!.

वरनाचा विचार शक्यतो डिझेल मॉडेलसाठीच करा.

सिटी आणि व्हेंटो मध्ये माझे मत सिटीला. व्हेंटोचे लुक्स तुलनेने वाईट आहेत, हे एक कारण आहेच. पण इंजिन परफॉर्मन्स देखील सिटीच्या तुलनेत किंचित स्लगिश वाटला मला. (मात्र मी लाँग ड्राईव्हला नेली नव्हती व्हेंटो.)

काल नवीन स्विफ्टची टेस्ट ड्राइव्ह घेतली.... मस्त आहे...
पण तिथले मार्केटींग वाले त्याऐवजी रीट्स प्रमोट करत होते... स्विफ्ट vxi ५.३५ ला आहे आणी फक्त १०-१५ जास्त टाकुन तेच सगळे फिचर रीट्स zxi मध्ये आहेत. वगैरे सांगत होते....(स्विफ्ट आणी रीट्स दोन्हीचे इंजिन सेम फियाटचेच आहे...)
असे का बरं , मारुतीवालेच आलेली नवीन गाडी प्रमोट का करत नाहीयेत...(की यात डीलर मार्जिन्चा संबध आहे...?)

@मंगेश-

असे का बरं , मारुतीवालेच आलेली नवीन गाडी प्रमोट का करत नाहीयेत...(की यात डीलर मार्जिन्चा संबध आहे...?)

तुम्ही म्हणता त्यात (मार्जिन वगैरे) तथ्य असू शकेल कदाचित, पण माझ्या मते स्विफ्टचा वेटिंग पिरीअड बराच जास्त असल्याने ते असे करत असावेत. मारुतीच्या स्विफ्टवाल्या प्लँटमधे गेल्याच महिन्यात संप झाल्याने त्यांचे प्रॉडक्शन टारगेट पूर्ण होत नसल्याचे वाचले होते. त्यात नव्या स्विफ्टने मार्केटची नस अचूक पकडली आहे. स्विफ्टचा वेटिंग पिरीअड वाढल्यानंतर रिट्झ चा मासिक खप बराच वाढला आहे असे आकड्यांवरून दिसते आहे.
अर्थातच, डिलरच्या युक्तिवादात तथ्य आहेच. रिट्झ जास्त प्रॅक्टिकल आहे, स्विफ्टपेक्षा.

---------------------------
@इब्लिस-

नक्की काय विचारायचे आहे? Happy

स्वरूप तू निसान मायक्राचा विचार केला नाहीस का? त्या क्लास मध्ये सर्वसोयींनी युक्त्त अशी गाडी आहे. थोडी हॉर्सपावर कमी आहे पण राईड वगैरे एकदम स्मुथ. एकदा टेस्ट ड्राईव्ह घेऊन ये, मगच ठरव. टॉप ऑफ द लाईन ६.२० ला आहे व त्यावर साधारण ४०००० डिस्काउंट मिळेल.

व्हेंटो व सिटी मध्ये आता सिटीच. शिवाय आक्टो मध्ये MMC येत आहे त्यामुले सिटी लगेच घेऊ नका, तर आक्टो पर्यंत वाट पाहा. बरेच नवीन फिचर्स, बाहेर आणि आत ह्या मॉडेल मध्ये येत आहेत. मी पण वाट पाहतोय. Wink

ह्या गेल्या दोन आठवड्यात मी अनेक कार्स चालवल्या, सफारी, जेटा,व्हेटों,व्हर्ना ते सिव्हीक, अल्टीस इ इ . सर्वांवर एक राईटअप लिहायचा विचार आहे.

ह्या महिन्यात अनेक नविन गाड्या लाँच होत आहेत. उगाच जुनी गाडी (मॉडेल) नका घेऊ.

