Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विजयजी, खुप धन्यवाद या
विजयजी, खुप धन्यवाद या माहितीसाठी.
या सह्याद्री सूंदरीला अजंनी म्हणावे>>>>> "सह्याद्री सुंदरी अंजनी" सुरेख नाव.
आपल्या आधीच्या पिढीत, झाडे
आपल्या आधीच्या पिढीत, झाडे लावायची ती पुढच्या पिढीसाठी हा विचार होता. त्या काळात कलमी झाडे नव्हती, त्यामूळे ती झाडे सावकाश वाढायची, आणि अनेक वर्षे जगायची
दिनेशदा,
खरचं सही ...आणि हे असे अनमोल विचार तुमच्याकडुन ऐकायला मिळतात !
आता मात्र झटपट,फास्ट,इन्स्टंट,फटाफट, रेडीमेड कढे ओढा वाढत चालला आहे ..
कोल्हापुरातली रस्त्यावरची गर्द झाडी इथे पुण्यातल्या उन्हाळ्यात तर मला खुप आठवते
विजय, मस्त माहिती. हे झाड तसे
विजय, मस्त माहिती. हे झाड तसे लहानखूरेच असते. मी फोटो दिलाय त्यापेक्षा उंच झाड मी बघितलेले नाही.
पण तो अंजन आणि आळंदीचा अजानवृक्ष एकच का ?
बरीच चर्चा होत आहे. आणि मी
बरीच चर्चा होत आहे. आणि मी प्रत्यक्श चर्चेला मुकत आहे. आज घरीच आहे बरच काही लिहायच आहे पण घरचा किबोर्ड खराब झाल्याने जमेल तेवढ लिहीण्याचा प्रयत्न करतेय.
दिनेशदा, अजानवृक्ष वेगळा.
दिनेशदा,
अजानवृक्ष वेगळा. अंजन ची लिन्क देतो.
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Anjan.html
आज मी परत त्या अंजनी कडे गेलो होतो. तेथे रांगेने अंजनी ची झाडे लावली आहेत. त्यातील एकावर अंजनी चा फलक होता.
हा दिल्लीलाच बघितला होता.
हा दिल्लीलाच बघितला होता. नगरला ते मोठे श्री दत्तगुरुंचे देऊळ आहे, त्याच्या बाजूला खास अजानवृक्षाची बाग आहे. आणि आळंदीला माऊलींच्या समाधीपाशी आहे, त्याची पाने सर्वजण सारखी तोडून नेत असतात. मी पण तोडले होते ...
हे पण इथल्या एका डोंगरावर
हे पण इथल्या एका डोंगरावर दिसलेले झाड. नाव वगैरे माहित नाही, पण आपल्या पांगार्याच्याच कूळातले असावे.
लांबून जरा वेगळे वाटेल, पण जरा फूलोरा बघा.
शेंगा पण पांगार्यासारख्याच. (चटका बसतो का ते बघितले नाही )
मागे असुदे (बागुलबुवा) ने
मागे असुदे (बागुलबुवा) ने लिहिले होते. निसर्ग म्हणजे फक्त झाडे नव्हेत.
बरोबर आहे.
मला इथे बरेच पक्षी दिसतात. पण ते इतके भिरभिरे असतात, कि फ़ोटो काढणे
अशक्यच असते. शिवाय हातात कॅमेरापण नसतो. (त्यामानाने फूले शहाणी, अगदी
घरी जाऊन कॅमेरा घेऊन येतो, सांगितले तरी, एकाजागी गुपचुप उभी राहतात.)
हा मात्र बाल्कनीच्या समोरच होता. मी फ़ोटो काढतोय, ते आवडलेले नव्हते बहुतेक !!
दिनेशदा, कसला भन्नाट आलाय
दिनेशदा, कसला भन्नाट आलाय फोटो.
मस्तच!!!
या पक्ष्याचे नाव काय बरं,
या पक्ष्याचे नाव काय बरं, रागावलेल्या...? फोटो मात्र मस्तच.
जिप्स्या तूझा तामणाचा फोटो
जिप्स्या तूझा तामणाचा फोटो खूपच छान आला आहे. तामण आपला राज्य पुष्प आहे. तूझा प्रची पाहून ज्याला हे माहीत नाही त्याला देखील खूप आनंद होईल, इतक छान फूल आपल राज्य पुष्प आहे हे पाहून.
तामणाला लेगर्स्त्रोमिया स्पेसिओसा असे म्हणतात. तू जी दूसरी प्रची २३,२४ दिली आहेस त्याला लेगर्स्त्रोमिया ईंडिका म्हणतात्. याच्या ३ प्रजाती आहेत. पांढरा, गूलाबी आणि जांभळा. हि तामणाची छोटी भावंडे आहेत. तामण ऊंच वाढतो. ही भावंडे १०ते १२ फूट वाढ्तात व पसरतात.
तूला पाचूंदा आणि वरूण यातला फरक कळावा म्हणून त्यांचे प्रचि देत आहे.
पाचूंदा
वरूण
जिप्स्या तूझ्या कामाच्या
जिप्स्या
तूझ्या कामाच्या ठिकाणी डि मार्ट च्या नाक्यावर तीन चार भेरले माड बहरून आले आहेत. त्यांचे प्रची काढ.
नविन वर्षाच्या शूभेच्छा.
uju आणि निकिता साठी माहीम चा
uju आणि निकिता साठी माहीम चा पत्ता.
