Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं मी तुझी ताई गं पायपेटी,
अगं मी तुझी ताई गं
पायपेटी, नेहमी गटगला येत जा म्हणजे शब्द फुटतच नाही तर शब्दांचे धबधबे कोसळतील.
भिडेकाका, तुम्हाला नाही
भिडेकाका, तुम्हाला नाही शर्यतीत धावायची सक्ती करणार ... टांगारुचं पण जाउदे >>>>
ज्येष्ठ नागरिकांना इतकी सूट ..... 'सुटतील' अशाने ते ....
पुढच्या वेळेस नक्की या >>> ...... नक्की येईन..... धन्यवाद.
चालेल काय!
चालेल काय!
आपणच ताई असे म्हणत
आपणच ताई असे म्हणत लाजणार्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी..
>>
हे टाकलंत ते ब्येस केलंत बगा..
होहो नी गटगला तिला शांत, गुणी
होहो नी
गटगला तिला शांत, गुणी बाळ म्हणणार्यांनी नोंद घ्यावी. कृपयाच. अमृता/किरण/जुई आणि नीरजा साक्षी आहेत नंतर गाडीतील मस्तीबाबत.
योडी- अगं ताई म्हणजे जुई (अमृताची लेक).
भिडेकाका, शर्मिला फडके, मयूरेश- यांनी कल्टी मारली ना?
माझ्यातर्फे आमच्यासाईडीच्या २ शांत टेबलांचा वृत्तांत

- सुप्रियाने ' मला तुझे पोस्ट्स कळत नाहीत' असे बजावले. अनुमोदन (तिच्या) विपुत द्यावे.
- अॅडमिन अगदी अॅडमिनसारखे दिसत होते. म्हणजे शांत, हसतमुख इ.इ.
- ललिताचे alleged वय किरू ने उघड केले. किरूचे खरे वय असुदेने सांगीतले. सगळे जाम इंप्रेस झाले.
- पाटलांनी समीरसाठी दिलेले सरप्राईज समीरच्या सुपूर्द केले आहे हो !
- पोपटी गटग ची (रम्य) आठवण नी ने विसेक वेळा काढली. त्याला सर्वांनी चाळीसेक वेळा अनुमोदन दिले.
- अगो भेटली. फार गप्पा होऊ शकल्या नाहीत तरी भेट झाली हेच महत्त्वाचे.
- सगळ्यांनाच भेटुन छान वाटले.
पोपटी गटग ची (रम्य) आठवण नी
पोपटी गटग ची (रम्य) आठवण नी ने विसेक वेळा काढली. त्याला सर्वांनी चाळीसेक वेळा अनुमोदन दिले.<<<<
पुढच्या गटगच्या विविध आयडियाच्या कल्पनांना सगळ्यांनी शंभरेक अनुमोदने आणि दिडशेएक सल्ले दिले...
अॅडमिन अगदी अॅडमिनसारखे दिसत होते. म्हणजे शांत, हसतमुख इ.इ.<<<
आणि संत!!
पोपटीचा न्येक्ष्ट व्हर्जन
पोपटीचा न्येक्ष्ट व्हर्जन भुजिंग गटगचे सूतोवाच झाले, संयोजकाचे पदासाठी भरती चालू आहे.
किरूचे खरे वय असुदेने
किरूचे खरे वय असुदेने सांगीतले.
>>
सांगायलाच हवं खरं वय, दोघे शनि-रविवारी सुद्धा एकत्र असतात.
हो गं. लईच शांत आहेत अॅडमिन
हो गं. लईच शांत आहेत अॅडमिन
किरणही खूप शांत होता.
किरण, अॅडमिन, अगो आणि पायपेटीमुळे ती दोन टेबलं शांत समजली गेली.
मी पण होते की शांत आणि धुडगूस टेबलांवर निम्मा निम्मा वेळ. माझी कुठली कॅटॅगरी?
वृत्तांत आणि फोटु.
वृत्तांत आणि फोटु.
