Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यावरुन अस दिसत, कि जस बदामला
यावरुन अस दिसत, कि जस बदामला (बीला) वरुन आवरण असतं ,तस काजुला आवरण नसतं ..?
अरे देवा, म्हणजे काजी कधी बघितल्याच नाहीत की काय???? एकदा कोकणदौरा करा राव. जास्त लांब नाहीय...
ह्या काजी भाजताना जो काय वास सुटतो तो अप्रतिम असा असतो. (मला तरी आवडतो, इतरांचे माहित नाही) माझ्या गावी काजू अजिबात होत नाही पण काजी मात्र सगळ्यांकडे असतात. सकाळी पाणी तापत ठेवताना न्हाणीघरातल्या चुलीत काजी घालायच्या. मस्त वास सुटतो. घरातल्या चुलीत मात्र घातला येत नाही भाजायला कारण भाजताना त्यांचा डिंक उडतो. चुलीकडे बसुन कोणी चहा/भाकरी करत असेल तर उडणा-या डिंकाचा खुप त्रास होतो.
पिकलेली बोंडे पण मस्त लागतात (आम्ही त्यांना बोंडू म्हणतो आणि बीयांना काजी) कापुन चार तुकडे करायचे, मिठ लावायचे आणि चघळत राहायचे च्युईंगमसारखे. सगळा रस निघाला की चोथा थुंकायचा. एकदम फेवरीट पास्टाईम.
आंबोलीला काजु होत नसले तरी आज-यातुन गोव्याला जाणारे बोंडू तिथुन जातात. घाट उतरत असताना पुढे एखादा बोंडू भरलेला ट्रक असेल तर ५ मिनिटात डोके दुखायला लागायलाच हवे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना
साधना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला थोडी माहिती हवी आहे.
मला थोडी माहिती हवी आहे. ओळखीच्यांत १का जागेला निवडुंगाचे मस्त कुंपण आहे. त्यांना ते तोडुन तारेचे घालायचे आहे. आता निवडुंगाचा तसा उपयोग नसला तरी १ मनात शंका आली, अनायसे वाढलेली झाडे तोडुन / वाळवुन / जाळुन टाकण्यापेक्शा त्याचे कंपोस्ट / खत तयार करता येईल का? ते जमिनीत गाडुन जमिनीत खत तयार होईल का? नाहीतर पावसानंतर कुंपणाचे निवडुंग मधे वाढायचे व सल्ल्याबद्दल मला ऐकावे लागायचे असे नको.
अजुन १ असा कुंपणावर निवडुंग तसाच ठेवुन फक्त मधे कधे खांब टाकुन त्यावर तारा खेचल्या तर ते योग्य आहे का?
हो का दिनेश? काजूच्या फळांना
हो का दिनेश? काजूच्या फळांना आम्ही बोंडं म्हणतो. बोंडं म्हणजे थॅलॅमस फुलांचा. पण मी कोकणात एवढे मोठे काजू झालावर एवढी लहान बोंडं बघितली नव्हती. त्यामुळे मला वाटलं हे तयार होत आलेले काजू आहेत.
साधना, काजुच्या फळांबद्दल अगदी अगदी. पण तुरट-गोड असतात ती फळं त्यामुळे जास्त खाल्ली जातच नाहीत. गावाकडे कातकरी बायका बिया फोडून आणत असत. त्याच्या चिकाने त्यांचे हात इतके खराब झालेले असत. त्या बिया फोडून विकायच्या - ओले काजू - म्हणजे खरच कष्टाच काम असायच. आणि बिया विकल्यावर संध्याकाळी जाताना आलेल्या पैशाचं रात्रीच्या स्वयपाकासाठी सामान. हातावरचं पोट.
माझे काका मालवणच्या एका काजू
माझे काका मालवणच्या एका काजू कारखान्याचे मॅनेजर होते. त्यावेळी कारखान्यात पण भाजूनच बिया काढत असत. पण तिथल्या कामगार महिला, इतक्या तरबेज होत्या, कि नेमका एक घाव घालून अखंड बी काढत असत. आता अगदी घरगुति स्तरावर कुणी काढत असतील तर नाहितर सगळीकडे अशाच उकडुन काढलेल्या मिळतात.
अमि, हि फळे कुस्करुन आम्ही समुद्राच्या पाण्यात टाकायचो (त्यावेळी मालवणचा समुद्र खुप स्वच्छ होता) आणि मग खायचो. खुप चवदार लागतात. गोव्यात याची बव्हंशी दारूच करतात. तिथल्या भट्टीवर याचा ताजा रस मिळतो. तो तसा चवदारही लागतो. पण थोडा वेळ तसाच ठेवला तर छोटासा स्फोट होतो आणि बाटलीचे झाकण उडून जाते.
