इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
केदार, योगायोग असा की मलाही
केदार, योगायोग असा की मलाही वाटत होते की नॅनो मुंबई पुणेही करणार नाही....तर परवा गावाला जाताना चक्क कशेडि घाटाच्या माथ्यावर जिथे रत्नागिरि आणि रायगड्ची हद्द येते तिथे नॅनो बघितली. म्हटले गाडी कशेडी चढली म्हणजे कमालच झाली..... धक्काच होता तो.......
कशेडी चढला. नॅनो घ्या!!
भ्रमरा.. कुठच्या घाटात (अगदी
भ्रमरा..

कुठच्या घाटात (अगदी माथेरानच्याही) नॅनो दम सोडेल, असं मला अजून तरी वाटत नाही. पण सरसकट रोज बाहेरगावी फिरविण्याची ही गाडी नाही, हे केदारचे मतही मान्य.
म्हणजे नुसती 'पहिली लाख-दोन लाखाची गाडी' माझ्याकडे आहे या क्रेझपायी घेणं व्यावहारिकदृष्ट्या बरोबर नाहीच. >> अगदीच बरोबर. नुसत्याच 'क्रेझ'पायी गाडी घेतली तर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. घेतलेली गाडी ४-५ वर्षे तरी वापरणार- या दृष्टीने म्हणतो आहे.
माझ्या मते, नॅनो घेण्याचा निर्णय खालील प्रकारांतले लोक घेऊ शकतात.
१) चारचाकी हवी आहे. कमीत कमी किंमतीत. कारण रोज आणि फार उपयोग नसणार आहे. जास्त पैसे मोजू शकत नाही; किंवा मोजू शकतात, पण 'लाखो' रुपये नुसत्याच 'हौसे'पोटी किंवा माफक उपयोगासाठी घालवायचे का, याचा तर्कशुद्ध विचार करणारे. चार लाखांची गाडी घेण्यापेक्षा २ लाखांची घेईन आणि २ लाखांचे एफडी करेन- असा विचार करणारे. स्टेटस सिंबॉल किंवा सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा 'युटिलिटी आणि रिटर्न्स'चा जास्त विचार करणारे. हे लोक कनिष्ठ्वर्गीय किंवा मध्यमवर्गातच असतील असे नाही, तर कुठच्याही वर्गात असू शकतात.
२) घरात आधीच मोठी, सेदान कार आहे. आठ-दहा लाख किंवा त्याच्याही वरची. 'स्टेटस सिंबॉल'ची भूक भागलेली आहे. पण प्रत्येक वेळी ते धुड बाहेर काढा, कटकटीच्या आणि आपल्या भारतीय पद्धतीच्या वाहतुकीत चालवत न्या, पार्किंग शोधायला तासन्तास घालवा- हे नको आहे. शिवाय ही सेदान कार घरातले बाईमाणूस चालवू शकत नाहीये. किंवा घरात गाडी चालवणारी माणसे वाढली आहेत, पण आताच उगाच महागडी कार लगेच घ्यायची नाहीये. नॅनो प्रकारातली कार स्वस्त असल्यामुळे, नवीन असली (आणि तिचे रिव्ह्युज अजून कळले नसले) तरी प्रयोग करून बघायला हरकत नाहीये..
३) ब्रँड-लॉयल्टीवाले कलंदर लोक. एखाद्याच ब्रँडच्या सार्या गाड्यांचे यांना कलेक्शन करायची हौस आहे. हे फारच निवडक असले, तरी युटीलिटीच्या पलीकडचा विचार करून ताफा बाळगणारे लोक मी पाहिले आहेत.
--
वरच्या कुठच्या कॅटेगरीत आपण बसतो, याचा विचार करायला हवा. 'नवश्रीमंत मध्यमवर्गीयां'चा नवीन क्लास आता उदयास आला आहे / येऊ घातला आहे. हा वर्ग बर्यापैकी बुद्धीवादी आणि लाईफस्टाईल जपणारा आहे. 'कंझ्युम करणे' शिकलेला आहे. कर्जाचा बागूलबोवा न वाटणार्यांतला आहे. बर्यापैकी कमाई असल्यामुळे, बर्याच तरुण वयात घर घेऊन झालेले असल्यामुळे (किंवा लवकरच घेणार असल्याने) 'स्टेटस सिंबॉल'ची हौस आहेच. पण खूप प्रयोग करून बघण्यात पैसे वाया घालवायचे नाहीत. घेत असलेली गाडी साग्रसंगीत विचार, तुलना आणि अभ्यास करून घ्यायची आहे, कारण ती कमीत कमी ५ वर्षे तरी वापरायची आहे. गाडी घेतल्यानंतर काहीच महिन्यात 'आणखी थोडे पैसे टाकू शकत होतो की..' असा विचार मनात यायला नको आहे.
या सार्या 'लॉजिक' मध्ये नॅनो बसत नाही, हे नक्की.
