Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निंबे adjustment म्हणून केलं
निंबे adjustment म्हणून केलं कि असच होतं
खरखरीतच.. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सूर्या.. तुझ्या गावच्या घरी
सूर्या.. तुझ्या गावच्या घरी यायला पाहिजे एकदा.. कुठेशी??? चाकणला का?
मुंबईच्या इतक्या जवळ असल्याने
मुंबईच्या इतक्या जवळ असल्याने आमच्या गावांची राया गेली पार.. गावासारखे नाही राहिले काही... स्पारटेक्स लावतात येडे लोक...
पन गुळगुळीत वगैरे काही
पन गुळगुळीत वगैरे काही फिनिशिंग नाही त्याला. >>> अगं त्याला स्कीलच हवे. आताचे गवंडी नुसतं सिमेंट थापून ठेवतात. त्याची घोटाई वगैरे जमली पाहिजे.
रोहन, आपण हळहळ व्यक्त केली की
रोहन, आपण हळहळ व्यक्त केली की त्यांना वाटतं त्याची डेव्हलपमेंट शहरी लोकांना नको आहे
मी एकदा भावूक होऊन असंच काहीतरी म्हटलं तर मला हेच उत्तर मिळालं होतं की आम्ही नाही का पुण्यामुंबईसारखं व्हायचं, आम्ही कायम गावातल्यासारखंच रहायचं का? यावर माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं.
कुठून कुठल्या विषयाकडे गेलात.
कुठून कुठल्या विषयाकडे गेलात. असो...
आम्हाला सध्या जो आर्किटेक्ट सापडलाय तो मस्त आहे. स्थानिक पद्धती, आर्किटेक्चर, लेबर, वस्तू असं सगळं वापरून पण सोयींनी अद्ययावत असं घर प्लॅन करतो तो. सही आहे तो.
करेक्ट केश्वि. ज्याचं
करेक्ट केश्वि. ज्याचं जळतं,त्यालाच कळतं म्हणतात ते हेच, इथे दोन्ही बाजूंनी.
हे बाकी एकदम खरे... मला
हे बाकी एकदम खरे...
मला कुठेतरी जागा घेऊन असे एक घर बांधून ठेवायचे आहे... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पभ, बांधून ठेवू नकोस, रहा पण
पभ, बांधून ठेवू नकोस, रहा पण त्यात.
हा तेच म्हणजे.. गटग करू
हा तेच म्हणजे..
गटग करू तिकडे हवंतर...:D
पभ, कोकणात बांधणार असलास तर
पभ, कोकणात बांधणार असलास तर आमचं घर बघून झाल्याशिवाय बांधू नकोस. खरंच सॉलिड काय काय आयड्या करतोय हा आर्किटेक्ट प्राणी.
नक्की... डीटेल्स दे की. एकदा
नक्की...
डीटेल्स दे की. एकदा भेट मग.. आपली भेट होऊन आता जमाना झाला.. आणि ती भेट पण अगदीच छोटीशी..
हायला रोहन, तू नीरजाला
हायला रोहन, तू नीरजाला जमान्यापुर्वीच भेटलायस?
ए अरे तुम्ही शहरी लोकांचे
ए अरे तुम्ही शहरी लोकांचे अजिबात कौतुक सांगु नका. ते स्वतः फारिन गोष्टींच्या मागे असत्यात.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अश्विनी.. ऑफिस मधून कधी
अश्विनी..
ऑफिस मधून कधी निघणार??? ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
निंबुडे, फर्निचर खरेदी करता
निंबुडे, फर्निचर खरेदी करता भरपूर चॉईस असलेले ठिकाण म्हणजे, कांजुरमार्गचे होम टाऊन. एकदा भेट देच.
लाकडी फर्निचर फॅबइंडियाचेही सुंदर असते.
