निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हो जांभळाबद्दल राहिलेच की. तिकडची जांभळे अगदी गोड पण आकाराने चिमुकली. मुंबईला मिळतात ती आकाराने मोठी पण चवीला कमी. झाडांच्या जनुकिय रचनेत बदल होत होत असे वेगळे प्रकार तयार होतात. पण ति जांभळे इथे आणि हि जांभळे तिथे नाही जगू शकणार.
रानातली कंटोळी आणि मुंबईला मिळतात ती हायब्रीड कंटोळी, असाच फरक आहे यात.
आणि आता आपण जी पिके घेतो, त्यांचे पुर्वज अजून जंगलात मूळ रुपात आहेत. रानमूग असतो, रानमेथी असते, जंगली गहू असतो आणि जंगली भात देखील.
आपण सुधारणा करताना त्यातला खाण्याजोगा भाग वाढवला आणि त्यांच्या जगण्यातील बळ काढून घेतले.
उदा. जंगली मूग असतात त्यातले दाणे लहान असतात पण त्यांच्या शेंगा उन्हाने तडकतात आणि हलके दाणे जरा दूरव्र जाऊन पडतात. मानवाने जेव्हा हे दाणे खायला करायला सुरवात केली, त्यावेळी त्याला असे पडलेले दाणे गोळा करावे लागत. आता आपण जे मूग खातो, त्याच्या शेंगा अशा तडकत नाहीत. त्यातले दाणे झोडपून वेगळे करावे लागतात.

मानुषी, बर्डस ऑफ पॅराडाइज, हे एका खास पक्ष्यांच्या गटाला दिलेले नाव आहे. हे पक्षी जास्त करुन पापुआ न्यू गिनी मधे दिसतात. अत्यंत नयनमनोहर रुप असते त्यांचे. हे फूल कमी देखणे आहे असे नाही, पण ते पक्षी, त्यांचे रंग, पिसांची रचना, त्यांचे नाच, उडणे सगळेच स्वर्गीय असते.

हो मानुषी. हेच ते Happy फ्लाइंग स्पॅरो (हेलिकोनिया स्पँड्युला). आणि बर्ड ऑफ पॅरडाइज म्हणजे मागच्या पानावर जिप्सीने फोटो टाकलाय ते.
मला एक लिन्क मिळालिय मस्त.
http://kopsnursery.com/archives/6

अंबोलीला जंगलात मला पेरुची झाडे दिसली होती

हो, आम्बोलीला पेरुंचे अफाट पिक येते. अगदी जंगलातही आहेत, पण सगळी लिंबाच्या आकाराची गोल गरगरीत एकदम आणि पिकल्यावर पिवळीधम्मक. त्यापेक्षा मोठे पेरू अगदी क्वचितच आठळतात. . एस्टीस्टँडावरुन माझ्या घराकडे जातानाची ती लहान झुडपे तुम्ही पाहिली, मला त्यात अकस्मात एक पेरूचे झाड दिसले. तिन फुट झाड आणि त्याच्यावर एक नवसाचा पेरू उरला होता. मी लगेच तोडला. आत एकदम गुल्लाबी. तो लहान लिंबाएव्ढा पेरू आम्ही तिघांनी खाल्ला. Happy आताच मोसम सुरू आहे तिथे. माझी दोन्ही आजोळे आंबोलीलाच. पण आईच्या घरी पिवळे पेरू तर बाबांच्या घरी लाल पेरू.. आता आठवुनच तोंपासु Happy ती गुलाबी पेरुंची चव इथे नाहीच.. अजिबातच नाही. आता गेलेले तेव्हा रात्री बॅटरी वापरुन आजीच्या अंगणातले पेरू तोडले आणि तेही जिथे पेरू होते त्या फांद्या वाकवुन. खुप खाल्ले पेरू यावेळी. गावातल्या झाडांना पेरू जास्त झालेले इतके पेरू.... (श्या.. आम्बोलीबद्दल कोणी काहीही लिहु नका, मग मला राहवतच नाही अगदी, कधी जाते तिथे असे होते. त्यात तुम्ही जांभळांचाही उल्लेख केला Sad ..)

