होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे तुमचं. पण मला खरतरं ते पडदे खूप आवडले आहेत. आणि त्याच टाईपचे डार्क कलरचे पडदे मला मिळाले नाहीत. जे काही थोडे होते त्यावर आरसे, मोती लावले आहे. फार भडक वाटतं ते. decent (मराठी शब्द?) नाही वाटले.
आणि मला वाटत आहे की wooden colour च्या खांबाने कदाचीत हॉललाही छान लूक येईल.
पण तरीही पडदे बदलण्याचा ऑप्शन आहेच.

can anyone please suggest good home interior decorator in Pune

मला गादी घ्यायची आहे.
कापसाची नकोय.. तस्मात कॉयर पण नको..

मौ आणी आरामदायक अशी सुचवा बरे!

बरं नकी सांगा!
अजुन कुठल्या चांगल्या गाद्या असतात?
काय काय वाचलं ऑन्लाईन..
मेमोरी मॅवगैरे, लॅटेक्स स्प्रींग वगैरे

आरामदायक असावी.. पाठ दुखी वगैरे चा त्रास आहे!

शोभा रेस्टोलेक्स ला माहीती देण्यास मेल पाठवली आहे. पण ते लोक फार महाग विकतात. ४०-४५ हजारा च्या घरात..
इतकीही महाग नकोय!

पुण्यात कोथरूड मधे खूप सारे फर्निचर करून घ्यायचे आहे. कोणी चांगला सुतार माहिती असल्यास प्लीज विपू मधे कॉन्टॅक्ट डीटेल्स द्या. धन्यवाद!!

चांगले इलेक्ट्रीशिअन, मिस्त्री, कार्पेंटर, रंगारी ह्यांचा एक डाटाबेस बनवायचा का?

ठाण्यामधे चांगले civil work (tiles, plumbing etc). करणारा माणूस असल्यास क्रुपया माहिती द्यावी.

DIY पडदे कसे शिवायचे कोणी सांगू शकेल का? कुठलं कापड, किती dimension चं आणि पुण्यात कुठे मिळेल इ. ?

मला मुंबईत चांगली व मध्यम दरातील झुम्बरे कुठे मिळु शकतिल?
तसेच पडद्यांची विविधता पण शोधतोय!

नवी मुंबई / मुंबई चालेल.

मला कोणी एक चांगला architect सुचवू शकेल का, please? जरा हटके ideas सांगेल असे कोणी तरी. मी पूण्यात camp जवळ राहाते. Thanks ! >>>

मी २०१० मधे टाकलेली पोस्ट परत टाकते आहे. ६ वर्ष झाली त्यामुळे परत रिनोवेशन करायचं आहे. फक्त अर्जंट भेटुन पटापट डिझाइन्स आणि कोट्स द्यायला हवी आहेत. कामही लगेच चालु करणार आहोत. ( फॉल्स सिलिंग, वुडन फ्लोअरिंग, लिविंग 20x20 चं पुर्ण फर्निचर इ इ. थोडंस बेडरुम्समधे बदल आणि टेरेसेस आता पर्यंत केलीच नव्ह्ती तिथे काही तरी पार्टीज साठी वगैरे बसता येइल असं काही)

मला मुंबईत चांगली व मध्यम दरातील झुम्बरे कुठे मिळु शकतिल? >> मुंबईची माहिती नाही, पण दिल्लीत कुठे मिळतील हे सांगू शकेन. चालत असेल तर सांगा.

धन्यवाद माधवजी ! शोधतो!
धन्यवाद कापोचे! पण दिल्ली बहोत दूर है!

यक्ष होम स्टोअर लाइफ स्टाइलचे आहे विवि आना मॉल ठाणे इथे. तिथे भेट द्या. ऑन ऑफ म्हणून एक दुकान ठाणे मुलुंड व भांडूप इथे आहे तिथे काही मिळतील. घाटकोपर आर सिटी इथे पण होम स्टोअर आहे. तिथे भेट द्या.

अंकु, संपर्कातुन काही पाठवलं असशील तर उपयोग नाही. तो इमेल आयडी फक्त माबो साठी बनवला होता आणि आता कित्येक वर्ष वापरला नाही. पासवर्ड नाही आणि शोधण्यासाठी प्रयत्न करायला उत्साह नाही.

प्लीज विपु मधे लिहि ना.

धन्यवाद अमा! शोधतो. तसे खारघर ला एक मोट्ठे डेकॉर चे शोरुम सापडले. सुमारे ३००/- रु. चौ.मि. ते ८,०००/- रु. चौ. मि असे दर आहेत. पण व्हरायटी छान आहे!.

पुण्यात मॉड्युलर फर्निचर किचनसाठी कोण चांगले करते? बिबवेवाडीचे कोणी शिर्के नेटवर दिसताहेत. पण माऊथ शटवर त्यांच्या नावाने खडे फोडणारेही आहेत. त्यातले चांगले रिव्यूजही मला मॅनेज्ड वाटू लागले आहेत

अ अ अ, तुम्ही स्वतः मार्केट फिरून आवडीनुसार चांगल्या प्रतीचं फर्निचर वाजवी किंमतीत मिळू शकेल.
इंटीरिअर डेकोरेटर कडून केलेलं माझ्यामते तरी महागात पडतं. अर्थात कुणी ओळ्खीचं वगैरे असेल तर गोष्ट वेगळी...

अ अ अ,
http://www.homedesignbangalore.com/ इथे तुम्हाला बरीच माहिती मिळेल.
आवडीनुसार मटेरिअल निवडून contractor कडून करून घेता येईल

Pages