निंबुडे, फर्निचर खरेदी करता
निंबुडे, फर्निचर खरेदी करता भरपूर चॉईस असलेले ठिकाण म्हणजे, कांजुरमार्गचे होम टाऊन. >>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला फर्निचर नाय गं खरेदी करायचं, मामी. जागूतायला हवंय ते सोफा वगैरे
बादवे, इथे विक्रोळीत पण होम टाऊन चं शोरुम आहे बहुदा. विक्रोळी डेपो च्या जवळ.
हो केश्वे. आम्ही ब्लॉगर लोक
हो केश्वे. आम्ही ब्लॉगर लोक एकत्र भेटलोत बरेच महिन्यांपूर्वी...
>>>>>कुठून कुठल्या विषयाकडे
>>>>>कुठून कुठल्या विषयाकडे गेलात. असो...
आम्हाला सध्या जो आर्किटेक्ट सापडलाय तो मस्त आहे. स्थानिक पद्धती, आर्किटेक्चर, लेबर, वस्तू असं सगळं वापरून पण सोयींनी अद्ययावत असं घर प्लॅन करतो तो. सही आहे तो. >>>>
हे निधप, मी एका चांगल्या आर्किटेक्टच्या शोधात आहे. मला सांगना तुझावाला आर्किटेक्ट. मी काल पोस्ट केलं होतं तसं, पण मला एकही response नाही. पुर्णपणे दुर्लक्ष केलं सगळ्या माबो.लिकरांनी माझ्या कडे. मी पूणेकर आहे. कॅम्पच्या जवळपास राहाते. मला त्याचा नंबर देशिल का, प्लिज? तुझे काम पूर्ण होईपर्यंत मी धीर धरीन. आज्जिबात मागे लागणार नाही त्याच्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते वर कोणी सोफ्याबद्दल विचारत होतं ना, तर माझा कळकळीचा सल्ला आहे. तो मी सविस्तर, अगदी कारणासकट पोस्ट करेन रात्री फुरसतीने. आता घरी पळायची घाई आहे. Bye.
कुणी इपॉक्सी फ्लोअरिंगबद्दल
कुणी इपॉक्सी फ्लोअरिंगबद्दल ऐकलेय्/पाहिलेय का?
मी एन्डीटीव्हीवरच्या ईं.डे.च्या कार्यक्रमात पाहिलं होतं हे वापरलेलं.जास्त करून हॉस्पिटल्समध्ये वापरलं जातं.
घरात प्रसाधनगृहासाठी योग्य.
http://www.google.co.in/images?um=1&hl=en&safe=off&biw=800&bih=398&tbs=i...
http://www.epoxyandepoxyflooring.com/index.htm
तुला कुठल्या शहरात हवाय? हा
तुला कुठल्या शहरात हवाय? हा माणूस कोकणात काम करतो. लांज्यात रहातो. आणि तो इंटेरियरची कामं बहुतेक तरी करत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत, इपॉक्सीफ्लोअरिंग आमच्या
भरत, इपॉक्सीफ्लोअरिंग आमच्या इथे गॅरेजमधे करुन घेतात. मस्त दिसते. पण घरात वापरायचे तर बाथरूममधे खूप गुळगुळीत वाटेल.
निंबुडा, ते पिव्हिसी फ्लोअरिंग नविन असताना टॉक्झिक फ्युम्स एमिट करतं. इथे आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही वापरतो. परवडत असते तर मी देशात असते तसे टाईल्सचे फ्लोअरिंग घेतले असते.
निधप, मी तर पुण्यात रहाते.
निधप, मी तर पुण्यात रहाते. चल, सोडून दे. Thanks.
आमच्या बंगलोरच्या फ्लॅटमध्ये
आमच्या बंगलोरच्या फ्लॅटमध्ये एका खोलीत वुडन फ्लोरिंग केले आहे. त्या लाकडी फळ्या जुन्या वाड्यांमधले लाकूड रिसायकल करून बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर दिसतात. शिवाय रिसायकल्ड मटिरिअल वापरल्याचे समाधान. बाकी घरात कोटा आहे. लाकडी जमिनीचा मुख्य फायदा म्हणजे गार पडत नाही.
