Submitted by नीधप on 26 April, 2011 - 00:36
संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?
अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,
असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...
- नी
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतीम !! अचानक घसा कोंडतो
अप्रतीम !!
अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,
व्वा !! मस्त.
आवडली. बहुत कुछ तुमसे कहने की
आवडली.
बहुत कुछ तुमसे कहने की तमन्ना दिल में रखतें हैं
मगर जब सामने आतें हैं कहना भूल जातें है ---आठवलं
पुन्हा एक जुनी कविता..!! नविन
पुन्हा एक जुनी कविता..!! नविन कविता कुठे आहेत?
नविन कविता होत नाहीयेत. सत्या
नविन कविता होत नाहीयेत. सत्या माझं लिखाण संपलंय आता..
संपलंय ऐवजी थांबलंय म्हणा
संपलंय ऐवजी थांबलंय म्हणा
व्वा... सुरेख.. शब्दांचे नवे
व्वा... सुरेख.. शब्दांचे नवे प्रकार फार छान करता/वापरता तुम्ही.. सुंदरच..
भारीच.
भारीच.
नवे प्रकार? कुठले ग मुक्ता?
नवे प्रकार? कुठले ग मुक्ता? मी असंच बोलते नॉर्मली...
छानच
छानच
>>>सगळं असणं भरारी
>>>सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,
.....
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...<<< मस्त ! आवडली कविता
>>>झर्रझुणझुण <<< आवडला शब्द
सुरेख! बहोत कुछ है दिलमें जो
सुरेख!
बहोत कुछ है दिलमें जो तुमसे है कहना,
मगर लफ्ज घूंघट में मुखडा छुपाये,
न आंखों से झांकें, न होटोंपे आये,
कहो ऐसे आलम में हम क्या बताये?
छान. आणि मखरात नटून
छान.
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...
सुरेख !!
सुरेख !!
अप्रतिम!! आवडली... सगळं असणं
अप्रतिम!!
आवडली...
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय >>> छान.
नविन कविता होत नाहीयेत.>>
होऊ द्या नवीन कविता. वाचायला आवडतील !
आवडली... सगळं असणं भरारी
आवडली...
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय >>
संवादायचंय, झर्रझुणझुण,
संवादायचंय, झर्रझुणझुण, भिंगोरल्या, पिवळट पाचोळा, झुळझुळ रेषा... फार वेगळे नाहीत पण सहसा न वापरणारे शब्द.. भलतेच चित्रमय.. कधी नादमय.. कधी गंधमय... नक्की नाही सांगता येणार पण जे तुम्हाला मांडायचय त्याची अगदी नेमकी अनुभूती देणारे शब्द असतात तुमचे..
मुक्ता ला अनुमोदन! >>
मुक्ता ला अनुमोदन!
>> सवांदायचंय अमर्याद
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...
या दोन ओळींच्या मध्ये कविता आहे! सुंदर!!
मुक्ता.. धन्स.. मी नॉर्मलीच
मुक्ता.. धन्स..
मी नॉर्मलीच इतपत वेडसर बोलत असते.
मी नॉर्मलीच इतपत वेडसर बोलत
मी नॉर्मलीच इतपत वेडसर बोलत असते. >>>>>>>
एकदम पटलं
बाकी, कविता छान......
असं वेडसर वागायलाही बरच काही
असं वेडसर वागायलाही बरच काही लागतं.. भाग्य, गट्स, प्रतिभा वगैरे.. सगळंच.. सगळ्यांना कुठे होता येतं असं वेडं.. तुम्हाला शुभेच्छा आणि हा वेडेपणा मिळाल्याबद्दल अभिनंदन..!
शेवटच्या २ ओळी खासच आहेत हे
शेवटच्या २ ओळी खासच आहेत हे पूर्वी पण मी तुला एकदा सांगितलं आहे बहुदा.
त्या शेवटच्या दोन ओळी मला
त्या शेवटच्या दोन ओळी मला खूपच आवडतात!! खूपच जास्त एक्स्प्रेसिव्ह आहेत, कमी शब्दांत!!
डोक्यावरून गेली
डोक्यावरून गेली
अप्रतिम भावना उमटवल्यात
अप्रतिम भावना उमटवल्यात शब्दात..!!
मंदार :अरे सोप्पय.नी धप ला
मंदार :अरे सोप्पय.नी धप ला कढी आवडते,शिळी तर शिळी!:)
आणि मखरात नटून बसलाय माझा
आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश... >>>> हे आवडतं. ही आधी पण कुठे तरी वाचली आहे. जुन्या मायबोलीत का ?
मर्यादित शब्दकोश? नी,
मर्यादित शब्दकोश? नी, मखरातल्या शब्दकोशाला हळूहळू जागं करण्यासाठीचा हा सगळा खटाटोप ना?
मुक्ता, वेडेपणा करायला
मुक्ता, वेडेपणा करायला काssssहीही वेगळं करावं लागत नाही..
शूम्पे, हो
सिंडे, नव्या माबोतच होती. पण मी खूप सारं लिहिलेलं एकदा उडवलं तेव्हा ही पण उडवली होती.
नाद्या...
सगळे, धन्स धन्स!!
पटलं..
पटलं..
मुक्ता ला अनुमोदन... खुप
मुक्ता ला अनुमोदन... खुप सुन्दर शब्द, मी खर तर कवितेच्या वाटी कधी जात नाही. पण निधपच कुठलही लिखान वाचल्याशिवाय रहात नाही. कधी प्रतिक्रिया देली जाते कधी राहून जाते
Pages