Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे नजर तयार झाली तर. आता
म्हणजे नजर तयार झाली तर. आता प्रवासाची तयारी करायला घेतली असशील ना. कॅमेरासाठी जास्तीची मेमरी कार्डस ने.>>>>>येस्स्स्स १२जीबी कार्ड तयार करून ठेवली आहेत. एका दिवसासाठी एक जीबी
डू आय घ्यावे लागले तरी
डू आय घ्यावे लागले तरी चालतील, पण सगळे फोटो डकव इथे.. हॅपी जर्नी !!
डू आय घ्यावे लागले तरी
डू आय घ्यावे लागले तरी चालतील,>>>>>:हाहा:
यावेळच्या ठाणा भेटीत दिसलेले
यावेळच्या ठाणा भेटीत दिसलेले कैलासपतीचे झाड.
Patta: Gokhale Road, Near Suyash Pathilogy lab, in front of Titan Showroom, Thane.
Unknown flowers. याचे नाव काय?
जिप्सी तु कुठे चालला आहेस का
जिप्सी तु कुठे चालला आहेस का ट्रिपला. हॅप्पी जर्नी.
नक्की फोटो टाक
कैलाशपतीचं झाड शिवाजीपार्कात
कैलाशपतीचं झाड शिवाजीपार्कात माझ्या बहिणीच्या बिल्डिंगच्या आवारातच आहे आणि त्यांच्या पाचव्या मजल्यावरल्या घराबाहेरच त्याच्या फांद्यांचा विस्तार आहे. वर्षातून दोनदा सगळी पानं झडतात. २-४ दिवसात झाड ओकंबोकं होऊन जातं. अगदी कंप्लीटली. आणि नंतर अचानक हिरवे कोंब फुटतात. ते पण इतके झपाट्याने वाढतात की अक्षरशः ४ दिवसात झाड पुन्हा हिरवंगार. या झाडांवर कावळ्याचं घरट आहे. तो कावळा इतका सोकावलाय की, यांनी टेबलावर जर काही खाणं ठेवलं असेल तर खिडकीतून चक्क घरात येतो आणि पळवून नेतो. कधी कधी तर त्यांच्या लिविंगरूमच्या एका खिडकीतून येऊन दुसर्यातून बाहेर उडून जातो. त्याच्याकरता हा शॉर्टकट असतो. बहिणीलाही फारसं काही वाटत नाही.
आस मूचकूंदाचे झाड या
आस मूचकूंदाचे झाड या महीन्यातच फूलते. ते त्याच्या विषिष्ट आकाराने लगेच ओळखू येते.
याच रविवारी काढ्लेले प्र्चि.
Jasminum malabaricum .
Jasminum malabaricum . Marathi- कूसर, रान मोगरा.
विजयजी, कुठे आहे मुचुकुंदाचे
विजयजी, कुठे आहे मुचुकुंदाचे झाड? मलापण बघायचे आहे.
:हट्ट करणारा बाहुला:
Unknown flowers. याचे नाव काय?>>>>भेरला माड आहे का?
जिप्स्या कूलाब्याच्या सागर
जिप्स्या कूलाब्याच्या सागर ऊपवनात. हे ऊद्ध्यान सकाळी ६ ते ११ व सायंकाळी ४ ते ७ पर्यंत ऊघडे असते.ईथून २ मिनिटावर आमच घर आहे. कूलाब्याच्या घरी गेल्यावर ईकडे जाणे होते.
half flower नावाप्रमाणे हे
half flower
नावाप्रमाणे हे फूल अर्धेच असते.
अरे वा, आम्हाला आता सावलीने
अरे वा, आम्हाला आता सावलीने काढलेले फोटो बघायला मिळणार.
मामी, प्लाझा थिएटरवरुन टिळकब्रिजकडे आताना, डाव्या हाताला पण मोठा कैलाशपति आहे.
पण त्यांची फळे फूटली कि भयानक घाणेरडा वास येतो.
विजय, हा फोटो जरा वरुन घेतलाय का ? मी चागला फोटो मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले होते. (पणजी ला पाट्टो भागात झाड आहे.)
