निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा वांग्याचाच एक प्रकार आहे. (बटाटा, टोमॅटो, मिरची सगळे याच कूळातले) याचे अगदी जमिनीलगत वाढणारे पण झाड असते. माझ्या आजोळी त्याला काटेरिंगणी म्हणतात. दातदुखीवर ते औषधी आहे, असे आई सांगते.
जागू, तो लेकुरवाळी झाडे लेख होता ना, तोच तो.

दिनेशदा लिंक द्या.
दिनेशदा माझ्या माहीती प्रमाणे रिंगणाच झाड वेगळ असत. त्याला पिवळ फुल येत आणि त्याचा नागिण ह्या रोगावर औषधासाठी वापर करतात.
हे बघा रिंगणचे झाड आणि फुल ह्याला नंतर फळ येत. त्या फळाचा वापर औषधासाठी करतात.

Ringan.jpg

जागू, याला आमच्याकडे काटेरी धोत्रा म्हणतात. (पडीक शेतात उगवते आणि भराभर वाढते) याचे फळ काटेरी व लांबट असते. याच्या पाकळ्यांचा उपयोग टकलावर केस उगवण्यासाठी करतात, असे माझ्या एका मित्राने सांगितले होते. त्याच्या डोक्यावर घासण्यासाठी मीच पाकळ्या गोळा करुन दिल्या होत्या. तो टकलावर बरेच कायकाय लावत असे.(कोरफड पण) त्याच्या टकलावर खरेच केस उगवले होते, पण ते नेमके कुठल्या औषधाने ने माहित नाही.

पण मी म्हणतो ते काटे रिंगणाचे झाड खूप कॉमन आहे. अशीच निळी पंचकोनी फूले पण झाडाची उंची कमी. रिंगणी हा शब्द गुजराथीमधे पण वांग्यासाठी वापरतात.

असुदे नक्की कुठला प्राणी बघु आम्ही ?

मी हिप्पो बघेन..... Light 1

दिनेश, तुमचे बरोबर आहे, ही काटेरिंगणीच आहे. आंबोलीला याचे काहीतरी नाव आहे (आईला विचारुन टाकते इथे). याची छोटी वांगी अतिशय कडु असतात. कुठलेही कडू फळ/भाजी मिळाली की लोकांना तो मधुमेहावरचा उतारा वाटतो. गावी काही जण याची चटणी करुन बिचा-या मधुमेहीला खायला घालुन त्याची अजुन वाट लावतात. माझ्या वडलांच्या घरात सगळे मधुमेही. त्यामुळे मधुमेहावरची सगळी औषधे घरातल्यांना ठाऊक...

नियमीत व्यायाम आणि तोंडावर ताबा ह्या दोन गोष्टी मात्र अतिवर्जीत.... आणि त्यामुळेच कोणीही सत्तरी गाठू शकले नाही Sad

कुठल्याही प्राण्याच्या पिंजर्‍यातला त्याचा आवडता खाऊ, हात लांब करुन पळवायला बघायचा.
जो प्राणी म्हणेल, असु दे !

तो असुदे !!!

दिनेशदा माझ्या माहीती प्रमाणे रिंगणाच झाड वेगळ असत. त्याला पिवळ फुल येत आणि त्याचा नागिण ह्या रोगावर औषधासाठी वापर करतात.
हे बघा रिंगणचे झाड आणि फुल ह्याला नंतर फळ येत. त्या फळाचा वापर औषधासाठी करतात.>>>>>>>>>

होय.. हेच रिंगणाचे झाड म्हणून ओळखले जाते...... माझे काका वैदू गिरी करायचे..... तेव्हा ते नागीण रोगावर ( हर्पिस सिंप्लेक्स किंवा हर्पिस झोस्टर ) रिंगणाच्या फळाचे औषध द्यायचे हे आठवतंय. Happy

या खेरिज रिंगणाच्या फळाचा दऊत ( इंक ) बनवताना मी त्यांना पाहिलं आहे. )

मला वाटतं दोन झाडांना एक नाव असावे, जागू च्या फोटोतल्या फूलाचे शास्त्रीय नाव Argemone mexicana आपल्याकडे ते तण म्हणूनच येते. याचे फळ पण लांबट आणि काटेरी असते. सूकले कि तडकते आणि बिया वार्‍याने उडतात.
आणि मी जे म्हणतोय ते काटे रिंगणी Solanum virginianum हे पण तणच आहे. याला छोटि बोरासारखी फळे लागतात. आधी हिरवी असतात मग पिवळसर होतात.
डॉ, माझे एक स्वप्न आहे, एखाद्या अनुभवी वैद्यासोबत सगळी औषधी झाडे बघत फिरायचे !!! त्या सगळ्या झाडांचे फोटो काढायचे !!!

