निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या ऑफिस मधे पोरी नाहीत कारे?

असत्या तर आतापर्यंत जिप्सीचा गृहस्थ झाला असता, असा रानोमाळ फुलांचे फोटो काढत फिरला नसता, छोट्याचे फोटो टाकले असते Happy

दिनेश, माझ्या घरच्या कॉम्पचे युएस्बी ड्राईव खराब झालेय, घरातच कॉम्प इंजीनीअर असल्याने मी फोन करुन कोणाकडुन दुरुस्त करुन घेईन यावर बंदी आहे आणि अर्थातच त्या घरातल्या कॉम्प इंजीनीअरला असली घरातली कामेकरायला वेळ नाही. कधीमधी लॅपटोप मिळाला तर अपलोड करते. फोटो ऑफिसमधल्या कॉम्पवर अपलोड करुन ठेवलेत पण ऑफिसमधुन पिकासा पाहता येते पण त्यावर फोटो अपलोड करता येत नाहीत. तो ओप्शन बंद केलाय कंपनीने.

यात्सव, घरात कुठल्याही विषयातले तज्ज्ञ लोक ठेऊ नयेत. आपली कामे वेळेवर होत नाहीत. (निसर्गतज्ञ्य चालतात कारण ते निसर्ग बिघडत नाही ना...)

विजय, मला कधीचे डिकेमालीचे फूल बघायचे होते. त्याचा वास अगदी नाकात आहे माझ्या. बाळघुटीत असते ते. अंधेरीला महाकाली केव्ह्ज जवळ पण आहेत हि झाडे, असे दुर्गाबाईंनी लिहून ठेवल्याचे आठवतेय.

साधना, तज्ञ माणसाला वारंवार आठवण करुन द्यावी लागते (आणि मागचे काही चार्जेस पेंडींग असले तर तेही पे करावे लागतात.)

जिप्स्याची भावी बायको पण फूल्ल वेडी असावी, असा आशिर्वाद देऊ या त्याला. नाही तर हा जायचा जंगलात आणि ती जायची मल्टिप्लेक्स मधे..

अरे हो, साधना बरेच दिवस विचारायचे होते. परत अंबोली संबंधीच. वाडी हून अंबोलीला जाताना. डोक्यावरच्या झाडांवर मोठमोठ्या वेली दिसतात. त्याच भीमाच्या वेली का ? त्या जर भीमाच्या वेली असतील, तर त्यांना खुप मोठी फूले येतात. खरे तर वेलवर्गातील सर्वात मोठी फूले ती. साधारण दिवाळीच्या सुमारास येतात. कधी बघितली आहेत का ? दिवाळीच्या सुमारास कधी जाणे झाले नाही तिथे माझे. मला वाटतं, नरेंद्र डोंगरावर पण आहेत या वेली.

जिप्स्याची भावी बायको पण फूल्ल वेडी असावी

दिनेश, तुम्हाला फुल म्हणायचेय बहुतेक. मला इंग्रजी फूल्ल वाटले Happy
(जिप्य्सा गेला का भटकंतीला, नाहीतर माझ्या डोक्यात काहीतरी घालायचा.)

त्या वेलींची नावे मलाहीमाहित नाही. मीहीदिवाळीला कधी गेले नाही. गेल्या वर्षी पहिल्यांदाच गेले होते पण भटकणे झाले नाही. आता गेले की नक्की लक्ष ठेवेन. दीपकलाही विचारते फोन करुन. त्यालाही बरीच माहिती आहे.

डिकेमली लहान मुलांच्या दात येण्यावर उत्तम औषध आहे. बाळाच्या हिरड्यांना डिकेमाळी पावडर चोळली तर दात येणे जड जात नाही. तसेच मुलांच्या दात येण्याच्या वेळेस हिरड्या सळसळ (?) करतात म्हणजे मुलं दिसेल ते तोंडात घालुन चावायचा प्रयत्न करतात. डिकेमाली हिरड्यांना चोळल्याने हे प्रमाण बरचस कमी होतं. डिकेमलीचा वास मात्र अतिशय उग्र असतो.

दिनेशदा,
मध्ये काही दिवस तुम्ही दिसला नाहीत, चुकल्यासारख वाटत होत..
त्यात साधना, जिप्सी,विजयजी हे पण नाही दिसले, मला वाटले कुठे सगळे ट्रिपला गेले कि काय ?
Happy

विजयजी,
तुम्ही टाकलेले फोटोतुन छान,नविन माहिती मिळतेय,

जिप्सी,
तुम्ही अकिलडेच पुण्यातल्या दौर्‍यावर होतात, पण याची साधी कल्पना देखील आमच्यासारख्या निगच्या सामान्य कार्यकत्यांना दिली गेली नाही, हे निग च्या नियमात बसत नसेल तर याची पक्षश्रेष्ठीकडुन दखल घेतली जावी.
Happy
रच्याकने ?????ल
कृपया याचा अर्थ सांगा कुणितरी ...
Happy

तुम्ही अकिलडेच पुण्यातल्या दौर्‍यावर होतात, पण याची साधी कल्पना देखील आमच्यासारख्या सामान्य कार्यकत्यांना दिली गेली नाही, हे निग च्या नियमात बसत नसेल तर याची पक्षश्रेष्ठीकडुन दखल घेतली जावी

पश्रे (म्हंजे मी नाय हा...) कदाचित दखल घेणार याच्याआधीच जिप्स्याने त्याचा बचाव मांडला ना वर... Happy .

