मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिकेत कावळा हागला
जाव‌ई माझा भला आणि लेक बा‌ईल-बुध्या झाला
नगार्‍याची घाय तर टिमकीचे काय
जात्यावर बसले की ओवी सुचते
नाव गंगाबा‌ई अन् रांजनात पाणी नाही

आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
करुन गेला गाव आणि #### चे नाव.

जावा जावा आणि उभा दावा
चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची.
तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा.
चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
तुला नं मला, घाल कुत्र्याला.
फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी व्हटात.
रोज घालतेयं शिव्या अन एकादशीला गाते ओव्या.
लढा‌ईमे बढा‌ई आणि खजिनेमे गवऱ्या

कंड भारी उड्या मारी
ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
हौस राजाची अन वागणुक कैकाड्याची

हळकूंडाच्या पदरात शेळकूंड.
पोरांच्या मळणेत बी नाय नी भात नाय.
तळा राखीत ता पाणी चाखीत.
पायलेभर वरये घेवा पण माका गावकारीन म्हणा.

आरे मस्त धागा. कसा काय मिसला मी?
एक नगरी म्हण, स्त्रोत : साबु.
"दिवा घेवुन शोधला वर (नवरा)
दिवसा खोकला, रात्री ज्वर"

एक ना धड भाराभर चिध्यां.
काकेत कळसा आणी गावाला वळसा.
कामापुरता मामा.
घरोघरी मातीच्या चुली.
हातच्या काकणाला आरसा कशाला.

पाटलाचा गडी अन् फाळ पडला हाती इडी

[इडी म्हणजे नांगर आणि फाळ यांना एकत्र धरून ठेवण्यासाठी असलेले लोखंडी कडे. मुसळाच्या टोकाला असते तसेच. पाटलाचा गड्याला कामात कसला आलाय रस? टाळता येत नाही म्हणून करायचे. शेतावर नांगराचा फाळ घेऊन जाताना रस्त्यात तो इडीतून निसटून पडतो, पण याचे लक्ष कुठेय? हातात उरलेली नुसतीच इडी घेऊन हा आपला आलाय शेतावर.]

चहा पेक्षा किटली गरम.
नळी फुंकली सोनारे इकडुन तिकडुन गेले वारे.
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
दुरुन डोंगर साजरे.

भुकेला कोंडा,निजेला धोंडा.
डोंगर पोखरुन उंदीर काढला.
पालथ्या घड्यावर पाणी.
येरे माझ्या मागल्या.

मला या सर्व म्हणी एका पुस्तकात सग्रहित करायाच्या आहेत.
आणि या सर्व म्हणीन्चा अभ्यास करायचा आहे.
ईतक्या या म्हणी महत्वाच्या वाट्तात.

बैल गेला आनि झोपा केला ===> यात झोपा म्हणजे काय?
झोपा म्हणजे गोठा. बैल बांधून ठेवण्याची जागा. ऊन/पाऊस खाऊन उघड्यावर बांधलेला बैल मरून गेला, आता झोपा म्हणजे गोठा बांधला असा अर्थ. वेळ निघून गेल्यावर मोठे प्रयत्न करतो आहोत असे दाखविणे

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ====> या म्हणीचा अर्थ काय?
मी तुला १०० किलो मिठाई दान केली, जा त्या हलवाया कडुन वसूल कर. असला अर्थ आहे. नुसती मिठाई नाही, हलवायाचे घर च या पठ्ठ्याने दान केलेय.

अती शहाणा त्याचा बैल रिकामा,
यात तो शेतकरी अती शहाणा आहे. सगळं गाव पेरणी करीत असतांना हा म्हणतो तुमची वेळ चुकली. अन आराम करतो. त्याचा बैल रिकामा, काम न करता आराम करीत असतो. असा अर्थ.

सरोजिनी बाबर यांचं एक पुस्तक वाचल्याचं आठवतं. त्यात म्हणी अन म्हणींच्या गोष्टी होत्या. अमुक म्हण कशी प्रचारात आली असं होतं ते. अर्थासकट म्हणी समजल्या तर च वापरता येतात. खरं तर म्हणी या अगदी अनुभवांचे अर्क असतात असा माझा अनुभव आहे. एकाद्या 'सिच्युएशन' चे 'समिंग अप' इतक्या चपखल पणे करण्याचा दुसरा प्रभावी मार्ग नाहिये.

काप गेले भोके राहिली.
काप हा एक कानात घालण्याचा दागिना. तो परिस्थितीमुळे विकावा लागला. त्या गतवैभवाच्या फक्त खुणा म्हणून कानाची (टोचलेली) भोके राहिली. असा अर्थ.

येरे माझ्या मागल्या अन ताक कण्या चांगल्या. असे ऐकल्याचे आठवते.

यात झोपा म्हणजे काय?

इब्लीस, झोपा म्हनजे गोठा नव्हे तर गोठ्याचे दार. त्याला काही ठिकाणी झोपाटा म्हणतात. म्हणजे लाकडे , पाला यानी विणून केवल गोठ्याच्या दारावर टेकवून ठेवण्याचे ते दार असते. बिन बिजागर्‍यांचे.गुहेच्या तोंडावर शिळा ठेवावी तसे. एका शेकर्‍याने गोठयात बैल ठेवला होता पण झोपा केला नव्हता. बर्‍याचदा लोकानी त्याला सांगितले अरे बाबा झोपा तयार करून घे नाहीतर बैल पळून जाईल. त्याने चालढकल केली आणि एक दिवस खरेच बैल पळून गेला नन्तर त्याने गोठ्याच्या दारावर झोपा ठेवला. वेळ निघून गेलयावर सुचलेले शहाणपण असा त्याचा अर्थ.

>>>खंडीच्या वरणात मुतणे>>>> ही म्हण नसुन वाक्यप्रचार आहे. म्हण आणि वाक्यप्रचार यात गफलत करु नये.

गेल्या महिन्यात एक विचित्र, नवीन आणि ग्रामीण म्हण ऐकली.

'हागता हागता ससा सापडला' Lol

ही म्हण मला तरी माहीत नव्हती.

या म्हणीचा मला सांगण्यात आलेला अर्थः काहीही उद्देश नसताना आणि काहीही करत नसताना अचानक घबाड मिळाले.

-'बेफिकीर'!

Pages