निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा म्हणजे चालतं,बोलतं ज्ञानाच भंडार आहे.कुठलिही माहिती द्यायला ते तत्पर असतात्.त्यांच्यामुळे अनेक शिष्यही तयार झालेत. निसर्गप्रेमी मंडळिंची संख्याहि वाढत आहे.

दिनेशदा, आत्ताच मेटोको (२५९०) वर तुमचे सल्ले वाचून आलो.

इकडे आणि तिकडे (आणि सगळीकडे) दिलेल्या सल्ल्यांमुळे तूम्हाला (हाडवैद्यच्या चालीवर) झाडवैद्य ही पदवी देण्यात येत आहे.... (रेकग्नाईझ्ड बाय 'अमित' ऑफ ईंडिया) Wink

जोक्स अपार्ट. सल्ल्यांबद्दल मनापासून आभारी आहोत.

असुदे, मला फार पुर्वीच, मायबोलीकरांनी "झाडबाबा" हि पदवी दिली होती. तिच जास्त आवडते.

साधना/ चातक, मला खायचा खूप मोह झाला होता हि फळे, पण भाभीने टोकले. पण फळे कडक होती.
(काहितरी खायचेच म्हणून कॉफीची कच्ची आणि पिकलेली फळे खाल्ली. "तरतरी" आली.)

दिनेशदा मारूती चित्तमपल्लींच्या पुस्तकात करमळाला रानकेळी हे दुसर नाव आहे. ती फळे खातात का ?

झाडबाबा<< दिनेशदा महीमंड्णगडचा ट्रेक लक्षात आहे म्हणायचा
मस्त धमाल केली होती

सचिन... Happy काढा रे परत तसले ट्रेक, आता त्याला ट्रेक म्हणायचे की पिकनीक हे तज्ज्ञांवर सोडू... Happy

पण सोबत पक्षीबाई भेटणार का परत?? Wink

जागू, रानकेळी वेगळी असतात. त्यांना चवई म्हणतात, त्याचे केळफूल मोठे असते, त्याची भाजी करतात. रानकेळी पण चवीला छान असतात, पण त्यात मोठ्या बिया असतात. माकडांना ती अतिप्रिय असतात, त्यामूळे त्यांच्या तावडीतून ती बचावत नाहीत.

हो रे, परत काढू या तसा ट्र्क कम पिकनिक..

ट्र्क कम पिकनिक..<< ट्रेक नाही झाला तरी चालेल पण तुमच्या बरोबर निसर्गात भटकंती करायची आहे, पण ट्रेक ला नकार मात्र नाहीये.

दिनेशदा मी कालच वाचले केशराचा पाउस पुस्तक. त्यात मारुती चित्तमपल्ली यांनी रानकेळी (करमळ) असा उल्लेख केला आहे.

जागू केशरांचा पाऊस म्हणजे त्यांचे ललित पुस्तक ना ? तेच वाचायचे राहिलेय.
करमळ म्हणजे पाचधारी पोपटी फळे असतात ती (स्टारफ्रुट) आणि मोठी करमळ म्हणजे आपण राणीच्या बागेत मोठ्या फळांचे झाड बघितले ते, त्यापैकी नेमके कुठले म्हणताहेत ते, कळत नाही.

शिवाय रानकेळी, म्हणताहेत म्हणजे केळी, कर्दळीच्या कूळातलेच असणार. (म्हणजे हि दोन्ही नाहीत)

साधना / सचिन नक्किच कळवीन यायच्या आधी.

अरे हो, विचारायचं होतं. कुणाकडे मनिप्लांटचा मोठा वाढलेला वेल आहे का ? भारतात त्याला फळ आलेले बघितलेय का ? मी काल मनिप्लांटचे फळ खाल्ले.
मग सविस्तर लिहिनच, पण भारतत कुणी बघितलेय / खाल्लेय का ते सांगा.

दिनेशदा मनिप्लांट माझ्याकडे आहे पण मी कधी फळ नाही पाहीले.

