संवादायचंय!

Submitted by नीधप on 26 April, 2011 - 00:36

संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?

अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,

असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद

आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...

- नी

गुलमोहर: 

अप्रतीम !!

अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,

व्वा !! मस्त.

>>>सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,
.....
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...<<< मस्त ! आवडली कविता Happy
>>>झर्रझुणझुण <<< आवडला शब्द Happy

सुरेख!

बहोत कुछ है दिलमें जो तुमसे है कहना,
मगर लफ्ज घूंघट में मुखडा छुपाये,
न आंखों से झांकें, न होटोंपे आये,
कहो ऐसे आलम में हम क्या बताये?

सुरेख !!

अप्रतिम!!

आवडली...
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय >>> छान.

नविन कविता होत नाहीयेत.>>
होऊ द्या नवीन कविता. वाचायला आवडतील !

संवादायचंय, झर्रझुणझुण, भिंगोरल्या, पिवळट पाचोळा, झुळझुळ रेषा... फार वेगळे नाहीत पण सहसा न वापरणारे शब्द.. भलतेच चित्रमय.. कधी नादमय.. कधी गंधमय... नक्की नाही सांगता येणार पण जे तुम्हाला मांडायचय त्याची अगदी नेमकी अनुभूती देणारे शब्द असतात तुमचे.. Happy

मुक्ता ला अनुमोदन!

>> सवांदायचंय अमर्याद

आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...

या दोन ओळींच्या मध्ये कविता आहे! सुंदर!! Happy

Happy असं वेडसर वागायलाही बरच काही लागतं.. भाग्य, गट्स, प्रतिभा वगैरे.. सगळंच.. Happy सगळ्यांना कुठे होता येतं असं वेडं.. Happy तुम्हाला शुभेच्छा आणि हा वेडेपणा मिळाल्याबद्दल अभिनंदन..! Happy

आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश... >>>> हे आवडतं. ही आधी पण कुठे तरी वाचली आहे. जुन्या मायबोलीत का ?

मर्यादित शब्दकोश? नी, मखरातल्या शब्दकोशाला हळूहळू जागं करण्यासाठीचा हा सगळा खटाटोप ना?

मुक्ता, वेडेपणा करायला काssssहीही वेगळं करावं लागत नाही.. Proud
शूम्पे, हो
सिंडे, नव्या माबोतच होती. पण मी खूप सारं लिहिलेलं एकदा उडवलं तेव्हा ही पण उडवली होती.
नाद्या... Happy
सगळे, धन्स धन्स!!

मुक्ता ला अनुमोदन... खुप सुन्दर शब्द, मी खर तर कवितेच्या वाटी कधी जात नाही. पण निधपच कुठलही लिखान वाचल्याशिवाय रहात नाही. कधी प्रतिक्रिया देली जाते कधी राहून जाते

Pages