Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इंद्रा, तो फोटो 'अमानवीय'वर
इंद्रा, तो फोटो 'अमानवीय'वर शोभून दिसेल

हा फोटो बघ छत्रेकाकुंच्या
हा फोटो बघ छत्रेकाकुंच्या नजरेतून काढलेला >>> च्यायला, इंद्रा
इंद्रा, च्याय ला. अगं पण
इंद्रा, च्याय ला.
अगं पण आत्ता येवढ्या उन्हाचा?
इंड्राने चायची टपरी टाकलेय?
इंड्राने चायची टपरी टाकलेय?
डुआय तुझा साग्रसंगीत वृत्तांत
डुआय तुझा साग्रसंगीत वृत्तांत वोडाफोनच्या जाहिराती सारखा वाजत गाजत येणार आहे का?
प्राची तो फोटो ट्रेकच्या वृत्तांतात 'अमानविय' म्हणूनच खपवला आहे
लले, शैलजा... 'चा'ची टपरी फक्त ट्रेकलाच
डु आय फोटो विपु मधेही टाकू
डु आय फोटो विपु मधेही टाकू नकोस. आलेल्या सगळ्यांना(च) मेल कर.
फोटो विपु मधेही टाकू नकोस.>>
फोटो विपु मधेही टाकू नकोस.>> विपूत टाकता येतो?
इथे कुठे टाकू ते विचारलं होतं कुठे टाकू नको ते नाही!
मज्जाय तुमची ! तुटक वृत्तांत
मज्जाय तुमची ! तुटक वृत्तांत चांगले आहेत..
वरच्या सगळ्या तुटक
वरच्या सगळ्या तुटक वॄत्तांतांत माझीही थोडी भर
रिक्षा थांबताना बघितलं तर दहा-बारा अनोळखी लोकांचा घोळका दिसला. हे मायबोलीकर आहेत हे तर लगेच कळलं पण वैयक्तिकरित्या कुणालाच ओळखत नसल्याने जरा धाकधूकच वाटली. माझी सरप्राईज एंट्री असल्याने मागच्यामागेच कल्टी मारावी की काय असा पळपुटा विचार क्षणभर मनात आला. तेवढ्यात नीधप पाठमोरी दिसली आणि मग खाली उतरले.
मला मात्र ( फोटो पाहूनही ) कुणीच ओळखू शकत नव्हते. त्यातल्यात्यात अमॄताने किंचित ओळखले असावे पण तिचीही ट्यूब पेटायला बराच वेळ लागला. "तू भारतात आहेस हेच मला माहीत नव्हतं नाहीतर तुला लगेच ओळखलं असतं." असं अमॄता म्हणाली. पण हे काही खरं नाही. ह्या गटगला सिंडी, मॄण्मयी, लालू, सायो, पराग, बुवा, पूनम ( आणखीही बरीच नावं आहेत ) ह्यापैकी कुणीही अचानक आलं असतं तरी मी त्यांनाही ओळखलंच असतं ह्याबद्दल मला यत्किंचितही संदेह नाही. ज्यांना आधी पाहिलं नव्हतं अशी काही मंडळी म्हणजे किरु, इंद्रधनुष्य,परेश लिमये, इतरही बरेच ज्यांची नावं आठवत नाहीत ह्यांच्याबाबतीत मात्र जाम कंन्फ्यूजन झालंय. त्यांना ( चेहेर्यावरुन ! ) नीट ओळखायला अजून एखाद्या गटगला हजेरी लावायला पाहिजे. असो.
अॅडमिन इतरांनी लिहिल्याप्रमाणेच शांत, समजूतदार आहेत. मधूनच ते मला म्हणाले की तू प्रत्यक्षात अगदीच शांत दिसतेस, मायबोलीवर तर बरीच बोलतेस की ! 
भारतात असताना मायबोलीवरचा वावर पूर्णपणे बंद पडल्याने ह्या गटगबद्दल मला खरं तर माहीतच नव्हतं. मंजूडीने त्याबद्दल सांगितलं त्यामुळे तिला धन्यवाद. आमचं परतीचं फ्लाईट रविवारी रात्रीचं होतं. पॅकिंग, शॉपिंग बर्यापैकी उरकल्यामुळे शनिवारी मोकळीच होते आणि ठाण्यातच होते त्यामुळे गडकरीला भेटणं अगदीच सोयीचं होतं म्हणून मग जायचं ठरवलं. इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे साडे-पाचच्या गटगला मी घरातून पावणे-सहाला निघाले आणि सहापर्यंत तिथे पोचले
ऑरकुट, फेसबुक किंवा मायबोली प्रोफाईलवर ज्यांचे फोटोज आधी पाहिले होते त्या सर्वांना मी अगदी लगेच ओळखले. ह्यांत अगदी अॅडमिन, झारापासून, रैना, ललिताप्रीति, अश्विनीके, अमॄता आणि फॅमिली, असुदे, योडी ते अगदी मिस्टर कवितालाही ओळखले. डु-आयला मात्र अज्जिबात ओळखले नाही. त्याने त्याच्या प्रोफाईलवर काहीतरी फुंकतानाचा पाठमोरा फोटो लावलाय त्याला मी काय करणार !
