होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1. घरी ठेवायला छोटे टेबल फाउंटन कुठे मिळतात ? यु ट्यूब वर तयार आणि घरी तयार केलेले असे पुष्कळ सुंदर नमुने आहेत

2. विना मोटर यु ट्यूब वर काही शास्त्रीय प्रायोगिक मॉडेल आहेत , पण ते प्रायोगिक वाटतात

3. सोलार मोटर असलेलेही सुंदर डिझाइन्स आहेत , पण ते डायरेक्त सन लाईट वर चालतात, बागेत छान चालतात, घरच्या उजेडात ही मोटर चालते का ?

हे सोलार फाउंटन , फक्त पाण्यावर ठेवायचे , आपोआप कारंजा उडतो

images.jpg

4. इथे कुणी असे फाउंटन , रेन मॉडेल्स वगैरे घरी केले आहेत का ?

कारंजा, पाणी ह्यांचा आवाज मस्त वाटतो

images.jpeg

फोटो गुगल वरून उदाहरण म्हणून घेतला आहे

सध्या पुण्यात फर्निचर साठी कोणते vendors छान आहेत?
आम्ही livespace ला भेटी दिल्या, discussion केले..
नाही पटलं, बेकार आहे.
Requirement fancy नाहीयेत फार
म्हणून सुतारा तर्फे करून घ्यावे का, (ते छान काम करून देतात locally )अशा विचारत आहोत.
प्रॉब्लेम असा आहे की आम्ही सध्या पुण्यात नाही, नांदेड ला आहोत जे बरेच दूर आहे.
त्यामुळे विना कटकट काम झाले तर बरे होईल असे वाटत आहे

आमच्या कडे गोदरेज लाईफस्पेस चे एक डायनिंग टेबल आहे.रबरवुड आहे.त्यावेळी गोदरेज प्रॉडक्ट वर डिस्काउंट मिळायचा, त्यात 7500 ला पडलेय.पण चांगले टिकलेय.
निलकमल च्या मोठ्या शोरूम्स मध्ये(वाकड ला मानकर चौक आणि कसप्टें चौकाच्या मध्ये, स्मशानभूमीच्या नंतर निलकमल ची चांगली शोरूम आहे.तिथले मुख्य सेल्स पर्सन अतिशय हुशार आणि पाहिजे तेच दाखवणारे वाटले.डायनिंग टेबल्स सुंदर होती.
आयकिया परदेशी म्हणून महाग वाटले तरी छोटी छोटी साईड टेबल, ड्रॉवर च्या चेस्ट, कॉफी टेबल यात चांगली डील मिळून जातात.पुण्यात एक वेअरहाऊस आहे तिथून शिपिंग होते.

किचन,किचन ट्रॉली हे बरेच महाग प्रकरण आहे.यात घालावे तितके पैसे आणि व्हरायटी मिळतात.आम्ही मिस्टर किचन नावाच्या दुकानातून केले, ते ओके टाईप टिकले आहे.(आमच्या कडच्या प्रचंड विचित्र आकाराच्या जुन्या ताट भांड्या चमच्यांना ट्रॉली मान टाकतात.)किचन ट्रॉली घेताना सर्वात खालच्या ट्रॉली काळा खटका दाबून काढायच्या न घेता साध्या नुसत्या सरकवून बाहेर काढायच्याच घ्या.नाहीतर ट्रॉली खाली स्वच्छ करावे वाटल्यास त्या ट्रॉली ते काळे खटके वर खाली दाबून नीट बसवणे, त्यात एखादे रेल वाकणे असे प्रकार दरवेळी होतात.

जगन्नाथ शंकरशेट रोड वर स्पेसमॅक्स आहे, त्यांची साईट पण आहे.मिशन मंगल मध्ये दाखवल्या आहेत तश्या फोल्डिंग वस्तू उत्तम मिळतात.इथेही एखादी वस्तू घेतलेली परवडते.पूर्ण घराचे कोटेशन मागितल्यास काही च्या काही बजेट जाते.पण स्पेस मॅक्स ला भेट देऊन नक्की या.