आणि त्या अर्ध्या फूलाला, मराठीत भद्रक असे नाव आहे. कदाचित काही औषधी उपयोग पण असतील. साधारण समुद्रकिनारी दिसतो. दुबईला समुद्रात जे अल बुर्ज हॉटेल बांधलेय, त्याच्या प्रवेशदाराजवळ याची झाडे आहेत.
आपली रुणूझुणू असते, त्या मालदीवला ला बरीच झाडे आहेत याची.
हा फोटो तिथलाच!
erinocarpus nimmonii. जंगली
erinocarpus nimmonii. जंगली भेंडी.
सर्व फोटो मस्त. विजय तुम्ही
सर्व फोटो मस्त. विजय तुम्ही जंगली भेंडी ज्याला म्हणता त्याला चेर असे पण म्हणतात बहुधा.भाद्रपदात साधारणतः ही फुले फुललेली मी बघितली आहेत.सुंदर फुलं आहेत हं. आणि half flower(भद्रक) मात्र मी पहिल्यांदाच पाहिलं.वेगळं फूल बघायला मिळालं तुमच्यामुळे,त्याबद्दल खूप धन्यवाद.आणि हो! कुसराची फुलं सुंदरच आहेत, पण त्या मागची लाल छोट्या छोट्या पाकळ्यांची फुलं पण किती छान आहेत,ते combination किती मस्त दिसतंय.
हाफ फ्लॉवर किती मस्त दिसतायत.
हाफ फ्लॉवर किती मस्त दिसतायत.
विजय तुमचे फोटो आणि माहिती
विजय तुमचे फोटो आणि माहिती दोन्ही एकदम झक्कास आहेत. तुम्ही तर झाडांसाठी कुठे कुठे फिरता.. खरेच ग्रेट.
दिनेश, भद्रकाचा फोटो खुप आवडला. प्रकाश खुप मस्त आलाय फोटोत. अतिशय सुंदर फोटो.
जिप्स्या हा घे भेरला माड.
जिप्स्या हा घे भेरला माड. खुप उंच ताडगोळ्यासारखे/नारळासारखे झाड असते आणि त्याला हे असे मंदिल लागतात. (गावी देवळात देवाच्या मागे असतात त्याला मंदिलच म्हणतात ना?)
विजय, प्लीज फोटो काढलेले झाड
विजय, प्लीज फोटो काढलेले झाड कुठे आहे ते पण लिहित जा !
साधना, पहिल्या फोटोच्या कोपर्यात पांगारा पण डोकावतोय. हो ना ?
भेरली / भेरला या शब्दाला कोकणात काही तरी अर्थ आहे असे वाटतेय. याची फूले पण छान दिसतात.
वा !! सगळे फोटो मस्तच, विजयजी
वा !! सगळे फोटो मस्तच,
विजयजी धन्यवाद,
विजय, प्लीज फोटो काढलेले झाड कुठे आहे ते पण लिहित जा !< अनुमोदन
जिप्या पुण्यात कधी येऊन गेलास, धावती भेट होती का ??
जिप्या पुण्यात कधी येऊन
जिप्या पुण्यात कधी येऊन गेलास, धावती भेट होती का ??>>>हो रे सचिन खुपच धावती भेट होती. गावची जत्रा होती (फलटण) म्हणुन दिड दिवस येऊन गेलो. काल दुपारी आलो घरी.
पुण्यावरून हडपसर->फुरसुंगी->दिवेघाट->सासवड->निरा->लोणंद मार्गे गेलो.
पुण्यावरून
पुण्यावरून हडपसर->फुरसुंगी->दिवेघाट->सासवड->निरा->लोणंद मार्गे गेलो. << मी फुरसुंगीला जातो कामावर. हडपसर पासून वळल्यावर दोन किमी वर आहे फक्त
आता जत्रेचे फोटो टाक लवकर
विजय, वर तुम्ही रान
विजय, वर तुम्ही रान मोगर्याचा फोटो टाकलाय, त्यात लाल रंगाची फुले दिसतायत ती कोणती आहेत?
हो दिनेश. आंबोलीच्या
हो दिनेश. आंबोलीच्या गावातल्या घरासमोर हा भेरला माड आणि त्याच्या आधी पांगारा.