९ तारखेला राणी बागेत कुठे भेट्णार आहात. मला यायच आहे.

राणीबागेला किती प्रवेशद्वारे आहेत? मला तरी वाटते दोन आहेत. त्यापैकी एकाजवळ भेटायचे ठरवुया. मला आता नक्की आठवत नाहीये त्यामुळे ज्यांना आठवतेय त्यांनी कुठे भेटायचे ते इथे लिहा.

नाहीतर बेस्ट म्हणजे तो मोडलेला हत्तीचा पुतळा आहे ना दाजी लाड संग्रहाबाहेर, तिथे भेटुया. बाकीच्यांनी त्यांच्या सुचना लिहा.

सध्या मी गॅलरीत ठेवलेल्या कुंड्याना "उंदिर" नावाच्या प्राण्याने त्रासले आहे Angry मी दुसर्‍या मजल्यावर राहतो, पण माहित नाहि तो कुठुन येतो आणि सगळी माती उकरतो. Sad आणि मुळे खातो (आणि हे सगळे त्याचे उद्योग मध्यरात्रीच असतात). मी लावलेले फणसाचे झाडाचे (चांगले ६ फूटी) मुळ खाल्ले आणि झाड गेले Sad (यंदा पावसाळ्यात बिल्डिंगच्या परिसरात /किंवा मित्राच्या बागेमध्ये लावणार होतो). मी ते झाड काढुन टाकले, पण आता मोगर्‍याच्या कुंडिवर याचा हल्ला चालु आहे. सकाळी सकाळी उठल्यावर एकच उद्योग असतो सगळी माती उचलुन परत त्या कुंडित भरायची. रॅट किल वगैरे ठेऊन पाहिले, पण काहि उपयोग नाही. काहितरी जबरी विषारी औषध ठेवायचे म्हटले तर झाडाला धोका शिवाय कधी कधी लहान मुलेही झाडांना हात लावतात.

यावर काही उपाय?????

रच्याकने, हा जर हातात सापडला ना तर................ :प्रचंड चिडलेला बाहुला:

मी लावलेले फणसाचे झाडाचे (चांगले ६ फूटी) मुळ खाल्ले आणि झाड गेले

आरं आरं लै वैट झालं राव.. नक्की उंदिरच आहे ना?? माझ्या गच्चीत पण उंदिर येतात पण माझ्या झाडांना कधीच कोणी हात लावलेला नाही.... Happy

रॅटकिल ठेवण्यापेक्षा उंदरांना आवडेल असे काहीतरी दुसरे ठेव (उदा भजी) म्हणजे मुद्दाम उकरुन मुळे शोधायचा त्रास ते घेणार नाहीत. Happy

डॉ, माझे एक स्वप्न आहे, एखाद्या अनुभवी वैद्यासोबत सगळी औषधी झाडे बघत फिरायचे !!! त्या सगळ्या झाडांचे फोटो काढायचे !!!

आधी वनस्पतीतज्ज्ञाबरोबर फिरायचे आमचे स्वप्न साकार करा ९ तारखेला.. मग तुमच्या स्वप्नाच्या मागे लागा....

दिनेशदा, साधना मी नेहमी म्हणत असते की जसे गाव बदलते तशी नावे ही बदलता. त्याप्रमाणेच असेल. मी म्हणते ते पिवळ्या फुलाचे रिंगणच नाव आमच्याकडे प्रसिद्ध आहे. माझ्या जावेची आई त्याच औषध बनवते नागिणीवर. पण कसे ते त्या सांगत नाहीत. कुणाला सांगितले की त्यापासुन उतार होत नाही अस त्या म्हणतात. पण मी अजुन प्रयत्न करणार आहे ते विचारण्याचा. आजच त्या घरी येणार आहेत.

योगेश अरे मी पण खुप हैराण झाले आहे ह्या उंदरांपासुन. सगळी दारे बंद असल्यावर हे उंदीर आमच्या एक्झॉर्स फॅन मधुन येतात. त्यासाठी आम्ही लोखंडी जाळि पाढुन चिकटवली होती फॅनला. आता त्या उंदरांनी त्या जाळीला वाजुला सारुन फॅन कुरतडून एक मोठी पट्टीच काढली आहे. अगदी दरोडेखोर घुसल्यासारख वाटल मला सकाळच. आता कुत्र्याबरोबर एक मांजरही पाळावी लागेल बहुतेक. रॅटकिल खात नाहीत, पिंजर्‍यात कधीतरी एखादा उंदीर अडकतो. पुट्ठा ही लावला आहे चिकटायचा.

