Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे. 
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोड चांगला व्हावा म्हणून अधे
रोड चांगला व्हावा म्हणून अधे मधे कामं चालू आहेत. आणि अॅक्च्युअल जॅम हा दहिसर-मिरारोड भागातच जास्त होतो. पुढे तसा कमी.
मुग्धानंदने बोलाय्ला नाही पण
मुग्धानंदने बोलाय्ला नाही पण वडे खाय्लातरी तोंड उघडल होत की नाही??

शांतपणात कट्ट्याच्या टेबलावर पय्ला नि एकुणात तिस्रा नंबर माझा होता..
नी ला घोरो बद्दल अनुमोदन..
अश्वे ती मुग्धानंदच
अश्वे ती मुग्धानंदच होती...
रैनातै मला पळावं लागलं गं... तुझी कित्ती कित्ती वाट पाहिली म्हणून सांगू!!
हे बघा आम्ही गटगला येत नाही
हे बघा आम्ही गटगला येत नाही कारण आम्हाला वृत्तांत वाचायचा असतो. तो टाका बरं झटपट!
घोरो? :निळा चेहरा:
घोरो? :निळा चेहरा:
हिम्या- तुझ्याशी जन्मभर कट्टी
हिम्या- तुझ्याशी जन्मभर कट्टी घेईन, तुझ्या प्रत्येक पोस्ट वर जळजळीत अभिप्राय लिहीन.
आता वाहतुकीवर पोस्ट पाडणार्यांनाही हीच धमकी लागू.
नी इज म्हणिंग द राईट.
दहिसर,भायेंदर,मीरा रोड हे सर्व खणखण खणलेले आहे. तिथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. त्यामूळे तिथे भयानक ट्रॅफिक जॅम असतो. तसेच ठाणे म.न.पा च्या हद्दीत शिरल्यावर घोरो वरही तुफान वाहतूक मुरंबा असतो. मग पुढे लाबशा मार्गावरही. (पुढील पोस्ट लाबशा भारताचे दुसरे पंतप्रधान होते यावर पाडा, मुरंब्यावर नको. ओके?)
होहो दुसर्या टेबलावर मेधा शांऽत होती, सौ भिडेही. पियापेटीही, किरणही.
तरीही एकुणात येवढा गोंगाट कोणाचा होता ते मला शेवटपर्यंत कळले नाही.
वडेही खाल्ले? आँ? कधी?
ठमादेवी- बघ ना गं. योगच नव्हता आपल्या भेटीचा.
लाबशा >>>> मी 'लाबशा' कोण हा
लाबशा >>>> मी 'लाबशा' कोण हा विचार करत होते. मग ट्युब पेटली
वृत्तांत येऊ देत.
एवढे जण जमलात पण एक कोणी
एवढे जण जमलात पण एक कोणी सविस्तर, व्यवस्थित, असा वृत्तांत लिहायचे मनावर घेईल तर शपथ!
पुढील पोस्ट लाबशा भारताचे
पुढील पोस्ट लाबशा भारताचे दुसरे पंतप्रधान होते यावर पाडा, मुरंब्यावर नको. ओके >>>
तरीही एकुणात येवढा गोंगाट कोणाचा होता ते मला शेवटपर्यंत कळले नाही. >>>> तो गोंगाट ऐकून सा.प्र.चा मॅनेजर भिड्यांचे पाय धरायला आला होता... पण भिंड्यांनी चतुराने अंग काढून घेतले व तो मान डुआयला दिला.
वडेही खाल्ले? आँ? कधी? >>> अरे रे... चांगले डजन भर वडे उरले होते... काय करायचे याचा विचार सुरू असताना... ते माबो ट्रेकर्सच्या कामी येतील म्हणून त्यांची रवानगी माझ्या सॅग मधे झाली... डजन भर वड्यांना आणि आनंदमैत्रीच्या पेढ्यांना सगळ्या ट्रेकर्स मंडळींनी धन्यवाद दिले आहेत.
