विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवघड आहे चेज करायला नाही म्हंटलं तरी! >> मला तरी वाटत नाही.. आपण उगीच स्लो विकेट चे बाउ करतोय.. त्यात आपले ऑउट ऑफ फॉर्मात असलेले गोलंदाज.. !! बघू आता..

ह्म्म्म्म्म बरोबर आहे.
आता कोहली सोडला तर कोणीच नाही राहिलं खाली त्यामुळे अजून ४-५ ओवर नीट खेळलं पाहिजे!
आता चौके हवे! छक्के नकोच!

गो हरभजन!!!!!

कोहलीची विकेट !!! त्याला का खाली ठेवतात ???? तो नाही खेळत हाणामारीच्या षटकात !!
माझ्यामते तरी मॅचवरील पकड सुटली आहे.. आता गोलंदाज काय दिवे लागतील त्यावर अवलंबून आहे..

असो.. आपण बुवा ज्याम खुष !! पुन्हा एकदा साहेबांचे अजून एक शतक नि बहारदर फलंदाजी बघायला मिळाली.. Happy

पन्ना अगदी !!
सगळ्याच बॉल्सवर उचलून मारायचा प्रयत्न कशाला?? आता बसा काढत सिंगल्स उरलेल्या ओव्हर.

आज आडियन्स मध्ये निसते तारे दिस्तायत!

चला बॉलर लोकांनी तयारीला लागा!! द गेम इज ऑन! आजची ही क्लिफहँगर होणार असं दिसतय!

काय मस्त फलंदाजी करताहेत.. धोनी एक रन धाव काढून तळच्या फलंदाजांना स्ट्राईक देतोय.. नि विकेट जातेय Lol

काय सांगता येत नाही! हरु नका म्हणजे मिळवली! बास!

आज स्लोवर बॉल्स वर ३ तरी विकेट गेल्या (किंवा जास्त). चांगले खेळले साऊथ आफ्रिका!

मूर्ख लोकं .. ५० ओव्हर्स पूर्ण खेळत नाहीत.. ९ ओव्हर्स ९ विकेट्स आणि फक्त २९ रन्स ...

माझ्या मते ५० रन्स कमी केल्यात... महाग न पडो म्हणजे मिळवलं

यो, तू आता एकदा क्रिकेट मॅच बघायला जा तुझा क्यामेरा घेऊन आणि जरा भारी फोटो काढून आण! Happy

>>आपले २५०+ आणि पठाण फलंदाजीला येणार हे दृष्य बघायचय..

या सामन्यात आफ्रिकेचे मानसिक खच्चीकरण करणे अधिक गरजेचे/फायद्याचे ठरेल.. बघुया.

a complete mess and failure of strategy by india... powerplay does not mean "everyone" starts slogging.. then who will bat through end?
गंभीर ला फटके: ईतक्या मह्त्वाच्या क्षणी निव्वळ पॉ.प्ले. आहे म्हणून स्वताची विकेट फेकणे अक्षम्य.. तो सेट फलंदाज होता.
युसुफ पॉ.प्ले. च्या मानसिकतेत बाद झाला.
मी आधी देखिल म्हटले होते की विराट कोहली ला खाली खेळवण्यापेक्षा एक अधिक गोलंदाज खेळवणे फायद्याचे आहे.
युवी चे बॅड लक..
धोणी "फलंदाजी" कधी करणार?
----------------------------------------------------------------------------------
भारताने हा सामना आफ्रिकेला बक्षिस म्हणून दिल्यात जमा आहे.. ३०० देखिल झालेले नाहीत. भारताचे खच्चीकरण व्हायची शक्यता जास्त आहे.
पिच स्लो आहे वळते आहे.. अश्विन नाही.. भज्जी चालत नाही.. युवी ने पुन्हा ५ गडी बाद केले नाहीत तर मुनाफ्/नेहरा/झहीर च्या गोलंदाजीवर या पिच वर आफ्रिकेने ३०० धावा सहज करायला हव्यात.

धोणी ची खरी परीक्षा आता आहे..

आजचा सामना भाररताने तरिही जिंकला तर फायनल मध्ये पोचतील असे वाटते अन्यथा, फुगा लवकर फुटण्याची शक्यता अधिक आहे Sad

पन्ना.. होताय होताय.. आपली ती खासियत आहे.. रागावयाचे कारण नाहीये त्यात Happy

वैद्यबुवा.. तिकडे मोबाईल घेउन जायला बोंब आहे.. क्यामेरा तर अशक्य.. त्यापेक्षा घरुनच बघितलेली बरी.. वानखेडेला सेक्युरिटी खूपच कडक ठेवतात..

http://www.technoexam.in/

मेधा इथे ट्राय कर..

यो, अरे रागवायचं नाही तर काय? साहेबांच्या (आणि विरू, गंभिरच्या) कष्टांवर पाणी न फिरवलं म्हणजे खूप... तिकडे साहेबांचं काय होत असेल?

योग.. अनुमोदन रे.. आजची जिंका कसेहीकरुन.. हीच संधी गोलंदाजांना आपली पात्रता सिद्ध करण्याची..

