इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
माधव हल्ली अश्विनी माझ्या
माधव हल्ली अश्विनी माझ्या रेसिंप्यावर येतच नाही घाबरुन.
जागु तु ते पक्ष्यांचे फोटू आणी त्यांची रेसिपी कधी टाकणार?? की तुझ्या हातातला क्यामेरा पाहुन उरणमधल्या चिमण्याही पळाल्या?????
कुठल्या पक्षांबद्दल बोलतेयस ? मला काही आठवत नाही अस बोलल्याच.
अगं तु म्हटलेलंस ना की तुला
अगं तु म्हटलेलंस ना की तुला पक्श्यांचे फोटु काढायचे होते पण पक्शी उडुन जात होते, त्यावर असुदेसाहेबांना वाटले की पक्षी तुला घाबरले, आता फोटो काढायचे म्हणशील आणि उद्या सरळ माबोवर प्रकाशचित्रे सदराऐवजी रेसिपी सदरात फोटोऐवजी चमचमीत रेसिपीच देशील त्यांची
साधने इतकी हिम्मत नाही
साधने इतकी हिम्मत नाही माझ्यात त्यांची रेसिपी बनवण्याएवढी. फोटो काढायला मला एक दिवस सुट्टी घ्यावी लागेल स्पेशल त्यांच्या मागे फिरायला.
योगेश जरा व्यनी बघ.
इथे अजुन मिळालेले जास्वंदीचे फोटो लोड केले आहेत.
http://www.maayboli.com/node/21865?page=1#new
मागे चित्रलेखात हा उपाय वाचला
मागे चित्रलेखात हा उपाय वाचला होता. (शेतातील उंदरांच्या बंदोबस्तासाठी)
उंदराचे पुढचे दोन दात सतत वाढत असतात आणि ते शिवशिवतही असतात. त्यांची झीज व्हावी म्हणून त्याला काहितरी सतत कुरतडावे लागते. त्यामूळे तो जे कुरतडतो, ते खातोच असे नाही.
तर चित्रलेखातला उपाय असा :-
शेतात अंतराअंतरावर निकामी झालेल्या ट्युबलईट्स उभ्या करुन ठेवायच्या. रात्रीच्या अंधारात त्या थोड्या चमकतात. उंदरांना त्याचे फार आकर्षण वाटते. त्यावर ते चढायचा प्रयत्न करतात, तो अर्थातच सफल होत नाही. पण त्याला चांगला टाईमपास मिळतो.
दुसरा उपाय म्हणजे, अशी काही उपकरणे मिळतात, जी विजेवर चालतात आणि आपल्या कानांना ऐकता येणार नाही, अशा फ्रिक्वेन्सीत गोंगाट करत राहतात. (पण बाकीच्या प्राणीव प्राण्यांना पण याचा त्रास होतो.)
उंदिंराना जागच्या जागी चिकटवून ठेवेल असाही एक गोंद मिळतो. तो बिनविषारी असल्याने आपल्याला धोकादायक नाही. पण तो "मेस" निस्तारणे कठीण असते.
उंदीर, पालीप्रमाणे सिलिंगवर चालू चकत नाहीत. मी काम करत असलेल्या एका अद्यावत बेकरीत, सभोवताली अशी भिंत बांधली होती, आणि संपूर्ण इमारतीला कुठेही बारिकसे छिद्र ठेवले नव्हते.
नायजेरियातल्या, माझ्या
नायजेरियातल्या, माझ्या हाऊसमेडने केलेला अफलातून उपाय.
आपल्याला गुंगी आणणार्या (सर्दी तापावरच्या ) ज्या औषधी गोळ्या असतात, त्यापैकी एक तिने पिठ साखरेत मिसळून उंदरासाठी ठेवली.
उंदराला गाढ झोप लागली.
आणि मग तिने त्या उंदराला........
<< आणि मग तिने त्या
<< आणि मग तिने त्या उंदराला........>> खाउन टाकले.
असुदे खाउन टाकले वरुन आठवल.
असुदे खाउन टाकले वरुन आठवल. जैत रे जैत पिक्चरमध्ये ठाकर उंदीर पकडतात आणि भाजुन खातात. त्यातिल एक ठाकर बोलतो उंदीर लय ग्वाड लागतात!
बाप्रे आता जागू उंदराची
बाप्रे आता जागू उंदराची रेसिपी टाकणार.
मामी करणार का टाकली तर ? बर
मामी करणार का टाकली तर ?
बर मस्करीचा भाग सोडला तर घुशीची काळजी दमा ह्या रोगासाठी औषधी आहे.
जागू, कातकरी (की ठाकरं) खातात
जागू, कातकरी (की ठाकरं) खातात उंदीर. त्याला भुईससा म्हणतात.
