Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाघेटी फळ. याची साल मोसंबी
वाघेटी फळ.


याची साल मोसंबी सोलतो तशी सोलतात. सालीची भाजी करतात्.साल काढली की फळ असे दिसते.
साल बारीक कापून ऊकडतात. पाणी गाळून कांदा आणि खोबरे घालून भाजी करतात. माझी आई छान भाजी करते. बायकोला जमत नाही.
मी हे फळ पहिल्यांदाच बघतोय.
मी हे फळ पहिल्यांदाच बघतोय.

विजयजी, वायवर्णचा फोटो मस्त आलाय.
त्यानी जून मधे मला झाडे द्यायचे कबूल केले आहे. तू फोटो काढलेल्या पांढ्र्या बहाव्याला अध्याप तेवढा बहर आला नाहीय.>>>>मला वाटले एव्हाना बहावा बहरला असेल.
रच्याकने, कॅशिया बहरला आहे का?
दिनेशदा, साधना, काल मी ज्या फुलाबद्दल बोलत होतो त्याचा हा फोटो. दिनेशदांनी चंदनाच्या फुलाचे वर्णन केले तेंव्हा मला पटकन हेच आठवले. विजयजींना सुद्धा बहुतेक याचे नाव नाही माहित.
फुलाचा फोटो

नंतर फुलातच असे करंवदासारखे फळ येताना दिसली

जिप्स्या, माझ्याकडच्या यादीत
जिप्स्या, माझ्याकडच्या यादीत नाव नाही त्या झाडाचे. इंग्रजी नाव वा वर्णन दिलेस तर सांगू शकेन.>>>>>
दिनेशदा, हिंगणबेटाची हि माहिती.
कुठलाही सौंदर्यालंकार न ल्यालेला हा वृक्ष, प्रतिकूल हवामानातही आपलं अस्तित्व टिकवून आहे. ५ ते ७ मी. वाढणार्या या वृक्षाची साल भुरकट असून पानं संयुक्त असतात, आपट्याची जाणीव करून देतील अशी. मात्र आकाराने लहान आणि अतिशय चिवत आणी बरोबरीने काटे. हिवाळ्यातल्या पानगळीनंतर उन्हाळ्यात नवीन पालवी येते आणि त्यापाठोपाठ हिरवट-पांढरी, मंद सुगंधी फुलं. त्यातुन पुढे टणक सालीची अंड्याएवढी फळं धरतात. बियांच्या आवरणात सॅपोनीन हा घटक असतो. राजस्थानात सिल्कचे कपडे धुण्यासाठी त्याचा वापर होतो. म्हणजे आपण ज्याप्रमाणे रिठा वापरतो तसा. फळांची साल मात्रं विषारी असते. आदिवासी या सालीचा मासेमारीसाठी उपयोग करतात. बीमध्ये ४३ टक्के तेल असतं. त्याचा उपयोग कफनाशक व श्वासनलिकेच्या रोगात करतात.
(संदर्भ: डॉ. विद्याधर ओगले, भटकंती मासिक, जून २००५)
दोनदा पोस्ट पडली.
दोनदा पोस्ट पडली.
विजय वायवर्णाचा फोटो मस्तच
विजय वायवर्णाचा फोटो मस्तच आलाय. वाघेटीची भाजी जागूने लिहिली होती.
मोहाच्या बियांची भाजी करता कि नाही. त्या मोहट्या, ठाण्याला असतात विकायला.
जिप्सी, तो कनकचंपा / रामधनचंपाचा प्रकार आहे. त्याचे फूल नाही तर फळ आहे ते. फूल पिवळेच असते.
राणीच्या बागेच्या रस्त्यावरच्या गेटजवळ, आत शिरल्यावर आपल्या उजव्या बाजूला, कुंपणाच्या आत हे झाड आहे. पुर्वी रुईया कॉलेजच्या आवारात पण होते.
जिप्सी, तो कनकचंपा /
जिप्सी, तो कनकचंपा / रामधनचंपाचा प्रकार आहे.>>>>येस्स, विजयजींनीसुद्धा हेच सांगितले होते. पण या दोन्हींच्या पानात मला थोडा फरक जाणवला होता :(. हा फोटो पवई बागेत काढलायं.
दिनेशदा, नेटवर चेकताना
दिनेशदा, नेटवर चेकताना "हिंगणबेटाचे" इंग्रजी नाव 'Balanites aegyptiaca' समजले.
या नावाने शोधले असता फुलांचा फोटोही दिसेल.
योगेश / दिनेशजी / विजय
योगेश / दिनेशजी / विजय माझ्यासाठी ही नविन माहीती, आता पाय शिवशिवतायत बाहेर भटकायला पण .....
माझ्या ऑफिसच्या आवारात तामण मस्त बहरलाय. पण आवारात फोटो काढण्यास बंदी आहे.
अरे हे झाड, तिथे लहान
अरे हे झाड, तिथे लहान मूलांसाठी घसरगुंडी वगैरे आहे तिथे बघितल्यासारखे वाटतेय. खरे तर इथल्या पूर्व आफ्रिकेतील वाळवंटात हे छान फोफावते. त्याची फळे उकडून खातात. माझ्या एका सुदानी मित्राने दिले होते, पण भयंकर कडू होते ते.
आणि या दोन फळात फरक जाणवणारच. कनकचंपाच्या फळात सहा ते दहा बिया असतात.
यात चार ते पाच असतात.
जिप्सी, तो कनकचंपा /
जिप्सी, तो कनकचंपा / रामधनचंपाचा प्रकार आहे
मीही हेच लिहणार होते.
दोन्हींच्या पानात मला थोडा फरक जाणवला होता
अरे चुलतभावंडे असतील.. अंजनाला नाही १० चुलतभावंडे आहेत
सचिन, रानफुले ब्लॉगवर नविन
सचिन, रानफुले ब्लॉगवर नविन काही अपडेट केलंय का?
अरे हे झाड, तिथे लहान मूलांसाठी घसरगुंडी वगैरे आहे तिथे बघितल्यासारखे वाटतेय.>>>>आता, परत गेल्यावर बघायलाच पाहिजे.
चुलत भावंडे असणार >>>>>:-)
नाही रे मित्रा प्रयत्न /
नाही रे मित्रा
प्रयत्न / धडपड करतोय पण सुट्टीच्या दिवशी या कामांसाठी वेळ देणे जमत नाहीये.
आणि या दोन फळात फरक जाणवणारच.
आणि या दोन फळात फरक जाणवणारच. कनकचंपाच्या फळात सहा ते दहा बिया असतात.
यात चार ते पाच असतात.>>>>>म्हणजे आता या बिया साठवून ठेवायला पाहिजेत.
प्रयत्न / धडपड करतोय पण सुट्टीच्या दिवशी या कामांसाठी वेळ देणे जमत नाहीये.>>>>तुझ्या ब्लॉगवर अपडेत करायला, तुझ्याकडे नसलेल्या (आणि माझ्याकडे असलेल्या) फुलांचे फोटो पाहिजे असेल तर नक्की सांग. विदाऊट वॉमा पाठवतो.
फुलांचे फोटो पाहिजे असेल तर
फुलांचे फोटो पाहिजे असेल तर नक्की सांग.<< दे की आणि वॉटर मार्क सहीत दे,
दिनेशजींनी सांगितले तसे मला त्या फुलांची वर्गवारी करायची आहे, त्यांची माहिती तिथे भरायची आहे. मला वाटते तुझ्या कडच्या फुलांचा असा डेटा तू जमवला आहेसच
नक्कीच, तुझ्या ब्लॉगवरच हे
नक्कीच, तुझ्या ब्लॉगवरच हे सगळे अपडेट करूया.
माझ्याकडे पण बरेच फोटो साचलेत
माझ्याकडे पण बरेच फोटो साचलेत पण वेळच मिळत नाही अजुन. इथे येउन वाचुन जातेय पटापट.