किल्ली पुण्यात घर कुठल्या भागात घेतलेस? आमच्या ओळखीचा एक चांगला सुतार आहे त्याने आमचे सगळे फर्नीचर चांगलेआणि बजेट मध्ये करुन दिले. तुला विपु करते नंबर.

भुगाव मध्ये घेतलंय घर
Thanku सियोना मिळाला no
त्यांना ओळख काय म्हणून सांगू? की direct call करू?

livespace----- माझ्या 3 ते 4 क्लायंट ना फसवलं आहे.... भंगार क्वालिटी आणि रेट्स हाय....

Blackcat, चेंबूरला ओटोबा मध्ये झकास पडदे मिळतील (तुम्ही त्याच बाजूला राहता ना)किंवा स्टेशन जवळ दुकाने आहेत तिथे मापे सांगून शिवून देतात.आमचे पहिले पडदे ओटोबामधून घेतले .महाग असतात पण छान असतात.नंतरचे स्टेशनजवळील दुकानातून घेतले.तेही मस्त आहेत.
डी mart,big bazar madhunhi changale पडदे (कॉटन) चे मिळू शकतील.

बोकलत, ठाण्यातून आपली अनिष्का येऊन करू शकेलच. पण तरीही, डोंबिवलीत टिळक रोडवरच्या sbi शेजारी दाभाडे म्हणून एक आहेत. ते खूप छान करतात इंटेरिअर. माझ्या आईकडे डोंबिवलीत आणि माझ्याकडे ठाण्यात त्यांनीच केले सगळे काम. एकदम वाजवी आणि टिकाऊ.

किल्ली गोंदिया जवळ सागाचे सोफा बेड डायनिंग टेबल वगैरे स्वस्त आणि चांगले तयार मिळेल. ट्रान्सपोर्ट चा खर्च निघून स्वस्त पडेल.

ओटोबा बघितले
फारच महाग वाटले.

म्हणून नेटवर पाहिले

Pardewale.in वरून मागवले , त्यांच्या व्हॅटसपवर आकार कट करून मागितले, जीपेने पैसे भरले , 2 दिवसात आजच पार्सल आले
अजून फोडले नाही.

https://pardewale.in/products/swiss-orchid-printed-curtain-grey?variant=...
हे मागवले

https://pardewale.in/

कधी एकदा पार्सलला बेपरदा करू असे झाले आहे

पडदे आयकिया मध्ये छान आहेत किवा फॅब इंडिआ.

आयकिया तुर्भे परेन्त प्लॅन करुन या काय काय खरेदी करायची आहे ती

एका दिवसात काम होईल.

परदे मस्त आहेत
अगदी फोटोत आहेत तसे आहेत, कापडही मजबूत आहे

लोड बेअरिंग to RCC कन्व्हर्ट करणे शक्य आहे का? असल्यास त्याने structure ची LIFE वर परिणाम होऊ शकेल का? पूर्ण घर पाडुन नव्याने RCC होम बांधणे योग्य कि लोड बेअरिंग STRUCTURE ला RCC मध्ये कन्व्हर्ट करून खर्चात कपात करता येईल?
कृपया मार्गदर्शन करावे.

हीच शंका मलाही आहे, धन्यवाद.

दोन मजली चाळीतील घर , ज्याला पिलर नाहीत व मधला स्लॅब सर्व भिंतीवरच आहे, तर ते किती मजबूत असेल.? भिंत फक्त 2 वीट जाड आहे.

कुणाला मेमरी फोमच्या गाद्यांचा अनुभव आहे का? कापसाच्या गाद्यांच्या तुलनेत जास्त आरामदायी आणि धूळ रेझिस्टंट असतात का? काही तोटे आहेत का? आम्हाला आधी डबल बेडसाठी आणि मग आवडल्या तर नंतर मुलांच्या सिंगल बेड्ससाठी घ्यायच्या आहेत. मेमरी फोम हा प्रकार चांगला आहे असं ऐकलंय. कुठल्या कंपनीच्या घ्याव्यात?

Pages