होम इंटिरिअर डेकोरेशन अर्थात घराची अंतर्गत सजावट

Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52

राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्‍या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.

घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाउसफुल ची लिंक इथेही टाका कोणीतरी.
एवढे वर्ष गाद्या जमिनीवर टाकून झोपतोय आम्ही. आता कंटाळा आला. पाठीचा त्रास असल्याने गादी पण खूप जाड आणि मऊ चालत नाही. त्यामुळे सरळ कोकणातल्यासारखा माचा करून घ्यायचा विचार आहे. ज्यावर पाहिजे तर जाड गादी, पाहिजे तर पातळ गादी टाकता येईल. पण तो २-३ ठिकाणी मोडून किंवा घडी करून नेता येण्यासारखा हवा. अजून भाडोत्री घरातच आहोत. तेव्हा शिफ्टींग नामक एका भीषण प्रकाराला अजून एकदा तरी किमान तोंड द्यायचेच आहे.

मला सुद्धा कोबा फार आवडतो. त्यातही लाल रंगाचा. चांगल्या प्रकारे केला असेल तर उकरला जात नाही. आमच्या गिरगावातल्या घरातला आतल्या खोलीतला कोबा रिपेअरींगच्या वेळेला फोडताना मजूरांचा दम निघाला होता.

आमच्या किंग्ज सर्कलच्या अंगणातला लाल कोबा तर अजूनही जस्साच्या तस्सा आहे. पन्नासच्या वर वर्षं झालीत म्हणे तो करुन.

भटक्या तुमच्या सोफ्याचा फोटो टाकाल का ?
>>> जागू... फोटो २० जानेवारी नंतर टाकू शकीन... Lol

रोझवुड फ्लोरिंग ??
>>> रैना.. ते फ्लोरिंगशी संबंधित नव्हते. एकंदरीत लाकडाचा दर्जा या मधून तो प्रकार उल्लेखला होता.. Happy

खरे लेदर असेल तर घर वातानुकुलीत हवे... Happy नाहीतर गरम किती होईल... गाडीमध्ये सुद्धा लेदर सीट करणे म्हणूनच टाळावे.

मला मार्बोनाईट फ्लोरींग आवडते. पण त्यावर पाणी सांडले तर पाय घसरून पडायला होते का?? (मला करायचे नाहीये आत्ता, पण पुढे मागे करायचे झाल्यास माहीत असलेले बरे म्हणून विचारतेय.)

मला आवडणारे फ्लोरिंग म्हणजे सारवलेले... Happy इथे घरी करणे शक्य नाही आहे..

हल्ली सारवलेल्या जमिनी सारख्या टाईल्स डिसाईन येतात असे ऐकले आहे..

रोहन, तू तुझ्या माजघरात..आपलं हॉलमधे बसव ना सारवलेल्या दिसणार्‍या मॅट फिनिशच्या टाईल्स आणि मधोमध एक सारवलेल्यावर शिरगोळ्याची रांगोळी काढलेल्याचं डिझाईन असलेली टाईल लाव Happy

अजूनही माझ्या गावच्या घराला शेणाचं फ्लोरींग आहे. अन भिंती सुद्धा फुफाटा मातीने सारवलेल्या आहेत. (शेण अन फुफाटा मातीचं ओलं मिश्रण करून सारवलेल्या) Happy माळ्याला , बाभळीच्या लाकडाच्या
फळ्या अन वासे आहेत. Happy सगळ्या देवाची वस्त्रे अडकवण्यासाठी ऐकमेव खुटी चंदणाच्या लाकडाची आहे. Happy

रैना, कोबा म्हणजे सिमेंटचं फ्लोअरींग त्यावर कुठलीही टाईल्स नाही. फक्त ते जसा वापर होत जाईल तसं गुळगुळीत होत जातं.

आणि कोपर्‍यात डेकोरेशन म्हणून मुसळ, उखळ, माठ अरेंज करुन ठेव. अगदीच कैच्याकै होतंय का हे ! Uhoh पण मी बघितलंय गाडगी मडकी, कंदील डेकोरेशन म्हणून ठेवलेले.

ते जसा वापर होत जाईल तसं गुळगुळीत होत जातं.

>> अरे ते आधीपासून पण एकदम गुळगुळीत करता येते...

अश्विनी... करीन काहीतरी भन्नाट... Happy अजून नक्की केलेले नाही पण डोक्यात बरेच किडे आहेत... Happy

भिंती रंगवणे पासून सर्व मी स्वतःच करणार.. Happy

सूर्या.. सारवलेली जमीन आणि कारवी-मातीच्या भिंती अशी घरे माझ्या आजोळी असायची आता पक्की घरी झालीत... काही घरे आहेत मात्र अजून... Happy कसले गार लागते आत मध्ये..

'गेरू' च्या मातीचा रंग लाल असतो ना. वारली जसे डिझाईन बनवण्यासाठी लाल रंगाची माती वापरतात तसाच अगदी.

पक्या, जूनी घरं ती जूनी घरं. अजूनही माळ्यावर पंजोबा पासूनच्या लग्नाची बाशिंग बांधलेली तशीच आहेत. बैलगाडी साठी वंगण घालायची तार अन बुधली सुद्धा तिथेच असते.

माझ्या आताच्या घरी बेडरूमची गॅलरी आत घेतली तेव्हा बेडरूमच्या आणि गॅलरीच्या फ्लोरींगच्या लेव्हलींग मध्ये खूपच फरक असल्याने सिमेंटचा कोबा करून लेव्हल सेम करून घेतली. पन गुळगुळीत वगैरे काही फिनिशिंग नाही त्याला. बेडरूमचा खिडकीकडचा भाग असा काही खरखरीत दिसतो की कधी एकदा नवीन फ्लोरींग करतोय असं झालंय. Sad

Pages