Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स माधव, दोन्ही फोटोसाठी.
धन्स माधव, दोन्ही फोटोसाठी.
कढीपत्त्याची फळ पहिल्यांदाच पाहिली.
कुणाला आठवतेय का माहित नाही
कुणाला आठवतेय का माहित नाही पण साधारण २५/३० वर्षांपूर्वी कोकणात, संतोषी मातेची भाकरी म्हणुन एक प्रकार होता. एका डब्यात म्हणे हि भाकरी ठेवायची आणि शुक्रवारी त्यावर कोरा चहा ओतायचा. मग डब्याचे झाकण लावून ठेवायचे. पुढच्या शुक्रवारी एका भाकरीच्या आपोआप दोन भाकर्या व्हायच्या. माझ्याच काकीकडून हे वर्णन मी ऐकलेय. मग दोन भाकर्या झाल्या कि, त्यातली एक भाकरी दुसर्या सवाष्णीला द्यायची. मग तिनेही तसेच करायचे. त्या वयात मला अचंबा वाटला होता, पण मी ती कधी बघितली नव्हती. (आणि आमच्या घरी असे काही करुही दिले नसते मी.)
मग सहज वाचनात आले त्यावरुन असे वाटते कि कोंबुचा नावाचे ते एक मश्रुम असणार. आरोग्याच्या दृष्टीने त्याची काही फायदेही आहेत. पण कोकणात हा प्रकार कुठून आला, आणि तो मागे कसा पडला, ते मात्र मला माहित नाही.
देवीच्या नावाने असे काही आरोग्यपूर्ण होणार असेल, तर चांगलेच आहे की.
आजपर्यंत मी निसर्गाच्या गप्पा
आजपर्यंत मी निसर्गाच्या गप्पा फक्त वाचतच होते. पण आज मी खूप खूष आहे कारण आजच माझ्या बागेतील ऊमललेल्या फुलांचा मी फोटो देत आहे
व्वा..! फारच सुंदर आहे हे फुल
व्वा..! फारच सुंदर आहे हे फुल
प्रज्ञा हे कोणते फुल आहे..?
चातक ,धन्यवाद. मीच खरेतर
चातक ,धन्यवाद. मीच खरेतर "चातकाप्रमाणे" प्रतिसादाची वाट पाहात होते.
हे फूल अगदि गेल्या वर्षीपर्यंत 'ब्रम्हकमळाचे फऊल' म्हणून ओळखत असत. पण गेल्या वर्षी पेपरमधून ह्याविषयी माहिती आली होती की ते एक प्रकारच्या निवडुंगाचे फूल आहे.
छान आहेत फूले. खर्या
छान आहेत फूले. खर्या ब्रम्हकमळाचा फोटो आडोनी पोस्टला होता इथे. (हेमकुंड... )
मी मुळ्याच्या बिया लावलेल्या
मी मुळ्याच्या बिया लावलेल्या ७-८ आठवड्यांपूर्वी. आधी घरात छोट्या कुंड्यांमधे लावल्या अन १५ एक दिवसांनी रोपं अंगणात लावलीत. त्याला पहिले ३-४ आठवडे मस्त पाला येत होता, पण आता फक्त फुलांचे तुरे येत आहेत. दिन दुने रात चौगुने वाढताहेत फुलं अन शेंगा. मी कितीही खुडल्या तरी पाला फारसा येत नाही . भरपूर पाला येण्यासाठी काय करावं लागेल ?
वा वा मस्त फुले आणि
वा वा मस्त फुले आणि फोटो.
कढीपत्त्याच्या बियां पासुन रोपे येतात. पण या बिया रुजायला खुप वेळ लागतो असे नुकतेच वाचले आहे.
बर मागे मी बटाटे लावुन बघण्याच्या प्रयोगाविषयी म्हणाले होते. त्याची माहीती इथे दिली आहे.
मज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप
मेधा, एकदा शेंगा यायला
मेधा, एकदा शेंगा यायला लागल्यानंतर परत पाला येणार नाहि. शेंगाचीच भाजी केली पाहिजे. नवीन पाला, मूळ्यासाठी नव्याने बिया लावाव्या लागतील.
प्रज्ञा मस्त आलेत फोटो ! खूप
प्रज्ञा मस्त आलेत फोटो ! खूप सुंदर,
चातक, दिनेशदा,सावलि, शांकली
चातक, दिनेशदा,सावलि, शांकली धन्यवाद.
प्रज्ञा, मस्त फोटो... हे
प्रज्ञा, मस्त फोटो...
हे निवडूंगच आहे. Epiphyllum या नावाचे. याचे फुल आपल्या इथे ब्रम्हकमळ म्हणुन ओळखले जाते. अर्थात मुळ ब्रम्हकमळ जरी वेगळे असले तरी हे इतके सुंदर दिसते की याला ब्रम्हकमळ म्हणुन हाक मारायला माझी तरी काहीच हरकत नाही. एकच वाईट गोष्ट म्हणजे हे रात्री फुलते आणि सकाळप्र्यंत कोमेजते.