इथे आलो नाही की खरेच चुकल्याचुकल्यासारखे वाटते. दरवेळी काहीतरी नविन मिळतेच मिळते.

कुसरीची फुलं खरच काय छान असतात ना? पण त्यांच नाव का असं देव जाणे?

कलाकुसरमध्ये कुसरचा जो अर्थ अभिप्रेत आहे कदाचित तोच अर्थ कुसरीला हे नाव देणा-याच्या मनात असेल.

@दिनेशदा: भेरला माड म्हणजे वेडा माड. यडला, वेडला,बेडला,भेडला अशी शब्दनिष्पत्ती असावी. ह्याला वेडा अशासाठी म्हणायचे की तो एखाद्या वेडसर भासणार्‍या गोसावी-बैराग्याप्रमाणे गळ्यात रुद्राक्षांप्रमाणे दिसणार्‍या लांबच लांब माळा घालून असतो. लांबच लांब जटा वाढलेले ते ध्यान वेडगळाप्रमाणेच दिसते.

हीरा, छान अर्थ. याची लाल पिवळी फुले सुंदर दिसतात. आणि खुप संख्येने असतात. फळे मात्र कुणीच खाताना दिसत नाही.
सध्या जगात, पाम ऑइल ज्यापासून काढतात त्याचीच जास्त लागवड झालेली दिसते. खाद्यतेल म्हणून त्याचा उपयोग आहेच, सौंदर्य प्रसाधनात पण वापरतात. पण त्यापासून बायो डिझेल पण तयार करता येते. कदाचित भविष्यात त्याला फार महत्व येईल.
मी ते फळ खाऊन बघितलेय (म्हणजे त्याची बी) नुसतीच तेलकट लागते. काही चव नसते त्याला.

बाकी फारच कमी फुलांच्या नावाचा अर्थ लावता येतो. खुपशी अशीतशीच असतात.>>>>>>>>>
हो,हे खरं आहे.इतक्या सुंदर फुलांना अशी विचित्र नावं का बरं असतात? कारण काही फुलांची नावं---माकडलिंबू, माकडशिंग,बेडकी, त्या rain tree च्या फुलांना माकडाची कर्णफुले असंही म्हणतात. हे म्हणजे सरळ सरळ त्या फुलांचा अपमान आहे (असं आपलं माझं मत बरका!) पण अशी नावं आहेत त्या मागचं कारण तसं कुणी सांगत नाही. आता सापकांदा म्हणजे डोळ्यांसमोर सापासारखी दिसणारी वनस्पती येते आणि खरंच ती (सापकांदा) तशीच दिसते. पण खोबरदोडा- ह्या नावावरून काही अर्थबोध होत नाही.
पण आभाळी,नभाळी,अबोलिमा अशी नेमकी वर्णनात्मक फुलं पण आहेत.
विजय,डिकेमालीच्या फुलाचा फोटो फारच सुरेख आला आहे.
दिनेशदा,त्या रानमोगर्‍याच्या फोटोतली लाल फुले कुठली आहेत हो? कांगळी (breynia retusa) - (आपण ज्याला कप बशीची फुले म्हणतो) त्या प्रकारातली आहेत का?

बेडल्या माडाच्या फळांतल्या बिया सुपारीत भेसळ करण्यासाठी वापरतात असे ऐकले आहे. पण त्यात तथ्य नसावे.कारण दोन्ही बिया तंतोतंत सारख्या दिसत नाहीत. पण पुन्हा कोणी सांगावे; कारण खर्‍या सुपारीची ओळखही शहरात कित्येकांना नसते. वाण्याकडे 'सुपारी' म्हणून मागितल्यावर जे काही मिळेल ते सुपारीच असणार ह्या श्रद्धेवर ती घरी आणली जाते. गुलाबाच्या पाकळीसारखी चव असणार्‍या एका छोट्या गोलसर फळाचे झाड आमच्याइथे होते.(त्याला आम्ही गुलाबजांबच म्हणत असू.) त्याच्या बिया आकाराने आणि दिसण्यात अगदी सुपारीसारख्या असत.

शांकली ती फ़ूले नसावीत. फ़ळेच वाटताहेत. कोकणात रस्त्याच्या कडेने दिसतात. आधी हिरवी असतात मग
विटकरी होतात.

