होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, कोणाला माहिती नाहीये वाट्टं...... गोरेगाव लिंकरोडला दिसले एक दुकान..... तिथे कार बेड वगैरे फार छान होते! पण किंमती भारी... तशा काही आयडिया घेऊन सुताराकडून करून घ्यावे झालं.....

पडद्यांसाठी सिंथेटि़क फॅब्रिकमुळे एकदा भिंती काळ्या करून झाल्या.म्हणून आता कॉटन घ्यावे असा विचार करून दुकानात गेले तर दुकानदार म्हणाला, पूर्वी पॉलीस्टर मधे पददे बनायचे आणि भिंती काळ्या व्हायच्या आता जे सिन्थेटिक फेब्रिक येतं त्यानी तस होत नाही. तुमचा काय अनुभव.

मुंबईत कोणाला चाइल्ड रूम डेकोर संदर्भात फर्निचरची / वॉल पेपर्स ची दुकाने इ इ माहिती आहेत कां? एखादी थीम घेऊन कस्ट्माइजड बेड आणि स्टडी टेबल करायचा विचार आहे. >>>> ओवी, होम टाऊन मध्ये तुला चॉईस मिळेल .

वॉलपेपर्स करता मार्शल्स आहेत. नाहीतर नेरोलॅक पेंटसवाले येऊन छान भिंती, छत हवं तसं चित्रं काढून रंगवून देतात. छतावर सुरेख ढग आणि भिंतीवर झाड आणि त्यावर गाणारे पक्षी वगैरे आहेत एका घरी.

माझ्या दोन मैत्रिणींनी आकांक्षा या एनजीओ च्या मुलांना बोलावून छान छान थीम देऊन चित्रं काढून घेतली होती. एकीच्या घराच्या भिंतीवर एअरपोर्ट सजलाय. पायलट म्हणून तिची दोन मुलं! Happy

हल्ली भिंतीवर लावायला छान वॉल डेकोर्स आहेत अव्हेलेबल बाजारात. होम स्टॉपमध्ये मिळतील. मार्शल्स मध्येही असतील.

ओवी, बीकेसीत गेले चार दिवस इंटिरियरचं प्रदर्शन सुरू होतं. तिथे वॉल डेकोरचे बरेच ऑप्शन्स दिसले. आजच शेवटचा दिवस आहे. जमत असेल तर नक्की जाऊन ये.

बहूतेक याच धाग्यावर किंवा मागे कुठेतरी नीधप नी प्लास्टिकच्या स्टोरेज ट्रॉली बोक्सेसबद्दल लिहिलं होतं. पलंगाखाली ठेवता येतिल असे.
>> हो अल्पना. पण मला पुण्यात दिसले नव्ह्ते. आता परत बघते.

घरात एक लिनन कॅबिनेट असेल ( उसगावातील घरांत सोय असते) नाहीतर वेगळे बनवून घेता येइल. >>
अश्विनीमामी मी पुण्यात आहे . रेडिमेड कॅबिनेट्स/ / प्लास्टिक स्टोरेज बॉक्स बघते.

चैत्रगंधा.. प्लॅस्टिक स्टोरेज बॉक्स मला रिलायन्स मार्ट मधे दिसले होते पुण्यात.. पण कलर्स भडक निऑन शेड्स होते.. नि टेक्श्चर उसगावात मिळत तसं नव्हतं
मुंबईत ओबेरॉय मॉल लाईफस्टाईल होम सेक्शन मधे मस्त होते

माझ्या मुलीने भिन्तीं पेन्सिल वा पेन आश्या तस्तम गोस्टी नी रंगवल्यात

ते साफ कोनत्या सोप्या पध्द्तीने करता येतील?

ओके चनस.
मी बिग बझारमध्ये रेडिमेड कॅबिनेट्सचे कलरपण असेच बघितले होते. एकदम भयानक डार्क Angry
असे कलर्स खरच लोक प्रिफर करतात का? का नाईलाजाने घेत असावेत? Manufacture करणार्‍यांना सांगायला पाहिजे.

माझ्या मुलीने भिन्तीं पेन्सिल वा पेन आश्या तस्तम गोस्टी नी रंगवल्यात
>> माझ्याकडे पण असच झालेलं. घराला नविन रंग दिला शेवटी..

प्रितीभुषण, माझ्या मुलाने असे केले होते तेव्हा जिथे खूप जास्त होते तिथे मी त्यानेच काढलेली/र्ंगवलेली चित्र लावली... थोडे प्रिंट आउट्स, चार्टस असे काही पण चालेल .. .... म्हणजे हे टेंप. सोल्युशन आहे... पण इट वर्क्स ....बघ तुला उपयोग होतो का...

धन्स मामी!! Happy बीकेसी चे नाही जमले काही कारणांनी..
एकीच्या घराच्या भिंतीवर एअरपोर्ट सजलाय. पायलट म्हणून तिची दोन मुलं! >>> सहीच! Happy
हो, रेडिमेड वॉल डेकोर्स दिसले बरेच... आता एकच काही थीम फायनल करायला हवीय.
सावली, लेकीची रूम सुरेखच!! Happy

माझ्या घरात लिव्हिंग रुममधे कोपयात बांधकामातच भिंतीत कोनडा आहे (जमिनीपासून छतापर्यन्त ) म्हणजे 7 फूट उंच 4 फूट रुंद आणि २ फूट खोल . मला तिथे काय करता येइल ? कृपया मार्गदर्शन करावे

लीव्हींग रूम मध्ये कपाट कदाचित तितकेसे चांगले दिसणार नाही.

तिथे कदाचित छोटीशी भारतीय बैठक आणि वरती दोनेक फूट उंचीचे आणि एक फूट खोलीचे शोकेस / बूकशेल्फ होऊ शकेल. किंवा पूर्ण उंचीचे डिस्प्ले कॅबिनेट / बूकशेल्फ होऊ शकेल.