येऊरच्या जंगलात गेलेलो तेव्हा जंगली गव्हाच्या चपात्या केल्या, जंगली भेंडीची भाजी, त्यावर जंगली तीळ खरपुस भाजुन.... सिताफळ्.चिकु माणसाने सुधारीत केले माहित नव्हते. जंगलात मी आंबेही पाहिलेत पण शहरात खास दिसणारी फळे पाहिली नाहीत कधी. गेल्या आठवड्यात जंगली पॅशनफ्त्रुटच्या फुलाचाही फोटो टाकलेला. त्याला भरपुर फुले आलीत.

दिनेशदांना १००% अनुमोदन! नैसर्गिक जंगल तयार व्हायला हजारो वर्षे जावी लागतात. आणि नैसर्गिकपणे वाढणारी झाडे (म्हणजे मानवी हस्तक्षेप न होता,संकरीत वगैरे न केलेली) खूप परस्पर पूरक (उदा. सालई-मोवई अशी) वाढतात. थोडक्यात त्यांचे परस्पर नाते संबंध असल्यासारखे असते.ती दीर्घायुषी आणि इतर प्राणी सृष्टीला आधारभूत असतात. ती स्वदेशी endemic असल्याने पक्षी,कीटक यांचे आश्रयस्थान असतात. शहरांत किंवा गावांत सुध्दा आजकाल परदेशी exotic झाडे लावल्याने त्यांचे (पक्षी-कीटकांचे) उच्चाटण झाले आहे. आपण बिया टाकल्यातर त्यांना रुजायला योग्य परिस्थिती असेल तरच त्या रुजतील. श्री.चितमपल्लीसाहेब म्हणतात की पक्ष्यांच्या/प्राण्यांच्या विष्ठेतून ज्या बिया पडतात त्या चटकन रुजतात.

श्री.चितमपल्लीसाहेब म्हणतात की पक्ष्यांच्या/प्राण्यांच्या विष्ठेतून ज्या बिया पडतात त्या चटकन रुजतात.

हल्लीच कुठेतरी वाचले, बहुतेक दिनेशनीच लिहिलेय की त्या बीयांना रुजण्याआधी उबेची म्हणजे एका ठराविक तपमानात ठराविक वेळ राहायची गरज असते. ती गरज अशा त-हेने भागते.

दिनेशदा मग आम्ही ट्रेक ला झाडे लावायची तरी नक्की कोणती

जाभूळ - आंबा - वडाची - पिंपळची रोपे तयार करावीत का ??
किंवा तिथे उपलब्ध असणारी झाडांच्या बिया गोळा करून दुसर्‍या ठिकाणी नेऊन टाकाव्यात,

किल्ल्याच्या परिसरात झाडांना पोहोचणारा आजुन एक धोका म्हणजे वणवे, मागच्या पावसाळ्यात उगवलेली आणि आजुन पर्यत तग धरून राहिलेली झाडे जळुन खाक होताना मी पाहीली रविवारी राजगड ला गेलो होतो तेव्हा.

सचिन,
वणव्यांची सुद्धा झाडांना सवय असते. वणव्यानंतर सर्व जंगल साफ होते व जमिनीतील क्षारांचे खास करुन पोटॅशचे प्रमाण वाढते. काही झाडांना रुजायची हिच संधी असते. प्रोटिआ सारखी झाडे तर या संधीचीच वाट बघत असतात. आपल्याकडचे उदाहरण द्यायचे तर बॉटलब्रशचे देता येईल. या झाडाच्या बिया वर्षानुवर्षे झाडावरच असतात. वणवा लागल्याशिवाय त्या झाडावरुन पडत नाहीत आणि रुजतही नाहीत. तसेच वणव्यात फक्त वरची वाढच नाहिशी होते, जमिनीखालच्या बिया सुरक्षित राहतात.