सध्या सबंध मुंबईलाच वाहतूक
सध्या सबंध मुंबईलाच वाहतूक मुरंब्यानी वेढलय... बर्याच दिवसांनी मध्यंतरी मुंबईत आलो होतो.. तेव्हा जाम वैतागलो होतो.. आणि नुसते नावालाच मुंबईचे सगळे ड्रायव्हर लेन शिस्त वगैरे पाळतात.. मुरंब्यात आडकले की कसली लेन आणि कसले काय... जिकडे वाट सापडेल तिकडे घुसत असतात...
रैना.. तू ट्रेननी लवकर पोहोचली असतीस ठाण्याला
अवांतर ठाणा स्टेशनच्या बाहेर जे काम चालू होते ते पूर्ण झाले आहे का...
अतिअवांतर - कोणीतरी वृत्तांत लिहायला मनावर घ्याच.. (झाशीच्याराणीला पेनाची तलवार बाहेर काढायची विनंती करावी काय???)
यावेळेला हा वृत्तांताचा अभिनव
यावेळेला हा वृत्तांताचा अभिनव उपक्रम केलाय शैलजा...
सगळेजण आपले आपले थोडे थोडे तुकडे टाकणारे त्यातून वाचणार्याने आपल्या मनाप्रमाणे समजून घ्यायचं मीटमधे काय झालं ते...
मी तुला फोन करेन त्यापेक्षा
मी तुला फोन करेन त्यापेक्षा आज रात्री वृ ऐकायला
माझ्या कानावर घोडबंदर रोड
माझ्या कानावर घोडबंदर रोड चांगला झालाय आणि आता आजिबात ट्रॅजॅ होत नाही अशी ख्याती आली होती...
>>
तु चुकुन '२०१५ च्या ठळक बातम्या' आता ऐकल्या असशील.
एकूणच गटग ला मजा आली. दुपारी
एकूणच गटग ला मजा आली.
दुपारी नीलचा फोन ... "अरे समीर शी बोलण झालय का ? "
मी " नाही...का ? माझ्याकडे त्याचा नं नाहीये "
नील " बर बर मी बोलतो .."
२० मिनिटांनी नीलचा पुन्हा फोन ..."झाल बोलण , येतोय तो..."
यावरची रीएक्षन द्यायला माबोवर स्मायली उपलब्ध नाही...असो
मलाच पोहोचायला उशीर झाला , कारण घरातुन वेळेवर निघाल्यावर १० मिनिटांनी किरुचा समस की त्याला अजुन १५ मि उशीर होइल...
मी किरुच्या घराखाली १५ मिनिटांपेक्शा जास्त थांबलो होतो तो भाग वेगळाच्.... असो
ड्यु आय चा फोन ५.३० च्या दरम्यान "अरे किती जण आलेत ? मी आहे ठाण्यात , लोक जमले की मी येतो.." यावरुनच मी ताडल .. की हा आधीच पोहोचलाय आणि कोणा समोर तरी फुशारकी मारण्यासाठी बोलतोय्...असो..
मी , मधुरा आणि किरु पोहोचलो तेव्हा
अम्या, नी, परेश , योडी, मुग्धानंद एका मैत्रिणी समवेत, ठमा , अगो , विष्वेश नवरे, लली, मेधा , मैत्री,इन्द्रा आणि बरीच गँग जमा होती... काही नाव राहिली असतील पण ...समजून घ्या ..असो..
नील आला होता पण ,त्याच्या आजीची तब्येत अचानक बिघडल्याने तो माघारी परतला ,आता त्याची आजी बरी आहे.
६.१० झाले समीरचा पत्ता नाही , मग मी नीलला फोन केला आणि समीरचा नं घेतला, तो म्हणला २च मिनितांत पोहोचतोय..
