संवादायचंय!

Submitted by नीधप on 26 April, 2011 - 00:36

संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?

अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,

असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद

आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...

- नी

गुलमोहर: 

शेवट आवडला.. Happy

(अर्थात आधीची कविता नसती तर शेवट कसा झाला असता??, सो, सगळा इफेक्ट शेवटी छान साधला गेलाय!)

नीरजा, मी ही वाचलीच नव्हती....
मुक्तेचं खरच... झर्रझुणझुण...
तुझं लिखाण वाचणं आनंदाचं आहे, नीरजा.

Pages