इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
मामी... फिगो बद्द्ल काय मत
मामी... फिगो बद्द्ल काय मत आहे तुमचे...
मी विचार करत होते...
फिगो SOHC engine आहे. जमाना
फिगो SOHC engine आहे. जमाना DOHC चा चाललाय.
म्हणुन फिगो स्वस्त आहे.
http://www.samarins.com/glossary/dohc.html
साजिरा, मी ही लिंक वाचूनच
साजिरा, मी ही लिंक वाचूनच मायबोलीवर आले आहे. मला प्लीज मदत कराल का?
भावली, कसली मदत हवीय? आर्थिक
भावली, कसली मदत हवीय?
आर्थिक मदत साजिरा करत नाहीत.
आपल्याला गाडी कुठली घ्यावी हे ठरवायला मात्र साजिरा नक्की मदत करतील.
किरु, मला पाच ते सहा
किरु,
मला पाच ते सहा लाखापर्यंत गाडी घ्यायची आहे. i१0 /swift /ritz/ indica vista यात गोंधळ झालाय. डिझेल की पेट्रोल हेही ठरत नाहीये. तर याकरता माहिती हवी होती. निसानच्या गाड्या या रेंजमधे येतात का? काही अनुभव?
साजिरा येतोच्चे... तोवर
साजिरा येतोच्चे...
तोवर तुम्ही हे वाचा स्विफ्ट बेस्ट.
फायनली वॅगन आर कॅन्सल करुन आय
फायनली वॅगन आर कॅन्सल करुन आय १० मॅग्ना घेतली. १०-१२ दिवसात डीलीवरी मिळेल. भयंकर कन्फ्युजन होते. सँट्रो चालवून (म्हण्जे ड्रायव्हींग क्लासला हीच गाडी होती) पाहील्यावर आवडली म्हणून ह्युंडाईचीच गाडी घ्यायची असे ठरवून आय १० घेतली.
भावली, तुमच्या प्रश्नाचं
भावली, तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर इथल्या आतापर्यंतच्या प्रतिसादांत आहेच.
पेट्रोल की डिझेल हे आधी ठरवायला हवं. जास्त वापर, रनिंग असेल, तर डिझेल गाड्या घेतल्या जातात. त्यांचे मायलेजही पेट्रोल गाड्यांपेक्षा चांगले असते. पेट्रोल आणि डिझेलमधल्या किंमतीच्या फरकामुळे रनिंग कॉस्ट डिझेल गाड्यांची बर्यापैकी कमी असते. जास्त मेंतेनन्स असलेल्या गाड्या म्हणून आजवर डिझेल गाड्या ओळखल्या जायच्या, आता तसं काही राहिलं नाही. डिझेल इंजिनांच्या नवनवीन तंत्रज्ञानांमुळे मेंटेनन्स कॉस्ट कमी होण्यास मदत झाली आहे. सर्व्हिस इंटर्व्हल्सदेखील ३ ते ५ हजार किमीवरून १५ हजार किमीपर्यंत वाढलेले आहेत. पारंपारिक डिझेल इंजिनांचे आवाज, व्हायब्रेशन्स यासकट इतर छोटेमोठे प्रॉब्लेम्स देखील खूपच कमी झाले आहेत.
पॉवर, पिक अप, कमी आवाज-प्रदूषण-मेंटेनन्स, रनिंगमधला स्विफ्ट्नेस आणि चालवण्यातला डिझेल गाड्यांच्या तुलनेतला थोडा जास्त आराम- यासाठी पेट्रोल गाड्या घेतल्या जातात.
आय १० ही डिझेल मध्ये नाही. इतर गाड्या डिझेल-पेट्रोल अशा दोन्ही प्रकारांत आहेत. या दोन्ही प्रकारांत उरलेल्या तिन्ही गाड्यांना एकच म्हणजे फियाटचे इंजिन आहे. फॉर्म, फिट, फिनिशच्या दृष्टीने आणि इफिशियंट आणि वाईड सर्व्हिस नेटवर्कच्या दॄष्टीने मारूतीच्या गाड्या सोयीस्कर आहेत, पण इंडिका व्हिस्टापेक्षा स्विफ्ट आणि रिट्झच्या किंमती जास्त आहेत. या चौघांना सध्या फॉर्मात असलेल्या फोर्ड फिगोची चांगली स्पर्धा आहे.
