Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्या जवळ सगळ असत. पण आपण हे
आपल्या जवळ सगळ असत. पण आपण हे सगळ मीस करतो आणि ऊगाच रडत बसतो.
धारवीच्या निसर्ग ऊद्ध्यानात देखील वेळ काढून जायला हवे.
जिप्स्या, आता मी पण हट्ट करु
जिप्स्या, आता मी पण हट्ट करु का, मला ने म्हणून ?
मला वाटते सर्वच चंदनाची झाडे
मला वाटते सर्वच चंदनाची झाडे आपोआप सरकारी मालकिची होतात. (आणि मग ती वीरप्पनच्या मालकीची होत असत.)
दिनेशदा,
सही वर्णन (:हाहा: आणि कटुसत्यदेखील :दुख: ! )
अलिकडे असे कितीतरी नविन विरप्पन हल्ली गावागावात तयार होताहेत, कारण त्याची वाढती किम्मत आणि मागणी ! आमच्याकडे सांगलीला असाच एक विरप्पन होता,त्याने तालुक्यातली जवळपासची झाडे हळुहळु (रात्री आवाज न करता कापुन) संपवुन टाकली,(सोबत मोरदेखील), मग नंतर तो नगरसेवक झाला, आता तर महापोर आहे.
गावाकडे, शेतात पुर्वी चंदनाची अनेक झाडे दिसायची,घरी त्यापासुन बनवलेल्या बाहुल्या या असायच्याच कुठेही मुक्का मार लागला तर आज्जी हमखास वापरायची , पण अलिकडे अशी बाहुली शोधुन सापडत नाही, कारण तिही कुणीतरी पळवली.
हो मी पण हे ऐकलय. ते झाड
हो मी पण हे ऐकलय. ते झाड तोडले तर पोलिस केस होते असेही ऐकलय.
मी अमि,
चंदनाचे झाड लावणार्यांनी ,सांभाळणार्यांनी, म्हणजे मालकांनी तोडले तर नक्कीच पोलिस केस होते, दुसर्यांनी (चंदनचोरांनी) तोडले तर केस होताना शक्यतो दिसत नाही ,कारण चंदनाचा 'वास' पोलीसांजवळ अगोदरच वेळच्या वेळी पोहोचवलेला असतो
आपल्या जवळ सगळ असत. पण आपण हे
आपल्या जवळ सगळ असत. पण आपण हे सगळ मीस करतो आणि ऊगाच रडत बसतो.>>>>अनुमोदन. मी जवळपास ६ वर्षे या परिसरात आहे आणि हे सगळे मी आत्ता बघतोय.
जिप्स्या, आता मी पण हट्ट करु का, मला ने म्हणून ?>>>>दिनेशदा, पुढच्या भारतभेटीत या दोन बागा लिस्टमध्ये अॅड करा.
जिप्स्या हि लिन्क चेक
जिप्स्या हि लिन्क चेक कर
http://en.wikipedia.org/wiki/Balanites_roxburghii
मला वाटतं बाहूल्या
मला वाटतं बाहूल्या रक्तचंदनाच्या असतात. शरीराच्या ज्या भागाला मुका मार लागलाय, बाहुलीचा तोच भाग उगाळून त्याचा लेप दुखर्या भागावर लावतात. खास करुन रक्त साकळलं असेल तर.
मला वाटतं बाहूल्या
मला वाटतं बाहूल्या रक्तचंदनाच्या असतात
खास करुन रक्त साकळलं असेल तर.
>>>>अनुमोदन. रक्तचंदनाचीच बाहुली.
अनील तू म्हणतोस ती
अनील तू म्हणतोस ती रक्तचंदनाची बाहुली. ती आयुर्वेदिक दुकानात मिळते. मुक्या मारावर अक्सीर इलाज.
माझ्याकडे आहे. सहाणेवर उगाळून लावयची.