मोनालिप, निवडुंग फड्या असेल
मोनालिप, निवडुंग फड्या असेल तर त्यावर कोचिनेल चे किडे जोपासता येतात. या किड्यंपासून खाद्यरंग करतात. त्याला जी फळे येतात ती चवदार असतात आणि पौष्टिकदेखील. डोंगरे बालामृत हे लहान मूलांचे टॉनिक त्यापासून करतात. पण हे उद्योग करायचे नसतील, आणि निवडुंग वेगळ्या प्रकारचा असेल, तर त्याचा काही खास उपयोग नाही.
ओल्या काजूची आमटी देखील छान
ओल्या काजूची आमटी देखील छान होते. अगदी मटणासारखी. पाकक्रीया जागू सांगेलच.
monalip
जो कोणी निवडूंगाचे कूंपण तोडत असेल तेर तो मूर्खच. पोल टाकून तारेचे कूंपण जरूर घालावे पण त्याखाली निवडूंग जरूर लावावा. तारेचे कूंपण घातले तरी दोन तारांमधील अंतर हे साधारण ९ त १२ ईंचाचे असते. दोन तारा हाताने वर खाली दाबून कोणीही माणूस आत येऊ शकतो. बकरया तर या बाबतीत अगदी तरबेजच असतात. जर वरच्या तारेची ऊंची ५ फुटा पेक्शा कमी असेल तर बैल ऊडी मारून येतो. तारेच्या कूंपणाच्या आतील बाजूने निवडूंग लावावा. त्यामूळे तार वर करून येणार्या माणसाना प्रतिबंध होतो. तसेच बकर्या देखील येत माहीत. मे महीन्या मधे निवदूंगाचे कूंपण लावावे. लावताना शक्यतो मोठ्या काठ्या लावाव्यात. जमिनीत पूरल्या नंतर वर असलेला भाग उघडा नसावा. जर ऊघडा राहिला तर पावसात त्या ऊघड्या भागावर पाणी पडून निवडूंग कूजते. सरळ काठी लावण्यापेक्शा फाटे फूटलेली काठी लावावी. तारेचे कूंपण घातले तर दोन तारा थोड्या थोड्या अंतरावर तारेने बांधून घ्या म्हणजे वाकवायला थोडे कष्ट पडतात.
अरे वा, विजय हि नवीन माहिती
अरे वा, विजय हि नवीन माहिती मला. मध्यंतरी महाराष्ट्रात फड्या निवडुंगाविरुद्ध मोहीम निघाली होती. आता तो फारच कमी दिसतो, आणि डोंगरे बालामृत हे टॉनिकही बंद झाले.
वर उल्लेख करायचा राहिलाच. काजू पण अपल्याकडे पोर्तुगीजांनीच आणला. आणि ते आणण्याचा उद्देश होता, मातीची धूप थांबवणे. गोव्यातील टेकड्यांवरील मातीची प्रचंड प्रमाणात धूप होत असे. काजूचे झाड चांगलेच विस्तारते आणि त्याची वाढ ही जमिनीलगतच असते. पाने रुंद असतात त्यामूळे पावसाचा थेट मारा जमिनीवर होत नाही.
काजूपासून फेणी, हि मात्र गोवेकरांची शक्कल.
मध्यंतरी महाराष्ट्रात फड्या
मध्यंतरी महाराष्ट्रात फड्या निवडुंगाविरुद्ध मोहीम निघाली होती
का? त्याने कोणाचे घोडे मारले होते??
दिनेश्दा या वर्षि पाऊस लवकर
दिनेश्दा या वर्षि पाऊस लवकर सुरू होईल असे वाटते. या वर्षि कुडा लवकर बहरला आहे.
मुसांडा, dhobi karchief
मुसांडा, dhobi karchief
![rsz_1dhobi_karchief.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32608/rsz_1dhobi_karchief.jpg)
Barringtonia asiatica.
Barringtonia asiatica. समुद्रफुल
![rsz_11rsz_dscn0448.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32608/rsz_11rsz_dscn0448.jpg)
Gmelina philippensis.parrot's
Gmelina philippensis.parrot's beak, wild sage
![rsz_dscn0549.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32608/rsz_dscn0549.jpg)
![rsz_1dscn0556.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32608/rsz_1dscn0556.jpg)
हे शेवटचे एकदम मस्त आहे. कुठे
हे शेवटचे एकदम मस्त आहे. कुठे मिळाले?
साधना याचे मोठे झाड, राणीच्या
साधना याचे मोठे झाड, राणीच्या बागेत, पक्ष्यांच्या पिंजर्याचे मोठे संकुल जिथे सुरु होते तिथे उजव्या हाताला आहे. खाली पिवळी फूले पडलेली असतात.
कारण माहीत नाहि, पण पुर्वी गावोगाव असणारा निवडुंग एकदम नष्ट करण्यात आला.