खरे तर लुक्स आणि स्टायलिंगच्या दृष्टीने विचार केला, तर तुम्ही म्हटलेल्या चारही गाड्या 'जुन्या' म्हणता येतील अशी परिस्थिती आहे. या द्रूष्टीने निस्सान मायक्रा, फोक्सवॅगन पोलो, फियाट पुंटो, शेवर्ले बीट, हुंडाई आय २०- अशी नवी पिढी मार्केटमध्ये समर्थपणे उतरली आहे. अजूनही काही येत आहेत.
हो, पेट्रोल निस्सान मायक्रा साडेपाच ते सहा लाखांच्या दरम्यान येते. मी अजून चालवली नाही, मात्र तिचे रिपोर्ट्स खरेच चांगले आहेत.
डिझेल गाड्या अर्थातच लाखा दोन लाखांनी महाग असतात. (किंमतीची रेंज ४ ते १२ लाख अशी पकडली आहे.)
धन्यवाद साजिरा. sorry, for
धन्यवाद साजिरा. sorry, for the delayed reply. केवढी डीटेल माहिती सांगितलीत! डिझेल गाडी घ्यायची असंच मनात आहे. पण बजेट्चाही विचार करावा लागेल. हा थ्रेड खरंच खूप उपयोगी आहे. नाहीतर मला इतक्या सोप्या भाषेत ही माहिती कशी मिळाली असती... खूप खूप आभार तुमचे साजिरा.
योगिता मला फिगो नीट आवड्ते.
योगिता मला फिगो नीट आवड्ते. एक वर्ष झाले काहीही त्रास नाही. फक्त गाडीत म्युझिक सिस्टिम आहे त्यास रिमोट नाही त्यामुळे मागे बसून गाणी पुढे मागे करता येत नाहीत. ते इंजीन जुने आहे वगैरे मला आजच कळले. कंपनी सांगत नाही अश्या गोषटी. पण मला फार तगडा पर्फॉरमन्स नको आहे सिटीत इकडे तिकडे जाणे, क्लासला मुलीला सोडणे, कुत्रे फिरविणे, रात्रीच्या काही दावत वगैरे असतील तर जाणे ह्यापुरतेच मला गाडी लागते. घरात हौशी चालविणारे असतील तर वर साजिराने सांगितलेल्या गाड्यांचा जरूर विचार करावा.
पर्सनली मला हाय एंड जर्मन गाड्या खूप आवड्तात.
फिगो SOHC engine आहे. जमाना
फिगो SOHC engine आहे. जमाना DOHC चा चाललाय.
म्हणुन फिगो स्वस्त आहे.
http://www.samarins.com/glossary/dohc.html
>>>
इकडे काहीतरी कन्फुयजन दिसते आहे.. कारण नेटवरच्या स्पेसिफिकेशन मध्ये फिगो DOHC दाखवली आहे....
.
दिप्स.. सेम पिंच होणार बहुदा.. मी पण अल्मोस्ट वॅगन आर फायनल केली होती, पण खुप कन्फुयजन मध्ये परत अडकलो आहे.. आता फिगो की आय १०...
तु कोणत्या पॉइंट वर फायन्ल केलेस
डिझेल फिगो SOHC ( ही जर DOHC
डिझेल फिगो SOHC ( ही जर DOHC असती तर अजुन १ लाखाने महाग असती )
पेट्रोल फिगो DOHC आहे.
हाय साजिरा, टेस्ट राईड
हाय साजिरा,
टेस्ट राईड केल्यावर मला 'शेवरोले बीट' ही कार आवडली. सौ आणि मुलांनाही कार चा लूक वैगैरे आवडला टेक्नीकली या कार ची वैशिष्ट्ये काय आहेत? फॅमिली कार म्हणुन या कारचा उपयोग कसा होईल? थोडक्यात, ही कार घ्यावी का? प्लीज मदत करावी..:)
गिरिश, बीट नक्कीच चांगली कार
गिरिश,
बीट नक्कीच चांगली कार आहे. आता डिझेल ही आलीय बाजारात. ती जास्त चांगली आहे (मायलेज पाहीलं तर) असं रिव्हू सांगतो. फक्त पेट्रोलपेक्षा महाग आहे एवढच.
बाकी साजिरा बोलेलच. त्याचा व्यासंग चांगला आहे.
साजिरा, एकूण अभ्यास केल्यावर लक्झरी कार्समध्ये शेव्रोले (डिझेल) चांगली वाटते. तुझा अंदाज काय?
