माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
या लेखात मला कॉम्प्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल सर्वसमावेशक चर्चा (थोडक्यात खर्या अर्थाने काथ्याकूट) करायची आहे आणि त्याद्वारे सर्वांचाच फायदा होईल असा मला विश्वास आहे.
तसे या विषयावर लिहिण्याचे कधीपासूनच मनात होते पण वेळही मिळत नव्हता.
पण आता लिहिण्यामागचे तत्कालीक कारण असे की अगदी कालपर्यंत गुगल डिक्शनरी उपलब्ध होती आणि जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमधील शब्दांचे अर्थ त्यात शोधण्याचा पर्याय उपलब्ध होता.
इंग्रजी ते मराठी साठी सुद्धा आणि तेही अगदी चांगल्या पद्धतीने.
संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?
अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,
असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...
- नी
नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!
१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे