इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
शेवटचे "चिंच" का? योगेश
शेवटचे "चिंच" का?
योगेश तुम्हारा पर्दाफाश......>>>>साधना, दिनेशदांनी दिलेली गाणी सुद्धा त्याच डिव्हिडी मध्ये आहेत. हि तीन वेगळी गाणी
नो योग्या.. पण तु जवळ
नो योग्या.. पण तु जवळ पोचलास... तु दिलेले तोंपासु फोटो आठव जरा आणि त्याच्यावरच्या माझ्या खास कमेंट्स.....
ठिक आहे, तुझ्यासाठी आणेन झाड आता... 'डोळे असुनी डोळे भरुनी....' शोध आणि आण.. मग गुलाबही देईन..
नो योग्या.. पण तु जवळ
नो योग्या.. पण तु जवळ पोचलास...>>>>>>"आवळा"
गुड बॉय... बक्षिस म्हणुन
गुड बॉय... बक्षिस म्हणुन ह्या फुलांचे आवळे झाले की त्यांचा मोरावळा देते तुला.
बक्षिस म्हणुन ह्या फुलांचे
बक्षिस म्हणुन ह्या फुलांचे आवळे झाले की त्यांचा मोरावळा देते तुला.>>>>आता एखाद्या गावठी गुलाबाचा फोटो पण टाक, मी पटकन ओळखतो. म्हणजे मग "गुलकंद"पण मिळेल.
साधना मस्त फोटो. ते आधी
साधना मस्त फोटो. ते आधी पांढरे मग गुलाबी वाले झाड मधुमालती का? त्याची फुलं अशी दिवसा रंग बदलतात ना?
साधना, कमळांचे फोटो सुंदरच
साधना, कमळांचे फोटो सुंदरच आलेत. सोनचाफा आणि कुंडीत?
बक्षिस म्हणुन ह्या फुलांचे
बक्षिस म्हणुन ह्या फुलांचे आवळे झाले की त्यांचा मोरावळा देते तुला.>>>>आता एखाद्या गावठी गुलाबाचा फोटो पण टाक, मी पटकन ओळखतो. स्मित म्हणजे मग "गुलकंद"पण मिळेल<<<<<< असं डिल सुरु आहे का साधना?
झक्कस धागा. थॅक्यु साधना,. आता शांतपणे वाचते सगळं
हि फुले कोणती??
हि फुले कोणती??
योगेश पहिला जांभळा कोबी (?)
योगेश पहिला जांभळा कोबी (?) आहे. (मला कोबीची भाजी नको )
कुंडीतल्या फुलांचे फोटो
कुंडीतल्या फुलांचे फोटो कुंदापासुन सुरू होतात. सध्या कुंदा, गुलाब आणि विषवल्ली टाकलीय. मोगरा, अबोली, जाई, चमेली इ. फुले होती, गेल्याच आठवड्यात गाडीत भरुन गावी पाठवली.
सोनचाफा पुण्यात घेतलाय, मुलीच्या शाळेतल्या झाडावरचा.
माझ्याकडे कुंडीतही होता सोनचाफा. अशी भरभरुन फुले लागायची..... मलाच दुर्बुद्धी सुचली आणि शेजा-याल्या दिला, तुझ्या बागेत जमिनीत लाव, अजुन मस्त वाढेल म्हणुन... मीच जाऊन लावायला पाहिजे होते, त्याने कसे लावले देव जाणे, माझे झाड मला कायमचे सोडुन गेले...
ते आधी पांढरे मग गुलाबी वाले झाड मधुमालती का
तु मधुमालती पाहिली नाहीस?? तिचा वेल असतो, झाड नाही. पण तो वेल बराच मजबुत असतो. पुर्ण वाढलेल्या वेलाचे खोड ३-४ इंच जाड होते. बहुतेक वेळा त्याला झाडावर सोडुन देतात, त्यामुळे त्याचे झाड आहे असे वाटते. तिचे फुल बुचाच्या फुलासारखे लांब दांड्याचे आणि टोकाला बारिक पाकळ्या असे असते. माझ्या कॉलनीत एकाकडे आहे. फुले आहेत का ते पाहते आणि टाकते.
वरचे लाजेरस्ट्रोमिया (Lagerstroemia) जातीतले आहे. याचे मराठी नाव माहित नाही. यातही भरपुर प्रकार आहेत. फुलांचा रंग हाच असतो. पण आकार लहानमोठे असतात. रस्तादुभाजकावर झुडपे असतात, ज्यांना लहान फुले येतात. भोकरासारखी दिसणारी फळे येतात. आकार लहानमोठा आहे.
ताजे फुल गुलाबी आणि जुने होत आले की पांढरे. फोटो काढला त्या दिवशी मी आणि लेक फिरत होतो सीवुड्समध्ये कॅमेरा घेऊन. तिने झाड गदगदा हलवले तेव्हा कित्येक फुले अगदी भिंगरीसारखी गोल फिरत खाली पडायला लागली. मग आम्ही रस्त्यावरच्या सगळ्या झाडांवर हा प्रयोग केला
बापरे केवढ्या गप्पा झाल्या ?
बापरे केवढ्या गप्पा झाल्या ? सगळ्या वाचुन काढल्या.
योगेश तो जांभळा प्लॉवर किंवा कोबी आहे का ?
योगेश तो जांभळा प्लॉवर किंवा
योगेश तो जांभळा प्लॉवर किंवा कोबी आहे का ?>>>>मलापण नाही माहिती
गेल्यावर्षी राणीच्या बागेत भरलेल्या फुलांच्या प्रदर्शनात तो टिपलाय.
त्या फुला प्रमाणे तु पण
त्या फुला प्रमाणे तु पण जांभळा पडला आहेस.
राणीच्या बागेत कधी भरत प्रदर्शन ? येत्या रविवारी असेल तर कित्ती छान!
जॅग्स, ते येत्या रविवारी
जॅग्स, ते येत्या रविवारी नसणार. जानेवारीतल्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब च्या पहिल्या आठवड्यात असते.
योग्या ते दुसरे फुल सुंदर आहे. दिनेशनी फोटो दिलेला ह्या फुलाचा. नावही सुंदर आहे त्याचे, पण नेमके आता आठवत नाहीये.
तो कोबी नुसता बघायचा आहे, खायच्या कामाचा नाही.
येत्या रविवारी म्हणजेच ९
येत्या रविवारी म्हणजेच ९ तारखेला प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ आणि शेफ श्री. दिनेश यांचे भारतदेशी आगमन होत आहे. सकाळी ११ वाजल्यापासुन राणीबागेतल्या झाडांची खास ओळख करुन देण्यासाठी ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राणीबागेत उपस्थित राहणार आहेत. तरी इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
त्या फुला प्रमाणे तु पण
त्या फुला प्रमाणे तु पण जांभळा पडला आहेस.>>>>:फिदी:
प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ आणि शेफ श्री. दिनेश>>>>आणि संगीत तज्ञ सुद्धा.
जानेवारीतल्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब च्या पहिल्या आठवड्यात असते.>>>>हो गेल्यावर्षी फेब. मध्येच गेलो होतो. प्रमुख मराठी वर्तमानपत्रात त्याची जाहिरात येते. मुंबई महानगरपालिकेचा एक सुंदर उपक्रम
साधनाने दवंडी पिटवली आहे. जे
साधनाने दवंडी पिटवली आहे. जे राणीच्या बागेत येणार असतील त्यांनी पटापट नावे द्या.
दिनेशदा, तुम्ही मागे दिलेलं
दिनेशदा,
तुम्ही मागे दिलेलं ते झाडाची फुले ही 'तंबाखुची' आहेत ना ?
पण ते महाराष्ट्रात भरपुर असतं .....म्हणजे उत्तर चुकलं ?
लहानपणी तंबाखुच पीक (तण नसल्यामुळे)मला पाणी देण्यासाठी (पाणी देता-देता खाण्यासाठी नाही !) खुप आवडायचं
साधना, एक से एक मस्त फोटो
साधना,
एक से एक मस्त फोटो !
सध्या कुंदा, गुलाब आणि विषवल्ली टाकलीय. मोगरा, अबोली, जाई, चमेली इ. फुले होती
साधना,
यावरुन ते मराठी (खास) गाणं आठवलं मला,कोणत्या सिनेमात आहे ते सांगाल का ? आज ऐकणार आहे.
हे एकदम सोपे ओळखा पाहु मधले ते 'शेवगा'....
