Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21
निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया....
आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/93440.html
धन्यवाद दिनेशदा, इथे दिली आहेत तीच फुले.
अमी खुप सुंदर लिंक दिलीस. हया
अमी खुप सुंदर लिंक दिलीस.
हया फुलांच्या वेली आमच्याकडे भरपुर आहेत. तसेच झाडही आहे.
धन्यवाद दिनेशदा, आता गाडी
धन्यवाद दिनेशदा, आता गाडी थांबवुन जरा नीट पाहते. पण जवळ जाऊन पहाता येणारच नाही, खुप उंचावर आहेत फुलं.
मी रोज कॅन्टॉनमेंट मधुन जाते येते, खुप हिरवळ आहे आणि बाभुळ, बिट्ट्या, बोगन वेली, बुचाची फुल आणि बरीच माहीत नसलेली झाड.... नुसत त्यातुन आल गेल तरी Fresh वाटत.
स्निग्धा, आपल्याकडे
स्निग्धा, आपल्याकडे निळ्याजांभळ्या रंगाची फूले येणारी खूपच कमी झाडे आहेत. झकरांदा, गायत्री, वांगीवृक्ष अशीच दोनचार !
स्निग्धा , तु पण रोज
स्निग्धा , तु पण रोज कॅन्टॉनमेंटमधुनच जातेस का? मग एम्प्रेस्स गार्डनला गेली आहेस का? मी दर विकेंडला ठरवते की जायचे एम्प्रेस्स गार्डनला पण जमत नाही.
विकेंडला ठरवते की जायचे
विकेंडला ठरवते की जायचे एम्प्रेस्स गार्डनला << एम्प्रेस्स गार्डन समोर मिलेटरी संचालीत एक रोपवाटीका आहे तिथे बर्याच प्रकारची झाडे आणि कुंड्या कमी दरात मिळतात
वा ! सुंदरच !
वा ! सुंदरच !
साधना ते उक्षी चे झाड.
साधना ते उक्षी चे झाड. आपल्याकडच्या, खास करुन कोकणातल्या घाटात भरपूर दिसते ती. आणि याचे वेल इतर झाडांवर चढतात. आधी अशी पोपटी असतात मग विटकरी होत जातात. पण फूलांचा आकार मात्र तोच राहतो.
एखाद्या झाडाने किती भरभरुन
एखाद्या झाडाने किती भरभरुन फूलावे ? मला याचे नाव वगैरे माहित नाही, पण हि झाडे बरीच दिसतात नैरोबी मधे. झाड दूरुन तर सुंदर दिसतेच.
पण फूलेही सुंदर असतात. (फक्त सुगंध तेवढा नसतो. )
वा... सकाळीच काय मस्त झाड
वा... सकाळीच काय मस्त झाड दिसले...
उक्षीबद्दल तुम्ही लिहिलेय काय? जुन्या रंगीबेरंगीत तेव्हा शीर्षके येत नसत त्यामुळे सगळीच बखर चाळावी लागते
शोधुनही काही मिळत् नाही.
उक्षी मला वेलीसारखीच वाटलेली पण वाटले की असावे झाड. आता वेल असेल तर तिने अख्खे झाडच व्यापुन टाकले असे म्हणायला पाहिजे. मी दुसरा फोटो दिलाय त्यात मुळ झाड कुठे दिसतेय ?
http://raanaphule.blogspot.co
http://raanaphule.blogspot.com/2010/05/calycopteris-floribunda.html
उक्षी
साधना उक्षी चे वेलच असतात आणि त्याची दरवळही वेगळीच असते
उक्षी बद्दल नव्हते लिहिले.
उक्षी बद्दल नव्हते लिहिले. त्याचा दरवळ असतो खरा, पण माझ्यासाठी त्या आठवणी, उन्हाळा, लाल माती, एस टी आणि वकार अशा आहेत...
साधना, आणखी काहि वेगळी झाडे दिसतात इथे. मग लिहितोच.
सचिन तुझी वेबसाईट बघायची
सचिन तुझी वेबसाईट बघायची बघायची असे बरेच दिवस ठरवत होते, आज तो योग आला.
अतिशय सुंदर फोटो टाकले आहेस.
एक सुचना करतेय बघ आवडते का - आपण फुलांचा फोटो देतो तेव्हा सोबत त्याच्या पानांचा, फुले झाडावर असताना जमल्यास झाडाचा फोटो असे दोन-तीन फोटो सोबत देता आले तर रानात किंवा शहरात झाडे ओळखायला सोपे जाते.
उक्षीचा तु दिलेला फोटो अ प्र ति म आहे. पण फोटोवरुन हे झाड आहे, वेल आहे की झुडुप आहे याचा काहीच अंदाज येत नाही. तु एवढे कष्ट करुन फुलाचे शास्त्रिय नाव वगैरे शोधुन काढुन देतोयस तर सोबत निसर्गात कशा अवस्थेत हे फुल सापडेल त्याचाही अंदाज येणारे फोटो दिलेस तर ते फुल निसर्गात सहज ओळखता येईल.
बघ आवडते का कल्पना ते.
(अजुन एक भोचकपणा - दिनेशदासारख्या तज्ज्ञांना कामाला लावुन त्यांच्याकडुन लिखाण करवुन तेही फोटोसोबत जोडलेस तर तुझी साईट म्हणजे रानफुलांचा संदर्भग्रंथ होईल.
)
अतिशय सुंदर फोटो टाकले आहेस.
अतिशय सुंदर फोटो टाकले आहेस. << साधना धन्यवाद
तु केलेली सुचना योग्य आहे त्याची दखल घेतली जाईल
अजुन एक भोचकपणा <<< अरे भोचकपण नाही हा, दिनेशजींच्या मदतीनेच कित्येक फुलांची ओळख पटली आहे मला, ट्रेक ल जाऊन आले की तेव्हा काढलेल्या फुलांच्या फोटो ची मेल त्यांना असते नावं विचारण्यासाठी.
साधना / सचिन, हा एक महत्वाचा
साधना / सचिन, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. फोटो काढताना, झाडाचा, पानाचा, फळांचा असे सगळेच फोटो काढायला हवेत. मराठी पुस्तकात रंगीत फोटो टाकायचे तर त्याची किंमत खुप वाढते. त्यामूळे छापील पुस्तकात ते शक्य नसते. पण ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात आपल्याला हे सहज शक्य आहे. आपण शक्यतो त्या झाडाचा पत्ता पण नोंदवून ठेवू. म्हणजे कुणाला बघायचे असेल तर तिथे जाऊन बघता येईल.
मी दर विकेंडला ठरवते की जायचे
मी दर विकेंडला ठरवते की जायचे एम्प्रेस्स गार्डनला पण जमत नाही. >>>>> नाही अजुन, मी पण ठरवते, जाऊ या, जाऊ या अस म्हणते पण...........
एम्प्रेस्स गार्डन समोर
एम्प्रेस्स गार्डन समोर मिलेटरी संचालीत एक रोपवाटीका आहे तिथे बर्याच प्रकारची झाडे आणि कुंड्या कमी दरात मिळतात >>>>> हे माहीत नव्हतं, आता नक्की चेक करेन.
उक्षीच झाड कस असत ? कदाची
उक्षीच झाड कस असत ? कदाची असेल आमच्याकडे.
अगं मागच्या पानावर बघ ना
अगं मागच्या पानावर बघ ना फोटू. त्याची पानेही दिसताहेत फोटोत. आणि ती वेल आहे, झाडाला पुर्ण झाअकुन टाकणारी. त्यामुळे झाड पाहतोय असे वाटते.
साधना पाहीला ग. पण आमच्याइथे
साधना पाहीला ग. पण आमच्याइथे नाही मी पाहीली ही वेल.
ती गुलाबी रंगाची फुले किती
ती गुलाबी रंगाची फुले किती सुंदर आहेत !!!!
सचिन, मस्त फोटो आहेत तुझ्या
सचिन, मस्त फोटो आहेत तुझ्या वेबसाईटवर. काही फुले मी बघितली नव्हती, ती बघायला मिळाली.
मोठा कावळा च्या ऐवजी मोठा कवळा असे पाहिजे होते.
कुसुंबीबद्दल एक शंका - कुसुंबी हा लाल्/केशरी प्रकारचा रंग असतो मग हे फुल पिवळे कसे? का रंगाचे नाव दुसर्या कशावरून पडले आहे?
दिनेशदा, काय झाड आहे,
दिनेशदा,