बाकी झारा, ललिताप्रीति, अश्विनीके, नीधप एकदम मस्त दिलखुलास वाटल्या. डु-आय एकदम हॅपी गो लकी. अमॄताशी पूर्वी पार्ल्यात बर्याच गप्पा मारल्याने तिला पहिल्यांदा भेटतेय असं अजिबात वाटलं नाही. रैना अगदी 'सुमधुरभाषिणी' आहे. एकदम soft spoken ! इरा, जुई आणि विनय भिडे ह्यांचा छोकरा ही बच्चेकंपनी अगदी गुणी आणि गोड
गटगला कट्टेकरी बरेच होते आणि 'कट्टा' भारतातल्या दिवसभरात वाहतं असल्याने माझी त्यांपैकी कुणाशीच ओळख नव्हती. ह्या गटगला बरेच जण असल्याने ओळख वाढवायचा चान्सही मिळाला नाही. त्यातून बसायला दिलेली दोन टेबलं लक्ष्मणरेषा आखलेली मिळाल्याने दुसर्या टेबलावर बसलेल्यांशी नीट बोलताही येत नव्हतं. साडे-आठ नऊला सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या असतानाच निघावं लागलं त्याबद्दल मात्र थोडं वाईट वाटतंय. पण तरीही गटगला जाता आलं हे ही नसे थोडके.
अगो कर्मभूमीत परतल्यानंतर
अगो
(इथे अजून फोटोंचा पत्ता नाहीये.)
कर्मभूमीत परतल्यानंतर आवर्जून (आणि सगळ्यात मोठी) वृत्तांताची पोस्ट टाकलीस.
बघा, बघा, इतरांनो, जरा शिका काहीतरी यातून...
अवांतर : इतक्या दिवसांनी या बीबीवर '१ नवीन प्रतिसाद' दिसल्यावर मला आधी वाटलं तो अॅडमिननीच टाकलाय की काय.
प्रीती, (समजतात हो ...) अगं
प्रीती, (समजतात हो ...) अगं आधी वृ लिहावा मग फोटो टाकावेत असं माझ्या मनात होतं
आता आधी फोटो मेल करतो.
अगो, इथं जेवढ्या प्रमाणात लिहिलं आहेस त्याच प्रमाणात निदान दोन चार शब्द तिथं बोलली असतीस तर
असो. पुढच्या वेळेस नक्की तुला वाव देऊ
या बीबीवर '१ नवीन प्रतिसाद' दिसल्यावर मला आधी वाटलं तो अॅडमिननीच टाकलाय>>>
अॅडमिननी, झारांनी त्यांच्या कुठल्याही आयडीने वृत्तान्त लिहावा अशी नम्र विनंती
अगो, मस्त सुटसुटीत वृत्तांत
अगो, मस्त सुटसुटीत वृत्तांत
दिपक, फोटो पाठव लवकर.
त्याने त्याच्या प्रोफाईलवर
त्याने त्याच्या प्रोफाईलवर काहीतरी फुंकतानाचा पाठमोरा फोटो लावलाय त्याला मी काय करणार >>>
डुआय, दिवा घे बाबा 
हो हो. मीही त्याला हेच बोलले होते. शिवाय त्यात बराच बारीक वाटतो तो.
फोटो पाठवल्येत मिळाले का? ते
फोटो पाठवल्येत मिळाले का? ते बघून सांगा. ऑलमोस्ट सगळ्यांचा मेल आयडी फेबू. वरून हडकून मेल करतोय जर कुणाला ही मेल मिळाली नसेल तर तांनी तसे कळवावे. (मेल आयडी सकट !)
त्याने त्याच्या प्रोफाईलवर काहीतरी फुंकतानाचा पाठमोरा फोटो >>>
हो हो. मीही त्याला हेच बोलले होते. >>>>अगं पण फेसबूकवर इतरही फोटो आहेत की ते बघायचे सोडून...