विजय, पावसाळा कधीही येवो पण सरासरी गाठो, हिच प्रार्थना.
निवडूंगाबाबत खरे असावे. आधी
निवडूंगाबाबत खरे असावे. आधी फड्या निवडूंग शेताच्या कुंपणांना दिसायचा. हल्ली दिसत नाही.
इतके दिवस हा धागा मी का
इतके दिवस हा धागा मी का बघितला नव्हता याचा पश्चात्ताप होतोय, आता अगदी सुरुवाती पासून बघतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंडळी मी खूप एक्सायटेड आहे.
मंडळी मी खूप एक्सायटेड आहे. माझ्या मोगर्याला(लावताना मोगरा म्हणून लावला पण फूल कुंदाचं/मदनबाण वाटतय.) पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणात कळ्या आल्या आहेत. परवा एकच फूल फुलले होते. खरं म्हणजे पाणी घातल्यावर माश्या येतात आणि पाने कट करून नेतात..अगदी प्रत्येक पानाच्या कडेला चंद्रकोरी असतात. म्हणून मला वाटलं की काय होतय या वेलाचं कोण जाणे पण आता मस्तच!
बागकामात एक्स्पर्ट असलेल्या
बागकामात एक्स्पर्ट असलेल्या माझ्या मित्राचा मी अनुभवलेला सल्ला. मोगर्याला भरपूर फुले यायला हवी असतील तर उन्हाळ्या आधी दोन महिने किमान पाणी घालणे बंद करायचे अन पाने - फांद्या छाटायच्या, पाणी अजिबात घालायचे नाही झाड मरते की काय अशी भिती वाटली तरी, ( हे मी जमिनीत लावलेल्या झाडाबद्दल लिहितोय कुंडीत कदाचित अगदी कमी पाणी घालावे लागेल.) मग थोड्या दिवसांनी माती जरा उकरून भुसभुशीत करायची व शेणखत घालायचे व पाणी देणे सुरु करायचे. आधी पाणी मिळत नाही म्हणून मुळे खोल वाढली असतात ती आता झपाटयाने काम करतात, काही दिवसातच भरपूर नव्या फांद्या फुटतात अन जेव्हड्या जास्ती फांद्या तेव्हढी जास्ती फुले
करा गजरे, वहा देवाला.
श्रीकांत मार्च मध्ये
श्रीकांत मार्च मध्ये मोगर्याच्या वेलीची आम्ही पाने काढतो. त्यामुळे ही चांगला बहर येतो मोगर्याला. आणि शेणखत तर उत्तमच.
विजय मागच्या वर्शी मी दिनेशदांच्या कृतीनेच ओल्याकाजुची उसळ केली होती. ह्यावर्षी नुसते कांद्यावर काजु परतले. तेही छान लागले.
श्रीकांत मार्च मध्ये
श्रीकांत मार्च मध्ये मोगर्याच्या वेलीची आम्ही पाने काढतो. त्यामुळे ही चांगला बहर येतो मोगर्याला. आणि शेणखत तर उत्तमच.
विजय मागच्या वर्शी मी दिनेशदांच्या कृतीनेच ओल्याकाजुची उसळ केली होती. ह्यावर्षी नुसते कांद्यावर काजु परतले. तेही छान लागले.
विजयजी, फोटो छान आहेत
विजयजी,
फोटो छान आहेत !
साधना,
काजुच्या बाबतीत अगोदर त्याच नेमक बी कुठल आणि फळ कुठल असा माझा गोंधळ झाला होता त्यात आता तुमच्याकडुन हे नविन बोंडे आणि काजी या शब्दांची भर पडली, असो, एकदा प्रत्यक्षच पहाव लागेल आता.
पुर्वी निवडुंगाची गर्दी हि जास्त करुन गावच्या वेशीजवळ, शेजारच्या शेताच्या बांधावर खुप दिसायची,आता मात्र नविन लावणारे कमी दिसतात.
श्रीकांतजी,
तुमच या पानावर स्वागत आहे..
vijay pokal व दिनेशदा धन्स.
vijay pokal व दिनेशदा धन्स. मी निरोप पोचवला.
अनिल फोटोत वर दिसतोय तो लाल
अनिल फोटोत वर दिसतोय तो लाल रंगाचा बोंडू आणि खाली राखाडी रंगाचा काजु लागलाय. खालचा काजु ही खरेतर त्याची बी आहे, जी फळाच्या बाहेर असते. जसे स्ट्राबेरीच्या बिया तिच्या सालीला बाहेरुन चिकटलेल्या असतात तशाच काजूबिया फळाला बाहेरुन असतात. एका फळाला एकच बी.