>>व्हेंटो व सिटी मध्ये आता सिटीच. शिवाय आक्टो मध्ये MMC येत आहे त्यामुले सिटी लगेच घेऊ नका, तर आक्टो पर्यंत वाट पाहा. बरेच नवीन फिचर्स, बाहेर आणि आत ह्या मॉडेल मध्ये येत आहेत. मी पण वाट पाहतोय.

केदार, धन्यवाद.
मी अजुनही घेतली नाही. मला टेस्ट राईड मधे व्हेंटोच मस्त वाटली, खुप स्टेबल वाटली. सिटी तेव्ह्डी स्टेबल नाही वाटली. व्हेंटोचे लुक्स खास नाहीत, १२/लिटर मायलेज, महाग सर्विसिन्ग ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.
Happy
नवीन सिटीची आक्टो पर्यंत वाट पाहीन मग निर्णय घेइन. घाई नाहीये, तो पर्यन्त जुनी सन्ट्रो पण विकली गेली तर ठिकच आहे.

पुंटो emotion की फिगो titanium ...दोन्ही diesel version च पहिल्यात ???? भयानक confusion आहे...
१ / २ दिवसात बुक करायचा विचार आहे

एक्सपर्ट च्या मतांची गरज आहे PLS

गाडी

या दोन्हींपैकी- पुन्टो एमोशन एनीटाईम.
कारण- फियाटचे सर्वोत्तम मल्टिजेट डिझेल इंजिन, जास्त स्पेस, फिगोपेक्षा कितीतरी चांगले लुक्स- आतून आणि बाहेरूनही (अर्थात हे सापेक्ष आहे), आणि अत्यंत बॅलन्स्ड ड्राईव्ह.

तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन पाहिली का? दोन्ही पाठोपाठ टेस्ट ड्राईव्ह कराल तर निर्णय घ्यायला मदत होईल असे वाटते.

होय आजच टेस्ट ड्राइव घेउन पहिली,
में हल्ली मारुती ८०० वर गाडी शिकले, त्यामुले पुंटो खुपच स्मूथ वाटली, पण सारखी बंद पडत होती, आणि मग ती ऑफ करून मग चालु करावी लागली. पण ते हल्ली मारुती चल्वालिये म्हणून ही असेल अस वाटल.
पुंटो emotion मधे ऐर्बग्स नाहीयेत, रिअर पॉवर विंडो आहेत.... फिगो तितानियम ला ऐर्बग्स आहेत
पुंटो लूक्स बयूतिफुल, लूक्स एकदम किल्लिंग आहेत Happy

एकून मी अजुनही निर्णय घेऊ शकलेले नाहीय Sad

गीतू निस्सान मायक्रा डिझेल चालवून बघा. इंटीरियर एकदम सुंदर. गाडी दिसते त्यापेक्षा खूप मोठी,इतरही अनेक गोष्टी. एकदा चालवून बघा. मगच ठरवा.

http://www.cardekho.com/compare-4car/Hyundai_i20_Sportz_Option_Diesel/Fi...

निस्सान मायक्रा बघितली, पण खुपच महाग आहे मज्यासाठी, ६.८ पण में बजेट स्ट्रेच केलय Happy खर तर मायाक्रा च्या लूक्स पण फार आवडल्या नाहीत .....

तुम्ही दिलेली comparison लिस्ट मात्र मस्त आहे...री थिंकिंग Happy

अभिनंदन. Happy

काल महिन्द्राची XUV500 लाँच झाली. लुक्स 'वेगळे' आहे. व्हॅल्यु फॉर मनी व्हेईकल वाटत आहे. लवकरच टेस्ट ड्राईव्ह घ्यावी लागेल.

केदार पण एक्सयूव्ही५०० च्या बॅक साईडच्या सिट्स लहान वाटतात आणि लेगस्पेस पण छान नसावी असे वाटते निदान फोटोजवरून तरी. टेस्ट ड्राईव्ह नंतर मत कळविणे.

