Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर्याच मुली हे करतात घरी.
बर्याच मुली हे करतात घरी. टेक्स्टाइल, होमसायन्स, फॅशन इत्यादी शिकणार्या किंवा मग कलाकुसरीच्या वस्तूंची आवड असलेल्या इत्यादी. >> हो लेकीकरताच दिवाळीचा उद्योग म्हणून विचार करत होतो. तिला कलाकुसर, हस्तकला वगैरेची प्रचंड आवड आहे. पण हे तिलाच काय मला पण झेपणारे नाही - म्हणजे दिवाळीच्या धामधुमीत एवढा वेळ मिळणार नाही. पण हे डाय कुठे मिळतात? पुढे मागे करून बघेन.
सध्या तिच्याकरता मांजरपाट वापरून कुशन्स चे अभ्रे अशा काहीतरी प्रोजेक्टचा विचार करतोय. मांजरपाटवर फॅब्रीक कलर्स व्यवस्थीत बसतील का?
मी येणार अडोब घराचे हाउस
मी येणार अडोब घराचे हाउस कीपिन्ग करायला. मला पण ज्वेलरी बनविण्यात अतिशय रस आहे. करूच करूच.
मार्जारपाटपटचित्रगृहवस्त्रे. नाव कसे आहे? माझा कॉपीराइट. काल रात्री नाव सुचल्यावर मी सर्दीतही हसत बसले होते.
हो बसतिल फॅब्रिक कलर्स
हो बसतिल फॅब्रिक कलर्स मांजरपाटावर.
नी, इथे अडीच मीटरची ओढणी एका रंगात डाय करायचे १५-२० रुपये घेतात. बाकी काही कधी रंगवून घेतलं नाही. आता असलं काही घरात करता येणार नाही. घर छोटं आणि पोरगा पण लहान.
पुण्यात डाय मिळणारी रविवार
पुण्यात डाय मिळणारी रविवार पेठेत काही दुकानं आहेत. तोळ्यावर वजन करून देतात. विजय टॉकिजच्या इथे दिप्ती केमिकल्स.
मुलगी किती वर्षाची आहे तुमची? कारण हे प्रकरण किमान १५ - १६ वयाच्या आधी तरी हाताळू नये.
मुंबईतलं मलाही माहीत नाही कारण हे सगळे उद्योग मी पुण्यातच केलेत.
अल्पना, मग थोडे चार्जेस कमी आहेत मुंबईपेक्षा. आणि लहान मूल घरात असताना करूच नये.
अमामी, नावाचा कॉपीराइट
अमामी,


नावाचा कॉपीराइट तुमचाच पण हे विकलं जाणार काय.
बिझनेस बाबत सिरीयसली हां पण!
चांगली आहे की मांपाची आयडिया.
चांगली आहे की मांपाची आयडिया.
अर्थात मला हे काहीच येणार/जमणार नाही , ढ आहे की अगदी या सगळ्यात. पण बाहेरून डाय करता येत ना? अभ्र्यापासून सुरूवात करावी म्हणते. मुलगी सुट्टीत (२०१३ च्या) पेंटिंग करेल. 
मी क्लासेस घेऊ का याचे? काश
मी क्लासेस घेऊ का याचे?

काश स्वतःचं घर असतं. लग्गेच सुरू केले असते.
लीव्ह न लायसन्स च्या घरात नाही करता येणार.
मी क्लासेस घेऊ का याचे? >> हो
मी क्लासेस घेऊ का याचे? >> हो
ठाण्याला घेणार असाल तर एक विद्यार्थीनी नक्की आहे.
छे ठाण्याला नाही. प्रवासातच
छे ठाण्याला नाही. प्रवासातच ३-४ तास जातील.
पार्ल्यात घेणार मी.
पार्ल्यात ते टिळक मंदिर आहे
पार्ल्यात ते टिळक मंदिर आहे तिथे तासावर भाड्याने जागा मिळत असेल तर बघ ना क्लाससाठी.
नको बाई. टिळक मंदीर आणि
नको बाई. टिळक मंदीर आणि त्यांच्या नकारघंटा जिथेतिथे हा वेगळा विषय होईल तर ते असोच्च..
पडद्यांवर पडदा पडला असेल तर
पडद्यांवर पडदा पडला असेल तर एक विचारू का?
नवीन घरात किचन १२ फूट बाय पावणेतेरा फूट असणार आहे.बारा फुटाच्या एका बा़जूला उभी खिडकी आहे.