जंगलात झाडे लावताना, ती निदान चार सहा महिने तरी नीट जगतील याची काळजी घ्यावी लागेल.
आता तूम्ही उन्हाळ्यात ट्रेकला गेलात कि तिथल्याच झाडाखाली (उदा, हिरडा, ऐन, बहावा, करंजा ) बिया, शेंगा पडलेल्या दिसतील. त्याच उचलून मोकळ्या जागी जरा उकरुन पेरल्या तर निसर्गात आपल्या आपण वाढतील. जंगलात मोठ्या झाडाच्या खाली नवीन झाडे नीट वाढणार नाहीत, पण मोकळ्या जागी, खास करुन ओहोळाच्या बाजूला वाढतील. आपल्या सह्याद्रीत एक दृष्य नेहमी दिसते ते म्हणजे एक सरळ उभा कातळ आणि त्याच्या पायथ्याशी हिरवळ. ती जागा झाडांच्या वाढीसाठी फार चांगली. एकतर तिथे ओलावा असतो, कड्यामुळे दिवसातून काही तास सावली असते, आणि वरुन पडण्यार्‍या पाण्यामुळे तिथे कूजलेला पालापाचोळाही असतो.
अगदी उतारावर जिथे पाणी वाहून जात असते पण जमिन मोकळी असते तिथे घायपाताची पिल्ले टाकता येतील. त्यांची मूळे खोल जातात आणि धूप थांबते.
पण सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन झाडे उगवणे हा आपला मुख्य प्रश्न नाहीच, (जंगल ते आपल्याआपण करते ) अमर्याद तोड हा आपला मुख्य प्रश्न आहे.

अमर्याद तोड हा आपला मुख्य प्रश्न आहे.

आणि अमर्याद वणवेही.

कालच वाचले की ताडोबासारख्या जंगलात आताशा दिवसात वणवे लागायचे प्रमाण वाढते. आणि हे वणवे १००% मानवनिर्मित आहेत याबाबत जंगल अधिका-यांचे एकमत आहे. दुर्दैव हे की ते लोक हे वणवे थांबवु शकत नाहीत आणि याला कारण परत तेच....... जंगलातली तेंदुची पाने तोडण्याचा लिलाव मार्चपर्यंत पार पडला की मग लगेच वणवे लागायला सुरवात होते. अशा वणव्यांतील उष्णतेमुळे तेंदुची पाने चांगली पोसली जातात असा काँट्रक्टर्स लोकांचा गैरसमज आहे आणि मग जास्त फायद्यासाठी वणवे लावले जातात. अशा वणव्यांमुळे जंगलातली वन्यजीव, झुडपे, वेली, गवत इ.इ. होरपळते त्याचे कोणाला काय????

दिनेशदा सुंदर माहीती. कंदमुळांनाही वणव्याचा धोका नसतो.

मी मागच्या पानावर चंदनाच्या झाडाचा फोटो टाकला आहे. त्याला पाने असतात का ? मी त्याची एक काडी काढून वास घेतला. खुपच चंदनाचा वास त्याला आला. पाने असतील तर पानांनाही येत असेलच ना ?

दिनेशदा, घरी काहि जुनी मासिकं चाळताना राणीच्या बागेचा एक लेख सापडला (दुर्मिळ वनस्पती), त्यात "हिंगणबेट" या झाडांचा आणि त्याच्या फुलांचा उल्लेख आहे. हे झाड राणीबागेत नक्की कुठे आहे.

मी त्याची एक काडी काढून वास घेतला. खुपच चंदनाचा वास त्याला आला. पाने असतील तर पानांनाही येत असेलच ना ?

हे काय भलतेच?? मी तर सगळीकडे असे वाचलेय की चंदनाचा वास त्याच्या खोडातल्या गाभ्याला असतो. चंदनाचे झाड तयार झाल्यावर म्हणजे साधारण ६० वर्षांनी त्याच्या खोडात हा सुवास तयार होतो. चंदनचोर किंवा चंदनमालाक चंदनाच्या झाडावर गिरमिट फिरवुन आतल्या गाभ्याचा भुसा काढुन बघतात तो तयार झाला की नाही ते.

अग वास चंदनाचाच होता पण खुप उग्र होता. मला थोडावेळ कसतरीच झाल. आणि तो वास पण बराच वेळ टिकुन होता. कदाचित त्यातही जाती असतील.