वरच्या लाल रंगाच्या बोंडूची गोव्यात फेणी करतात, तेवढाच त्याचा उप्योग. बाकी खाण्यासाठी म्हणुन फारसा उपयोग नाही. टेक्श्चर ताजेपणा संपलेल्या पनीरसारखे चिवट असते. अगदीच काही उद्योग नसेल तर एखादा चांगला बोंडू घेऊन मिठ लावुन चावत बसायचा. पण एकापेक्षा जास्त खाववत नाही.
फोटोत दिसतोय तो काजू (याचे मालवणीत अनेकवचन काजी) भाजतात किंवा दिनेशनी लिहिल्याप्रकाणे वाफवतात आणि मग त्यातुन काजू बाहेर काढतात. हा खुपच टणक असतो आणि त्याला अंगभुत डिंक भरपुर असतो. ह्याला फोडण्यासाठी हातोडी किंवा तसेच काहीतरी वजनदार लागते. नाहीतर अजिबात फोडता येणार नाही. मी भाजुन खाल्लेत काजु. भाजल्यावर बाहेरुन थोडासा जळकट दिसतो पण तरीही
खुप कडक असतो. चुलीतुन काढुन थोडासा थंड झाला की दगड किंवा काहीतरी जड घेऊन हळूहळू फोडायचा. एकदम जोरात फटका मारला तर धाडकन दोन तुकडे होणार आणि आतला काजुगरही त्या तुकड्यात विभागला जाणार, मग त्याला बाहेर काढण्यासाठी खटपट. त्यापेक्षा नीट अलगद काजु फोडावा आणि आतला काजुगर मटकवावा.
लहानपणी काजुच्या बिया चुलीत
लहानपणी काजुच्या बिया चुलीत टाकुन भाजायचो. असा वास सुटायचा, अजुन आठवतो.
हे जिप्सिसाठी. त्याला हिरवा चाफा पहायचा होता. पण ह्यापेक्षा अजुन थोडे मोठे फुल असते. पिकले की पिवळे होउन ह्याचा सुगंध पसरतो. सुगंधामुळे साप ह्या झाडावर येतात असे म्हणतात. ह्याच्या झुडुपाला लांबट टोकाला निमुळती हिरवी फळे येतात.
![](https://lh5.googleusercontent.com/_f-coGQqX4Oo/Tb-Ce0kWx6I/AAAAAAAAAYo/YHw1-dso_zE/s800/SDC10342.JPG)
बोंडु आणी काजी.. आहाहा... मी
बोंडु आणी काजी..
आहाहा...
मी भरमसाठ बोंडु खाल्ले आहेत. मे महिनन्याच्या सुट्टीत गावी जाउन का़जी जमा करण आणी बोंडु खाणं ह्यात किती संध्याकाळी गेल्या आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे ओले काजु ही मी कांद्यावर
हे ओले काजु
![](https://lh3.googleusercontent.com/_f-coGQqX4Oo/Tb9tL9WQBNI/AAAAAAAAAXQ/5KKh0LPkNtA/s800/SDC10092.JPG)
ही मी कांद्यावर परतवलेली भाजी.
![](https://lh6.googleusercontent.com/_f-coGQqX4Oo/Tb9tRMamb8I/AAAAAAAAAXU/HCrPy-w8qI4/s800/SDC10093.JPG)
जागु, मस्त दिसतेय भाजी
जागु, मस्त दिसतेय भाजी एकदम.. ओले काजु दादरला मिळतील. बाकी आमच्याइथे नाही मिअत. मी एकदा कुडाळला १०० रुपयाल १०० ओले काजू घेतलेले![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
साधना, धन्स ! लगेच शंकांच
साधना,
धन्स ! लगेच शंकांच निरसन (दुध का दुध ...आणि काजु का काजु :स्मित:) केल्याबद्दल.
पहिल्या चित्रा बोंडु अगदीच लहान होता, तुम्ही टाकलेल्या या चित्रात बोंडु एखाद्या सफरचंदासारखा दिसतोय, आता लक्षात आलं.अगोदर काजु मोठा दिसतोय,मग वरचा बोंडु मोठा होतोय, गम्मत आहे.
त्यापेक्षा नीट अलगद काजु फोडावा आणि आतला काजुगर मटकवावा.
बाकी हे मात्र मला सगळ्यात सोपं वाटल ...
जागु,
वाह ! चक्क आणि फक्त काजुची आणि काजुचीच भाजी ?
दिनेशदा,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे बदाम,काजु आणि आक्रोड अशा सारख्या फळांची आवरण खुप कठिण/टणक का असतील बरं ?
तेवढेच त्यांचे बाजारातले दरही कठिणच असतात ना ! (याला मनुका/बेदाणे मात्र अपवाद)
जागु, खुप खुप खुप खुप खुप खुप
जागु, खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद हिरवा चाफ्याबद्दल.
मी अजुन प्रत्यक्ष पाहिला नाहीये. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(दुध का दुध ...आणि काजु का काजु )>>>>>अनिल,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages