निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा,म्हणजे मूळ विरजण असे लागले गेले असेल तर, थँक्स दिनेशदा,मी ह्याच निष्कर्षापर्यंत आले होते,की चिंचेच्या आणि दुधाच्या एकत्री करणाने दही लागत असावे.आता त्याला पुष्टीच मिळाली!कारण मला नेहेमी हा प्रश्न पडायचा की अगदी पहिल्यांदा दही कसे लागले गेले असेल? लिंबामुळे फाटणार, पण चिंचेच्या सालाच्या आतमधला आंबटपणा त्या आकड्याइतक्या दुधाच्या विरजणाला पुरेसा आहे आणि ते सुद्धा कवडी दही!निसर्गातले एकेक चमत्कार बघितले की नतमस्तकच व्हायला होते नाही?

मी माझ्या घराच्या पाठी चुल ठेवली आहे. महीन्यातुन एकदा तरी तिचा वापर करते. सुरुवातीला मी पण एक पाईप शोधुन फुंकणी केली होती. पण ती आता हरवली. बहुतेक कुत्र्यानेच पळवली असणार मार खायला नको म्हणून.

दिनेशदा हे तुमच्यासाठी.

जागू, सूरणाचे फूल !! खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली. (मी चोरला हा फोटो.)
याचा प्रोफाईलमधे पण एक फोटो पाहिजे.

पण हे असे जमिनीतुन उगवल्यासारखे का? मी तर चांगले दोन फुट वाढलेले सुरणाचे रोपटे पाहिलेय. फुले रोपट्यावर येते की जमिनीत वाढत असलेल्या सुरणावर??

साधना आधी फुल येते मग त्यातुन रोपटे वाढत जाते. पण जर सुरणाचा कंद बारीक असेल तर फुल न येता सरळ रोपटेही उगवते.

फूले आधी येतात. भूईचाफ्यासारखीच. पण भयानक घाण वास येतो याला.

दिनेशदा अगदी बरोबर. कच्ची जांभळे पडली आहेत. ह्या सुरणाच्या झाडावर भले मोठे जांभळाचे झाड आहे.

जागू, या फूलाला पुढे तूरा येतो का ? हे किती दिवस उमललेले असते ? या तूर्‍याला बिया धरतात का ?
(भारतात असतो, तर लगेच आलो असतो हे बघायला. मी निदान ४० वर्षानंतर बघतोय हे फूल.)

दिनेशदा हे फुल आलय माझ्या माहेरी. आता मला त्यासाठी मधुन मधुन आईकडे चक्कर टाकावी लागेल ह्या फुलाच्या निमित्ताने. आठवडा तरी झाला असेल ह्या फुलाला कालही त्याच स्थितित पाहील. आता उद्या जाउन बघते परत.

मोनालिप त्यात हसण्यासारख काहीच नाही. तोंडली पण कवळी अशिच दिसतात पण ती गळून पडत नाहीत जांभळांसारखी.

सुरणाचं फुलं. सुरणाची त्या एका भल्यामोठ्या गोळ्याशिवाय काही कुटुंबसंस्था असू शकेल असं कधीच वाटलं नव्हतं. Happy

मी कोवळी तोंडली खूप खाल्ली आहेत. वेलीवरून तोडून. आमच्या शेजार्‍यांच्या परसात होते तोंडलीचे वेल.

http://www.maayboli.com/node/22774 वर मी एक समस्या मांडली आहे. कृपया त्याचे उत्तर द्याल का कोणी?

तो धागा बराच मागच्या पानांवर गेला आहे आणि बागकामाशीच निगडीत आहे म्हणून इथे लिंक देते आहे. विषयांतराबद्दल माफी.

मामी, लहान मुलांनी कच्ची तोंडली खाऊ नयेत, जीभ जड होते !!
प्राची मुंग्यांसाठी पावडर बाजारात उपलब्ध आहे. आणि वाळवीसाठी पेस्ट कंट्रोलच करावे लागेल. ती दिसतेय त्यापेक्षा खुपच जास्त पसरली असण्याची शक्यता आहे.

२/३ दिवस इथे कोणीच दिसत नाहीये.खूपच चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय.गावाला गेले की काय सगळे? या बरं लवकर गप्पा मारायला.करमत नाहीये.

