निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, जिप्सी,
हा अंबोलीला काढलेला अंजन फूलांचा फोटो.

याचे शास्रीय नाव Memecylan umbellatum याची पुढची अवस्था म्हणजे साधनाने वर दिलाय तो फोटो.
जिप्स्याच्या फोटोतली फूले जरा वेगळी दिसताहेत ना ? मला वाटते ती फूले, Memecylon malabaricum ची वाटताहेत. दोन्हीचे कूळ एकच असले तरी फरक नक्कीच आहे.

अंजनवृक्षाचे फोटो सुंदर आहेत. याच्या पानांच्या अर्कावर संशोध सुरू आहे. डायबेटिक उंदरांवर प्रयोग केले असता त्यांची सीरम ग्लुकोज पातळी कमी झाल्याचं आढळलंय.

मृण्मयी, अंजनाचा काही उपयोग आहे हे कळले तर चांगलेच होईल..

अंजनाबद्दल माहिती शोधत असताना खालिल लिंक सापडली.

http://botanical.com/site/column_poudhia/402_anjan.html

http://www.biotik.org/ - ही साईटही मस्त आहे. इथे भारतातल्या आणि पश्चिम घाटातल्या झाडांची माहिती आहे. पण मराठीतली नावे दिलेली नाहीत Sad दाक्षिणी नावे आहेत.

मला आंबोलीतली झाडे Memecylon lushingtonii ह्या जातीची वाटताहेत. मला काही झाडांची पाने टोकाला जराशी विभागलेली आढळली. आंबोलीत फक्त एकाच प्रकारच्या अंजनीची झाडे नसुन दोन्-तिन जाती एकत्र आहेत असे वाटतेय.

जिप्स्याच्या फोटोतली फूले जरा वेगळी दिसताहेत ना
फुले, पाने, फुलांचे देठ सगळेच वेगळे आहे. मुंबईतल्या अंजनाची पाने लांबट आणि टोकदार आहेत, आंबोलीतली पाने गोलट आहेत.

anjan1.jpganjan3.jpg

सगळ्या झाडांवर इतकी मोठी फळे अजुन धरली नाहीत. फार थोड्या झाडांवर आढळली.
anjan2.jpg

अंजनाचा गावी काय उप्योग करतात तेही विचारुन घेते आता.

आधीच्या एका पोस्टमध्ये विजयजीनीं सांगितल्या प्रमाणे मला दिसलेले झाड "अंजनी" असावे आणि आंबोलीतले झाड "अंजन". मुंबईतील त्या झाडावर नावदेखील अंजनी असेच होते. दिनेशदांनी जो झाडाचा फोटो टाकला होता ते झाड मोठे होते आणि इकडचे झुडुपासारखे.
"अंजन किंवा अंजनी "नाव काहि असो पण दोन्ही फुलं मात्र एकदम रापचिक Proud

जिप्स्या, तू मागोवा घेशीलच ना, फळे वगैरे पण वेगळी आहेत का, ते कळेल आपल्याला.

सुर्यप्रकाश आणि पाऊस हे सगळे कृत्रिमरित्या उपलब्ध करुन झाडे वाढवण्याचा प्रयोग इथे वाचा.
http://news.yahoo.com/s/ap/eu_netherlands_sunless_farming

साधना, मला जी सफेद मुसळी Chlorophytum borivilianum वाटतेय, तिचा माझ्याकडचा फोटो. हा नीट नाही आलाय, कारण त्या दिवशी धुके होते.
पंकजकडचा स्पष्ट असेल. गंमत म्हणजे हि फुले, तो कडा सोडला तर कुठेच नव्हती. गावात नाहीत, वाटेवर नाहीत. बाकीच्या पॉइंट्सवर पण नाहीत.
पण सफेद मुसळी असेल तर तिला थोडा सुगंध असायला हवा. तसे काही आठवत नाही. पण तिथला भन्नाट वारा, धबधबा, पाऊस, धुके यामूळे तो विरलाही असेल.

हा तिथेच घेतलाय ना? ह्या फोटोत अजुन नीट काय येणार? माझ्या मते अप्रतिम आहे फोटो.. फुले अजुन जरा स्पष्ट येऊ शकली असती.