'बीट'चे लुक्स थोडे
'बीट'चे लुक्स थोडे 'डिस्प्युटेड' या प्रकारात गणले गेले असले (अनेक लोकांना तिचे शार्प कर्व्ह्ज अँड कॉर्नर्स आवडत नाहीत), तरी अत्यंत फ्युचरिस्टिक डिझाईन असलेले एक्स्टेरियर या गाडीला लाभले आहे. पेट्रोल इंजिनचा विचार केला, तर जवळपास याच शक्तीची इंजिने असलेल्या इतर गाड्या आहेत- आय१०, स्विफ्ट, रिट्झ, पोलो, पुंटो १.२ आणि फिगो. यांच्याशीच बीटची थेट तुलना होते. यातल्या स्विफ्ट आणि रिट्झ खरे तर एकच गाडी आहे. फक्त आकार थोडा वेगळा. पण रिट्झचे दिसणेही थोडे बीट सारखेच 'डिस्प्युटेड' असे म्हणता येईल. स्विफ्ट या सगळ्या गाड्यांत सर्वात जास्त चालणारी गाडी असली, तरी तिचे वय आता दिसायला लागले आहे, शिवाय वरच्या इतर गाड्यांच्या तुलनेत तिचे किंचित कमी असलेले मायलेज. हे पेट्रोल गाडीबद्दल. (डिझेल स्विफ्टचाच खप तुलनेने खूप जास्त असेल).
लुक्सचाच विचार केला तर पुंटो ही यातली हॉटेस्ट लुकिंग कार. पण तिचा ग्लोबाकाराबद्दलही पुन्हा तेच- लवकर आऊटडेट होऊ शकणारा- आणि म्हणूनच कुणाला आवडेल, कुणाला नाही. इंजिनाच्या बाबतीतही फियाटच्या गाड्या गुणाच्या असल्या, तरी फियाटचे टाटांशी झालेले लग्न- हाही कळीचा मुद्दा. टाटांच्या अफाट आफ्टर सेल्स सर्व्हिसने गेल्या दोन वर्षात अनेक फियाटच्या ग्राहकांना शिव्या मोजायला लावले असेल.
आय१० हे या कॅटेगरीतले, आणि पेट्रोल व्हर्जन्समधले यशस्वी मॉडेल असेल. आता नवीन टिकली बांगडी करून पुन्हा नव्याने बाजारातही ती आलीय. पण असे थोडाफार मेकप करून तीच गाडी नव्याने बाजारात येऊ लागली, की समजावे, गाडीचे वय झालेय, आणि शेवटी शेवटी सुगी कापून घ्यायचा प्रयत्न चाललाय. अर्थात असे सार्याच कंपन्या करतात. फॉर्मात असलेले मॉडेल अचानक मार्केटमधून काढून घेण्याचे साहस खूपच क्वचित आणि टोयोटासारखी एखादीच कंपनी दाखवू शकते.
नव्याचे आकर्षण असलेले, आणि परिणामांची फारशी पर्वा न करणारे लोकांचा एक खास वर्ग असतो. असे लोक रिस्क घेऊन, रिझल्ट्सची वाट न बघता नवीन वस्तू घेतात. (व्यक्तीशः माझे मत थोडेफार तशा लोकांशी जुळते. ) 'बीट'च्या बाबतीत तर इतकी रिस्कही नाहीये. गाडी बाजारात येऊन बरेच दिवस झालेत. अजूनही तिचे लुक्स, इंटेरियर, इनोव्हेटिव्ह बिल्ड (पाहा- आतले इंस्ट्रूमेंट पॅनल, मागच्या दरवाजांची हँडल्स, टेललँप्सचे डिझाईन इ.) फ्रेश आणि फ्युचरिस्टिक वाटतात. इतर गाड्यांपेक्षा ही थोडी छोटी भासते. पण तशी खरे तर ती नाही. किंमतीच्या बाबतीत तिच्याशी समर्थ स्पर्धा फक्त 'फोर्ड फिगो' करू शकेल.
वरच्या गाड्यांशी टेक्निकली तुलना करून बघायची असेल, तर मी काय सांगणार? थेट http://www.chevrolet.co.in/content_data/AP/IN/en/GBPIN/001/beat-compare.... इथेच पाहा.