काय झाड आहे, पानांपेक्षा फुलेच जास्त आहेत !
सचिन,
रानमेवा पाहिला, छान आहे.
पुण्यात इंप्रेस गार्डन नेमक कुठे आहे ...?
माधव नावात बदल केला आहे
माधव नावात बदल केला आहे
पुण्यात इंप्रेस गार्डन नेमक कुठे आहे ...?<< रेसकोर्स च्या मागच्या बाजूला
माधव, कुसुंब नावाचे एक झाड
माधव, कुसुंब नावाचे एक झाड आणि रंगही असतो. या झाडाला उन्हाळ्यात याच रंगाची फूले येतात.
संत मीराबाईच्या रचनेत याचा उल्लेख आहे.
कहो तो कुसुंबी रंग सारी रंगा
मला सचिनची साईट परत निवांतपणे बघायला हवी.
जागूच्या उरणला जायलाच पाहिजे.
जागूच्या उरणला जायलाच पाहिजे. तिच्या म्हणण्यावरुन असे वाटतेय, कि कोकणातली कॉमन झाडे तिथे नाहीत, पण त्यापेक्षा बरीच वेगळी झाडे आहेत तिथे.
या उक्षीचा तर महामूर फुलोरा असतो घाटात !
करवंदाचे फुल. ह्याच्या जवळ
करवंदाचे फुल. ह्याच्या जवळ गेल की ह्या फुलांचा सुंदर वास येतो. माझ्या मनात आधी यायच की ही फुल काढून ह्यांचा गजरा करावा. पण करवंद नाही मिळणार म्हणून कधी केला नाही. माहेरी आमच्या कंपाउंडला होती करवंदांची जाळी. आता काही शिल्लक आहेत.

करवंदे लोणच आणि चटणीसाठी तयार आहेत.

ह्या पानांची छान पिपाणि
ह्या पानांची छान पिपाणि होते...
मला सचिनची साईट परत निवांतपणे
मला सचिनची साईट परत निवांतपणे बघायला हवी.<<आगदी मनातलं बोललात.
दिनेशदा नक्कीच तुमच्या
दिनेशदा नक्कीच तुमच्या पुढच्या फेरीत उरणला याच. आणि शक्यतो पावसाळ्यात या म्हणजे रानभाज्याही मिळतील बघायला.
Pages