दरवर्षी लाकडाला पॉलिश करून घ्यायचे असे सांगितले आहे. अजून एक वर्ष व्हायचे आहे.
दुसरे म्हणजे पलंग आणि सोफे मनासारखे न सापडल्याने नवर्याने लाकूड, फळ्या आणि सुतारकामाचे साहित्य विकत आणून घरीच फर्निचर बनवले. सोफ्यासाठी कुशन्स आणि लोखंडी चौकटी ऑर्डर देऊन बनवून घेतले. त्याला एकट्याला हे काम करायला ३ महिने लागले. सुतारकामाची आवड असेल आणि वेळ असेल तर हा एक पर्याय आहे.
अरे वा इथे चिक्कार पोस्ट
अरे वा इथे चिक्कार पोस्ट आल्यात. बरं काल मला लिहायला वेळ मिळाला नाही. पण वर काही काही प्रश्न आहेत ना त्याबद्दल लिहिते.
पुर्ण वुडन फ्लोरिंग - हे ओक, चेरी, बांबु, साग, इत्यादी लाकडापासुन बनते. अर्थात साग प्रचंड महाग असते.
पिव्हिसी फ्लोरिंग- या कार्पेट्सारख्याच पण चौरस शीट्स असतात. वुडन डिझाईनच्या घेतल्या तर दुरून वुडन दिसेल पण जरा गुळगुळीत आणि चकचकीत असतात.
पिव्हिसी वुडन फ्लोरिंग- हे बरच नविन मटेरियल आहे. यात पिव्हीसी आणि लाकुड एकत्र लगदा करुन बाकी बरेच काही अधेसिव्ह, रंग वगरे टाकुन मग प्रेस करुन हुबेहुब लाकडासारखं दिसणारे मटेरियल मिळवतात. यात अनेक रंग उपलब्ध असतात. म्हटलत तर हो बेंटेक्स. पण याचे गुणधर्म लाकडापेक्षा जास्त चांगले असतात. लाकुड फुगतं, बेंट होतं पण हे वॉटर रेसिस्टंट असत, वाकडं होत नाही. अतिशय जास्त तापमानाला थोडं लवचिक होतं. मात्र लाकडापेक्षा थोड कमी स्ट्राँग असतं. पण जिथे पाणि वगरेचा वापर जास्त आहे तिथे वापरायला योग्य आहे.
एक्स्टेरियर वुडन डेक्स - यात रिसायकल हाय ग्रेड प्लॅस्टीक आणि लाकडाचा भुसा , इतर फायबर वगरे मिक्स करुन बनवतात. यात सुद्धा रंग बरेच आहेत. आणि हे घराबाहेर टेरेस मधे, डेक बनवायला, बागेतलं फर्निचर बनवायला वापरतात.
पीव्हीसी
पीव्हीसी बद्दल..
http://aquaticpath.umd.edu/appliedtox/wendy.pdf
http://www.besafenet.com/pvc/PVC_Flooring_and_Toxic_Cleaning_Products_in...
http://www.greenpeace.org/raw/content/eu-unit/press-centre/policy-papers...
भारतातले पीव्हीसी वुडन
भारतातले पीव्हीसी वुडन फ्लोरींग म्हणजे इथे यु एस मध्ये ज्याला लॅमीनेट म्हणतात ते का?
बहुतेक नाही. कारण लॅमिनेट
बहुतेक नाही. कारण लॅमिनेट फ्लोरिंग वर जास्त पाणि चालत नाही असं ऐकलं आहे. लॅमिनेट फ्लोरिंग बघितलं नाहीये.
भारतात पिव्हिसी वुडन फ्लोरिंग कुठे मिळतं/ मिळतं का हे माहीत नाही. त्याला दुसरं नाव असण्याची शक्यता आहे. म्हणजे वुड प्लॅस्टीक वगरे सुद्धा.
oh ok. thx
oh ok. thx
Pages