माझे फोटो शोधावे लागतील आता, कारण मध्ये कॉम्पुटरला काहीतरी झालेले तेव्हा डेटा कॉपी केलेला दुसरीकडे.

आणि फोटो हरवले तर परत काढेन फोटो.... हाय काय नाय काय... आंबोली कुठे पळुन जात नाय आणि मीही आंबोली सोडुन कुठे दुसरीकडे जात नाय... Proud आंबोलीला दुर्मिळ रानवनस्पती खुप आहेत. मी मागे इथे लिहिलेले बहुतेक. एकदा पावसाळ्यात महादेवगडावर गेलेले तेव्हा माझ्यासमोर एक जोडपे त्या टोकावर रॅपलिंग करुन चढुन आले. ते लोक सक्काळीच त्या टोकावरुन दोरी लावुन खाली उतरलेले वनौषधी शोधायला...

दिनेशदांनी जो झाडाचा फोटो टाकला होता ते झाड मोठे होते आणि इकडचे झुडुपासारखे.

आंबोलीतली १०-१५ फुट वाढतात. पक्की झाडेच आहेत ती, झुडपे नाहीत.

मस्तच दिनेशदा.
काल मी बरेच दिवसांनी गाडीने ऑफिसला आलेय तर सगळा रस्ता वेगळाच दिसतोय. सगळीकडे फुलांचा वसंतोत्सव चालु आहे. गुलमोहर रुप बदलु लागलाय. पीतमोहर भरभरुन फुललाय . तामण चे झाड माझ्या घरापासुन २०० मीटरवर आहे हे मला आता कळतेय. बहावा पण मस्त फुललाय. मधुमालतीचा घमघमाट गाडीवरुन जाताना पण जाणवतोय. बोगनवेल, चाफा, टॅबेबुया यांचे तर पुर्ण झाड नुसते फुलांनी भरुन गेलेय. मस्त . फक्त एकच कमी आहे . जॅकरांडा चा बहर मात्र हळुहळु ओसरु लागला आहे. काही ठिकाणी आहे अजुन तर काही ठिकाणी शेंगा आल्या आहेत.

वर जॅकरांडा वाचुन आठवले. मला मुंबईत कुठेही हे झाड दिसले नाही. पण गेल्या आठवड्यात गावी जाताना सातारा ते सांगली ह्या सुवर्णचतुर्भुज रस्त्यावर दुतर्फा ह्याची झाडे दिसली. साता-याला जिथे एक्स्प्रेसवेवरुन प्रवेश आहे तिथले चारमजली झाड तर केवळ फुलांनी भरलेय. सांगलीपर्यंत वेगवेगळी रुपे दिसली, कुठे जरासा बहर, कुठे शेंङा पुर्ण बहरलेला तर कुठे फक्त फुले, पाने नाहीच. पण आश्चर्य म्हणजे साता-याच्या आधी व सांगलीच्या पुढे एकही झाड दिसले नाही. पुण्यातही हे झाड दोन ठिकाणी पाहिले असे मुलीने रिपोर्ट केले.

अजुन काही फुले दिसली.
मला एका फुलाचे नाव हवे होते. कर्दळीच्या कुळातील झाडाला लाल पिवळा मोठा तुरा पिसासारखा, खाली झुकलेला असतो. कोकणात पण अंगणात हे फुल बघितलेय मी. आतापर्यंत मी त्या फुलाचे नाव 'बर्ड ऑफ पॅराडाईझ' समजत होते. पण ते हे नाही. तर याफुलाचे नक्कि नाव काय आहे? तसेच एक अगदी छोटी नाजुक जांभळ्या रंगाचे तुरे असलेले पण झाड होते त्याला आम्ही विष्णुकांता का असेच काही तरी म्हणायचो आता नक्की नाव आठवत नाही.

साधना, पुण्यात खुप आहे जॅकरांडा पण तिथेही असेच. काही ठिकाणी पूर्ण झाड जांभळे होते. तर काही ठिकाणी फक्त शेंडा.