हो जागू, मुंबईत चंदनाचे झाड आहे. मलबार हिलवर आहे ते. त्याला फिक्कट हिरव्या रंगाची पाने येतात.
आकाराने त्रिकोणी असतात. लाल किरमिजी रंगाची चार पाकळ्यांची फूले येतात. आणि करवंदाएवढी फळे येतात. ती फळे खायला कोकिळा पण येते.
झाडाचा पर्णसंभार दाट असतो.
पण जर माहीत असेल हे झाड चंदनाचे आहे तरच त्याच्या पानाला वास येतो. माहित नसलेल्याला तो अजिबात येत नाही. याचे कारण मानसिक असावे. पण चंदनाच्या खोडाइतका काही वास येत नाही पानांना. (तसा तो फूलांना आणि फळांनाही येत नाही. ) आपण जे उगाळायचे चंदन वापरतो, त्या झाडाचे खोड कमीतकमी ६० वर्षांचे असेल तरच त्याला वास येतो. माझ्या जून्या लेखाची लिंक सापडली तर देतो.

साधना, गवताळ जंगलातले वणवे आणि आपल्याकडच्या जंगलातले वणवे यात फरक पडतो. इथले वणवे भराभर पुढे सरकतात, आपल्याकडचे मात्र एकाच जागी धुमसत राहतात. त्याने जास्त नुकसान होते.
सरकारला विड्यांवर एक्साईज ड्यूटी मिळतेय, तोवर तेंदुपत्त्यांना आणि त्याच्या कत्राटदारांना मरण नाही. या पानाचे आणखी काहि खास उपयोग, वाचल्याचे आठवत नाही. त्या तोडणार्‍या कामगारांना किती मजूरी मिळते, ते वाचल्यावर तर यात कुणाचा फायदा जास्त होतो, ते नक्कीच लक्षात येते.

जिप्स्या, माझ्याकडच्या यादीत नाव नाही त्या झाडाचे. इंग्रजी नाव वा वर्णन दिलेस तर सांगू शकेन.

जिप्स्या, माझ्याकडच्या यादीत नाव नाही त्या झाडाचे. इंग्रजी नाव वा वर्णन दिलेस तर सांगू शकेन.>>>>नक्की, मी घरी जाऊन, वाचुन लिहितो माहिती. Happy

त्याला फिक्कट हिरव्या रंगाची पाने येतात.
आकाराने त्रिकोणी असतात. लाल किरमिजी रंगाची चार पाकळ्यांची फूले येतात. आणि करवंदाएवढी फळे येतात. >>>>>>>>दिनेशदा,
ते करवंदाएव्हढे फळ फुलातच येते का?
ती फळ अगदी करवंदासारखीच दिसतात का?
एका फुलात ३-४ फळे असतात का?
आणि फुले साधारण ३-४ फूट उंचीच्या झाडाला येतात का?

मी ज्याम उत्सुक आहे जाणुन घ्यायला. Happy

नाही रे फूलात नाही येत. सूटे सुटेच येते. याचा गुच्छ साधारण मेंदीच्या तूर्‍याची आठवण करुन देतो.
फूले अगदीच छोटी. ३ ते ४ मीमी चीच असतात. फळे मात्र करवंदाएवढीच असतात.
साप वगैरे येत असतील, तर सावलीसाठी.
पण हे झाड परजीवी आहे. जमिनीखाली इतर झाडांच्या मूळांना विळखा घालून त्यांचे अन्न पळवते.
मी फोटो शोधतो रात्री.

नगरला नलिनी राहते त्या भागात खुप आहेत झाडे. कदाचित मानुषी कडे पण असेल.

अच्छा!! Happy
माझ्याकडे, वर मी वर्णन केलेल्या एक फुलाचा फोटो आहे. तो मी आज टाकतो इथे. कसले फुल आहे ते माहित नाही. Sad

ते करवंदाएव्हढे फळ फुलातच येते का?
ती फळ अगदी करवंदासारखीच दिसतात का?
एका फुलात ३-४ फळे असतात का?
आणि फुले साधारण ३-४ फूट उंचीच्या झाडाला येतात का?

अगदी तुझ्या कुंडीतच झाड लागल्यासारखे प्रशन विचारतोय्स...