मी गुरुवारी पेणला गेले होते. तेथिल एका डोंगरावर जाण्याचा योग आला आणि मला इतका आनंद झाला कारण बुधवारीच मी इथे उक्षिची फुल पाहीली आणि मी कधी पाहिलीनसल्याचे म्हटले. पण त्या डोंगरात उक्षीचा भरपुर बहर आला होता. भरपुर उक्षी आहे पेण च्या रस्त्या रस्त्यालाही. सगळी फुलली होती. मोठे मोठे वेलही होते.
ukshi.JPGukshi1.JPG

एक दोन दिवसात लिहितो. पोताला अननसासारखे आणि चवीला साधारण फणसासारखे लागते. इथे केवड्याचे फळ पण खातात. ते दिसायला आणि चवीलाही, अननसासारखेच लागते.

मी ते गणपतिपूळ्याला (प्रदक्षिणेच्या मार्गावर) आणि अंबोलीला (कावळेसादला जाताना जी नदी ओलांडावी लागते, त्या नदीच्या पात्रात ) बघितले होते.

अरे नुसते झाडच काय घेऊन बसलाय? आआपा चे काय? तिथे पाकवैद्य ही पदवीही द्यावी लागेल >>>साधने, अग, आणि गाण्यात पण यांचा नंबर पहिलाच असतो. मला वाटत हे प्रत्येक क्षेत्रात तरबेज आहेत, तर यांना 'सर्व गुण संपन्न' किंवा सर्वश्रेष्ठ अशीच पदवी द्यावी लागेल. Lol

हो गं शोभा, गाण्याचे विसरलेच..

केवड्याला फळ लागत असेल असे मलाही वाटते. केवडाही अननसासारखाच ब्रोमेलिआड फॅमिलीतलाच ना.

कावळेसादला पाहिलेत? तिथल्या पात्रात उतरु नका कधी. तिथे मगरी आहेत. मागे एकजण सापडलेला त्यांच्या तावडीत. तसेही तिथले हिरवेगार पाणी पाहुन उतरण्याची हिम्मत होणार नाही कोणाचीही. हिरण्यकेशीच्याला जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरुन आत वळलो की थोड्या पुढेही एक केवडेबन आहे, तुम्हाला माहित आहे. तिथला फक्त वास घेतलाय मी उन्हाळ्यात. त्या बनात मोठमोठे साप आहेत असा गावात समज आहे. फक्त एकाच फॅमिलीतले लोक तिथे जाऊ शकतात असा त्यांचा समज आहे. मला एकदा जायचेय तिथे पण....

जागु मस्त गं..... बघ इथले वाचुन आपला निसर्ग अजुन ओळखीचा व्हायला लागला.

साधना, तो सपाट बिनकठड्याचा पूल आहे ना, तिथे बघितले होते. झाडावर फूल टिकले तर फळ धरणार ना !
पण आंबोलीत इतक्या उंचीवर केवडा आहे हे एक नवल आहे. हे झाड समुद्रकिनार्‍यावरचे. त्याच्या खोडाचे, इतर तिवरांच्या झाडाशी असणारे साम्य नक्कीच लक्षात आले असेल. जिथे खाडीचा भाग असतो, तिथे पाण्याची पातळी दिवसातून दोनदा कमीजास्त होते. त्यामुळे त्या भागातली खोडे, मुळांचेही काम करतात.

या झाडांचा तो भाग, अर्धा दिवस पाण्यात असतो, तर अर्धा दिवस वर असतो. त्या भागात पाने नसतात.
या झाडांना दिवसातून दोनदा खारट पाण्यांचा सामना करावा लागतो. रसायनशास्त्राचा एक नियम माहित असेल, कि दोन वेगवेगळ्या संपृक्ततेचे द्राव एकमेकांचा संपर्कात आले, कि त्यांच्यातील विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण, समपातळीवर यायचा प्रयत्न करते. समुद्रातले खारे पाणी आणि झाडातले साधे पाणी यांच्यातही असेच होते. यावर या झाडांनी अनेक उपाय शोधलेले असतात. काही झाडे मीठ झाडात शिरणार नाही अशी व्यवस्था करतात तर काही झाडे, जास्तीचे मीठ पानावाटे बाहेर टाकतात.
या भागातल्या काही झाडांच्या पानांवर मीठाचे थर असतात.

माचोळ नावाची एक रानभाजी असते. ती समुद्रकिनार्‍यालगतच उगवते. पाने सुरुच्या पानासारखीच असतात. ती पण अशीच खारट असते. त्या भाजीत मीठ घालावे लागत नाही.
(शिवाय तिचा स्वाद माश्यासारखाच असतो. जागू/ साधना ऐकताय ना ?)