चंदनाचे झाड लावणार्यांनी
चंदनाचे झाड लावणार्यांनी ,सांभाळणार्यांनी, म्हणजे मालकांनी तोडले तर नक्कीच पोलिस केस होते, दुसर्यांनी (चंदनचोरांनी) तोडले तर केस होताना शक्यतो दिसत नाही ,कारण चंदनाचा 'वास' पोलीसांजवळ अगोदरच वेळच्या वेळी पोहोचवलेला असतो>>>>>>>>>>>(स्मित हास्य करणारी स्माइली) १००००% अनुमोदन!
पुण्यात चंदनाची खूप झाडे आहेत. आणि बहुतेक 'चोरांना' त्यांचा 'वास' आधिच आलेला असतो. त्यामुळे राजरोसपणे झाडे तोडली जातात. मग पुढचे सर्व नाटक............पोलिस केस,पेपरमधे छापून येणे (तोडलेल्या झाडाचा फोटो) इ इ. परत पहिले पाढे पंचावन्न!
रंग सदाफुलीचे
रंग सदाफुलीचे
आपल्या नेहमीच्या
आपल्या नेहमीच्या सदाफूलीपेक्षा हे नवीन रंग आता दिसायला लागले आहेत. पन तरी लाल / गुलाबी च्या आसपासचेच रंग आहेत हे. झाडे बुटकी असतात.
आणि हि झाडे मी पहिल्यांदा दुबईमधे रस्त्याच्या कडेला बघितली होती. दहा वर्षांपुर्वी.
मानुषी,
मानुषी, शांकली,दिनेशदा
अनुमोदन !
(मी अशी शेकडो झाडे अचानक कापली गेलेली पाहिली आहेत, ते पाहताना खुप यातना झाल्या, संताप देखील)
मला वाटतं या चंदनाच्या झाडांना वाचवण्यासाठी सगळ्यांनी मिळुन ठोस प्रयत्न करायला हवेत,लोकांना याची माहिती व्हायला हवी, नाहीतर याच्या काही जाती कायमच्या नष्ट होतील !
पुण्यातल्या निगच्या (पहिल्या-वहिल्या) एखाद्या गटगच्या माध्यमातुन याविषयी चर्चा करता येईल !
कारण मुंबईच्या गटगला जाण सगळ्यांनाच दरवेळी शक्य होत नाही म्हणुन
जिप्सी,
छान सदाफुली , आवडली !
जिप्सी,सदाफुलीचे फोटो
जिप्सी,सदाफुलीचे फोटो अप्रतिम!
आजकाल अशा वेगवेगळ्या रंगांच्या सदाफुली किती निघाल्याएत नै! जास्वंदीं इतकी विविधता आहे त्यांच्यात! पण ती रोपं टिकतात का ? माझी ७/८ रोपं जगली नाहीत.माझं काय चुकलं असेल बरं? पण अशी रोपं जगली नाहीत की फार दु:ख होतं. आणि परत मग ती लावण्याचा धीरच होत नाही
अनिल, डॉ.डहाणूकरांच्या एका पुस्तकात एक गमतीदार उल्लेख आहे; त्यांना कुणीतरी म्हणाले की "अहो इकडे तुम्ही झाडांबद्द्ल,त्यांच्या उपयोगांबद्द्ल लिहिले की तिकडे त्यांची तोड सुरु होते बघा!" त्या तर पुढे जाऊन असं म्हणतात की 'होळी,वटपौर्णिमा यांच्या निमित्ताने बिचार्या झाडांवर संक्रांतच कोसळते.ती ओरबाडली जातात.तोरण करण्यासाठी आसुपालवाची (indian mast tree- खोटा अशोक) पाने तोडतात. पण भिंतीत उगवलेले वड,पिंपळ मात्र उपटायला हे लोक तयार नसतात.का तर ते धार्मिक वृक्ष आहेत म्हणून!म्हणजे यांच्या मुळ्यांपेक्षा धार्मिकतेच्या मुळ्याच जास्त खोल गेल्याएत.' किती मार्मिक लिहिलंय त्यांनी!