(जिप्य्सा गेला का भटकंतीला, नाहीतर माझ्या डोक्यात काहीतरी घालायचा.)>>>>दोन दिवस नेट बंद असल्याने फिरकलो नाही तर कित्ती ती माझी आठवण. Proud

जिप्सी,
तुम्ही अकिलडेच पुण्यातल्या दौर्‍यावर होतात, पण याची साधी कल्पना देखील आमच्यासारख्या निगच्या सामान्य कार्यकत्यांना दिली गेली नाही, हे निग च्या नियमात बसत नसेल तर याची पक्षश्रेष्ठीकडुन दखल घेतली जावी.>>>>>अनिल, खुप धावता दौरा होता. पुढच्या वेळेस नक्की पूर्वकल्पना देईन. Happy

त्यात साधना, जिप्सी,विजयजी हे पण नाही दिसले, मला वाटले कुठे सगळे ट्रिपला गेले कि काय ?
>>>>>>>>दोन-तीन दिवस घरचा नेट पूर्णपणे बंद होता. Sad

@दिनेशदा: भेरला माड म्हणजे वेडा माड. यडला, वेडला,बेडला,भेडला अशी शब्दनिष्पत्ती असावी. ह्याला वेडा अशासाठी म्हणायचे की तो एखाद्या वेडसर भासणार्‍या गोसावी-बैराग्याप्रमाणे गळ्यात रुद्राक्षांप्रमाणे दिसणार्‍या लांबच लांब माळा घालून असतो. लांबच लांब जटा वाढलेले ते ध्यान वेडगळाप्रमाणेच दिसते.>>>>>मस्तच. Happy

ओरिसातल्या चिलका लेकला जाताना टिपलेली काजूची झाडं. काजूची फळ वाळली आहेत आणि काजू केवढे टपोरे होत चालले आहेत त्यासाठी काढलेला फोटो.

kaajU1.jpg

आर्च, मस्त फोटो. मी पहिल्यांदाच असे काजू बघितले (वाळलेली फळे आणि टपोरे काजू). Happy

आर्च, हि फळे वाळलेली नाहित. हि या फळाची पहिली अवस्था, बोंड म्हणजे फळ मग मोठे हो जाते. खरे तर तो फळाचा देठ असतो.
जिप्स्या, सुरेखच रचली आहेस. (तू रांगोळी पण छान काढू शकत असशील) बकुळीची फूले झाडावर उमलतात त्यावेळी यापेक्षा छान तेजस्वी रंगाची असतात. आणि ती देठासकट तोडताही येतात.

धन्स दिनेशदा, सचिन Happy

तू रांगोळी पण छान काढू शकत असशील>>>>>>नाय ब्वॉ Happy चित्रकला आणि रांगोळी यांच्याशी आमचं कधी जमलच नाही :(. अजुनही नीटसं चित्रं काढता येतच नाही Sad

दिनेशदा हेच सांगायला आले होते की ती फळे वाळलेली नाहीत.
तुमच्या काजु लेखासाठी चांगले फोटो आहेत. काजू भाजताना आणि फोडतानाचेही आहेत. तुम्हाला हवे असतील तेव्हा सांगा.

जिप्सी मस्त फुले Happy

आर्च,
काजुचा असा फोटो पहिल्यांदाच पाहिला ...

जिप्सी,
बकुळीची फुले छान मांडलीत ...
Happy
दिनेशदा,
यावरुन अस दिसत, कि जस बदामला (बीला) वरुन आवरण असतं ,तस काजुला आवरण नसतं ..?

अनिल, काजूला खुप जाड आवरण असतं.
काजू तयार झाला की तोडून मग चांगला भाजतात. आणि त्यानंतर त्याची सालं फोडून काढतात. त्यावेळी हात नुसते डिंकाने भरतात.

सावली, पुर्वी काजू भाजूनच सोलत असत पण त्यात बिया छोट्या निघत तसेच अखंड बियांचे प्रमाण पण कमी असे. आता त्या वाफवून बिया काढतात. त्यामूळे हल्लीचे काजू टप्पोरे असतात आणि बरेच अखंडही निघतात. आकार आणि अखंडपणा यावरुनच त्यांची प्रत ठरते.
फोटोबद्दल अवश्य सांगेन !

काजूची फळे आवडीने खाल्ली जातात. मला विशेष आवडत नाहीत कारण त्याला वेगळाच वास येतो. पण ती भूक वाढवण्यास मदत करतात असे म्हणतात.

दिनेशदा हो त्याच्यासाठी फॅक्टर्‍या असतात. बीचा आकार बदलत नाही पण बी अखंड निघते. म्हणजे चांगल्या प्रतीच्या बीया मोठ्या आणि महाग. लहान बीयांना कमी किंमत असते.
भाजलेले बी काढताना तुटते पण असे भाजके काजू खाल्ले असतील तर या फॅक्टरी मधले खाववत नाहीत Happy

Pages