Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मनातलं आहे हे अगदी,की
माझ्या मनातलं आहे हे अगदी,की एखाद्या झाडाचा फोटो, किंवा त्याच्या पाना-फुलाचा फोटो जर अपलोड केला तर त्या झाडाचं नाव कळावं,अशी काहीतरी जादू (म्हणजे सिस्टिम) कम्प्यूटरवाल्यांनी तयार करावी. हे अॅप म्हणजे काय आहे ते तपशिलवार सांगणार का?
अरेच्या, मी ही पोस्ट टाके
अरेच्या, मी ही पोस्ट टाके पर्यंत त्या अॅप बद्द्ल लिंक पण आली की!
शांकली, आयफोन, आयपॅड असेल तर
शांकली, आयफोन, आयपॅड असेल तर हे अॅप डाऊनलोड करता येईल. काही अॅप्स फ्री असतात तर काहींना चार्ज असतो.
अॅप म्हणजे अॅप्लिकेशन.
आभार सायो, फॅन्टास्टीक आहे.
आभार सायो,
फॅन्टास्टीक आहे. त्यांचा डेटाबेस लवकरच वाढो. म्हणजे सगळ्यांना उपयोग होईल.
सायो,माहिती बद्दल आभार.
सायो,माहिती बद्दल आभार.
हाय.. असले काही आमच्या साध्या
हाय.. असले काही आमच्या साध्या मोबाईलमध्येही उपलब्ध झाले तर काय बहार येईल..........
हे बांबुसारख काय आहे ?
हे बांबुसारख काय आहे ?
हे बांबुच आहेत. बहुतेक जपानी
हे बांबुच आहेत.
बहुतेक जपानी बांबु आहेत. त्यांची खोडे अशीच असतात. अर्थात विलायती नावाच्या सगळ्या गोष्टी देशीच असतात हे सांगायला नकोच.
उजु, हिरड्याच्या झाडाचा फोटो
उजु,
हिरड्याच्या झाडाचा फोटो पहिल्यांदाच पाहिला.
ही झाड पुण्यात कुठे आहेत का ते बघाव लागेल ?
मला माझ्या ऑफिसच्या
मला माझ्या ऑफिसच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर अजून एक वृक्ष दिसला 'शिवण'(Gmelina arborea)! त्याचे मोबाइलवरून काढलेले फोटो. सातारा रोडकडून सुरभि मंगल कार्यालयाकडे येताना डाव्या हाताला हे महाशय इतर झाडांमधे अंग चोरून उभे आहेत. अर्थात वयाने पण हे महाशय जरा लहानच आहेत, पण पानांवरून ओळख
पटतेच.
जागू,तू टाकलेला फोटो Buddha's
जागू,तू टाकलेला फोटो Buddha's Belly Bamboo (Bambusa ventricosa) या नावाने ओळखला जातो. हा चीनमधून आपल्याकडे आला.
शांकली, याला फूले नाही आली
शांकली, याला फूले नाही आली अजून ? छान पिवळी आणि चॉकलेटी रंगाची फूले येतात याला !
दिनेशदा,हा वृक्ष खूप लहान
दिनेशदा,हा वृक्ष खूप लहान आहे, पूर्ण वाढ अजून झाली नाहीये जेमतेम २/३ मी. उंच असेल.पानं तर माझ्या हाताला लागत होती,(मी फक्त ५ फूट २ इंच उंच आहे)म्हणजे बघा किती बाळवृक्ष असेल हा. पण परत एकदा डॉ.डहाणूकरांचे शब्द आठवले आणि मला पण 'आजि म्या ब्रह्म पाहिले!' असे झाले.कुठलेही झाड बघितले की मला डॉ.च आठवतात. तुमचा मला खूप हेवा वाटतो,की अशा व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभला!
दिनेशदा एप्रिल्-मे मध्येच
दिनेशदा एप्रिल्-मे मध्येच शिवणीला फुल येउन गेली. आता फळे धरत असतील.
जपानी बांबु >> जपानात
जपानी बांबु >> जपानात बघितलेला नाही
माळरानांचे जंगल करण्यासाठी >> खुप वर्षापुर्वी वाचलेली माहीती. कोणी एक गृहस्थ घरात फळ खाऊन उरलेल्या बिया साफ करुन ठेवत. आणि वर्तमान कागदाच्या छोट्या पिशव्यात थोडी माती घेऊन त्यात प्रत्येकी दोन तीन बिया टाकुन मोठ्या पुड्या करुन ठेवत. ट्रेनने दुर जाताना किंवा डोंगरावर फिरायला जाताना ते दुर वर वेगवेगळ्या ठिकाणि फेकुन येत. यामुळे किती झाडं जगली, मोठी झाली ते काही माहित नाही पण ५% रोपं उगवुन त्याची झाडं जगली तरी खुप आहे.
फक्त ते जंगलात सगळीकडे ते कागद फार खराब दिसतील त्यापेक्षा पानाच्या द्रोणात टाकायला हवे.
तब्बल ३६ तास बाभळीच्या बिया
तब्बल ३६ तास बाभळीच्या बिया भिजत ठेवल्या तरी मोड आलेच नाहीत. फक्त त्यांचा कडकपणा कमी झाला. आज सकाळीच त्या पिशवीत माती घालून रुजायला घातल्यात. बघू काय होतं ते.
फक्त ते जंगलात सगळीकडे ते कागद फार खराब दिसतील त्यापेक्षा पानाच्या द्रोणात टाकायला हवे. >>> अगदी अगदी
ही आयडीया मागे जिप्सिने दिलि
ही आयडीया मागे जिप्सिने दिलि होती बिया फेकण्याची.
अश्विनी फक्त बाभळीच हवी का ग ? दुसरी झाडे नाही चालणार ? माझ्याकडे रामफळांची झाडे उगवली आहेत. तसेच आता बरीच कसली कसली उगवतील.
अश्विनी खरच बाभळी पेक्षा
अश्विनी खरच बाभळी पेक्षा दुसरे काहीतरी लाव ना.
बोगनवेल, मेंदी हे चांगले पर्याय आहेत.
सावली, डेक्कन क्वीनचे प्रवासी
सावली, डेक्कन क्वीनचे प्रवासी हा उद्योग करतच असत. त्यांनी फेकलेल्या बियांची झाडे खंडाळा घाटात उगवली आहेत.
आता कसारा रेल्वे घाटात हा प्रयोग करायला पाहिजे. त्या मार्गावरचा परिसर, उन्हाळ्यात खूप उजाड दिसतो.
आणि साधा कागद असेल (फार छपाई नसलेला) तर तो मातीत मिसळून जातो. फक्त प्लॅस्टीकचा नको.
जागू, तू सगळ्या ट्रेकर्सना व्हाया उरण जायला सांग. हि रोपे आताच दुसरीकडे लावली तर बाकिच्या पावसाळ्यात तग धरतील.
मी ट्रेकर्सना देण्याएवढी रोपे
मी ट्रेकर्सना देण्याएवढी रोपे नाही जमवु शकत पण बिया जमवु शकते. बिया पिशव्यांमध्ये रुजवल्याही असत्या पण तेवढी मातीही हवी ना.
सावली, बाभळीचं बी मिळालं होतं
सावली, बाभळीचं बी मिळालं होतं ते लावलंय. बाकीचे पर्याय पुढे पाठवलेत इमेल करुन
जागू, रामफळंच काय, कसल्याही मोठ्या वृक्षांची रोपटी चालतात. तुझ्याकडे अशी रोपटी तयार झाली की तुझ्या ओळखीचे कुणी आमच्या संस्थेतील आहेत त्यांना विचारुन देऊन टाक किंवा दिनेशदा म्हणतात तसं कुणी भटके असतील त्यांच्याजवळ देऊन टाक. फक्त भटक्यांना खड्डे खणून रोपं लावणं कितपत शक्य होईल कुणास ठाऊक. ते लोक्स बिया नक्की उधळू शकतील.
त्यांनी फेकलेल्या बियांची
त्यांनी फेकलेल्या बियांची झाडे खंडाळा घाटात उगवली आहेत.>> अरे वा छान.
ओके अश्विनी
सागाची रोपे कशी तयार करतात? (मी विचारुन सांगते माहीती मिळाली तर ) तीही लावता येतील ना माळरानावर. साग असेल तर तोडताही येणार नाही ( कि चोरुन तोडला जाईल? )
सावली, माळरानावरचा साग नक्की
सावली, माळरानावरचा साग नक्की चोरीला जाणार आणि साग हे सावलीचे झाड नाही.
साग हे सावलीचे झाड नाही.>>
साग हे सावलीचे झाड नाही.>>
ह्म्म साग म्हटलं चोर येतीलच. त्यापेक्षा साधी सुधी फळझाडं बरी.
सावली सागाच्या बियांपासुन
सावली सागाच्या बियांपासुन रोपे उगवत असतील. सागाच्या झाडाखाली दिसतात छोटी झाडे.
हा बाफ "निसर्गाच्या गप्पा"
हा बाफ "निसर्गाच्या गप्पा" असा असला तरी घरची बाग मध्ये असल्याने पक्ष्याबद्दल पोस्ट नाही ना चालणार? आता चिमणी हा पक्षी शोधूनही सापडत नाही. काही वर्षांपुर्वी कावळ्यांपक्षाही जास्त चिमण्या दिसायच्या. इथे तिथे बसायच्या, भुर्र उडायच्या. त्या चिमण्या परत दिसू लागाव्यात, त्यांची पैदास जास्त व्हावी यासाठी आपण काय करु शकतो?
अश्विनी निसर्ग म्हटल की
अश्विनी निसर्ग म्हटल की त्यातील सगळेच घटक आले ग. पक्षी पण आलेच.
खर म्हणतेस. हल्ली चिमण्या खुप कमी दिसतात. पहीला नुसती त्यांची चिव चिव अंगणात काही ना काही उचलुन न्यायला यायच्या. मी लहान असताना आम्यच्या घरातल्या तसबिरीच्या मागे घरट करायच्या.
शेवळाचा कंद. पुढे त्या
शेवळाचा कंद. पुढे त्या शेवळामधुन असे बोके येतात. नंतर सुरणासारखे झाड होते. त्याचा फोटो नंतर टाकेन.
माझ्याकडे रामफळांची झाडे
माझ्याकडे रामफळांची झाडे उगवली आहेत
माझ्यासाठी ठेव एक...
त्या चिमण्या परत दिसू लागाव्यात, त्यांची पैदास जास्त व्हावी यासाठी आपण काय करु शकतो?
मोबाईल टॉवर्स तोडा २० वर्षांपुर्वी आपण मजेत होतोच ना??????????
एनी वे, माझ्या घरी चिमण्या आहेत भरपुर. पण तरीही कमी झाल्या असे वाटते. नेरुळ पुर्व स्टेशनसमोर सिडकोने लावलेले बांबुचे भलेमोठे बन आहे. त्या बनात चिमण्या रात्रीला वसतीला असत. संध्याकाळी त्या एकत्र जमल्या की एवढा चिवचिवाट करत की डोके दुखायला लागे. (मी त्या गार्डनमध्ये मुलीला घेऊन जात असे संध्याकाळची) हल्ली कधीतरी संध्याकाळी तिथुन जाताना मुद्दाम थांबले चिमण्युआ आहेत का पाहायला.. एकही चिमणी दिसली नाही, बन कमी झाले तरी शिल्लक आहे, पण चिमण्यांचे आवाज नव्हते.
मी पण आज ट्रेनच्या दारात उभी
मी पण आज ट्रेनच्या दारात उभी राहून चिमण्या शोधत होते.
Pages