टांगारु फोटू इल्ले
टांगारु फोटू इल्ले
again i missed. dhamal kelit
again i missed. dhamal kelit na... mi suddha ek gtg plan kartoy 11 nov la... vrutant krupaya mail kara... naytar mobilevarun vachtaa.. vachta... pudchi don char gtg urakun jaychi.
वृत्तांत आणखी येऊ द्या.
वृत्तांत आणखी येऊ द्या. धन्यवाद.
रैना ...... मी कल्टी नाही
रैना ...... मी कल्टी नाही मारली
कारण.... आल्यानंतर लवकर निघुन जाण्याला 'कल्टी' मारणं म्हणतात ना !
आलोच नाही तर कल्टी कशी मारणार ..... :प
मी टांग मारली ..... टांगारू झालो
(न येण्यामागचं कारण वरती सांगीतलं आहे)
वृत्तांत लिवा की. अॅडमिन
वृत्तांत लिवा की. अॅडमिन कोणास काय म्हणाले? कोणाच्या कोणत्या प्रश्नांना कसनुसे हसून टाळले? कोणत्या प्रश्नांना बिलंदर हसून अनुल्लेख करून टाकला? कोणत्या प्रश्नांना डिशमधले खाण्याचा अभिनय करत ऐकूच न आल्याचे भासवले? संतपदाला पोचल्याचे एक तरी लक्षण दाखवले की नाही? त्यांनी कोणाला कोणत्या गोष्टींचा आणि कोणी त्यांना कोणत्या गोष्टींचा जाब तावातावाने विचारला? सुप्रियाने कोणत्या टेबलावर दे दणाद्दण पोष्टी टाकून भंबेरी उडवून टाकली? रैनेने कोणाकोणाला खोपच्यात घेऊन इंटेलेक्च्युअल चरच्या घाईघाईने करून घेतली? केश्विने कोणकोणते भाबडे प्रश्न विचारले? त्यांची उत्तरे नीरजाने असूदेला द्यायला सांगितली की नाही? घारूअण्णांच्या शेंडीचे सध्याचे काय स्टेटस? आणि गटगत त्यावर काय मौलिक चरच्या झाली? डुआयच्या चौफेर प्रश्न आणि कॉमेंट्सना कुणाला उत्तरे देता आली की नाही शेवटी? तावातावाने बोलण्याच्या नादात हादडण्याचे राहूनच गेले, असा पस्तावा कुणाला झाला? तावातावाने हादडण्याच्या नादात कुणाला तरी काहीतरी टाँट मारायचा राहूनच गेला- अशी रूखरूख कुणाला लागून राहिली?
सांगो सांगो. जल्दी सांगो.
- सुरूवातीला काही वेळ इरा
- सुरूवातीला काही वेळ इरा कट्टेकर्यांच्या ताब्यात होती. त्यावरून पर्याने किंवा असुदेने 'पुढची पिढी कट्ट्यावर आहे' असं रैनाला सांगायची संधी साधून घेतली.

माझ्या शाळेतल्या खास मैत्रिणीला ती तेव्हाच्या वक्तृत्व स्पर्धेमुळे चांगली ओळखते असंही कळलं. मग त्या काळातल्या एका ऐकीव अफेअरबद्दल आम्ही दोघींनी गुपचुप चर्चा केली.
- 'मायबोली अशी सुधारता येईल' याबाबतच्या सर्वांच्या बहुतेक सूचना अॅडमिननी हसतहसत ऐकून सोडून दिल्या.
- सौ.अॅडमिन ठाण्यातलीच असल्याचं कळलं. मी तिच्यापेक्षा चाऽर(!) वर्षांनी मोठी आहे आणि ती माझ्यापेक्षा चारच वर्षांनी लहान आहे असं तिनंच जाहीर केलं.
- किरणने मोसंबी ज्यूस खाल्लं, मग कुणीतरी कुणालातरी इडली पिण्याची सूचना केली.
- "परदेशात राहणार्यांना मायबोलीसारख्या माध्यमाची गरजच असते, पण मला तुम्हा सर्वांचंच कौतुक वाटतं" अशी अॅडमिननी सर्वांना पावती दिली.