जागू, आमच्या घरी नाही येत उंदिर पण गॅलरीत असलेल्या झाडांवर मात्र यांची दावत झडत असते (आणि हो एकच उंदिर/घूस आहे. तोच सारखा येत असतो).
एकदा हातात सापडला ना तर त्याचा शेवटचा फोटो काढुन हार घालणार आहे. Angry Angry Angry

पण मी अजुन प्रयत्न करणार आहे ते विचारण्याचा. आजच त्या घरी येणार आहेत.

हे 'उतार होणार नाही' हे उत्तर बरेच जण देतात. यामागचे खरे कारण उगाचच सगळ्यांनी औषध बनवायचा प्रयत्न करुन मुळ वनस्पतीचा नाश करु नये हे असावे असे मला वाटते. आपल्याकडे बहुतेक वेळा लोकांना शास्त्रिय माहिती देऊन परावृत्त करण्यापेक्षा त्यांच्या मनात भिती घालुन परावृत्त करण्याकडे जास्त कल आहे. (आणि शास्त्रिय माहिती दिली की लोक दुरूपयोग करतात. डहाणुकर बाई झाडांच्या औषधी गुणांबद्दल लिहायच्या तेव्हा लोक झाडांवर डल्ला मारुन त्यांची वाट लावायचे असे दिनेशनी लिहिले आहेच.)

हे ज्ञान आता लिहुन ठेवणे किती गरजेचे आहे हे तु त्यांना समजाव. तसेच 'उतार होणार नाही' हे गुरूंनी मनात ठवसण्यामागचे कारणही त्यांना पटवुन दे. मग त्या नक्कीच सांगतील तुला. नाहीतर असली सगळी उपयुक्त माहिती त्या लोकांबरोबरच नष्ट होणार. पुढच्या पिढीपर्यंत पोचणारच नाही.

<< त्याचा शेवटचा फोटो काढुन >>

शेवटी फोटो काढणारच तर तू त्याचा.... Proud

तूला एअरगन हवीये का या शुभकार्यासाठी ?

योग्या आधी द माउसहंट हा चित्रपट पाहुन घे आणि मग या शुभकार्याला लाग.... Happy
त्या चित्रपटातल्या उंदरासारखा तुझ्या उंदराचाही काहीतरी hidden agenda असावा Happy

Happy
तूला एअरगन हवीये का या शुभकार्यासाठी ?>>>>>>>चालेल Happy पण, हातात सापडतच नाही, कधी येतो कधी जातो ते कळतच नाही Sad

योगेश फोटो काढलास तरी माबोवर नको टाकुस. नाहीतर फोटो काढशिल आणि उंदरावरुन गाण शोधशील आणि टाकशील माबोवर गाण + मेलेला उंदीर.

गाण + मेलेला उंदीर

मला चालेल असला फोटू..

गाणे हे टाक -

छोड गये बालम, मुझे हाय अकेला छोड गये
तोड गये बालम, मेरा प्यार भरा दिल तोड गये....

बरसोंकी मेहनतसे, एक पेड लगाया था,
उम्मीद के पानी से, उसको मैने सिंचाया था,
खा गये बालम, सारी जडे वो खा गये...

थोडे दिवस कुंड्यांची जागा बदल.. जरा त्रास घे आणि रात्री कुंड्या घरात आणुन ठेव. त्याना यायची सवय झालीय. काहीच मिळत नाहीये असे दिसले की जागा सोडतील. उंदिर लोखंडी जाळीही तोडतात त्यामुळे जाळी लागुनही काही उप्योग होणार नाही. रॅटॉल चा वापर करुन बघ परत एकदा (औषधाचा ब्रँड बदल)

जागु तु ते पक्ष्यांचे फोटू आणी त्यांची रेसिपी कधी टाकणार?? की तुझ्या हातातला क्यामेरा पाहुन उरणमधल्या चिमण्याही पळाल्या????? Wink

गाण + मेलेला उंदीर Rofl

जागू तरी बरं, तुमच्याच डोक्यात अशी कल्पना आली. नाही तर योगेशच्या डोक्यात अशी कल्पना आली असती तुमच्याकडचा उंदरांचा त्रास बघून तर काही खरे नव्हते. केश्विनीची काय अवस्था झाली असती?

Pages