खुप मिस करतेय गप्पा.
साधना, जिप्सि मी शनिवारी डॉ. कैलास ह्यांच्या आरोग्य केंद्रात गेले होते कँपच्या संदर्भात. उरणला २४ तारखेला आम्ही इनरव्हिल क्लबच्या तर्फे डॉक्टरांच्या मार्फत मेडीकल कँप घेणार आहेत.

त्यांच्या समोरही बहावा छान फुलला आहे. डॉ. शी ओळख झाली. प्रभावी व्यक्तिमत्व आहे त्यांच. तिथुन मी नेरूळला गेले तिथुन नणंदेच्या घरी सिवुडसला. तिथे जाताना पाम बिचच्या रोडला मला जकरांदासारखी झाडे फुललेली दिसली. तिच आहेत का ते नक्की कळल नाही. अक्षर अपार्टमेंचच्या जरा आधी. सिवुड्समध्ये घुसल्यावर तर बहाव्याने धुमाकुळच घातलाय. वेळ नव्हता म्हणून फोटो नाही काढता आले.

दिनेशदा, काल व्हिटी ला गेले होते तिथे सुवर्णपत्रीची बरीच झाडे रस्त्याला दिसली.

जिप्सी अरे हेच तर खरे 'बर्ड ऑफ पॅराडाईज' आहे ना? हल्ली बुकेमधे पण असते. मी जे म्हणतीय ते हे नाही . ते खाली लोंबत असते केळफुलासारखे. तेवढेच लांब. पण फुलोरा लाल पिवळा. आणि आकारही वेगळा.

आस, मी या फूलाबद्दल मी सविस्तर लिहिले होते.
झकरांदा आणि पीतमोहोर सारखी जी झाडे बाहेरुन आणलीत ती अजून भारतातल्या ऋतूंना अ‍ॅडजस्ट व्हायची आहेत. त्यामूळे त्यांच्या फूलण्यात एकवाक्यता नाही.
मला भारतात झकरांदाचा सुगंध पण नाही जाणवला. इथे केनयात तो ऑगस्ट मधे फूलायला लागतो.

दादरला, पारसी कॉलनीत फाइव्ह गार्डन मधे एक मोठे फूलणारे बहाव्याचे झाड आहे. तिथेच वाघुळफूलांचे पण झाड आहे.
कोल्हापूरला, रंकाळा तलावाचा जो रिक्षा स्टँड आहे, तिथे पण बहावा भरभरुन फूलतो.
(ही सगळी झाडे मला आजही डोळ्यासमोर दिसतात.)
पण आपल्याकडे झाडे बहरण्याचा काळ मर्यादीत आहे. इथे वेगवेगळ्या ऋतूमधे वेगवेगळी झाडे फूललेली दिसतात. तसे आपल्याकडे असायला हवे होते.

साधना,
अंबोलीहून आजर्‍याकडे जाणारा जो रस्ता आहे, त्यावर पण खुप अनोखी झाडे आहेत. आजर्‍याचे जंगल, फक्त गाडीतूनच बघितलेय आजवर.

ते आस आणि जागू म्हणताहेत त्या झाडाच्या फूलांची रचना बघा. या रचनेतल्या फुलांतला मधुरस केवळ, हमिंग बर्डच पिऊ शकतो. त्यामूळे जर हि फूले जास्त असतील, तर तो पक्षीही तिथे दिसायला हवा.

पण याचा दुसरा पैलू म्हणजे पक्षी कमी.. झाडे कमी.. झाडे कमी.. पक्षी कमी...

अगदी अगदी. मला अशा रस्त्यावरुन जी शाळकरी मूले शाळेत जाताना दिसतात, त्यांच्याबरोबर फेरी मारावीशी वाटते. खुप शिकवतील ती आपल्याला !

पक्षी कमी.. झाडे कमी.. झाडे कमी.. पक्षी कमी...