शिवाय तिचा स्वाद माश्यासारखाच असतो. जागू/ साधना ऐकताय ना
माचोळबद्दल ऐकलेय.. पण मासे ते मासेच.. उगाच दुधाही तहान ताकावर भागवणा-यातले आम्ही नाही हो.... Happy

तो बिनकठड्याचा पुल लै डेंजरस आहे. गेल्याच्या गेल्या वर्षी तिथे दारू पिऊन झुलत सुमो चालवणारे तिघे आत गेले. दुस-या दिवशी बॉडीज काढाव्या लागल्या. तिथे रहदारीही जवळजवळ शुन्य आहे. कोणी आत गेले तरी लोकांना कळत नाही.

रच्याकने, आंबोलीला अपघात होण्याचे प्रमाण खुप आहे.गेल्या वर्षी मी मार्चमध्ये गेलेले तेव्हा दोन दिवसांपुर्वीच नांगरतास धबधब्यात बेळगावचा एक डॉक्टर पाय घसरुन पडुन गेलेला, आतुन त्याला काढायला रॅपलिंग करणारे एक्पर्ट बोलवावे लागले. Sad आता तो धबधबा लांबुन बघितला की इतकी भिती वाटते, अशा वेळी त्याच्या वरच्या बाजुला जायचा गाढवपणा लोक का करतात? आम्ही तिथे उभे राहुन ह्या गप्पा मारत असतानाच एक गोवन कुटूंब तिथे आले आणि परत तोच गाढवपणा करायला लागले. सोबत लहान मुलेही. मी त्यांना चांगलेच झापले. तिथला कठडा जरासा तुटलेला तर लोक लगेच त्याचा उप्योग करुन मृत्युच्या दारात पाय टाकायला लागले. पुढच्या वेळेस तिथे गेलेले तेव्हा कठडा दुरूस्त केलेला होता.

दिनेशदा मी अशिच समुद्रातली भाजी दिली होती मागे घोळीच्या पानंसारखी सारखी पण लांबट. तिच नाव डायला. ती पण चविला खारटच असते.

साधना, निसर्ग वाईट नसतो, नशा वाईट !!!

आणि ना कुठेतरी निसर्गाचे श्रेष्ठत्व मान्य करावेच लागते. पृथ्वीवरच्या निसर्गात, मानव म्हणून आपले स्थान अगदी क्षुद्र आहे. आपण फार कमी काळ पृथ्वीवर आहोत, आपले अस्तित्व पुसुन टाकायला, निसर्गाला फार कमी वेळ लागेल. आपण मात्र, त्याच्यावर प्रमाणाबाहेर अत्याचार करतोय.

बाय द वे, आज जागतिक वन दिना निमित्त, "होम" हा चित्रपट परत बघूया यू ट्यूबवर. आता आपल्या हातात, केवळ १० वर्षेच आहेत म्हणे, केलेल्या चुका निस्तारायला..

जागू, तिवरांची जंगले कमी झाल्यापासून, हि माचोळ भाजीही जवळजवळ नष्टच झालीय. आपल्याकडेच नाही तर भूमध्यसमुद्राच्या परिसरात पण खातात ही भाजी.

मला फार पुर्वीच, मायबोलीकरांनी "झाडबाबा" हि पदवी दिली होती. तिच जास्त आवडते.
दिनेशदा,
मग ठिक आहे, बाकी माझी नविन पदवी आता मी तरी माघारी घेतो ....!
या वरील सगळ्या पदव्या तुम्हाला द्यायच्या तर कशा स्वरुपात ? माझ्या मते आर्मीतल्या लोकांसारखे स्टार्,मेडल (बिल्ले) शर्टावर अडकावलेले छान दिसतील, सगळे ७-८ मेडल एका ठिकाणी दिसतील ...
Happy

आम्ही पुणेकर पण जॉईन होऊ तुमच्या ह्या ट्रेक कम पिकनिकला .
प्रज्ञा,
अनुमोदन !

जागु ,मुंबईकरांनो 'निग' या पानावर पुणेकरांची गर्दी वाढत आहे, हे लक्षात असु द्या
मग एक दिवस आम्ही या पानावर पुण्याचा पुणेरी शिक्का मारु !
Happy

पुपु होणार नाही<< मी पुण्यातलाच आहे तरी पण याचा पु पु होणार नाही, निसर्गा पुढे कोणाचे चालते का कधी,

Pages