"ग्लोबल वॉर्मिंग" विषयावरचा
"ग्लोबल वॉर्मिंग" विषयावरचा पहिला मराठी (कमर्शियल) चित्रपट "करूया उद्याची बात" काल प्रदर्शित झालाय.
अवश्य बघा.
बहुतेक हा प्रश्न ईथे विचारण
बहुतेक हा प्रश्न ईथे विचारण योग्य नाही पण मला नक्की कुठे विचारु ते कळत नव्ह्ते, थोडाफार निसर्गाशी संबंधित आह म्हणुन विचारते. आम्ही २-३ दिवसांपुर्वीच नवीन भाड्याच्या जागेत रहायला आलोत. हॉल्च्या खिडकित ग्रिलम्ध्ये काल दुपारी कबुतरने एक अंड घातलय आणि तेव्हापासुन ते त्या अंड्याजवळच असते आमची थोडी हालचाल जाणवली की उडुन जाते नी पुन्हा येते. बहुतेक ते अंड उब्व्त असते. नवरा म्हणतो की ते अंड आपण खाली कंम्पाउंड्मध्ये झाडाखाली नेऊन ठेवुया. इथेच ठेव्ल तर त्यातुन पिलु बाहेर आल्यावर कबुतरं इथेच घरटं करतील, कचरा करतील. माझ मत अस की पिलु होईपर्यंत ते इथेच असु द्याव. पिलु झाल की ते काही दिवसांनी आपणच उडुन जाईल. उगाच ते अंड खाली नेऊन ठेवल्यावर ते त्या मादी कबुतराला नाही मिळाल तर? सोसायटीतील लहान मुलांनी ते फोड्ल तर? त्या छोट्या पिलाला (आल्यावर) त्रास दिला तर? तसही मी अस ऐकल आहे की माणसाने हात लावलेला पक्षांना आवड्त नाही....
काय करु?? एक भावनिक विचार येतो की नविन घरात आल्या आल्या एका आईला तिच्या पिलापासुन वेगळे का करु? फक्त स्वच्छतेसाठी?
कोणाला कबुतरांचा अभ्यास आहे का? की अंड्यातुन पिलु बाहेर यायला अंदाजे कीती दिवस लागतील? नंतर पिलु उडण्याइतपत मोठ व्हायला कीती दिवस लागतील?
या प्रश्नासाठी योग्य ती जागा/ लिंक दिली तरी चालेल....
साक्षी पिलु आहे तिथेच राहु
साक्षी पिलु आहे तिथेच राहु द्या. बाहेर नेलेत तर कबुतराला कळणार नाही. जास्तित जास्त १५ ते २० दिवस लागतील पिलु उबवायला मग पिलु एकदा बाहेर पडले की ७ ते ८ दिवसांत कबुतर त्याला बाहेरची दिशा दाखवेल त्यानंतर त्याला तुम्ही न येण्यास प्रतिबंध करु शकता.
जागूला अनुभव आहे !! माणसांनी
जागूला अनुभव आहे !!
माणसांनी हात लावलेला पक्ष्यांना चालत नाही, हे मात्र तितकेसे बरोबर नसावे.
माझेही फोटोंच्या बाबतीत तेच झाले होते, पण जून्या मायबोलीवर बर्यापैकी संग्रह शाबूत आहे अजून.
साक्षी परत तुमच्यासाठी लिंक
साक्षी परत तुमच्यासाठी लिंक देते.
http://www.maayboli.com/node/21700
कबुतरे काही घरटी बिरटी करणार
कबुतरे काही घरटी बिरटी करणार नाहीत. तेव्हा त्याची काळजी नको. घरटे करायचेच असते तर ते अंडे घालायच्या आधीच केले अस्ते. आता असे उघड्यावर घातलेले अंडे तुम्ही हलवु नका. महावीर काळजी घेईल त्याची आणि पिलु उडुन जाईल.