दिपक, मिळतायत फोटो
दिपक, मिळतायत फोटो एकामागोमाग. थँक्स रे.
मेरेको नै मिल रहे है!
मेरेको नै मिल रहे है!
फेसबुकावर मेल आयडी नसणार
फेसबुकावर मेल आयडी नसणार तुझा.
रैनाचाही आयडी दे धाडून संपर्कातून
डुआया, मला फोटो नकोत पण
डुआया, मला फोटो नकोत पण (माझी) पुस्तकं पाठव.
माझीही पाठव रे परवा ठाण्यात
माझीही पाठव रे
परवा ठाण्यात होतो तेंव्हाच देता आली असती रे प्रीतीकडे लक्षातच राहिलं नाही.
तुला संपर्कातून माझा मेल
तुला संपर्कातून माझा मेल आय्डी पाठवलाय.
मग आता पार्ल्यात जा
मग आता पार्ल्यात जा
डु आय, पाठमोरा काय फुंकत
डु आय, पाठमोरा काय फुंकत होतास ?
अॅडमिनेश्वरांस लवकरच १२
अॅडमिनेश्वरांस लवकरच १२ वर्षे पूर्ण होताहेत. तप(स्या)पूर्तीबद्दल अभिनंदन आणि सादर आभार!
-गा.पै.
अरे वा? समीर, शुभेच्छा
अरे वा?
समीर,
शुभेच्छा
(पैलवान सहसा थट्टा करत नाहीत, वर्ष ५२ आठवड्यांनी संपते, ४९ आठवड्यांनंतर का घोषणा केली पैलवानांनी हे माहीत नाही) (हलके घेतले जावे)
-'बेफिकीर'!
बेफिकीर, तीन आठवड्यांत धागा
बेफिकीर,
तीन आठवड्यांत धागा विस्मृतीत जाण्याची शक्यता आहे. अगोदरपासून काळजी घेतलेली बरी!
समीरभाऊंना प्रत्यक्षात जास्त वर्षे झाली असावीत. सदस्यनामावरून तरी १२ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तसंही प्रशासक स्वत:बद्दल फारसं बोलंत नाहीत. हे काम जिकीरीचं आहे. एव्हढे वर्षे बर्याच लोकांना सांभाळणे खरंच स्तुत्य कार्य आहे. कोणी त्यांना कधीतरी पोहोच दिल्याचं आठवत नाही. माझं स्वत:चंच माबो वय दोनअडीच वर्ष आहे. यापूर्वी असा कार्यक्रम झाला असेल तर माहीत नाही.
तरी या तपपूर्तीच्या निमित्ताने छोटासा कृतज्ञताप्रदर्शनाचा (प्रत्यक्ष व/वा दूरस्थ) कार्यक्रम/लेख/मुलाखत झाल्यास मध्ये आयोजनास वेळ मिळेल. यानिमित्ताने त्यांचे अनुभवही ऐकायला मिळतील. असा प्रसंग कुठे जुन्या धाग्यावर असल्यास माहित नाही.
कशी वाटली कल्पना?
आ.न.,
-गा.पै.
सुंदर कल्पना
सुंदर कल्पना
बेफिकीर, मी इथे लांब आहे.
बेफिकीर, मी इथे लांब आहे. भारत आणि अमेरिकेच्या बरोब्बर मध्यावर लटकलोय. ना घरका ना घाटका!
कल्पना पुढे रेटण्यासाठी कुठली बटणे दाबावीत?
आ.न.,
-गा.पै.
या तपपूर्तीच्या निमित्ताने
या तपपूर्तीच्या निमित्ताने छोटासा कृतज्ञताप्रदर्शनाचा (प्रत्यक्ष व/वा दूरस्थ) कार्यक्रम/लेख/मुलाखत झाल्यास मध्ये आयोजनास वेळ मिळेल. यानिमित्ताने त्यांचे अनुभवही ऐकायला मिळतील.
>> वा गामा. उत्तम कल्पना मांडलीत.
गेल्या वर्षीचा धागा? बरोब्बर
गेल्या वर्षीचा धागा? बरोब्बर २५ एप्रिललाच पुन्हा खोलला? गम्मतच आहे.
कुणीतरी मनावर घ्या रे! नाहीतर
कुणीतरी मनावर घ्या रे! नाहीतर केवळ अभिनंदनाच्या धाग्यावर समाधान मानावे लागेल. यानिमित्ते एखादे गटग करता येईल काय?
-गा.पै.
Pages