पण ती रोपं टिकतात का ? माझी
पण ती रोपं टिकतात का ? माझी ७/८ रोपं जगली नाहीत.माझं काय चुकलं असेल बरं>>>>>शांकली, जगतात ती रोपे. मी लाल सदाफूली लावली आहे. मस्तपैकी वाढलीय. त्याला शेंगाही आल्यात त्यापैकी काहि फुटुन त्याच कुंडित रूजली आहेत. छोटी छोटी झाडे यायला लागलीत आणि मोठ्या झाडाला भरपूर फुले आली आहेत.
आंबाडा Wild Mango,Indian hog
आंबाडा
Wild Mango,Indian hog plum, Indian mombin • Hindi: अम्बाड़ा, अम्बाड़ी , अमरा , भृङ्गी फल , मेटुला , पशु हरितकी , पीतन • Marathi: अमडा , अंबाडा , ढोलआंबा , खटांबा, रानआंबा • Konkani: आंबाडे , आंबाडो ambado
माझ्या गावच्या घराच्या मागील दारी आहे. याच्या कोवळ्या फळांचा मीठात मूरवलेल्या लोणच्याची चव खूपच छान लागते.
विजय, याची जरा वेगळी जात
विजय, याची जरा वेगळी जात गोव्यात बघितलीय. तिथे श्रावणातल्या गोकुळाष्टमीला आंबाडीचे रायते हवेच. तूमच्याकडे करत असतीलच.
त्याचा रंगही थोडा फिकट असतो. मुंबईत पण मिळतात. पण बर्याच जणांना माहीत नसते ते काय आहे ते. देशावर नाहीत ही झाडे.
अशी बरीच झाडे आहेत, कवठ, कडूनिंब, नेपती, शिरिष हि झाडे कोकणात नाहीतच.
रातांबे, आंबाडे, जगमं, तोरणं देशावर नाहीत.
योग्या सदाफुली मस्तच, विजयजी
योग्या सदाफुली मस्तच,
विजयजी माहिती बद्दल धन्यवाद
इथे खुप मोठ्या प्रमाणात
इथे खुप मोठ्या प्रमाणात महत्वाची माहिती गोळा होत आहे. पण ती वाचण्यासाठी प्रत्तेक पानावर जाऊन शोधावी लागतेय, हे खुप अवघड जाते जुने प्रतिसाद शोधताना. काही उपाय करता येईल का ??
आंबाडे गणपतीला मिळतात मुंबईत.
आंबाडे गणपतीला मिळतात मुंबईत. पाच भाज्या, सोबत आंबाडे घालुन केलेले अळूचे फतफते हा माझा गणपतीच्या दिवशीचा आवडता पदार्थ आहे. दरवर्षी बनतोच न चुकता.
गणपतीमध्ये गावाला पाहिली आहेत
गणपतीमध्ये गावाला पाहिली आहेत ही आंबाडीची फळे. लोणचे करातात याचे.
इथे मस्त माहिती वाचायला मिळतेय. फोटोज पण सुंदर. आजुबाजुला पाहिलेल्या झाडांचे नाव, माहिती समजल्यावर एकदम मस्त वाटतय. झाड ओळखल्यासारख वाटतय.
तुमची पॅशन अशीच शेअर करत रहा इथे. कीप इट अप.
शांकली, तुम्ही दिलेला
शांकली,
तुम्ही दिलेला डॉ.डहाणूकरांच्या एका पुस्तकातला गमतीदार उल्लेख खरचं विचार करायला लावणारा ..!
जिप्सीच्या या सदाफुलीच्या फोटोमुळे अंगण आणि अंगणातली सदा फुललेली सदाफुली आठवली !
