Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निकिता, दिनेश म्हणताहेत ते
निकिता, दिनेश म्हणताहेत ते कांडोळ किंवा घोस्ट ट्री (Sterculia urens)
मी घोळ घातला. घोस्ट ट्री
मी घोळ घातला. घोस्ट ट्री बरोबर.
दुसर एक झाड त्याच्या बाजुलाच आहे हिरवी फळ की फुल असतात त्याला आणी ती उलटी उमलतात (फुटतात). म्हण़जे जमिनीकडे तोंड करुन.
जिप्सी तुझ्यासाठी एक प्रश्न. फॉरेस्ट रोड वर ती बॉल सारखी फळ/फुल येणारी झाड आहेत ती कुठली. सध्या एकदम सगळी फुलली आहेत.
निकीता तो कदंब आहे.
निकीता तो कदंब आहे.
होय निकिता, ते कदंबाचेच झाड
होय निकिता, ते कदंबाचेच झाड आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने, तु बघुन आलीस करमळ?
मला कदंबाचे फुललेले झाड
मला कदंबाचे फुललेले झाड पाहण्याची खुप इच्छा आहे. आमच्याकडे कुठे दिसले नाही.
आमच्याकडे एक झाड आहे त्याचे
आमच्याकडे एक झाड आहे त्याचे नाव कदंब आहे असे मध्यंतरी कुणीतरी मला सांगितले. खूप सडा पडतो फळा फुलांचा. त्या आधी मला ती फळं उंबरासारखी वाटायची पण झाड तर उंबराचे दिसत नव्हते.
जिप्स्या, त्या फूलाचा, खास
जिप्स्या, त्या फूलाचा, खास करुन मधल्या भागाचा क्लोजप घे. खुप फूले असतील, तर फोटोसाठी एक फूल तोडण्याचा गुन्हा माफ !!
जागू, मुंबई मधे नरिमन पॉइंटजवळ कदंबाची झाडे आहेत. दादरला हिंदु कॉलनीत आहे. भाइंदरला रेल्वेलाईनजवळच आहेत.
मला वाटलच तो कदंब आहे. कसला
मला वाटलच तो कदंब आहे. कसला सुंदर आहे तो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करमळ आज पहाणार..
देव करो एक फुल झाडाखाली मिळो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नवी मुंबईत नाहीत का कुठे ?
नवी मुंबईत नाहीत का कुठे ? मुंबईला कधी जाणे होईल तेंव्हा बघेन. पण फुले मौसमातच येत असतील ना ?
एक विचारायचय बर्याच दिवसांपासुन रोज विसरते. हादग्याला झाड किती मोठे झाल्यावर फुले येतात ? मी आत्ताच लावलय.
जिप्सि करमळांची फुलं खुप
जिप्सि करमळांची फुलं खुप सुंदर दिसतायत.
अश्चिनी, कॅडबरी ते एसटी
अश्चिनी, कॅडबरी ते एसटी वर्कशोप हा रस्ता नुसता भरलाय कदंबाने. आता फुलायला लागली आहेत झाडे. या विकेंडला जमल्यास बघून ये. पुढच्या विकेंडला बहर ओसरेल. रच्याकने एक अठीळ लावली आहे. बघू झाड येतय का ते.
तिकडे पण सडेच सडे पडले असतील
तिकडे पण सडेच सडे पडले असतील ना? त्या झाडाखालून मी नेहमी जायचे पण कधी वर बघितलंच नव्हतं (कर्मदरिद्री.. दुसरं काय? ) कारण ते झाड एका अर्धवट बांधकाम होऊन आता विद्रुप दिसणार्या बिल्डिंगला खेटून आहे. मला वाटतं अम्या (बागुलबुवा) की त्याची बायको म्हणाली होती की तो कदंब आहे.
आठिळ लावलीत? मस्तच. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनी के, सहज म्हणुन मी
अश्विनी के, सहज म्हणुन मी लिची ची बी लावली होती. १ विताचे झाड व ५-६ पाने आहेत. हवामानामुळे का काय माहित नाही पण आपल्या इथे दिसत नाही लिची ची झाडे, तु ट्राय करु शकतेस, अपेक्षेपेक्षा लवकर आले झाड, जरा वेगळे काहीतरी. पपई, देखील वाढते बी लावली की.
ह्या झाडांखाली खच नाही.
ह्या झाडांखाली खच नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बहुतेक साफ करतात..
पण कसला फुललाय.
अजुन एक्..पळस परत फुलतो का? मी माझ्या घरा जवळ हल्लीच पाहिलाय अस वाटतयं. माझं क्नॉलेज (मराठी शब्द येतो पण टाइप करता येत नाही अद्यान कसं लिहायच?) अगाध आहे
सहज म्हणुन मी लिची ची बी
सहज म्हणुन मी लिची ची बी लावली होती. >>>>मला उत्तरांचल भटकंतीत भरपूर दिसली लीचीची झाडे
फोटो देतो इथे नर ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नवी मुंबईत नाहीत का कुठे
नवी मुंबईत नाहीत का कुठे ?
अगं इथे भरपुर आहेत, झाड एकदम त्रिकोणी दिसते. रविवारी पाने आणते तुझ्यासाठी, मग ओळखशील लगेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहज म्हणुन मी लिची ची बी लावली होती
माझ्याकडेही एक उगवलेय. मी ७-८ बीया टाकलेल्या पण एकच आलेय.