छान फोटो प्रज्ञा. पण गेल्या
छान फोटो प्रज्ञा.
पण गेल्या वर्षी पेपरमधून ह्याविषयी माहिती आली होती की ते एक प्रकारच्या निवडुंगाचे फूल आहे.>>>>"फड्या निगडुंग" नाव आहे ना?
अर्थात मुळ ब्रम्हकमळ जरी वेगळे असले तरी हे इतके सुंदर दिसते की याला ब्रम्हकमळ म्हणुन हाक मारायला माझी तरी काहीच हरकत नाही. >>>>>>माझी पण काहीच हरकत नाही
मेघा मुळ्याचे बी पेरले आणि
मेघा मुळ्याचे बी पेरले आणि मुळ्याला ५-६ पाने येउन ती थोडी मोठी झाली की मुळा काढायचा असतो. लगेच होतो मुळा अगदी १५ दिवसांत काढता येतो. आता नव्याने बी लाव.
प्रज्ञा माझ्याकडेही परवा फुलली. छान आहेत तुझी फुले.
अरे व्वा. मस्त फोटो. काल
अरे व्वा. मस्त फोटो. काल माझ्याकडे पण ५ फुले फुलली. मी फोटो टाकणार होते. पण आता जाऊदे.
(सगळे माझा नंबर का घेतात? :अओ:)
सुशोलभा पुढच्या वेळी तु
सुशोलभा पुढच्या वेळी तु सगळ्यांचा नंबर घे.
हे
हे पहा.
http://72.78.249.107/Sakal/29Jun2011/Normal/PuneCity/page3.htm
http://72.78.249.107/Sakal/29Jun2011/Normal/PuneCity/page7.htm
वा सुशोलभा! फारच छान!
वा सुशोलभा! फारच छान!
सुशोलभा, याफुलांना 'तुतारी'-
सुशोलभा, याफुलांना 'तुतारी'- Datura arborea असं म्हणतात. खरंतर ही फेब्रू-एप्रिल या दरम्यान फुलतात. या वर्षी जरा उशीरा जाग आलेली दिसतेय.
स्मार्ट फोन app, निस्र्ग
स्मार्ट फोन app, निस्र्ग प्रेमी साठी. " Leafsnap"
This is a free app that you can use while walking through the woods. You can take a picture of any leaf, and it will tell you the name of the tree, its history, diseases, geographic spread, and the information will also be sent to a data base to map the foliage of the US .
हे बघा आमच्या नारळांवर चढलेले
हे बघा आमच्या नारळांवर चढलेले घुसखोर उंदीर. चढतात आणि कोवळे नारळ खात बसतात.
अगं येडे, त्यांचे फोटो काय
अगं येडे, त्यांचे फोटो काय काढत बसलीस. घे एक काठी आणि हाण त्यांच्या डोसक्यात........
अगं येडे, त्यांचे फोटो काय
अगं येडे, त्यांचे फोटो काय काढत बसलीस. घे एक काठी आणि हाण त्यांच्या डोसक्यात........
नारळांसारखे उंदिर लागलेत
नारळांसारखे उंदिर लागलेत वाट्टं झाडाला झाडाला चिकटा बांधून ठेव नाहीतर पिंजरा बांध.
हो माझ्य घरी पण असेच छ उंदिर
हो माझ्य घरी पण असेच छ उंदिर आहेत. ४ थ्या मजल्यावर आहे माझं घर तरी. आधी नारळाच्य झाडावरुन यायचे. मग झावळ्या तोडल्या तेव्हा पासुन खिड्कितुन येतात. माझ्या मुळ्याची वाट लावली अगदि.
मी ना एकदा कत्तल करणार आहे
नारळावरुन आठवलं. नारळाच फुल
नारळावरुन आठवलं. नारळाच फुल आणि कळी दोन्ही किती सुंदर असतात ना?
जागू, नारळाच्या झाडाच्या
जागू, नारळाच्या झाडाच्या बुंध्याला चौफेर शंकूच्या आकाराचा पत्रा ठोक किंवा बांध. उंदराना, पालीसारखे उलटे म्हणजे छताच्या खालून चालता येत नाही. अगदी सोपा उपाय आहे हा.
समुद्रातले काही मोठे खेकडेही नारळाच्या झाडावर चढून खोबरे खातात !!
दिनेशदा सही आयडीया. आता तेच
दिनेशदा सही आयडीया. आता तेच करते.
जागुतै काय गोडगोजीरे आहेत
जागुतै काय गोडगोजीरे आहेत दोघे....
जागू, काय ग, काय फौज पाळतेस.
जागू, काय ग, काय फौज पाळतेस. भिती नाहि का वाटत. तीन तीन गोजिरवाणी पिल्ले म्हणजे मोठी किती असणार?
Pages