३र्ड रो सिट तशीही अनकंम्फर्टेबल असते. देशात आल्यावर लगेच टेस्ट ड्राईव्ह घेणार. Happy

होंडाचं नवं मॉडेल ब्रियो/ब्रायो कस आहे? काही कल्पना? रिअर ग्लास खुप मोठा दिसतोय. हेअडलाईट्स आकाराने मोठ्या आहेत.

ब्रिओ मस्त आहे. होन्डा असल्याने परफॉर्मन्सचा प्रश्न नाहीच. तिच्या इंजिनचे खूपच चांगले रिव्ह्यूज येत आहेत.
किंमतही रास्त असेल असे वाटते. होन्डा डिझेल ऑप्शन मात्र देत नाहीच अजूनही. पेट्रोलच्या किंमती पाहता 'ब्रिओ' ला किती मार्केट मिळेल याची शंका वाटते.
आधी कुठल्याही हॅचमधे नसलेले एक वैशिष्ठ्य हिच्यात आहे- मागचा दरवाजा (हॅच) संपूर्ण काचेचा आहे. तुम्ही डिक्कीत काय ठेवले आहे हे सगळ्यांना दिसणार. Wink
हे चांगले की वाईट हे प्रत्येकाने ठरवावे, अर्थातच !

---------------------------------

@गीतू-

अभिनंदन ! फार चांगली कार निवडलीत तुम्ही. ईपी घेतले हे आणखीनच छान.

होंडा ब्रिओवर जाझचेच इंजिन आहे. रिट्यून करून मायलेज वाढवले आहे. पण त्यामुळे पिकअप अर्थात जाझसारखा मिळत नसेल.
ज्यांचे रनिंग महिना १२०० कीमी पेक्षा कमी आहे ..त्यांच्यासाठी पेट्रोलमध्ये अजून एक चांगला ऑप्शन! Happy

मला एक सल्ला द्या. मला रिलोकेट करायचे आहे. मुंबईत गाडी चालवायची नाहीये. तर फिगो विकून टाकू का गॅरेज मध्ये तशीच ठेवून देवू? अजून १२ महिन्याचे मंथली हप्ते भरायचेच आहेत. २०१३ मार्च ला हप्ते पूर्न होतील. येथील सोसायटीतील पब्लिक बदमाश आहे. माझी कार नसेल तर गॅरेज लगेच वापरायला घेऊन बळकावून टाकतील( असे मला वाट्ते) ते होउ नये म्हणून गाडी इथेच धूळ खात ठेवली तर? अशी लाँग टर्म गाडी बंद ठेवताना काय काळजी घ्यावी. ब्यट्री डिस्कनेक्ट करावी का? इतर काही सूचना मोस्ट वेलकम.

स्कूटर घेऊन जाऊ का इथेच विकून टाकू? व तिथे नवीन घेऊ?

ब्यट्री डिस्कनेक्ट करावी का >> त्याची गरज नाही. तशीही ती बंद पडेल, तुम्ही ठेवली तर तुम्हाला जम्प स्टार्ट करावी लागेल. त्याशिवाय आणखी कोणतीही काळजी घेण्याची आवशक्ता नाही.

गाडी अजिबात वापरणार नसाल तर विकलेली बरी असे मला वाटते. गराज तुमचे (तुम्ही विकत घेतलेले असेल) तर ते तसे करू शकणार नाहीत, फार तर तुमची जागा कोणीतरी वापरेन. पण त्यासाठी गाडी कशाला ठेवायची?
मी तर म्हणेन फिगो आणि स्कुटर घेऊन जा. बरी पडेल.

धन्यवाद. परवा मला एक फार चांगला म्हातारा टॅक्सीवाला भेटला. त्याला बोलून बघते. गाडी नेली तर मला ड्रायवर ठेवावाच लागेल. त्यापेक्षा इथून विकते व तिथे सेटल झाल्यावर नवी घेते. सहा महिने स्कूटर पे चला लेंगे.

Pages