हे कमी कमी आता खुप जोरजोरात होतेय.. सगळेच नष्ट होतेय.. Sad

रच्याकने, आंबोलीला कुठे गिरिपुष्प बघितला नाही. अर्थात तिथे गरज नाहीय. पण समजा कोणी गाढवाने तिथे जाताना सोबत बीया नेल्या, उधळल्या आणि मग झाडे उगवली तर तिथल्या पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होइल काय? आता तिथल्या जंगलात मी बाओबाब च्या बीया टाकलेल्या पण त्यांचा गिरीपुष्पाइतका प्रसार होत नाही. एक गिरीपुष्प लावले तर दोनचार वर्षात तिथे १० झाडे तयार होतील.

या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो तिथल्य जंगलावर? जिप्स्याने बिया गोळा करुन जंगलात टाकण्याबद्दल लिहिलेय त्यावर विचार करताना हे सगळे डोक्यात आले. मी जंगलात सिताफळे/चिकु/आंबे इ. च्या बिया टाकल्या तरी त्या कितपत रुजतील? मी ज्या बिया टाकेन त्या हायब्रिड असतील बहुतेक, मग जंगलात त्या वाढतील का? आणि अशा वाढु शकल्या असत्या तर आतापावेतो जंगलात ही सगळी झाडेही दिसली असतीच ना? मुळात जंगलात ही झाडे का दिसत नाहीत? जी दिसताहेत ती काही कोणी मुद्दाम लावलेली नाहीत, त्यांचे बीज जंगलांनीच शतकानुशतके जपलेले आहे. मग या झाडांचे का नाही जपले गेले? आपल्याला शहरात मिळतात त्या रुपात नाही तर निदान जंगली रुपात तरी ही झाडे हवी होती तिथे.

आजर्‍याचे जंगल, फक्त गाडीतूनच बघितलेय आजवर.
दिनेशदा,साधना, पुढे जर एखाद गटग तिथेच ठेवलं तर चालेल ना !!
Happy

अशोकच्या झाडाबद्दल छान,भन्नाट माहिती मिळाली, आता त्याला कधी एकदा जवळुन पहातोय असं झालयं
Happy

साधाना, चिकूची वगैरे झी झाडे आपण बघतो, ती मानवाने विकसित केलेल्या प्रजातीपैकी आहेत. निसर्गात फळात एवढी साखर नसते कधी. आपण पाळतो तो कुत्रा आता मानवाच्या सोबतीशिवाय जगूच शकणार नाही.
प्रत्येक जमिनीचा कस वेगळा असतो. त्या हवामानत जगणारी झाडेच तिथे जगू शकतात. त्यापेक्षा कठिण परिस्थितीत जगणारी झाडे तिथे तग धरतील, कदाचित जास्तच फोफावतील.
अगदी तूझ्या डेझर्ट रोझचेच उदाहरण बघ. मी वाळवंटात जी झाडे बघितली, त्यावर एकही पान नव्हते. पण तूम्ही घरात लावल्यावर त्याला भरपुर पाने फूटली.
बाहेरून आणलेली ऑस्ट्रेलियन बाभूळ इथे भराभर वाढली पण तिच्यात जोम नव्हता. इथल्या झकरांदाला तिथे गेल्यावर फूलायचे कसे आणि कधी तेच कळेनासे झालेय.
झाडाच्या अनेक पिढ्या खर्च झाल्यावर, तिथल्या भौगोलिक परिस्थितीशी जूळवून घेण्याचे तंत्र त्यांना जमते. मग तिथे तिच झाडे जगू शकतात. त्यामूळे जंगलात जी झाडे आधीच आहेत, तिच लावायला हवीत.
अंबोलीला जंगलात मला पेरुची झाडे दिसली होती. पेरुही लागले होते पण ते आकाराने अगदी छोटे आणि बियांनी भरलेले. आपण खातो ते पेरु असतात भरपूर गरांनी भरलेले, जंगलात तितक्या गराची गरज नसते. पोपट गर खात नाही तर केवळ बियाच खातो.
बाओबाबच्या बिया मी दिल्या खर्‍या, पण इथले उष्ण हवामान तिथे नसल्याने, तिथे रुजायची शक्यता फार कमी, इथे त्यांची वने असतात, भारतात मात्र ती एकटीदुकटीच सापडतात.

Pages