तिकडे किचन platform नाहीये.बारा फुटाची दुसरी बाजू आहे त्याला लागून डायनिंग टेबल साठी space आहे बारा फूट बाय ८ फूट.
पावणेतेरा फूट लांबी असलेल्या दोन्ही बाजूना पॅरलल असे किचन platform करता येणार आहेत. त्यात स्टील सिन्क. ४ बर्नर स्टोव्ह, आणि फ्रीझ पण बसवायचा आहे.
मला असं विचारायचं आहे की
दोन ओट्यांमधलं अन्तर जरा जास्त होईल का? किचन आयलंड चा पर्याय कसा आहे ?
किचन आयलंड मधे स्टोव्ह कोणी वापरता का ? वापरायला सोयीचं वाटतं का?
इकडच्या ( अमेरिकेतल्या )
इकडच्या ( अमेरिकेतल्या ) घरांमधे साधारणपणे सिंक, फ्रीज अन स्टोव्ह टॉप ( गॅस/ इले जे असेल ते ) हे एका (शक्यतो ) समभुज त्रिकोणात असावेत असा संकेत आहे. स्वैपाक करताना या तीन ठिकाणी ये-जा सगळ्यात जास्त होते, ते एकमेकांपासून फार दूर नसावेत व मधे एखाद्या गोष्टीला वळसा घालून दुसरी कडे जाऊ लगे नये .
भारतात बर्याच घरांमधे फ्रीज डायनिंग टेबलच्या जवळ , ओट्यापासून दूर असा ठेवतात. ते गैरसोयीचे पडते.
<एखाद्या गोष्टीला वळसा घालून
<एखाद्या गोष्टीला वळसा घालून दुसरी कडे जाऊ लगे नये > > येस्स . हे नक्कीच लक्षात ठेवते.
किचन आयलंडमधे स्टोव्ह Vs भिन्तीला लागून ओट्यावर स्टोव्ह याबद्दल पण सांगा बरं !
अवनी, स्टोव्ह आयलंड वर ठेवणे
अवनी,
स्टोव्ह आयलंड वर ठेवणे फारसे योग्य होणार नाही असे वाटते. भारतीय स्वयंपाकातल्या फोडण्या सगळीकडे उडणार. तळण असलं तर कढईला धक्का लागायची भिती वगैरे.
आयलंड किचनच्या डोसक्यावर
आयलंड किचनच्या डोसक्यावर भल्ला थोरला एक्झॉस्ट नसेल तर देसी घरात तरी त्याचा उपयोग होणार नाही. उगाच मधेच आल्यासारखं होईल. असं मला तरी वाटतं.
दोन बाजुंनी ओटा, एका बाजूने
दोन बाजुंनी ओटा, एका बाजूने डायनिंग टेबल एवढ सगळं असल्यावर मधे आयलंडच थोडं अडचणीचं पडेल . त्यात त्यावरच गॅस ठेवला की इथे उभं राहून एक-दोन लोकांना काम करणं अवघड होइल. खिडकीपाशी / किंवा बाहेरच्या भिंतीला लागून गॅस ठेवला की एक्झॉस्ट बाहेर करता येईल.
)
अमेरिकेत आयलंडवरच्या गॅसमधे डाउन ड्राफ्ट व्हेंट मिळतात पण ते फोडण्या, आले लसूण वाटण परतणे, फिश फ्राय वगैरेच्या पुढे अगदीच निरुपयोगी ( स्वानुभव
किचन बद्द्ल चाललं आहे
किचन बद्द्ल चाललं आहे तर.
मुंबईत मॉडयुलर किचन साठी कोणी खात्रीलायक जागा माणुस माहित आहे का? चांगला हवा कारण जागा थोडी आणि गरजा फार आहेत. स्लीक किचन बघते आहे. पण ते ब्रॅण्डेड असल्याने महाग आहे. मला कोणीतरी चांगली/ चांगला इंटिरियर वाला/वाली हवी आहे. किचन स्पेशॅलिस्ट
निकिता दादरला कबुतरखान्या जवळ
निकिता
दादरला कबुतरखान्या जवळ एक आहे- MODERN KITCHEN
मी माझ्याघरी ट्रोली करुन घेतल्या आहेत.
अगदी छान. आणी घरी येवुन जागा बघुन मापानुसार suggestions देतात.
माला तंजाउर पैन्टिन्ग्स हवी
माला तंजाउर पैन्टिन्ग्स हवी आहेत. पुण्यात कुठे मिळतात का? जानेवारी मधे मी पुण्यात येनार आहे - कोणाला माहित असेल तर जरुर कळवा....