६.१२ ला समीर आणि सुप्रिया यांच आगमन , सगल्यांशी हस्तांदोलन , नमस्कार चमत्कार ...
परेश शी ओळख करुन देताना ड्यु आय म्हणला " आता याला किंवा याचा आयडी ओळख, किंवा गेलाबाजार याचा द्युआयडी ओळख "
समीर " तु खरा आयडी तर सांग ,मी तुझे सगळे ड्यु आयडी सांगतो" यावर जोरदार हशा ... असो
क्रमष :
कविता नवरे यांचा वृत्तांत
कविता नवरे यांचा वृत्तांत त्यांच्याच 'धृतराष्ट्र' नजरेतुन
जल्ला जमलेले सर्व लोक्स, एक पण वृ टाकत नाही नुसतेच पोस्टींची लांबण लावताय
हे घ्या एका टांगारुचा वृ
दिनांक १६ एप्रिल २०११ रोजी ठाणे येथे मायबोली ह्या संकेत स्थळाचे गटग झाले त्याला आमच्या वाहिनीचे एक प्रतिनिधी उपस्थीत होते. आमच्या प्रतिनिधिंकडून मिळालेला हा आखोदेखा हाल
सर्वात पहिले नील आणि विश्वेश ज्याची श्रीयुत कविता अशी ओळख काहिंनी करुन दिली ते दोघे ऍडमीन साठी सरप्राईज का कायसस घ्यायला गेले आणि नेमका नील ला त्याच्या(च) घरुन त्याची आजी चक्कर येऊन पडल्याचा फोन आला आणि परत जावं लागलं.
मग विश्वेशलाही काय घ्यावं सुचेना म्हणून तो पण गडकरीला परत गेला. तिथे योडी नावाची काडी हजर होती.
तिथे खातेपिते घरची मुग्धानंद बरोबर योडीची बहिण शोभेल अशा व्यक्तीला घेऊन प्रवेशती झाली. येताच तिने "इथे एक गृप जमणार होता ना?" असं चेह्ऱ्यावरुन "कोणाची मस्करी न करणारा गंभीर प्रवृत्तीचा आणि अतीसभ्य" वाटणाऱ्या विश्वेशला विचारलं आणि "दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं" हा धडा तिला शिकायला मिळाला.
(ए कोण रे ते म्हणतय मी १० वर्षापुर्वी शिकलेला धडा आहे तो म्हणून? - आम्ही दोघेही सारखेच सभ्य आहोत ह्याची दोघांनाही पुर्ण कल्पना आहे) 
योडी फिस्स्कन मांजरी सारखी हसली नसती तर नक्कीच अजून थोडावेळ मुग्धानंदचा गोंधळलेला चेहरा गटगकरांना बघायला मिळाला असता.
"योडी तू कधी आणतेस जोडी?" ह्या प्रश्नावर योडीने थोडसं लाजल्यासारखा अभिनय केला असंही समजलं.
मग बटाटे वड्यांचा आस्वाद घेतला गेला (मधल्या गप्पा ह्या टांगारुला कळल्या नसल्याने तुम्ही गाळलेल्या जागा भरा, मेन बटाटवडे होते आणि ते सगळ्यांनी हाणले हे कळलं) विश्वेशने नेलेल्या मैसुरपा ला मंजुडी सारखी खवैयी न आल्याने "साजुक तूप फार आहे नाही" असा रिस्पॉन्स मिळाला आणि वजनकाट्याची काळजी घेत सगळ्यांनी त्याचा तुकडा तुकडाच संपवला (धन्स टू वजन की फिकिर करनेवाले लोक्स, त्यामुळे मला घरी मैसुरपा यथेच्छ खाता आला) (मंजुडे मैसुरपा करता तुला खुप्प खुप्प मिस केलं)
नंतर मोर्चा "लाजो गटग फ़ेम हॉटेल कडे वळला" त्या हॉटेलातल्या कर्मचाऱ्यांचे घाबरलेले, त्रस्त झालेले चेहरे पाहुनही कोणाला त्यांची दया आली नाही. गेल्यावेळच्याच जागा म्हणे पटकावल्या गेल्या. फक्त ह्यावेळी त्यांच्यावर उपकार म्हणून अश्वीने त्यांना "कांगारु कुठे मिळतात" हे जीके हातवारे करत सांगितले नाही आणि भरत नाट्यमवालीही त्या हॉटेलात त्या दिवशी फिरकली नाही.