कल्पतरू गांडूळ खत निर्मिती, प्रकाश दांडेकर,
दांडेकर निवास,
५८८/८९ एल्.जे.क्रॉस रोड-१,
सेंट मायकल चर्च मागे,
माहीम,
मुंबई-४०००१६
फोन. २४४४०३९१,९८२०७८४२९१
(No subject)
विजय, हा फरक आता स्पष्ट झाला.
विजय, हा फरक आता स्पष्ट झाला. वरुण जास्त फेमस आहे. उत्तरेकडे पण आहे तो, असे वाचले. तिथे त्याला बरुन म्हणतात.
माझ्या आजोळी, पाच पुरणपोळ्यांना पण पाचुंदा म्हणतात. तेवढ्या वाढणार्या बायका आणि तेवढे खाणारे पुरुष पण होते.
विजय, आता आठवले ते वरच्या
विजय, आता आठवले ते वरच्या फोटोतले पांढरे फूल आहे, ते मी चोर्ला घाटात बघितले होते. (फोटो असणार माझ्याकडे ) पण त्याचे पुंकेसर भरगच्च होते.
केपर्स नावाचे एक कळे, इतालियान जेवणात वापरतात, त्याची फुले पण अशीच असतात. तेच कि काय हे, कारण ते कळे पण असेच असतात.
शशांक, तो पक्षी म्हणजे आफ्रिकन स्पेकल्ड पीजन. पण आपल्याकडे दिसते असे वाटते. आपल्याकडे चष्मेवाले कबूतर म्हणतात, बहुतेक.
विजयजी माहितीबद्द्ल
विजयजी माहितीबद्द्ल धन्स.
माझ्या बिंल्डिंगच्या समोरच्या बाजूलाच एक पार्क आहे. त्यात दोन जांभळे तामण व तीन बहाव्याची झाडे आहेत.अजून फूलले नाहियेत, आत्त्ताशी बहर यायला सूरवात झाली आहे.
माझा उन्हाळा फार सूसह्य करतात हि झाड.
माझ्या आजोळी, पाच
माझ्या आजोळी, पाच पुरणपोळ्यांना पण पाचुंदा म्हणतात. तेवढ्या वाढणार्या बायका आणि तेवढे खाणारे पुरुष पण होते.
दिनेशदा,
अनुमोदन !
पाचवरुन संख्या आता १-२ वर आली आहे असं म्हणता येईल, खाल्ल तरी पचवायची ताकत कुठुन आणणार ? माणुस निसर्गापासुन दुर चालला आहे निसर्गाचे नियम मोडत आहे,हेदेखील एक कारण नक्कीच म्हणता येईल .
ह्या पाचु.न्द्याच काय करतात ?
ह्या पाचु.न्द्याच काय करतात ? आमच्या एरीयातील गार्डनमध्ये मी हे झाड पाहील आहे.
मला तामण ची लि.न्क द्या प्लिज.
दिसला तामण. त्याला आम्ही
दिसला तामण. त्याला आम्ही खोबर्याची फुले म्हणतो. कारण खरवडलेल्या खोबर्याप्रमाणे त्याच्या पाकळ्या दिसतात.
विजय, हे मला एका घाटात
विजय, हे मला एका घाटात दिसलेले फूल.
वा त्या पक्ष्याचा फोटो मस्तच
वा त्या पक्ष्याचा फोटो मस्तच दिनेशजी
पाचुंदा मी टिपलेला
सचिन हे कुठे दिसले ? तूझ्या,
सचिन हे कुठे दिसले ? तूझ्या, विजयच्या आणि माझ्या फोटोत कितीतरी फरक आहे !
तूझ्या, विजयच्या आणि माझ्या
तूझ्या, विजयच्या आणि माझ्या फोटोत कितीतरी फरक आहे !<<<
हे मी भुदरगडावर टिपले कोल्हापुर ट्रेक च्या वेळेस
वाघाटी ची फुले पण अशीच दिसतात ना ?? त्यात आणि ह्यात काय फरक आहे,
वाघाटी
म्हणजे, मला दिसलेले ते
म्हणजे, मला दिसलेले ते वाघाटीचे तर. याच्या फळाचा फोटो जागूने दिला होता. त्याची भाजी करतात.
मंडळी नमस्ते ! हा माझा
मंडळी नमस्ते !
हा माझा (मित्राच्या मोबाईलवरुन काढलेला) माबोवरचा पहिला फोटो ...
मला याच नाव माहित नाही,आमच्या कैंम्पसमध्ये आहे,आज त्याची माझ्याशी गाठ पडली, तब्बल २ वर्षांनी !
जाणकार नक्कीच नाव सुचवतील अशी आशा करतो !
(नाव ठेवलीत तरी उत्तमच ! :हाहा:)
फोटो तू टाकलायस ना, मग नावं
फोटो तू टाकलायस ना, मग नावं पण तूच ठेवायचीस !!
अनिल हा कॅकटस चा प्रकार
अनिल हा कॅकटस चा प्रकार वाटतोय.
दिनेशदा, हे खास तुमच्यासाठी.
दिनेशदा, हे खास तुमच्यासाठी. पक्ष्यांची नॉर्मल घरटी खूप बघितली होती पण हे मातीपासून बांधलेले घरटे पहिल्यांदा पाहिले. आधी मला ते कुंभारमाशीचे घरटे वाटलेले पण आतून चक्क पक्षीण बाहेर आली तेव्हा दचकलोच.
बागुलबुवा ते घरटे पंकोळी
बागुलबुवा ते घरटे पंकोळी (swallow) चे असावे.
Pages