Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=jqxENMKaeCU
वरच्या लिंकवर होम, हा नितांतसुंदर माहितीपट आहे. दिड तासाचा आहे, तूमच्या कनेक्शनचा स्पीड किती आहे त्यावर डाऊनलोड टाईम ठरेल. पण रात्री सुरु करुन, सकाळी बघितलात तरी चालेल. पण बघाच.
अरे मी सकाळी येतानाच विचार
अरे मी सकाळी येतानाच विचार करत होते इथे टाकायचे म्हणुन. चला मंडळी हात करा वर फटाफट.. जागूला परत लाँचप्रवास झेपणार आहे का???
दिनेश तुम्ही तिकीट काढा लगेच,
दिनेश तुम्ही तिकीट काढा लगेच, सकाळी ५ ला उतरा सांताक्रुझला,स. ९ वाजता बागेत, १ वाजता न्युयॉर्कर आणि ५ वाजता परतीचे फ्लाईट..... (किती संक्षिप्त इटि... )
तोपर्यंत मी होम बघुन ठेवते. तेव्हा डिस्कसुया.
डॉक,सचिन , निसर्गा पुढे
डॉक,सचिन ,
निसर्गा पुढे कोणाचे चालते का कधी,>>>> निसर्गापुढे, मी तर किस झाड कि पत्ती !
जिप्सी,
यायची इच्छा तर आहेच ,बघु !
नाहीतर पुढच्या वेळी आम्ही पुणेकर पुण्यात एक राणीची बाग उभी करु ...
पण रात्री सुरु करुन, सकाळी
पण रात्री सुरु करुन, सकाळी बघितलात तरी चालेल. पण बघाच.


दिनेशदा,
ऑफीसमध्ये युट्युब येत नाही,घरी नेट नाही,आता मी बाहेर बघेन येत्या शुक्रवारी ..!
साधना, दिनेशदा सुपरमैन सारखे काही तासात बागेत हजर झाले तर ....!
जागूला परत लाँचप्रवास झेपणार
जागूला परत लाँचप्रवास झेपणार आहे का???
अजुन हात पाय धडधाकट आहेत हो माझे.
अनिल ये हुई ना
अनिल ये हुई ना बात..
रच्याकने, मी हल्लीच राणीबागेबद्दल पेपरात वाचले. म्युन्सिपालिटीने दिलेले प्रपोजल कुठल्यातरी टिमने परत नाकारले. ही टिम बहुतेक राणी बाग रिस्ट्रक्चरिंगचे काम करणारे. त्यांनी राणीबागेतल्या प्राण्यांच्या पिंज-यात असलेल्या झाडांवर जोरदार आक्षेप घेतलेत. मला तर आश्चर्य वाटले हे वाचुन. प्राण्यांच्या पिंज-यात झाडे का नको? झाडांमुळे प्राण्यांना जंगलाचा फिल नाही का येणार? मला तर आता राणीबागेतल्या झाडांची कत्तल होतेय की काय अशी भिती वाटायला लागली. एका थाई कंपनीची टिम आहे.
अगं पण तु काय आमच्यासार्खी
अगं पण तु काय आमच्यासार्खी मोकळी थोडीच आहेस?? एक आदर्श गृहिणी, शिवाय रोटरी क्लबची सेक्रेटरी. तुला थोडेच जमणार दरवेळी आम्ही हाळी दिली की धावत सुटायला?????
कोबी किंवा अलकोलचे बी कुठे
कोबी किंवा अलकोलचे बी कुठे मिळेल. कुंडीत लावायचा आहे
भायखळ्याला राणीबागेसमोरच्या
भायखळ्याला राणीबागेसमोरच्या दुकानांमध्ये नक्की मिळेल. तु ये ना रविवारी राणीबागेत.
रोटरी नाही ग इनरव्हील, रोटरीत
रोटरी नाही ग इनरव्हील, रोटरीत आहो आहेत. कटवतेयस काय ? तशीही नाही येणार ग.
कटवणारच ना.... तु राणीबागेत
कटवणारच ना.... तु राणीबागेत आलीस तर मग संध्याकाळी मासे कोण तळून ठेवेल माझ्यासाठी?? तिकडुन थेट तुझ्याकडे येणार आहे
आहो रोटरीत आहेत म्हणजे तुझा अर्धा पाय तिकडे. जिकडे आहो जातात तिकडे तुलाही जावे लागतेच ना...
हो मोठे प्रोग्रॅम विथ फॅमिलीच
हो मोठे प्रोग्रॅम विथ फॅमिलीच असतात.
नक्की येतेयस का ? काय बनवुन ठेउ सांग.
मग आपणच जाऊ या जागूकडे, उरणला
मग आपणच जाऊ या जागूकडे, उरणला ! निसर्ग आहेच, जागूही आहे.
आता कुठे २ महिने होताहेत मला येऊन. वेळ आहे अजून.
अनिल, पहिल्या ५ मिनिटातच हा चित्रपट मनाची पकड घेतो.
दिनेशदा नक्कीच या.
दिनेशदा नक्कीच या.
मी नाही येउ शकणार. मुलगी लहान
मी नाही येउ शकणार. मुलगी लहान आहे माझी. आणी आता उन खुप असतं
रच्याकने, माझा नर्सरीवाला
रच्याकने,
माझा नर्सरीवाला अगदी अंत पाहतोय. मागच्यावेळी वांग म्हणुन टोमॅटोच्या बिया दिल्या. आणी ह्यावेळी गवार म्हणुन मुळा.
मला फारश्या बिया ओळखता येत नाही.सगळा आनंद आहे
निकिता मुळ्याच्या बिया
निकिता मुळ्याच्या बिया राईसारख्या असतात.
गरम हवेत कोबी, अलकोल होत नाहीत ग. थंडीत येतात.
हि उंदिरमारीची फूल आहेत
हि उंदिरमारीची फूल आहेत का?


