निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही उगवली Sad मी आता ४ कुंड्यांमध्ये मका पेरलाय. तो नक्की येईल. गेली ३ वर्षं उगवतेय मक्याचा चारा.

माधव, वेळ असेल तर आज दाखवतो करमळचं झाड. >>> दोगंबी एकाच हापिसात हैत का?>>>>नै कै Happy पण हापिस जवळपासच हैत :-).

आत्ताच माधव आणि मी परत जाऊन करमळ पाहुन आलो. पाकळ्या पण टेस्ट केल्या Proud मस्त आंबटगोड होत्या. Happy

न्हाय येकाच हाफिसात न्हाय पन येकाच भागात हायेत. Happy आलो बघून मोठी करमळ. जिप्स्यामुळे एक सर्वांगसुंदर झाड बघायला मिळाले. खूप धन्यवाद रे जिप्सी Happy

अश्चिनी तुला नक्की कशाकरता रोपे हवी आहेत आणि कधी हवी आहेत? माझ्याकडे बर्‍याच आठळा पडल्यात. फणसाचे रोप येते का ते बघू का?

माधव, मला बाभळीची रोपं करायची आहेत एका प्रोजेक्टसाठी. तरी दुसर्‍या वृक्षांची रोपं केलीत तरी चालतीलच. ती त्या प्रोजेक्टसाठी नसली तरी रुटीन वृक्षारोपणांसाठी उपयोगी येतीलच. तुमची रोपं साधारण १-२ फुट तयार झाली की मला सांगा. मी येऊन घेऊन जाईन. धन्यवाद Happy

होय दिनेशदा,
पिवळा तबेबुया पण पाहिला आहे. आमच्याइथेच सारंग सोसायटीच्या इथे मुक्तांगण आणि सातव हॉल यांमधे हे झाड आहे. याची फुलं मार्च महिन्यात येतात; पण अगदी ५/६ दिवसांत तो बहर ओसरून पण जातो. त्याची पानं अरुंद असतात. पण फुलं किती ब्राइट पिवळी असतात नाही? मला पण तोच जास्त आवडतो या गुलाबी तबेबुयापेक्षा.

हो शांकली, त्या पिवळ्या रंगात काहितरी जादू आहे खरी. कोल्हापूर ला आहेत हि झाडे. बेळगावला पण खुप आहेत. त्या मानाने हा गुलाबी रंग जरा निस्तेज वाटतो.

माधव, पानाचा फोटो मस्त आलाय. आता जिप्स्याच्या फोटोची वाट बघतो. पण हे फोटो सकाळी काढावे लागतील. त्यावेळीच हि फुले सुंदर दिसतात.

जिप्सी,
पिवळ्या तबेबुयाचे फोटो मस्त आलेत हं! तुम्ही आणि माधव दोघांनी पण मोठ्या करमळाचा बहर बघाच म्हणजे त्याचं वर्णन शब्दांत मांडणं किती अवघड आहे हे कळेल इतकं सुंदर फूल आहे ते. आणि त्या फुलांचे फोटो पण टाका.

सर्वात मोठे फूल येणारे झाड आहे ते आपल्याकडचे. स्पर्धा कदाचित गोरखचिंचेची असेल, पण ते आफ्रिकेतून आले आहे. आता अनेक जास्वंदी त्या स्पर्धेत उतरल्यात. दिल्ली सावर पण आहेच.
सगळ्यात मोठे फूल येणारी वेल म्हणजे भीमाची वेल. हि वेल आंबोली / सावंतवाडी भागात आहे. तिला दिवाळीच्या दरम्यान फूले येतात.

साधना भूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊण.

हे पिवळ्या फुलांचे झाड टॅबुबिया आहे होय ! आमच्या ऑफिसमध्ये आहेत ही झाडं. >>>>> आमच्या सोसायटीत पण आहेत. माझ्या घराच्या गॅलरी समोरच.

पिवळा टॅबुबिया किती गोड.
मला वाटत त्या झाडाच्या काळपटपणाकडे झूकण्यार्या खोडामूळे त्याच्या फूलांचा रंग जास्त उठून दिसतो.

धन्यवाद !
शांकली >>तबेबुया (दोन्ही प्रकारचा) पहिल्यांदाच पाहायला मिळाला.त्या झाडाची पाने प्रथम पाहिल्यावर करंजासारखीच वाटली
दिनेशदा>>तिथले आकाशातले फोटो छान वाटले,नविन अनुभव
माधव् >>करमळीचा फोटो पहिल्यांदाच पाहिला
जिप्सी >> बांबुचा फोटो तर मस्तच.आज हा तबेबिया इकडे कुठे दिसतो का ते बघणार आहे.
Happy

दिनेश, जागु, जिप्सी... सगळे मिळुन आंबोलीची ट्रिप मारुया एकदा./... Happy

दिनेश सोनघंटा फेब/मार्च मध्ये फुलते असे गावी ऐकले. मलाही उत्सुकता आहे. गावक-यानी फ्लॉवर ऑफ इंडियावरचा फोटो पाहुन हेच फुल त्यानी पाहिलेय असे सांगितलेय पण आपण प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहिल्याशिवाय काय्बी खरे नाय बा... Happy

निकिता, कराया गम का ? (भूताचे झाड / कांडोळ)

साधना, आता जिप्सी, जागूला घेऊन जा, (हिच्या घोवाला कोकण दाखवा !!!)

दिनेश, जागु, जिप्सी... सगळे मिळुन आंबोलीची ट्रिप मारुया एकदा./...>>>>मी तय्यार, कधी जायचे ते ठरवा. Happy

मोठ्या करमळीच्या फुलांचे फोटो Happy (तितकेसे खास नाही आले म्हणुन आज वेळ असेल तर परत जाणार आहे. ;-))

हा फोटो खास पानांसाठी

त्याच बागेतला हा आराम करत असलेला दगडी टेडी Happy

Pages