कित्येक शिकलेल्या लोकांना निसर्गाबद्दल काही देण-घेणं नसतं,झाडांची माहितीही खुप कमी असते..
विजयजी,
धन्स ! आंबाडा पहिल्यांदाच बघायला मिळाला,हे आणि अशी अनेक झाडे कोकण भागातली , जी आमच्याकडे मी तरी कधी पाहिल्याचं आठवत नाही.
जिप्सी,तुमच्याकडे ती रोपं छान
जिप्सी,तुमच्याकडे ती रोपं छान वाढताहेत हे वाचून खूप आनंद झाला. अशी भरभरून फुललेल्या रोपांना बघून किती मस्त वाटतं नाही?.
अंगणातल्या नारळावर मधमाशांनी
अंगणातल्या नारळावर मधमाशांनी पोळ करायला सुरुवात केली आहे.
प्रचि १
From Apr 21, 2011
प्रचि २
From Apr 21, 2011
प्रचि ३
From Apr 21, 2011
बापरे !! जपून रहा. माझ्या
बापरे !!
जपून रहा. माझ्या तळेगाव च्या घरात पहाटे ४-५ वाजता लाईट लावली की मधमाश्या घरात घुसायच्या प्रयत्न करायच्या आणि काच बंद असेल तरी धडका देत रहायच्या आणि मरायच्या
हो सचिन त्यांना जरा धक्का
हो सचिन त्यांना जरा धक्का लागल्या तरी त्या चावायला येतात. अजुन तरी त्या पसरल्या नाहीत.
जागू, फोटो द्यायचे तंत्र जमलं
जागू, फोटो द्यायचे तंत्र जमलं तर.
सहसा नारळावर नसतात पोळी. त्यांना आडवी फांदी आवडते.
आता बी ईटर पक्षी पण यायला लागेल. पण धूर वगैरे पासून पण जपावे लागेल.
मॅन व्हर्सेस वाईल्ड च्या एका भागात दाखवले होते, कि थोडा धूर झाला तर त्या चवताळतात पण फार धूर आणि थेट धग लागली, तर मात्र पळ काढतात.
एका सुरक्षित अंतरावरून त्यांचे निरिक्षण करता येईल. त्या मध कसा आटवतात, मेण कसे जमा करतात, उन्हाळ्यात पाणी शिंपडून पोळ्याचे तपमान कसे राखतात.
बापरे जागू, खर विचारू, तुला
बापरे जागू, खर विचारू, तुला भिती नाही वाटत?
नाही ग. रोज अश्या गोष्टी
नाही ग. रोज अश्या गोष्टी नजरेसमोर असल्यावर भिती उडून जाते.
आमच्याइथे पावसाळ्यात तर मोठे मोठे साप पण येतात.
जागु, मला तर या फोटोतले पोळ
जागु,
मला तर या फोटोतले पोळ पाहिल्यावरच भीती वाटली
नारळाच्या झाडावरचा पोळ पहिल्यांदाच पाहिला ..
मधमाश्यांमध्ये लहान आणि मोठे असे प्रकार दिसतात,मोठ्या पोळ आणि माश्या माश्यांना आमच्याकडे 'ऐगेमो' असच काही म्हणतात, हे मोठे पोळ मी नदीकडेला असणार्या पाणीउपसासाठी बांधलेल्या जैकवेलवर,तसेच पाण्याच्या टाकीला लटकलेले खुप पाहिले, रंगाने जांभळट,काळे, यां मधमाशांचा हल्ला मात्र खुप भयानक असतो.
तर बहुतेक रानात, झाडा-झुडुपावर,घरच्या भींतीवर असणारे पोळ,माश्या हे लहान दिसले, रंगाने पिवळसर,चावल्यावर कमी त्रासदायक
यां मधमाश्यांच्या या, इतर जातीची शास्त्रीय माहीती मात्र मला नाही
Pages