गटगत चक्क दोन गट पडले, एक दंगा करणाऱ्यांचा आणि एक दंगा ऐकणाऱ्यांचा गट.
दंगा ऐकणाऱ्या गटात: अमृता आणि परिवार, रैना, पायपेटी आणि परिवार, मधुरा भिडे होते असे आमच्या खास वार्ताहाराकडून कळले
बाकी लोक्स नेहमी प्रमाणे दंगा करणाऱ्या गटात होती हे ओघाने आलेच. तरिही ऑर्फ़ियस उर्फ़ परेश नामक आयडीचा दंगा वाढल्यावर नीरजा नामक आयडी त्याला अधून मधून दुसऱ्या टेबलावरुन दटावत होती असे समजले.
रैना हा आयडी एकंदर खुप तोलुन मापुन बोलत होता म्हणजे नेहमीचा ठेवणीतला आवाज लावत नव्ह्ता असं राहून राहून वाटत होतं
(soft spoken skills ghotun aleli aslyasarkha vatla
)
ज्युनियर रैना मात्र खुप गोड दिसत होती आणि "choo sweet" कॅटेगरितली होती.
ऍडमीन हे ऍडमीनचाच मुखवटा पुर्णवेळ घालून असल्याने "शांत समंजस वाटले" की "आयडी मागचा चेहरा ही तस्साच आहे" हे समजू शकले नाही. पण एकंदरीत ते ही इतरवेळी "आमच्याच इतके शांत, कोपरखळ्या न मारणारे" असावेत असा अंदाज आजे.
झारा ही आपल्याप्रमाणेच गिरगावकरीण असल्याचे सध्या पुणेकर असलेल्या व पुर्वाश्रमीचा गिरगावकर असलेल्या परेश नामक आयडीने सांगून "आपण अजूनही गिरगावला विसरलो नाही हाऽऽ" असा सुर लावल्यासारखा वाटले.
स्टार्टर्स चांगले होते. एक पदार्थ मात्र खास "लाजो गटग"चा बदला घेण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांनी बनवून घेतल्यासारखा "सॉल्टी" होता. शेवटी संयोजक पदाची जबाबदारी ओळखून कट्टा मालक विनय ने "बदलून आणायला सांगुयात ही डिश" असं विश्वेशला सांगितलं.
आमच्या वार्ताहाराला घर नामक ठिकाणी अत्यंत महत्वाची ड्युटी असल्याने तो दिवाणे आम संपल्यावर दिवाणे खास ला हजेरी न लावता तिथुन निघाला. तसही दिवाणे खास बाबत जाहीर रित्या काही "लिहिणेबल" नसतच.
----------------
मला पावलोपावली लागलेल्या ठेचांमुळे मला किती मिस केलं ते समजलं त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
तरिही ऑर्फ़ियस उर्फ़ परेश
तरिही ऑर्फ़ियस उर्फ़ परेश नामक आयडीचा दंगा वाढल्यावर नीरजा नामक आयडी त्याला अधून मधून दुसऱ्या टेबलावरुन दटावत होती असे समजले. >>>
त्यावर परेशनामक आयडीने तिलाच धमकावले - फार बडबड केलीस तर एखाद्या बाफवर तुझ्या बाजूने बोलेन
योडे ठाण्यात मिठाच प्रमाण
योडे ठाण्यात मिठाच प्रमाण जास्त लागल्यावर भिती तर वाटणारच ना ग ??