मामीपेक्षा पहिले मी ओळखलं होतं, पण त्यांनी माझ्या अगोदर टायपुन टाकलं एवढचं !
शेवटच्या चित्रातलं ते चिंचच झाड आहे का ?
ओळखाचा खेळ चालु आहे म्हणून
ओळखाचा खेळ चालु आहे म्हणून पुढील फळ ओळखायला टाकतेय. पण खुप सोप्प उत्तर आहे.
माझी यायची खूप खूप ईच्छा
माझी यायची खूप खूप ईच्छा होती, पण जमणार नाही असं दिसतय. तेव्हा माझ्या ऐवजी राणीच्या बागेतले प्राणी बघून समाधान मानून घ्या दोस्तहो.
जागु.....ह्या तर घाणेरिच्या
जागु.....ह्या तर घाणेरिच्या कांगुण्या.
माझ्या कोड्याचे उत्तर कॉफी.
माझ्या कोड्याचे उत्तर कॉफी. खरेतर कळ्या आहेत त्या. (मामींना अर्धेच मार्क) कोकोचे फूल वेगळे असते, त्याचा फोटो टाकला होता हल्लीच मी.
आणि साधनाच्या फोटोतली गुलाबी फूले म्हणजे, गिरिपुष्प. त्याला लोकभाषेत उंदिरमारी असे नाव आहे कारण उंदरांना मारायचे विष त्याच्यापासून करतात. या कारणासाठी शेताच्या कडेने लावायला उत्तम.
(पण एवढ्यात कसा फूलले ?)
ते पांढरे गुलाबी, तामणाचाच प्रकार आहे.
असुदे नक्की कुठला प्राणी बघु
असुदे नक्की कुठला प्राणी बघु आम्ही ?
जयु १०० पैकी १००.
दिनेशदा नमस्कार.
दिनेशदा , कॉफीचे मळे मी
दिनेशदा , कॉफीचे मळे मी पाहिलेत.पण तेव्हा त्याला फळे लागलेली होती. तुमच्या फोटोत पाने वेगळी वाट्तायत.घरी फोटो बघते परत.
तो अर्धवट सोडलेला प्रयत्न
तो अर्धवट सोडलेला प्रयत्न म्हणजे अर्धवट उत्क्रांती आहे. किटकांत आधी गांधीलमाशा (वास्प)
निर्माण झाल्या. त्या मांसाहारीच असतात आणि एकेकट्या घरे बांधतात.
त्यापासून दोन शाखा झाल्या.ज्यांनी जमीनिवर रहायचे ठरवले त्या मुंग्या झाल्या. वारसा म्हणून
त्यांना मिलनकाळापूरते का होईना पंख फूटतात. मिलनानंतर मुंग्या आपले पंख आपणच खुडतात.
ज्यांनी शाकाहारी व्हायचे ठरवले आणि फुलांतील नेक्टरवर गुजराण करायची ठरवली त्या मधमाशा
झाल्या. या दोन्ही शाखा समूहाने राहतात.
वरच्या फ़ोटोतली घरटी, हि समूहाने घरटी बांधणा-या वास्प्स ची आहेत. त्यात अंडी किंवा अळ्या
दिसताहेत.
कुणाकडे राय आवळ्याचे झाड असेल
कुणाकडे राय आवळ्याचे झाड असेल (जागू) तर त्याची काही पाने गोलाकारात कापल्यासारखी
दिसतात. ही पण एका गांधीलमाशीचीच करामत असते. बघा नीट, काय करते ती या पानांचे !
ही मला काही आढळलेली डोंगरातील
ही मला काही आढळलेली डोंगरातील फळे. कशाची आहेत माहीत नाही. ह्याची पाने व फुले दिसायला वांग्यासारखीच होती पण फळे मात्र अगदी लहान व हिरव्यागार आणि पिकल्यावर लाल झालेली होती. पानावर काटेही होते. काटेरी वांग्यांच्या झाडांनाही असेच पण जरा छोटे काटे असतात.
दिनेशदा आता नक्की निरिक्षण
दिनेशदा आता नक्की निरिक्षण करेन रायआवळ्याच्या पानांचे. तुम्ही राय आवळ्यावर लेख टाकणार होतात ना ? काय झाल त्याच ?
Pages