निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला आठवतेय का माहित नाही पण साधारण २५/३० वर्षांपूर्वी कोकणात, संतोषी मातेची भाकरी म्हणुन एक प्रकार होता. एका डब्यात म्हणे हि भाकरी ठेवायची आणि शुक्रवारी त्यावर कोरा चहा ओतायचा. मग डब्याचे झाकण लावून ठेवायचे. पुढच्या शुक्रवारी एका भाकरीच्या आपोआप दोन भाकर्‍या व्हायच्या. माझ्याच काकीकडून हे वर्णन मी ऐकलेय. मग दोन भाकर्‍या झाल्या कि, त्यातली एक भाकरी दुसर्‍या सवाष्णीला द्यायची. मग तिनेही तसेच करायचे. त्या वयात मला अचंबा वाटला होता, पण मी ती कधी बघितली नव्हती. (आणि आमच्या घरी असे काही करुही दिले नसते मी.)

मग सहज वाचनात आले त्यावरुन असे वाटते कि कोंबुचा नावाचे ते एक मश्रुम असणार. आरोग्याच्या दृष्टीने त्याची काही फायदेही आहेत. पण कोकणात हा प्रकार कुठून आला, आणि तो मागे कसा पडला, ते मात्र मला माहित नाही.

देवीच्या नावाने असे काही आरोग्यपूर्ण होणार असेल, तर चांगलेच आहे की.

आजपर्यंत मी निसर्गाच्या गप्पा फक्त वाचतच होते. पण आज मी खूप खूष आहे कारण आजच माझ्या बागेतील ऊमललेल्या फुलांचा मी फोटो देत आहेDSCN2638.JPGDSCN2639.JPGDSCN2640.JPGDSCN2642.JPGDSCN2643.JPGDSCN2645.JPGDSCN2647.JPG

चातक ,धन्यवाद. मीच खरेतर "चातकाप्रमाणे" प्रतिसादाची वाट पाहात होते. Happy
हे फूल अगदि गेल्या वर्षीपर्यंत 'ब्रम्हकमळाचे फऊल' म्हणून ओळखत असत. पण गेल्या वर्षी पेपरमधून ह्याविषयी माहिती आली होती की ते एक प्रकारच्या निवडुंगाचे फूल आहे.

मी मुळ्याच्या बिया लावलेल्या ७-८ आठवड्यांपूर्वी. आधी घरात छोट्या कुंड्यांमधे लावल्या अन १५ एक दिवसांनी रोपं अंगणात लावलीत. त्याला पहिले ३-४ आठवडे मस्त पाला येत होता, पण आता फक्त फुलांचे तुरे येत आहेत. दिन दुने रात चौगुने वाढताहेत फुलं अन शेंगा. मी कितीही खुडल्या तरी पाला फारसा येत नाही . भरपूर पाला येण्यासाठी काय करावं लागेल ?

वा वा मस्त फुले आणि फोटो.
कढीपत्त्याच्या बियां पासुन रोपे येतात. पण या बिया रुजायला खुप वेळ लागतो असे नुकतेच वाचले आहे.

बर मागे मी बटाटे लावुन बघण्याच्या प्रयोगाविषयी म्हणाले होते. त्याची माहीती इथे दिली आहे.
मज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप

मेधा, एकदा शेंगा यायला लागल्यानंतर परत पाला येणार नाहि. शेंगाचीच भाजी केली पाहिजे. नवीन पाला, मूळ्यासाठी नव्याने बिया लावाव्या लागतील.

प्रज्ञा, मस्त फोटो...

हे निवडूंगच आहे. Epiphyllum या नावाचे. याचे फुल आपल्या इथे ब्रम्हकमळ म्हणुन ओळखले जाते. अर्थात मुळ ब्रम्हकमळ जरी वेगळे असले तरी हे इतके सुंदर दिसते की याला ब्रम्हकमळ म्हणुन हाक मारायला माझी तरी काहीच हरकत नाही. एकच वाईट गोष्ट म्हणजे हे रात्री फुलते आणि सकाळप्र्यंत कोमेजते. Sad

छान फोटो प्रज्ञा.

पण गेल्या वर्षी पेपरमधून ह्याविषयी माहिती आली होती की ते एक प्रकारच्या निवडुंगाचे फूल आहे.>>>>"फड्या निगडुंग" नाव आहे ना?

अर्थात मुळ ब्रम्हकमळ जरी वेगळे असले तरी हे इतके सुंदर दिसते की याला ब्रम्हकमळ म्हणुन हाक मारायला माझी तरी काहीच हरकत नाही. >>>>>>माझी पण काहीच हरकत नाही Proud Happy

मेघा मुळ्याचे बी पेरले आणि मुळ्याला ५-६ पाने येउन ती थोडी मोठी झाली की मुळा काढायचा असतो. लगेच होतो मुळा अगदी १५ दिवसांत काढता येतो. आता नव्याने बी लाव.

प्रज्ञा माझ्याकडेही परवा फुलली. छान आहेत तुझी फुले.

अरे व्वा. मस्त फोटो. काल माझ्याकडे पण ५ फुले फुलली. मी फोटो टाकणार होते. पण आता जाऊदे.
(सगळे माझा नंबर का घेतात? :अओ:)

सुशोलभा, याफुलांना 'तुतारी'- Datura arborea असं म्हणतात. खरंतर ही फेब्रू-एप्रिल या दरम्यान फुलतात. या वर्षी जरा उशीरा जाग आलेली दिसतेय.

स्मार्ट फोन app, निस्र्ग प्रेमी साठी. " Leafsnap"

This is a free app that you can use while walking through the woods. You can take a picture of any leaf, and it will tell you the name of the tree, its history, diseases, geographic spread, and the information will also be sent to a data base to map the foliage of the US .

हो माझ्य घरी पण असेच छ उंदिर आहेत. ४ थ्या मजल्यावर आहे माझं घर तरी. आधी नारळाच्य झाडावरुन यायचे. मग झावळ्या तोडल्या तेव्हा पासुन खिड्कितुन येतात. माझ्या मुळ्याची वाट लावली अगदि.
मी ना एकदा कत्तल करणार आहे

जागू, नारळाच्या झाडाच्या बुंध्याला चौफेर शंकूच्या आकाराचा पत्रा ठोक किंवा बांध. उंदराना, पालीसारखे उलटे म्हणजे छताच्या खालून चालता येत नाही. अगदी सोपा उपाय आहे हा.
समुद्रातले काही मोठे खेकडेही नारळाच्या झाडावर चढून खोबरे खातात !!

Pages