पुस्तके ठेवण्याचे कपाट = बुक शेल्फ.
शोभेच्या वस्तू ठेवण्याचे कपाट = डिस्प्ले कॅबिनेट.

तात्पर्य,

"कपाट"

धन्यवाद.

इब्लिस, सहीच... हे तर माझ्या लक्षातच आले नाही!!! Happy उभ्या आयुष्यात मी बूकशेल्फ आणि डिस्प्ले कॅबिनेट कडे तसल्या (म्हणजे कपटाच्या) नजरेने पहिले नव्हते! Happy शतशः धन्यवाद

एक फूट खोलीचे शोकेस / बूकशेल्फ >>> बुकशेल्फ एक फुट खोलीचे चालत नाही , १६ इंच ते १८ इंच असावे. त्या जागेत बसेल. पूर्ण उंचीचे शेल्फ केलेत तरी छान दिसेल. ( पण अगदी रिकामे असल्यास चांगले दिसणार नाही. )

ईथे बाय एनी चान्स मिस्टर क्लीन मॅजिक इरेझर चे स्क्रब पॅड्स मिळतात का? त्याने क्रेयॉनचे कलर्स पुसले जातात भिंतीवरून.

माझ्या मुलीने भिन्तीं पेन्सिल वा पेन आश्या तस्तम गोस्टी नी रंगवल्यात. ते साफ कोनत्या सोप्या पध्द्तीने करता येतील? >>>प्रिती, आमच्याकडे ही भाच्याचे हेच प्रताप होते ते मी CIF cream वापरुन काढले. बर्यापैकी गेले.

घरात शू-रॅक आणि किचन कॅबिनेट करुन घ्यायचयं. कुणी खात्रीचा राजस्थानी सुतार सुचवाल काय अथवा इंटेरिअरवाला? पिंपरी-चिंचवड परिसरातील?

चांगल्या बाथरुम अ‍ॅक्सेसरीज ( सोप होल्डर्स, नॅपकिन अडकवायचा हूक वगैरे ) कुठल्या मोठ्या दुकानात मिळतील. वन स्टॉप शॉपिंग सोयीचे वाटते !

अ‍ॅट होम म्हणून चेन आहे फेबफर्नि श ऑनलाइन. तिथे बघा अगो.

त्या कोनाड्यात एखादे मस्त शिल्प ठेवून किंवा पेंटिग लाऊन स्ट्रॅतॅ जिक लाइट लावता येइल.

देशात की परदेशात. ऑनलाइन असली तरी अजून अनेक स्टोर्स कंट्री स्पेसिफिक आहेत.
फॅब इंडियाची ऑनलाइन आऊटलेटस देशाबाहेर पण उपलब्ध आहेत.

माझ्या घरात हॉल मधुन स्वयंपाकघरात जायला जो भाग आहे तिथे पी ओ पी वाले खांब आहेत. काहीसे असे.
मी तिथे दोर्‍यांचे पडदे लावले आहेत. पण पडदे घेताना लक्षात नाही आले की पी ओ पी पांढरे आणि पडदे सोनेरी (faint golden yellow). त्यामुळे ते उठून दिसत नाही.
Entrance.JPG

आता नालासाठी घोडा घ्यायचा प्लॅन आहे. म्हणजे ते खांब रंगवावे असे ठरवत आहे. भिंत पण पांढरी असल्यामुळे रंगवलेले खांब चांगले दिसतील असे वाटते. Wooden Colour लावायचा आहे. पण पूर्ण घर रंगवायचे बजेट नसल्यामुळे हे काम मलाच करावे लागणार आहे.
हे काम घरी करणे बरोबर आहे का? जमेल का, म्हणजे घरी चांगले फिनिशींग देता येईल का?
एखादा स्प्रे पेंट असतो का जो नवशिक्यांसाठी आहे? सगळ्यात महत्वाचे, की कोणी असा उद्योग केला आहे का? हे पी ओ पी खांब रंगवणे फ्लॉप ठरणार नाही ना? Wooden Colour चांगला दिसेल ना?

अजुन एक, हा प्रश्न कुठल्या धाग्यावर विचारावा हे माहीत नाही - सॉफ्ट टॉइज घरी स्वच्छ करता येतात का? की मळलेले सॉफ्ट टॉइज टाकून द्यावे? हे सॉफ्ट टॉइज लहान मुलांचे नाहीत माझे आहेत. पण घरात रोज खूप धूळ येत असल्याने मळले आहेत.

मला सल्ला हावाय. हॉलमधे एका भिंतीला खाली जरा ओल लागलीये. रंग गेलाय. बाकी सगळा रंग [ लस्टर] ओके आहे. तेव्हा फक्त खाली ६-७ इंच असे काही करता येइल का?

सॉफ्ट टॉईज धुणे / शीअर्स ( झिरझिरीत कापडाचे पडदे) धुणे :

एखाद्या ओढणीत २ ते ४ टॉईज / १-२ पडदे ( सॉफ्ट टॉईजच्या आकारानुसार / पडद्यांच्या आकारानुसार) ठेऊन ओढणीच्या टोकांची गाठ मारून सैलसर गाठोडं बांधून वॉशिंग मशिनमध्ये बेसिक मिनिममवर धुवायचं. पडदे लगेच पुन्हा त्यांच्या जागेवर अडकवून पसरून ठेवले की वाळतात. खेळणी धूळ बसणार नाही अशा मोकळ्या जागी ठेऊन सुकवावीत. पूर्ण सुकल्यावर जर कपाटात ठेवायची असतील तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून मग पुन्हा एका पिशवीत घालून ठेवावीत.

Pages