मॉड्युलर किचनसाठी कालच
मॉड्युलर किचनसाठी कालच स्लीकची साईट बघितली मी.
बरं इथे कोणाला मुंबईतले पश्चिम उपनगरातले चांगले म्हणजे क्रिएटीव्ह/इनोवेटीव्ह आयडियाज देऊ शकणारे इंटिरियर डिझायनर/आर्टिटेक्ट्स माहिती आहेत कां?
आऊटडोअर्स तुम्हाला मिळाले तर
आऊटडोअर्स
तुम्हाला मिळाले तर प्लीज मलाही सांगा...
मला एकाचं नाव कळलंय, पण ते
मला एकाचं नाव कळलंय, पण ते म्हणे खूपच बिझी असतात. थोडे महागही आहेत. पण त्यांनी केलेलं काम चांगलं आहे असं माहितीतून कळलंय.
मला सध्या फक्त किचन करुन
मला सध्या फक्त किचन करुन घ्यायचा आहे. स्लीक थोडा जास्तच महाग वाटतो आहे..
किचन हॉब आणि नॉर्मल किचन
किचन हॉब आणि नॉर्मल किचन शेगडी मधे काय फरक असतो ?
किचन हॉब साठी फक्त फ्लॅट बुडाचीच भांडी वापरावी लागतात का?
अंतर्गत सजावटी विषयी प्रश्न
अंतर्गत सजावटी विषयी प्रश्न नाही पण कुठे विचारावे हे न कळल्याने ईथे विचारत आहे.
कौलारु घरांची कौले कुठे मिळतील ? टाईल्सच्या दुकानात मिळतील का ?
बंगळूरमधले
बंगळूरमधले क्रिएटीव्ह/इनोवेटीव्ह आयडियाज देऊ शकणारे इंटिरियर डिझायनर/आर्टिटेक्ट्स माहिती आहेत कां?
लहान मुलांच्या खोलिचे
लहान मुलांच्या खोलिचे इंटेरिअर करायच्या काही आयडिया आणि रिलेटेड काँट्याक्ट ( contact कस लिहु
) सुचवा ना प्लिज.
या मधे कार्टुन वॉल वगैरे करायचा विचार आहे.. कोणाला काहि माहिती आहे का?
चिऊ, सजावट कशी करायची.. हे
चिऊ, सजावट कशी करायची.. हे लिहिणे अवघड वाटते.... पण प्रयत्न करते...
खोली मुलासाठी की मुलीसाठी आहे त्याप्रमाणे कार्टुन घ्यावे.... त्याची आवड,वय बघुन चित्र निवडावे...
तु USA आहेस कि India त? तुला target, Home depot... ईथे वॉलपेपर मिळतील. online search कर..http://freecartoonwallpapers.net/category/Disney/ ईथे बघ...
वॉलपेपर जर लावला नाहिस तर..... थोडे पेंटिग जमत असेल तर वरच्या लिंक मधे बघुन पाहिजे ते चित्र घेउन पेंन्ट करावे...जंगल चा सिन असेल तर कोपर्यात आर्टिफिशल झाड ठेउन त्यावर पक्षी सॉफ्ट टॉय्ज लावावे.....
कार आवडत असेल तर सोप्पे आहे... रोड पेंन्ट करुन २-३ कार दाखवायच्या....लहान मुलाचे बेड हि कार च्या आकाराचे मिळतात.
मुलींसाठी सिंडरेला, स्नो-व्हाईट... असेल तर वॉलपेपर तसा मिळवायचा..वॉलपेपर छोटा असेल तर त्याच्या मागे ही थोडे पेंटिग करावे. सोप्पे पेंटिग ..सिंडरेला साठी जिना दाखवायचा. झिरझिरित कापड, ओढण्या याचा वापर करुन भिंतीवर सोडावेत. स्नो-व्हाईट साठी मागे जंगल दाखवावे. सॉफ्ट टॉय्ज चा वापर करुन जंगलात पक्षी-प्राणि दाखवावेत.
एकदा तु करायला घेतलेस कि तुलाच नविन नविन आयडिया सुचतील.
मी_चिऊ, माझ्याकडे काही
मी_चिऊ,
माझ्याकडे काही boys-and-girls room designs च्या इमेजेस आहेत मेल मधून आलेल्या. मस्त आहेत. त्यातूनही काही आयडीयाज उचलता येतील. मला संपर्कातून मेल करणार का? मी फॉरवर्ड करेन तो मेल.
Pages