मी मागच्यामहिन्यात जेजूरीला गेले होते तेव्हा तिथे हे झाड फूललेले दिसले.
>> मागच्यावेळी वांग म्हणुन
>> मागच्यावेळी वांग म्हणुन टोमॅटोच्या बिया दिल्या. आणी ह्यावेळी गवार म्हणुन मुळा.>>
तुला कसं कळलं टोमॅटो आणि मुळ्याच्या बिया आहेत, म्हणून?
उजु उंदिरमारीच आहे ही.
उजु उंदिरमारीच आहे ही.
जागू धन्स ग
जागू धन्स ग सांगितल्याबद्द्ल.
कोणी बूचाच्या झाडाचा फोटो टाकू शकेल का?
मला फार बघायचे आहे बूचाचे झाड व फूल.
झाडाला टोमॅटो आले. आमच्या
झाडाला टोमॅटो आले. आमच्या काकु सांगत होत्या वांग नाही टोमॅटो आहे. पण फळ येइपर्यंत मी ठाम होते. वांग्याचं रोप आधी बघितलं नव्ह्त.
आणी आता मुळे आलेत. पाल्यची भाजी करुन खाल्ली
पालकाच्या पण बिया दिल्या आहेत. त्या लावुन बघायचं आहे काय उगवत..
घरी भाजी साठी आणतो त्या वांग्याच्या बिया लावल्या तर झाडं येतील का?
निकिता पुर्ण तयार झालेल्या
निकिता पुर्ण तयार झालेल्या वांग्याच्या लागतील कोवळ्या वांग्याच्या नाही लागणार.
माझ्या कडे असलेल्या बियांचे फोटो टाकेन मी ओळखण्यासाठी.
उजू, हा बघ गुगलवरून घेतलाय.
उजू, हा बघ गुगलवरून घेतलाय.

दिनेशदा, भारतात येणार आहेत
दिनेशदा, भारतात येणार आहेत का? कधी?
निकिता, पालकाच्या बिया
निकिता, पालकाच्या बिया चारधारी असतात.
टोमॅटो आणि वांगी यांच्या बिया सारख्याच दिसतात.
प्रज्ञा, वेळ आहे अजून, तारिख ठरली कि सांगिनच इथे.
उजु उंदिरमारीच आहे ही.<<
उजु उंदिरमारीच आहे ही.<< दिनेशदा हे गिरीपुष्प नां
आहाहा ही बुचाची फुल पाहीली की
आहाहा ही बुचाची फुल पाहीली की बालपणीच्या आठवणी ओल्या होतात.
हो सचिन तेच ते. दोन्ही
हो सचिन तेच ते. दोन्ही एकच.
जागू, याचा पण दोर्याशिवाय गजरा होतो. (गुलबक्षी, मधूमालती सारखाच !!)
Pages