Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अच्छा. धन्यवाद स्वाती आणि
अच्छा. धन्यवाद स्वाती आणि शीतल!
online curtains (पडदे) कुठुन
online curtains (पडदे) कुठुन मागवावेत?
amazon वर बघितले पण फार व्हरायटी मिळाली नाही!!
Try IKEA store
Try IKEA store
pardewale.in
www.pardewale.in
सोफा कम बेड
सोफा कम बेड
आणि मैंट्रेस हवे आहेत
कुठले घेऊ
बाणेरला resale ३ बेडरूम घर
बाणेरला resale ३ बेडरूम घर घेतले आहे. सध्या इंटिरियरशी बोलणी चालू आहेत
१. किचन पूर्ण नवीन करायचे आहे , ओटा , मॉड्युलर युनिट्स सगळे नवीन बनवणार आहोत ? tandem ट्रॉलीचा अनुभव कसा आहे? आम्हाला क्लीन करायला सोप्पा सेटअप हवा आहे
२. हॉल मध्ये एक सेटी , सोफा सेट , टीवी युनिट , डाईनिंग टेबल करायचे आहे
३. सॅमसंगचा "The Frame" नावाचा ५०" टीवी घ्यायचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने मागे डेकॉर करू (काही अनुभव असतील तर कळवा )
४. पिवळे वॉर्म लाईट हवे आहेत , त्या साठी फाल्स सीलिंग आवश्यक आहे का
५ एन्ट्री ला एक लॉबी एरिया आहे तिकडे अँटिक मिरर वॉल घ्यायचा विचार आहे
पूर्वीच्या ओनरचे सागवानचे चांगले फर्नीचर आहे . ते पोलिश करून घराला वूडन थिम ठेवण्याचा विचार आहे . veneer पॉलिश आणि upvc खिडक्या करायचा विचार आहे.
पुण्यामधील चान्गले फर्नीचर शॉप्स माहित असल्यास सांगा . इकडे वाकडला रांगेत आहेत पण सगळे भुस्सा फर्नीचर वाटते. पडदे, डेकॉर साठी फॅब इंडिया अथवा ikea चा विचार आहे
आयकिआमध्ये टी वी युनिट्स,
आयकिआमध्ये टी वी युनिट्स, फ्लोअर लॅम्प्स, क्रोकरी वगैरे चांगले आहेत. ३१ मार्च पर्यंत BESTAच्या फर्निचरवर तेथे डिस्काउंटही आहे. औंधला परिहार चौकात एकबोटे चांगले आहे. सॉलिड वूड फर्निचर तेथे मिळेल.
विकतचे कोणतेही फर्निचर mdf
विकतचे कोणतेही फर्निचर mdf किंवा sfd मध्ये बनवले जाते.. मोठ्या ब्रँड मध्ये ही हेच वापरले जाते...
त्यामुळे कोणतेही कार्पेन्ट्री काम माहीत असलेल्या कार्पेन्टर ला बोलवून , प्लाय मध्ये च करून घ्यावे. 10 -15 वर्ष काही होत नाही...
Mdf 3 वर्षात वाकायला लागतं.
Tandem डोळे झाकून घ्या. दिसायला आणि क्लीनिंग ला बेस्ट.
नॉर्मल स्टील जाळी ट्रॉली पैसे वाचवते. Tandem जरा महाग पडते.....
पिवळे वॉर्म - त्याला नॅचरल किंवा डे लाईट म्हणतात. हे पॅनल लाईट चौकोनी किंवा राउंड शेप मध्ये येतात. त्याला पीओपी सिलिंग करायला लागते.
यात 3 ही रंग येतात सफेद, डे लाईट आणि पिवळा. म्हणजे एकात च हे तिन्ही लाईट चा इफेक्ट मिळतो. सिसका वगैरे चांगले आहेत. लोकल ब्रँड पण हल्ली खूप चांगले येतात. सिसका वगैरे ची वर्ष भराची वॉरंटी असते पण हे लोकल ब्रँड 3 ते 4 वर्षाची देतात.
पीओपी नसेल करायचं, खर्च वाढत असेल तर नुसते नॉर्मल सिलिंग ला लावायचे पण लाईट येतात. पण मग त्याला कोंडयुट वगैरे ची भानगड होते. ज्याची फिनिशिंग चांगली केली नाही तर गडबड होते.
किंवा मग भिंती पासून ते सिलिंग पर्यंत झरी मारायला लागते....
मी सजेस्ट करेन सिलिंग करून घ्या. जास्त नाही 5 इंच ड्रॉप घ्या आणि प्लेन बनवा, फार डिझाईन करू नका हवे तर...
Pages