हे कांडोळचे फोटो. फळ की
हे कांडोळचे फोटो.
फळ की फुल
![](https://lh3.googleusercontent.com/-5FcmknFbJpM/TbGHvsZL92I/AAAAAAAAAR8/xGfe8NLnl3U/s800/IMG_0077.jpg)
झाड
![](https://lh4.googleusercontent.com/-X4sSFpScoc4/TbGJR23TrjI/AAAAAAAAASE/w-qU3xJzdBo/s800/IMG_0076.jpg)
साधना कुठे आहे ते सांग मी आले
साधना कुठे आहे ते सांग मी आले की बघेन.
ही फुले कसली आहेत ?
ही फुले कसली आहेत ?
ही मी नॅशनल पार्कात पाहिली
ही मी नॅशनल पार्कात पाहिली होती.
ही माझ्या ऑफिसच्या पुढच्या
ही माझ्या ऑफिसच्या पुढच्या जंगलात आहेत.
कांडोळ आहेत तशीच फुलं/फळं पण
कांडोळ आहेत तशीच फुलं/फळं पण हिरवी/काळी.
रंगीत कधी पाहीली नाही.
जागू, कांडोळाचा शेवाळे
जागू, कांडोळाचा शेवाळे आल्यासारखा पुंजका दिसतो तो त्याचा मोहोर (फूले) आणि लाल पिवळे पंचधारी दिसते ते फळ. पण त्या फळाला खुप कुसे असतात. त्यातल्या बिया भाजून खाता येतात.
दुसरी पांढरी फूले आहेत ती काळ्या कुड्याची.
आपल्याकडे, डहाणु / घोलवड भागात लिचीची झाडे आहेत. माझ्या माहितीत कर्जतला पण आहेत. त्यामुळे आपल्याकडे झाड वाढू शकेल.
हाच का तो काळा कुडा ? ह्यालाच
हाच का तो काळा कुडा ? ह्यालाच शेंगा येतात का ? तुम्ही मागे म्हणत होतात त्या ?
हो होते आपल्याकडे हे झाड. मी
हो होते आपल्याकडे हे झाड. मी लहान असताना माझ्या आईकडे होते. त्याला लिचीही यायच्या पण नंतर झाड जुनं झाल्यावर यायच्या बंद झाल्या.
जागू, कदंब बघायला अंबरनाथला
जागू, कदंब बघायला अंबरनाथला ये माझ्याकडे. आमच्याकडे भरपूर आहेत कदंब अन् सगळे आता फूललेत.
इथे पुण्यात तावरे कॉलनीत पण
इथे पुण्यात तावरे कॉलनीत पण कदंबाचे २ वृक्ष फुलले आहेत. फारच सुंदर आणि देखणे आहेत ते दोन्ही. अर्थात कदंब असतोच तसा! राजबिंडा!
जिप्सी, कित्ती सुंदर आलेत
जिप्सी, कित्ती सुंदर आलेत फोटो करमळाचे! मी आधी शेवटच्या पानावर गेले आणि नंतर अलिकडच्या पानावर आले.
फारच सुंदर फोटो आलेत.
शांकली तुम्हालाही धन्यवाद
शांकली तुम्हालाही धन्यवाद
तुमचे फोटो बघुनच समजले कि करमळ फुलली. आणि खास धन्यवाद दिनेशदांना राणीबाग भटकंतीत या झाडाची ओळख करून दिल्याबद्दल. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे अजुन काही क्लोज-अप फोटोज् दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे:-)
(दिनेशदा, एकही फुल न तोडता फोटो काढले. फुल तोडायला मनच करत नव्हते म्हणुनच खास झूम लेन्स घेऊन गेलो. :-))
टपोरी कळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh4.googleusercontent.com/-INFkd9crA-s/ThSTGGAbRwI/AAAAAAAADQI/PxhGi98X_FQ/s640/IMG_1863_copy%252520copy.jpg)
![](https://lh6.googleusercontent.com/-Y184Z-_-tC8/ThSTG4IOsoI/AAAAAAAADQM/5Z7XvXA3nVQ/s640/IMG_1856%252520copy.jpg)
![](https://lh6.googleusercontent.com/-4raD2j894OA/ThSTHTAwr9I/AAAAAAAADQQ/zd96qUWSULY/s640/IMG_1864%252520copy.jpg)
![](https://lh6.googleusercontent.com/-7zxC7HMoCnQ/ThSTIb5YDaI/AAAAAAAADQU/JcjbRjo5SEQ/s640/IMG_1870%252520copy.jpg)
![](https://lh3.googleusercontent.com/-4E86AvPYK_8/ThSTJP_SKWI/AAAAAAAADQY/2pTNw3_UONQ/s640/IMG_1872%252520copy.jpg)
एक पाकळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh6.googleusercontent.com/-yzKkVwfew_Y/ThSTJ5wqv1I/AAAAAAAADQg/P2uoTRLqqFA/s640/IMG_1873%252520copy.jpg)
हे खास जागूसाठी कदंब
हे खास जागूसाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कदंब
![](https://lh3.googleusercontent.com/-3PV_dHoPlDI/ThSTLyTnDqI/AAAAAAAADQo/QqPYrLAvyF0/s640/IMG_1869%252520copy.jpg)
![](https://lh5.googleusercontent.com/-cr0BsUkK7rw/ThSTKbunI1I/AAAAAAAADQk/0aWQZIWNhlg/s640/IMG_1882%252520copy.jpg)
Pages