मी नॅनो सावंतवाडीला बघीतली
मी नॅनो सावंतवाडीला बघीतली आहे.
नॅनो ची र्चचा चालु आहे म्हणुन
नॅनो ची र्चचा चालु आहे म्हणुन एक प्रश्न -
बजेट कमी असेल तर नॅनो घ्यावी का एखादी सेकंड हन्ड प्रिफर करावी ?
आणि महिंद्राच्या लोगानबद्दल
आणि महिंद्राच्या लोगानबद्दल काय मत आहे तुझं साजिर्या?
किरु, इथेच दुसर्या पानावर
किरु, इथेच दुसर्या पानावर थोडी चर्चा झालेली आहे लोगानवर. महिंद्रा आणि रेनॉ यांचे कोलॅबोरेशन आता संपल्यात जमा आहे. रेनॉ स्वतंत्रपणे भारतात पॅसेंजर कार्समध्ये उतरते आहे. स्वतंत्र सेल्स-सर्व्हिस नेटवर्कसह.
सचिन, वरच्या नॅनोच्या पोस्टमध्ये थोडेफार उत्तर आहेच. शिवाय, तुमचे बजेट किती आहे; कॅश पेमेंट आहे की लोन; ती किती वर्षे वापरणार आहात; फीचर्सवर तडजोड करणार की गाडीच्या नव्या-जुन्या असण्यावर अशा अनेक मुद्द्यांवर ते अवल्ळ्बून आहे.
धन्यवाद साजिरा. नविन Alto K10
धन्यवाद साजिरा.
नविन Alto K10 ३ लाख, कमी बजेट आणी long term वापरासाठी योग्य वाटत आहे ...
साजिर्या, छान सविस्तर उत्तर
साजिर्या, छान सविस्तर उत्तर दिलेस माझ्या प्रश्नाला. त्यामुळे तूर्तास नवी नॅनो घेणे लांबणीवर.
अगदीच वाटलं तर तुझी आहेच.

अश्विनीमामी - होंडा
अश्विनीमामी - होंडा सीआरव्हीला माझे मत जाईल. >>>> पूर्णपणे अनूमोदन. माझीही आटूकमाटूक CRV आहे गेली ३ वर्षं. प्रशस्त आणि भरवशाची. ती घेऊन आम्ही भटक भटक भटकलोय. मुंबई - कूर्ग पण केलयं आणि येताना बंगलोर-मुंबई एका दिवसात आलोय. गाडिनं कधिही काहिही त्रास दिलेला नाही. कुठेहि जाताना एक रूमच घेऊन गेल्यासारखे वाटते.
आता आता पर्यंत माझ्या मुलीची निम्मी पुस्तकं आणि खेळणी गाडीत असायची. मागे बसून खेळत, वाचत, छोट्या खुर्च्या टाकून बसायची. आता उंची वाढल्यामुळे बंद झालं.
आधी सफारी होती. ती खरंतर आणखी मोठी होती. पण खुप vibrations जाणवायचे.
एक अश्विनिमामी आणि दुसरी
एक अश्विनिमामी आणि दुसरी CRVमामी........
(क्रुपया दिवा बिवा काय म्हणतात तो घ्या बरे का..... :खोखो:)
अरे गाड्यांचा बीबी आहे
अरे गाड्यांचा बीबी आहे हेडलाइट घेऊ कि टेल लाइट? ब्रेक लाइट कि इंडिकेटर. काय ब्वा?
शिवाय ही सेदान कार घरातले
शिवाय ही सेदान कार घरातले बाईमाणूस चालवू शकत नाहीये.
>>
जेन्डर बायास दर्शविणारे हे विधान वाचून खेद वाटला.
(दोन्ही)मामी रॉक्स!
(दोन्ही)मामी रॉक्स!
जेन्डर बायास दर्शविणारे हे
जेन्डर बायास दर्शविणारे हे विधान >> डोंबलं तुझं! त्या वाक्याच्या आधी 'जर / समजा' असे अध्याहृत आहे. ती फक्त एक शक्यता आहे. कार चालवता येत असली तरी फोबिया असू शकतो की. आणि तो कुणालाही असू शकतो. अगदी फुलस्टॉप ठेवल्याच्या थाटात विधान केलेस.
नविन Alto K10 ३ लाख >> हम्म. याचसाठी म्हणत होतो याआधी की के-सिरिजच्या इंजिनासह आल्याशिवाय अल्टो घेऊ नका. आधीच्या अल्टोला ८००सीसीचे म्हणजे मारुती८०० चे इंजिन होते. आता ही गाडी स्पार्कला नक्कीच वरचढ ठरेल.
आशूडे, नॅनोची पहिली सर्व्हिस देखील झाली. घेऊन जा.
जेन्डर बायास दर्शविणारे हे
जेन्डर बायास दर्शविणारे हे विधान >> डोंबलं तुझं! >> अगदी अगदी त्यात कसला हो बायस कैतरीच.