असुदे जैत रे जैत मध्ये ठाकर
असुदे जैत रे जैत मध्ये ठाकर आहेत - आम्ही ठाकर ठाकर गाण आहे ना ?
जागू, ह्या दोन जाती आहेत
जागू, ह्या दोन जाती आहेत आदिवासींच्या , कातकरी आणि ठाकर. ते गाण बरोबरे
मंडळी उद्याचे लक्षात आहे
मंडळी उद्याचे लक्षात आहे ना?
राणी बाग सकाळी ११ वाजता तिकीट काऊंटरजवळ भेटायचे. त्यानंतर ३-४ तास तरी लागतील आतल्या भटकंतीला. त्यानंतर काय करायचे ते तेव्हा ठरवू
मंडळी उद्याचे लक्षात आहे
मंडळी उद्याचे लक्षात आहे ना?>>>> कोण कोण येणार आहे उद्या??
मंडळी काल यायची खूप इच्छा
मंडळी काल यायची खूप इच्छा होती. खूप प्रयत्न केला पण नाहीच जमले यायला.
पण तुमच्याकडून वृत्तांत आणि फोटोंची वाट बघतोय.
माधव, तुम्ही यायला पाहिजे
माधव, तुम्ही यायला पाहिजे होते काल, खुप छान माहिती मिळाली दिनेशदांकडुन.
मी गेल्यानंतर किती वेळ होतात
मी गेल्यानंतर किती वेळ होतात ?
खुप छान माहीती मिळाली काल. खरच माधव आणि डॉ. कैलास तुम्ही यायला हव होतत. तुमच्याकडूनही अजुन काही माहीती मिळाली असती.
अचानक काम आल्याने मला जमलं
अचानक काम आल्याने मला जमलं नाही.... मी एका चांगल्या अनुभवास मुकलो.
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो रॉक्स की जिप्सी ?
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो रॉक्स की जिप्सी ?>>>>>यो रॉक्स आणि जिप्सी फोटो टाकणार आणि वृतांत साधना आणि जागू लिहिणार
नुसते बोलू नका - टाका !!!
नुसते बोलू नका - टाका !!!
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो रॉक्स की जिप्सी ?>>>>>यो रॉक्स आणि जिप्सी फोटो टाकणार आणि वृतांत साधना आणि जागू लिहिणार
आणि त्या फोटोंना नाव दिनेशदा देणार
जागु तु गेल्यावरही बराचे वेळ
जागु तु गेल्यावरही बराचे वेळ होतो.. मागच्या पानावर गुलाबी आणि भगवी फुले टाकलीत ना ती झाडे पाहिली. नागकेशराची झाडे पाहिली. पक्ष्यांच्या पिज-याजवळ तर भरपुर टिपी केला. मग साडेचारच्या सुमारास बाहेर पडुन अजुन धमाल केली. आता योग्याचे फोटो आले की जळतीलच सगळे....
सावलि ने सान्गीतलेले झाड
सावलि ने सान्गीतलेले झाड सोनसावर तर नाही. मी या झाडाच्या शोधात आहे.पत्ता मिळेल का.
विजय कोणत सावलीने सांगितलेल
विजय कोणत सावलीने सांगितलेल झाड ? कितव्या पानावर आहे ?
ते सावलीने सांगितलेले झाड
ते सावलीने सांगितलेले झाड सोनसावर नाही. ते शेफ्लेरा आहे.
विजय, काल तुमच्या बदलापुरच्या
विजय, काल तुमच्या बदलापुरच्या फार्मबद्दल बोललो. खालचा ब्लॉग बदलापुरच्याच एका संडे शेतक-याचा - हिरामनचा आहे. अवश्य पाहा. कदाचित तुम्ही ओळखतही असाल त्यांना-
http://sundayfarmer.wordpress.com/
काल तुमच्या बदलापुरच्या
काल तुमच्या बदलापुरच्या फार्मबद्दल बोललो. खालचा ब्लॉग बदलापुरच्याच एका संडे शेतक-याचा - हिरामनचा आहे. अवश्य पाहा.>>>>आणि पुढचे गटग "बदलापूरला" ठेवा
जिप्स्या आधि कालचा वृतांत दे.
जिप्स्या आधि कालचा वृतांत दे. तुला सवय आहे लेट करायची. कॅमेराची माहीती दोन गटग झाले तरी दिली नाहीस. आता बदलापुरच्या गटग नंतर देशिल काय राणिच्या बागेचे फोटो ?
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो
वृत्तांत कोण टाकणार आहे ? यो रॉक्स की जिप्सी ?>>>>>यो रॉक्स आणि जिप्सी फोटो टाकणार आणि वृतांत साधना आणि जागू लिहिणार
आणि त्या फोटोंना नाव दिनेशदा देणार >> अगदी
Pages