हा पुर्ण फोटो -
आंबोलीचे खुप फोटो आहेत, इथे टाकायचेत पण पिकासावर टाकायला वेळच नाहीय मायबोलीवर फोटो अपलोड केले की आकार खुप लहान होतो. त्यामुळे फोटो नीट दिसत नाही. पांगा-याचाही शेंगांसकट एक मस्त फोटो आहे पण पिकासावर अजुन टाकला नाहीय म्हणुन देत नाहीय इथे. लहान आकारात सगळा मस्तपणा निघुन जातो
साधना, पिकासावर टाकायला वेळ
साधना, पिकासावर टाकायला वेळ नाही लागत. आकार साधारण ३०० पर्यंत कमी करायचा (तो पेंटब्रशनेही करता येतो) मग अपलोडला टाकून, जेवायला वगैरे जायचे. जेवून आल्यावर ते अपलोड झालेले असतात. आपण बघत बसलो तर वेळ लागतो. स्वानुभव.
या दिवसात जर घराबाहेर उघड्यावर एका थाळीत पाणी ठेवले तर बरेच पक्षी पाणी प्यायला, अंघोळीला येतात. गोव्यात मी करायचो तसे.
नाही काही फोटो काढलेले नाहीत
नाही काही फोटो काढलेले नाहीत यावेळी. फक्त हेच वर दिलेले ते.
त्यातला दुसर्या कोणत्या झाडाचा आहे ते कोणी सांगितलेच नाही अजुन.
यावेळी ठाण्यात सगळीकडे सुवर्ण मोहोर अगदी फुलुन आला होता
ठाणेकरांनी तो कैलासपती पाहायला पण नक्की जा
कुसरीची फुलं खरच काय छान असतात ना? पण त्यांच नाव का असं देव जाणे?
मी आज पवई उद्यानात जाऊन (ऑफिस
मी आज पवई उद्यानात जाऊन (ऑफिस अवर्समध्ये ;-)) बकुळीची फुले गोळा करून आणली आणि डेस्कवर ठेवलीत.
अगदी झाड हलवून ताजी ताजी फुले गोळा केली.
सावली, तो माडाचाच एक प्रकार
सावली, तो माडाचाच एक प्रकार आहे, इथे पण आहे. पण त्याची फळे ना माणसे खातात ना पक्षी.
बाकी फारच कमी फूलांच्या नावाचा अर्थ लावता येतो. खुपशी अशीतशीच असतात.
जिप्स्या, मी तूझा बॉस असतो तर...
तूझ्या टेबलावरची पळवली असती.
जिप्स्या, मी तूझा बॉस असतो
जिप्स्या, मी तूझा बॉस असतो तर...>>>>आपण दोघेही गेलो असतो आणि मला अजुन झाडांची डिटेलवार माहिती मिळाली असती.
जिप्स्या ऑफिस मधे पोरी नाहीत
जिप्स्या ऑफिस मधे पोरी नाहीत कारे?
बकुळीची फुले अशी टेबलावर राहीलीच कशी ?
रान मोगरा चा फोटो या महिन्याच्या सुरवातीस मूरूड्च्या जंगलात काढ्ला. या वेळी माहीत नसलेली देखील खूप झाडे दिसली. मार्क करून ठेवलीत. आता दर तीन महीन्याने जाऊन पहायची म्हणजे ओळ्खीची काही खूण कळेल.
brilliant gardenia, cambi
brilliant gardenia, cambi resin tree, white emetic nut • • Hindi: देकामाली •Marathi: डिकामाली डिकेमाली • Sanskrit: नाडिहिङ्गु
डिकेमाली राणीच्या बागेत फूलली आहे. फोटो १०/१२ दिवसा पुर्वीचा आहे. डिकेमाली (डींक ) वातावर चांगली असते. तसेच तापावर देखील वापरतात. गावात लहानमूलांसाठी याचा फार वापर होतो.
कूम्भाची फांदी ची पावडर करुन ती वर दिलेल्या कूसर च्या पाना बरोबर कातकरी लोक विष बाधेवर ऑषध म्हणुन वापरतात.
Pages