डिझेल बीट मात्र मी अजून चालवून बघितली नाही. पण किंमत जास्त असली, तरी ती 'व्हॅल्यु फॉर मनी' असणार. हे नक्की.
किरू, तू शेवर्ले 'क्रूझ'
किरू, तू शेवर्ले 'क्रूझ' बद्दल म्हणत असशील, तर हो. प्रचंड परफॉर्मन्स देणारे हे इंजिन आहे. अक्षरशः 'टेक-ऑफ' फील असलेले हे इंजिन मला खूप आवडले आहे. शिवाय हे २.० लिटर्सचे इंजिन सिटी-ट्रॅफिकमध्ये १.२ किंवा १.३ सारखे वागते आणि नेव्हिगेशन अगदीच स्विफ्ट, सॉफ्ट अँड क्विक होते- हे तर फारच भारी.
तिच्या क्लासमधल्या करोला आल्टिस, सिव्हिक, जेट्टा, सुपर्ब या गाड्या चालवून बघितल्या तर हे लक्षात येते. तिची किंमतही जेट्टा आणि सुपर्बपेक्षा थोडी कमीच आहे. (१६ लाखांच्या आसपास). माझ्या मते ती तिच्या या स्पर्धक गाड्यांपेक्षा दिसतेही छान, मोठी आणि हॉट.
मी क्रुझबद्दलच बोलत होतो.
मी क्रुझबद्दलच बोलत होतो. लिहायच राहूनच गेलं वर.
गाडी खरच मस्त आहे. व्हॅल्यू फॉर मनी.
किरू, क्रूझ डिझेल
किरू, क्रूझ डिझेल ब्येस्टच.....
बरेच दिवस या धाग्यावर फिरकलो नव्हतो.
साजिरा,
जरा इनोव्हा की टाटा अरिआ???? तुझा अहवाल सांग.
कारवाले आणि इतर ठिकाणहून माहिती काढतोच आहे पण प्राईज पासून परफॉरमन्सपर्यंत तुला डिटेल माहिती असेल तर दे. अरिया डिझाईन लई आवडलय्.....ओव्हरऑल लुक्स पण आणि स्पेससुध्दा. फक्त प्राईज उगाच जास्त वाटतेय. ढीगभर सेंसर्स टाकलेत, का तर अरियाची काँपीटिशन सीआर्व्ही, कॅप्टिवाशी आहे. पण मग त्या प्राइइजमध्ये रिलायबल इनोव्हा बरी वाटते.
अरिया साईज पण मोठी, पार्किंग आणि छोट्या गल्लीत घालायचे वांदेच जास्त. पण डिझाईन मनात भरलय.
आपली एक्सपर्ट कमेंट
अरे इतक्या दिवसात कोणाची
अरे इतक्या दिवसात कोणाची काहीच एक्सपर्ट कमेंट नाही "अरिया"वर.......
इतकी बकवास गाडी आहे की काय???? टाटावाले तर म्हणतायत, त्या सेगमेंटमधली सेकंड बेस्ट सेलिंग कार आहे. (मग फर्स्ट कुठली हा भा.प्र. विचारायला मी विसरलोच)
कमेंटच्या प्रतिक्षेत.....
भुंग्या, अरे सॉरी हा. लक्षात
भुंग्या, अरे सॉरी हा. लक्षात नव्हते आले. मित्राला इथली एक पोस्ट मेल करण्यासाठी उघडले, तेव्हा बघितले. मला माहिती आहे, तेवढे लिहितो थोड्या वेळात.
@गिरीश- 'बीट' बद्दल साजिराने
@गिरीश- 'बीट' बद्दल साजिराने लिहिले आहेच. त्यात नवे काही भर घालण्यासारखे नाही. तुम्हाला तिचे लुक्स आवडत असतील, तर गो फॉर इट. फक्त एक निगेटीव्ह सांगतो- तिचे मागचे सीट्स फारच लहान आहेत (किंवा वाटतात). मागच्या खिडक्या फारच लहान असल्याने मागे बसणार्याला जरा क्लॉस्ट्रोफोबिक वाटते.
लांबून पाहिले तर ही चक्क टू-सीटर कार दिसते.
'आरिया' हे टाटाचे क्रॉसओव्हर व्हेईकल आहे. माझ्या मते, इनोव्हाशी त्याची तुलना होणार नाही.