काय झाला फायनल स्कोर?

वानखेडेला सिक्युरीटी भारी Sad पार व्हिटी स्टेशनला गाड्या पार्क करा म्हणून बोर्ड लागलेत. सगळीकडे नाकाबंदी.. नशिब की सुट्टीच्या दिवशी सामना आहे नाहितर आम्हाला नपॉ पासून व्हिटीपर्यंत चालत जावं लागेल Uhoh

छे! पहिले तिघेजण सोडले तर इतर जण निव्वळ हजेरी लावून परतले. असेच इतर जण खेळले तर साहेबांनी प्रत्येक सामन्यात शतक केले तरी काही उपयोग नाही. हरभजन, पठाण आणि कोहलीला आता बसवायची वेळ आली आहे. पुढच्या सामन्यात हरभजन व पठाणला काढून रैना व अश्विनला घ्यावे.

२९६ इतकी वाईट धावसंख्या नाही. खरं तर ३५० धावा सहज शक्य होत्या. २९६ करून सुध्दा आपण जिंकू असं वाटतंय. आफ्रिकेला दुसर्‍या डावात पाठलाग करणं अवघड जाईल असं वाटतंय.

जुन्या चेंडूवर खेळणे अवघड झाले होते... आणि सर्व विकेट्स जवळ जवळ चेंडू जुना झाल्यावर (रिवर्स स्विंग) मिळाल्या आहेत. पण स्टेन ची गोलंदाजी निव्वळ उत्कृष्ट- महान! आजूबाजूला ईतकी तोडफोड चालू असताना भन्नाट गोलंदाजी केलीये त्याने.. hats off!

आपली सुरुवात भज्जी, पठाण करतील काय? मग जुन्या चेंडूवर झहीर्/नेहरा अधिक उपयुक्त ठरतील असे वाटते.

या वर्ल्डकपमधेपण सचिनच्या ५०० वर रन्स होऊदेत....... जमल्या तर ८००/९००.....

देवा Indian Bowlers ना ते क्रिकेटर आहेत आणि चांगले खेळू शकतात याची जाणिव लवकर होऊदे......

योग.. अनुमोदन रे.. आजची जिंका कसेहीकरुन.. हीच संधी गोलंदाजांना आपली पात्रता सिद्ध करण्याची..>>>
(त्यांनी ती कधीच दाखवली आहे.... परत आज सिद्ध नाही केली म्हणज़े मिळवल...)

क्रिकेट बघण्याच्या फुकट साईट्स जरा जपुनच वापरा...>>>>अनुमोदन नात्या!! इतरांनीपण खरच गंभीरपणे घ्या ही सुचना. मी स्वतः खुप फुकट पाहायचा मोह टाळून विलो ची मेंबरशीप आज घेतली. मला मध्यंतरी विलो टिवी कढून इमेल आला होता. विलो टिवी वाल्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कोर्टात याचिका दाखल केली आणि इल्लिगल साईटस वर जास्त कडक कारवाई करण्याची परवानगी मिळवली आहे.
आपल्या ४ तासांच्या फुकट फीड करता नंतर उगाच आपण गोत्यात नको यायला!
बाकी, काल पासून विलोचा स्पेशल डिस्काऊंट पण सुरु आहे. $१०० च्या ऐवेजी $८४ मध्ये मिळतय! जबरी क्लियर आहे फीड!!!! त्यात सगळे हायलाईट्स वगैरे उपलब्ध आहेत!

हे लोक पण असे खेळतात ना, मी कितीहि बोलायचे नाहि म्हणले तरि मला बोलायलाच लागते. Proud

तरिहि मला माहित आहे, आंधळे आंधळेच रहाणार. २६०/१ वरुन २९६/१० का होइनात! Biggrin

जुन्या चेंडूवर खेळणे अवघड झाले होते... >>> शहाणे ३४ ओव्हर नंतर चेडु बदलतात.

स्मिथ!!!!!!!!
साहेब!!!!!
जागचा हल्ला नाही तेंडल्या!!!! टोटली डिसीव्ड बाय चेंज ऑफ पेस!

लाईन लेंत चांगली आहे झहीरची आज! भाऊ, मागच्या वर्ल्ड कपात केलेली पापं धुवायचा चान्स आहे ह्यावेळी!

साहेबानी आज धोनीला टपल्या मारायचं ठरवलंय. अफलातून क्षेत्ररक्षण, सेंच्यूरी मारल्यावर ! द.आ. ४१-१ ! भारत जिंकावा ही मनस्वी इच्छा ; नाही तर इथल्या कांहीजणांच्या मते साहेबाच्या सेंच्यूरिला, सेहवाग, गंभीरच्या खेळाला किंमतच रहाणार नाही !
भारताने डावाची सुरवात चँपियनसारखी केली, त्यांच्या डावाचा शेवट द.आं.ने चँपियनसारखा केला ! आता बघूं शेवटी कोण चेंपियन सारखा खेळतो ते !!!

Pages