पण विष्वेश ने डिश मधे काहिच शिल्लक न ठेवल्याने बदलायला वावच उरला नव्हता...
मी ही लिहिणार लवकरच @ झारा,
मी ही लिहिणार लवकरच
@ झारा, उविकु नावाचा ओरिजनल आयडी. कालच अस्तित्वात आलाय गं
हायला, श्रीयुत नवरे छुपे
हायला, श्रीयुत नवरे छुपे रुस्तुम आहेत हाँ
इंद्रा- तुझा फोटो टाक बाबा इकडे. मला छत्रेकाकुंने व्हेगली तो बघ तो इंद्रा असे सांगीतले, पण अजून लक्षातच येत नाहीये कोण ते.
सगळे वडे
अरे फोटो द्याकी कुणीतरी..
अरे फोटो द्याकी कुणीतरी..
अरारा योडे, पायपेटी नाही ग
अरारा योडे, पायपेटी नाही ग पियापेटी. ती काय ऑर्गन आहे काय?
बाकी वृ मस्त.
<< मला छत्रेकाकुंने व्हेगली
<< मला छत्रेकाकुंने व्हेगली तो बघ तो इंद्रा असे सांगीतले >>
छत्रेकाकु नेहमी असाच कुणा ना कुणाचा कात्रज करतात.
एकूण काय,ते खाद्यपदार्थांचे
एकूण काय,ते खाद्यपदार्थांचे रसभरीत फोटो न टाकण्याएवढे ठाणेकर दयावान आहेत. त्या बद्दल आधी धन्यवाद. तर सगळ्यांचा कलकलाट, हसणे खिदळणे बघून झालेच तर दहिसर, मीरारोड इ भल्भलत्या ठिकाणी वाहतुकीचा उडालेला फज्जा, चुकलेले रस्ते, न आलेल्यांची अपरिहार्य कारणे, शांत वि अशांत टेबले, बालमायबोली, संतश्री अॅडमिन यांचे हसतमुखत्व व झाशीच्या राणीचे आजचे वय (अमूक इतके असून ती ललिता प्रीतीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे तर ललिता किंवा प्रीतीचे वय किती? व स्कॉलरशिपसाठी पुढचा प्रश्न, असूदे व किरुचे वय अंदाजे सांगा. चारी पर्याय- यापैकी नाही.) मला अगदी प्रत्यक्ष गटगलाच आल्यासारखे वाटले.

सगळ्यांचे वृ मस्त. मजा केलीत!
माझ्याकडे जे फोटो आहेत ते कसे
माझ्याकडे जे फोटो आहेत ते कसे / कुठे टाकू ?
अॅडमिनचा एखादा असेल तर
अॅडमिनचा एखादा असेल तर त्यांना विचारुन टाक जमल्यास :).
दिपक, इथे नको टाकूस. इमेलने
दिपक, इथे नको टाकूस. इमेलने पाठव सगळ्यांना.
इथे टाकत नाहीये ! इमेलने
इथे टाकत नाहीये ! इमेलने सगळ्यांना >> ओक्के.
आशू अगं गटगचे फोटो
अॅडमिनचा एखादा>> बरेच आहेत वेगवेगळ्या अँगलने
विपूत विचारून टाकतो.
बाकीच्यांचे पण टाकतो टाकू ना ?
पिकासावर गूगलच अकाउंट असेल तर टाकता येईल ना?
क्रमशः वृ चा पुढील भाग कधी
क्रमशः वृ चा पुढील भाग कधी येत आहे?
मला छत्रेकाकुंने व्हेगली तो
मला छत्रेकाकुंने व्हेगली तो बघ तो इंद्रा असे सांगीतले >>>
इराला विचार... ती नक्की सांगेल...
हा फोटो बघ छत्रेकाकुंच्या नजरेतून काढलेला.
डुआय, फोटो मेल कर.
डुआय, फोटो मेल कर.
Pages