पुढच्या वेळेस असे होऊ नये याची काळजी म्हणुन ग्रिलवर जाळी बसवा. माझ्या आईने हेच केले. कबुतरे ग्रीलमधुन आत येऊन खालच्या खिडकीच्या छज्ज्यावर अंडी घालायची, कुठलेही घरटे बिरटे बांधत बसायच्या फंदात न पडता आणि मग कावळे अंडे खाईल ह्या भितीने आई राखण करत बसायची. कबुतरे पण गुजरात्यांसारखीच असतात. उगाच पोरांची जास्त काळजी करत बसत नाहीत.
धन्यवाद सर्वांना... नाही काही
धन्यवाद सर्वांना... नाही काही करत त्या अंड्याला आता... तसही खुप छान दिसत ते कबुतर जेव्हा आपले पंख फुलवुन ते अंड उबवत असतं ... मी सारखी सारखी जाऊन पाहत असते. मला त्या छोट्या पिलाला अंड्यातुन बाहेर येताना पाहायच आहे.
मी एकदोन दिवसात राणीच्या
मी एकदोन दिवसात राणीच्या बागेत जाणार आहे.
तिथे कोणती झाडे कूठे आहेत ह्याविषयी माहिती द्या.(दिनेशदा, जिप्सी, विजय़जी)
उजु, राणीच्या बागेत फेरफटका,
उजु, राणीच्या बागेत फेरफटका, नेचर वॉक वगैरे बीबी वाचले का ?
तिथे गेल्यावर प्रत्येक झाड निरखून बघायचे. इथे येऊन वर्णन करायचे, जमले तर फोटो टाकायचे आणि म्हणायचे, ओळखा पाहू !
Wild Guava, Ceylon Oak,
Wild Guava, Ceylon Oak, Patana Oak • Hindi: कुम्भी Marathi: कुम्भा • Sanskrit: गिरिकर्णिका कालिंदी

याला पीलू असेही म्हणतात.
कुम्भीच झाड.
कुम्भीची कळी


कुम्भीचे फूल
गेल्या आठवड्यात वेंगुर्ला
गेल्या आठवड्यात वेंगुर्ला येथे गेले होते, तिथे श्री. बोवलेकर यांनी वाग्याचे झाड लावले आहे आता ते चक्क २४ फुट उंच झाले आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी त्या झाडाचा वरषाचा वाढदिवस साजरा केला.
आता जुन मधे गिनीज बुकात नोंद होणार आहे म्हणे. फोटो आहे पण टाकता येत नाहीये ( प्रयत्न चालू आहे).
विजय, या फळांचा फोटो असणार
विजय, या फळांचा फोटो असणार माझ्याकडे. अगदी कुंभासारखाच आकार आतो. पण या फूलांना प्रचंड दुर्गंधी येते. पाऊस पडला तर जास्तच येते.
हो दिनेशदा. आमच्या येथे याची
हो दिनेशदा. आमच्या येथे याची खूप झाडे आहेत. फळाना अध्याप वेळ आहे. आता फूलांचा बहर सुरु झाला आहे. जनावर देखील या फळांना तोंड लावत नाहीत. पण झाडाचा ऊपयोग खोकल्याच्या औषधात करतात.
विजयजी, पवईच्या फॉरेस्ट
विजयजी, पवईच्या फॉरेस्ट गार्डनमध्ये शुक्रवारी जाऊन आलो. त्यात फिरताना खरंच (थोडाफार) जंगलाचा फिल येतो
भरपूर झाडे, एक गूढ शांतता, फक्त पक्ष्यांचे आवाज आणि हे सगळे पवईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी. खुप छान मेंटेन ठेवले आहे. झाडे भरपूर आहे पण ओळखु येत नाहि (मला :-)). फुलोरा दिसला नाही. बांबूची खुप झाडे आहेत. पावसाळ्यात हा परिसर खुपच सुंदर असणार. 
Pages