विक्रम३११, होन्डाची ज्याझ
विक्रम३११, होन्डाची ज्याझ कधीच आली आहे भारतात. मध्यन्तरी (CNBC - Overdrive) मधे होन्डाची ज्याझ आणी स्कोडाची फाबीआ यान्ची तुलना दाखविली होती. होन्डाची ज्याझ नक्किच ऊजवी ठरली कारण
१) ऐसपैस जागा ( ईतकी कि आपण दोन्ही हात आरामात लाम्ब करून आळस देउ शकतो).
२) कुलिन्ग
३) होन्डा म्हटल्यावर नो प्रोब्लेम...
४) अगदी मोठ्ठी Front Glass
५) किल्लिन्ग लूक
६) फ्युल एफिशिअन्शी ठिकठाक.....
७) चान्गला ग्राऊन्ड क्लिअरन्स
८) लेग स्पेस....
अश्विनीमामी, चिंगी आपल्या
अश्विनीमामी, चिंगी आपल्या दोघींना दगड म्हणाली ....
होन्डाची ज्याझ >> मिनी
होन्डाची ज्याझ >>
मिनी इनोव्हा वाटते. लेग स्पेस चांगलि आहे. इंटिरीयर झकास आहे. गाडी पेट्रोल आहे.
साजिरा, ट्यूबलेस टायर्स
साजिरा, ट्यूबलेस टायर्स बद्द्ल मी इथे विचारलंय. तुझं मत काय?
मामी मला तुझ्या सीआर्वीतून
मामी
मला तुझ्या सीआर्वीतून फिरव. मी तुला सँडविच खायला आणेन. कारगट्ग. चिंगटले तू पण यायचं.
साजिरा भाऊ रागावू नका. मला
साजिरा भाऊ रागावू नका. मला फक्त खेद वाटला. बाइमाणूस चालवू न शकल्याचा. तुमच्या विधानाचा नाही. तुम्ही फक्त वस्तुस्थिती नमूद केलीय.त्यानी सेदान गाडी चालवायला शिकले पाहिजे .सक्षम झाले पाहिजे. .
इथं खेद वाटण्याचंही स्वातंत्र्य नाही का?
मला तुझ्या सीआर्वीतून फिरव.
मला तुझ्या सीआर्वीतून फिरव. मी तुला सँडविच खायला आणेन. कारगट्ग. चिंगटले तू पण यायचं.>>>>> नक्की नक्की.
हो हो जरूर... होऊन जाऊ द्यात!
हो हो जरूर... होऊन जाऊ द्यात! कारगट ची टारगट मंडळी...
मामी, एवढी मोठी गाडी आणि
मामी, एवढी मोठी गाडी आणि फिरणार फक्त अश्विनिमामी........बहौत ना ईन्साफी........ आम्ही पण येणार........ फुकट सँडविच पण मिळतिल.......
या या तुम्ही पण या. फुकट
या या तुम्ही पण या.
फुकट सँडविच पण मिळतिल >>> हो ना, फुकटचं ते पौष्टिक !
कोणी Volkswagen Vento चालवून
कोणी Volkswagen Vento चालवून बघितली का?
बरेच दिवसांनी इकडे
बरेच दिवसांनी इकडे आलो...
साजिर्या नेहमीप्रमाणेच सविस्तर माहिती देत आहेस...
माझ्या मेहुण्यांनी मांझा पेट्रोल घेतली शेवटी .. उद्या येईल... मांझाची किंमत हा सर्वात महत्वाचा घटक होता ठरवण्यात... इतर त्याच रेंज मध्यल्या गाड्यांपेक्षा एक लाखाहून कमी आहे मांझा...
Vento अजून डेमोसाठी पुण्यात उपलब्ध नाहीये... सप्टे च्या पहिल्या आठवड्यात येईल तेव्हा बघेन...
पण प्राईस जास्त वाटतेय Vento ची पेट्रोल on-road 9.25 ला पडत आहे
मी पण नविन गाडी घेऊ म्हणतोय... पण सध्या अर्थातच गोंधळात आहे...
इतके पर्याय उपलब्ध आहेत सध्या सेदन मिड रेंज मध्ये

Tata Indigo Manza
Fiat Linea
Ford Fiesta
Maruti SX4
Hundai Verna
Chevy Aveo
Maruti Swift Dzire
aaNi
Volkswagen Vento
तरी होंडा सिटी ला ह्यात धरले नाहीये आणि hatchbacks पण नाही पकडल्या
आणि त्यात परत डिझेल कि पेट्रोल आहेच...
मला आय१० बद्दल माहिती हवी
मला आय१० बद्दल माहिती हवी आहे. इथे आधीच असेल तर मला पान नंबर सांगा ना प्लिज
आम्ही शेवटी घेतली सफारी (GX
आम्ही शेवटी घेतली सफारी (GX 4WD मिनीरल रेड (नवर्याची आवड). नेक्स्ट विक मध्ये येइल वाटत.
मिल्या Fiat Linea पण छान आहे ना! लुक्स तर मस्तच आहेत.
Pages