अर्रे दिनेशदा.......काय अचूक नाव टाकलंय माझं! आहेच... म्हणजे माझ्या अंगणात एक चंदनाचे झाड होते. अंगणात फरश्या टाकल्या तेव्हा हे झाड तोडले. थोड्या जागेत लोखंडी जाळी टाकून लुईसाठी एक खोलीवजा पिंजराही केला.
आणि तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे च त्याला पाने फुले होती.
>>>>>>>>>>>>>> फूलात नाही येत. सूटे सुटेच येते. याचा गुच्छ साधारण मेंदीच्या तूर्‍याची आठवण करुन देतो फूले अगदीच छोटी. ३ ते ४ मीमी चीच असतात. फळे मात्र करवंदाएवढीच असतात.>>>>>>>>>>
तर आता या चंदनाचे बुंधे अंगणाच्या एका कोपर्‍यात उभे करून ठेवले आहेत.
चंदन घरात असेल तर त्यांची नोंद करावी लागते वगैरे ऐकलं त्यामुळे कित्येक वर्षं हे बुंधे तसेच आहेत.
आणि तुम्ही म्हणता तसं ६० वर्षं नाही झालेली त्याला. आणि वासही काही खास नाही. पण ३०/३५ वर्षं नक्की झाली असतील. म्हणजे झाडाचं वय.

अगदी तुझ्या कुंडीतच झाड लागल्यासारखे प्रशन विचारतोय्स...>>>>>>कुंडीत नाही पण याच वर्णनाचे फुल पाहिले. घरी गेल्यावर टाकतो फोटो. विजयजींना पण दाखवले ते झाड पण त्यांनाही नाही ओळखता आले.
नाहीतर बहुतेक ते शोभेचे झाड असावे Happy

>> चंदन घरात असेल तर त्यांची नोंद करावी लागते वगैरे ऐकलं त्यामुळे कित्येक वर्षं हे बुंधे तसेच आहेत.
>>

हो मी पण हे ऐकलय. ते झाड तोडले तर पोलिस केस होते असेही ऐकलय.

मला वाटते सर्वच चंदनाची झाडे आपोआप सरकारी मालकिची होतात. (आणि मग ती वीरप्पनच्या मालकीची होत असत.) मी ज्या झाडाचा फोटो काढला होता, ते आता गायब झालय. निदान अलिकडे कोल्हापूरात गेलो त्यावेळी जागेवर दिसले नाही एवढे खरे.

जिप्स्या माझ्या शेतावर चन्दनाचे झाड आहे. गावी देखील चंदनाची झाडे आहेत. दिनेशदानी सांगीतल्या प्रमाणे ६० वर्षानी खोडापासून चंदन मिळते. ते देखील गाभ्यातून. शीवाय चंदनाच्या झाडाला अन्नासाठी दूसर्या झाडावर अवलंबून रहावे लागते. तूर, बारतोंडी सारखी झाडे आजूबाजूला लागतात. झाड कापताना पोलीस परवाना लागतो. झाड लावल्यानंतर ७/१२ वर नोंद असावी म्हणजे पूढे कटकटी होत नाहीत.
मी या सूट्टीत फणसाड अभयारण्यात जाऊन आलो.
काल राणीच्या बागेत गेलो होतो. राणिच्या बागेचे सूपरीटेन्डेन्ट सोबत आले होते. त्यानी जून मधे मला झाडे द्यायचे कबूल केले आहे. तू फोटो काढलेल्या पांढ्र्या बहाव्याला अध्याप तेवढा बहर आला नाहीय.
(तशी २ झाडे आहेत). या झाडांना अध्याप शेंगा धरत नाहीत. मला तूझी खूप आठ्वण आली.

विजय, मी पण मागे तिथल्या प्रमुख सुरक्षा अधिकर्‍याला घेऊन फिरलो होतो. तिथल्या बंगल्याच्या आवारातल्या उर्वशीला मस्त बहर आला होता. तो म्हणाला, कि रोज इथे ड्यूटी करतो, पण या झाडाकडे कधी लक्षच गेले नाही.

पनवेलला, गार्डन हॉटेलच्या गल्लीत, पुर्वी यू टी आय बँक होती. आता अ‍ॅक्सिस बँक असेल, तिच्या आवारात एक वेगळा बहावा बघितला होता. रंगाने पिवळाच पण फुलांचा आकार वेगळा. तिथल्याच रेशीमगाठी लग्नाच्या हॉलसमोर, एक मोठा वाढलेला मोह आहे. भरभरुन फुलतो तो.

दिनेशदा आमच्या बदलापूरला मोहाची झाडे बक्क्ळ. माझ्या शेतात पण आहेत. तीथे ही झाडे लावावी लागत नाहीत. आम्हाला काढून फेकून ध्यावी लागतात.

Pages