सहा एयरबॅग्ज, जीपीएस, फोर व्हील ड्राईव्ह, अत्याधुनिक इंटिरीअर्स, चिल्ड ग्लोव्हबॉक्स यांसारखे टाटांनी पहिल्यांदाच दिलेले फीचर्स हे याचे विशेष म्हणता येतील. टाटाने उत्पादित केलेली ही आजवरची सर्वोत्तम कार ठरू शकते, असे मला वाटते. बाकी साजिरा सांगतीलच.
@साजिरा- (ग्रॅन्ड व्हिटारा वगळता) सर्वात महाग मारूती-'किझाशी' बद्दल काय मत आहे?
'स्पोर्ट लक्झरी सेदान' हा काय प्रकार असतो?
साजीरा, ज्ञानेश, किरु...
साजीरा, ज्ञानेश, किरु... धन्स! मी 'बीट' 1.2 LT बूक केली आहे (ग्रीन कलर), पाडव्याच्या दिवशी डिलिव्हर होणार..:)
इटिऑस कशी आहे?
इटिऑस कशी आहे?
इटिऑस...... आता बूक केली तर
इटिऑस...... आता बूक केली तर ऑक्टोबर नंतर डिलिव्हरी मिळेल (निदान मुंबईत तरी). इतके दिवस थांबणार का???? परफॉर्मन्स वाइइज गाडी मस्त आहे, लाँच होताना गाजावाजा करत आली होती. पण प्रत्यक्ष बसलो तेंव्हा लक्षात आलं........ थोड्याफार प्रमाणात "लोगान" सारखं डिझाइइन आहे.
पर्फॉर्मन्स नक्कीच तगडा आहे पण स्पेसवाइइज डिट्टो "लोगान". काय उपयोग????
Interior लोगान सारखे आहे पण
Interior लोगान सारखे आहे पण external look खुप चान्गला आहे .....
अरिआ best आहे.....फक्त front lamps सोडुन.....
Interior लोगान सारखे आहे पण
Interior लोगान सारखे आहे पण external look खुप चान्गला आहे .....
>>>
मलाही तोच आवडला होता. पण मुळात आतली जागा तेवढीच असेल तर काय मजा नाय बा......
साजीर्या, ईस्टिलो बद्दल
साजीर्या, ईस्टिलो बद्दल सविस्तर लिहना.
मारुतीच्या शोरुममधे आजकाल सगळे सेल्सवाले हि गाडी घ्या म्हणतात. तुझं मत येऊदे.
एस्टिलोपेक्षा वॅअन आर
एस्टिलोपेक्षा वॅअन आर एनीटाइइम व्हॅल्यु फॉर मनी. वॅगन आर सोडून सगळ्याच मारुती गाड्यांवर मेजर डिस्काऊंट स्कीम्स चालल्यात.
माहिति खुप च छान. पण अशि
माहिति खुप च छान. पण अशि महिति जुन्या गाडिसाठि हवि आहे.जर कोनाचि विकायचि असेल तर अवश्य लिहा.
किझाशी, सिव्हीक, पसाट,
किझाशी, सिव्हीक, पसाट, अॅकॉर्ड, निसान स्कोडा सुपर्ब, ह्या सगळ्या गाड्या इंजिन आणि आराम ह्याला मोजाव्या लागणार्या पैशाच्या तुलनेत फार महाग आहेत. अगदी डबल. स्पेशली अमेरिकेत राहिल्यावर तिथे येउन ह्या नॉन प्रिमियम गाड्यांना एवढे पैसे देणे म्हणजे जरा जास्तच. मला किझाशी फार आवडली आहे आणि ऑलमोस्ट घ्यावी असे ठरवले होते. (लॉन्चच्या आधी जेंव्हा १२ लाख किंमत प्रिडिक्ट केली जात होती) आता १८ लाखाला २.० लिटरची देणे निव्वळ पणा ठरेल असे वाटत आहे त्यामुळे बॅक ऑफ.
त्यापेक्षा वेन्टो व सिटी ह्याची तुलना (तशी काही बाबतीत होऊ शकत नाही) पण केलेली बरी. १७-१८ आत्ता घालन्यापेक्षा ८.५ ते १०.५ मध्ये बर्यापैकी चांगली गाडी येऊ शकते.
टाटा आरिया मला आवडली. मी मध्ये बसलो होतो पण ड्राईव्ह केली नाही. टाटा प्रायमा येण्याची वाट पाहत आहे.
Pages