अॅडमिन अगदी अॅडमिनसारखे
अॅडमिन अगदी अॅडमिनसारखे दिसत होते. म्हणजे शांत, हसतमुख इ.इ.<<< agadee agadee... malaa rainatai la bhetayachi faar ichha hoti... pan ti trafficamadhye adakali aani mazhyakade pahunyanche traffic jam zhale hote... tyamule palave lagle...
अरे जरा नीट वृत्तांत टाका की
अरे जरा नीट वृत्तांत टाका की कोणीतरी.. साजिर्यानी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांसकट...
उपस्थित आयडींची यादी येऊ दे.
उपस्थित आयडींची यादी येऊ दे.
रैना, तू ठाण्याला चुकीच्या मार्गाने येतेस म्हणून तुला नेहमी यायला उशीर होतो.
श्री. व सौ. अॅडमिनांना भेटायची फार म्हणजे फार इच्छा होती, शिवाय आमच्याच गावात गटग असूनही मी मिस केलं
त्यांना भेटायला परत कोण जाणार असेल तर कळवा मला.
मी विचारणारच होते की रैना
मी विचारणारच होते की रैना नक्की कोणत्या मार्गाने आली ठाण्याला? दोन-अडिच तास म्हणजे जरा जास्तच वेळ लागला.
वाममार्गाने
वाममार्गाने
होहो भिडेकाका यु आर म्हणिंग द
होहो भिडेकाका यु आर म्हणिंग द राईट. तुम्ही टांग मारली.

ठमादेवी आणि योडीने आणि अगोनेही कल्टी मारली ना म्हणजे.
ते गटग संपल्यावर आले होते ते कोण होते रच्याकने?
नीरजा,अगो, छत्रेकाकु, केश्विनी, शर्मिला फडके यांना अनुक्रमे फोन लावले. एकीनेही फोन उचलला नाही. त्यावरून कित्ती गप्पा झाल्या असणार याचीच मी ट्रॅफिकमध्ये अडकल्या अडकल्या चिंता करत होते.
'बरं बाई तुझेच खरे' मंजू.
अल्पना- घोडबंदर रोड नावाच्या रम्य रस्त्याने.
ललिता- होहो तो डायलॉग महान होता. पुढची पिढी कट्ट्यावर.
साजिर्या
ओय त्या पलिकडच्या दोन टेबलांचा वृत्तांत टाका लोक्स. बर्याचदा नक्की काय झाले ते वृत्तांत वाचूनच कळते. हजर असलेल्यांनादेखील.
अरे कुणी फोटो टाकणार आहे का?
अरे कुणी फोटो टाकणार आहे का? मी मिसलो....
गटग संपल्यावर पाठीला सॅक
गटग संपल्यावर पाठीला सॅक लावून आले ते 'आंद्या केळकर' होते.
अजून एक कोणीतरी आली होती
अजून एक कोणीतरी आली होती सुरूवातीला तिने पण कल्टी मारली. ती कोण ते कळलंच नाही.
मनि पण टांगारू.
अजून एक कोणीतरी आली होती
अजून एक कोणीतरी आली होती सुरूवातीला तिने पण कल्टी मारली. ती कोण ते कळलंच नाही.
>>> मुग्धानंद होती का? तिचं नाव दिसतंय या बाफच्या डोक्यावरल्या लिस्टमध्ये.
हो पण ती बहुतेक फारसं कोणाशी
हो पण ती बहुतेक फारसं कोणाशी न बोलताच गेली असावी.
घोडबंदर रोड नावाच्या रम्य
घोडबंदर रोड नावाच्या रम्य रस्त्याने.>>>>> अरेरे!
तुझं आणि ट्रॅफिकचं जन्मोजन्मीचं नातं दिसतंय बहुतेक.
बर्याचदा नक्की काय झाले ते
बर्याचदा नक्की काय झाले ते वृत्तांत वाचूनच कळते. हजर असलेल्यांनादेखील. <<< रैना, अगदी!
माझ्या कानावर घोडबंदर रोड
माझ्या कानावर घोडबंदर रोड चांगला झालाय आणि आता आजिबात ट्रॅजॅ होत नाही अशी ख्याती आली होती...
Pages