हा बीबी वर काढायचा अधूनमधून...
जिप्स्या फिरतीवर गेलाय. साधना अंबोलीला गेली नाही, डॉक्टर रुसलेत आणि जागू मासे नीट करतेय !!
मी आहेच.

म्हणजे जे मघाशी केलं तेच करायचं, एक प्रतिसाद द्यायचा टाकुन गळ म्हणुन की आलाच बीबी गळाला लागुन पहिल्या पानावर...

नमस्कार मंडळी !
गर्दी कमी दिसते, हा उन्हाळ्याचा परिणाम म्हणायच का ?
Happy
नुकतीच पुण्यात एक बातमी वाचली, एका निसर्गप्रेमीने आपल्या लग्नाच्या प्रत्येक पत्रिकेबरोबर काही दुर्मिळ झाडांच्या/फुलांच्या बिया वाटल्या...छान कल्पना !
कोल्हापुरच्या घोडावत उद्योगसमुहाकडुन लाखावर झाडे लावुन,त्यांची योग्य काळजी घेतली गेली आहे, यासाठी नुकताच एक अवार्ड मिळाला..हेहि नसे थोडके !

या असल्या उन्हाळ्यात बहरलेला गुलमोहर मात्र किती उठुन दिसतो ...!

अनिल मला स्मृति उद्यानाची कल्पना पण आवडते. दिवंगत व्यक्तीच्या नावाने एक झाड लावायचे, आणि त्याची जोपासना करायची.
मुंबईत नॅशनल पार्क आहे तसाच अनेक शहरांत मध्यभागी एक राखीव जंगल पाहिजे. इथे नैरोबीत पण असे जंगल आहे. ते इतके दाट आहे कि १० फूटाच्या पुढचे दिसत नाही. इथे खरे तर जंगल म्हणजे गवताळ प्रदेश, तरीही इथे मोठमोठी जंगले जोपासली आहेत.
आता भारतात पण ही जाणीव होतेय. चांगली गोष्ट आहे.

>> लहान मुलांनी कच्ची तोंडली खाऊ नयेत, जीभ जड होते !! <<

दिनेशदा, एकदा टिव्हीवर एका आयुर्वेदीक डॉक्टरने तोंडली खाल्ल्याने बुद्धी कमी होते (म्हणजे नक्की काय हे मलाही माहित नाही) असे सांगितले होते, तेव्हापासून कित्येक वर्षे मी तोंडली खाल्ली नाही आहेत. Happy

अमि, मला आवडते तोंडल्यची भाजी. (म्हणूनच माझं हे असं झालं असेल का ?)
परवा इथे निवडुंगाचा विषय निघाला होता. हि इथली काही कुंपणाबाहेरची झाडे. काही निवडुंग तर काही कोरफडी. नावे वगैरे मला माहीत नाहीत. फूले फळे पण नक्कीच येत असणार. बघू परत कधी दिसली तर.

१)

२)

३)

४)

५)

६)
हे फूल तर जेमतेम ६ मीमी चे होते

७)

८)
ह्या पानावरचे कोरीव काम बघा.

९)
हि पाने अक्षरश: चामड्यासारखी होती.

प्रचि क्र. ८ सासुच्या जिभा - mother-in-law's tougue सारखे दिसतेय. बहुतेक सासुच्या जिभाचे नैरोबीला राहणारे चुलत भावंड असावे.

कोरीव काम मात्र जबरी आहे एकदम..

मस्तच दिनेशदा.

प्रचि ६ चं झाड पूर्वी माझ्याकडे होतं. प्रचि ८ पण भारतात पाहिलय. त्यालाच साधना सासुच्या जिभा म्हणतेय वाटत.

माझ्याकडचं आळू इतकं छान झालेलं. आता पानं अचानक पांढरी पडलीत आणि त्यांच्या मागे जाळी निर्माण झालीय. ही एक प्रकारची कीडच आहे का? सगळी पानं कापून टाकून काम होईल का?

एक फ़ोटो चुकून दोनदा टाकला होता. ते कोरीवकाम नैसर्गिकच आहे. सासूच्या जीभा, छान नाव आहे.

मामी,
अळूची पाने जून झाली आहेत. सगळी कापून टाकली, तर नवीन येतील चांगली.

Pages