निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाउदे... गाणी तु अशीही आणशीलच.. ( Happy )
मी झाड/बिया अशाही आणेनच .. उगाच डिल कशाला करायचे????

(मी उगाच एवढे मोठे वाढलेले झाड जागुला दिले, तेही शेंगासकट.. तुला दिले असते तर गाणी अजुन वाढली असती......... )

विचार चालु आहे........

साधना $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

कितीही राग आला तरी आता ते झाड मी तुला परत देणार नाही.

साधने, तंदूरी ? तीही कुत्र्याची ? शिव शिव

तुमची डोकी अशीच चालायची.....

तंदुरी करुन कुत्र्याला घालायची, तो तंदुरी खाण्यात रमला की लगेच आपला कार्यभाग आटपायचा......
(एव्हाना जागुने कुंडी घरात नेली असणार..)

असुद्या, वरची फुले अतिशय सुरेख आहेत. मला जर खाली मोहरीच्या शेंगा दिसल्या नसत्या तर मी योग्याला वेड्यात काढले असते.....

जागू तो सबजाच. सबजाची झाडे दोन प्रकारची असतात, एक असा आणि दुसर्‍याची पाने हिरवी असतात आणि त्याला आपल्या तूळशीच्या मंजीरीप्रमानेच उभट तूरे येतात.
पण याला जास्त सुगंध असतो. याचा तूरा विठोबाला वाहतात. मुसलमान लोकात पण ईद च्या सुमारास हा लागतो. मस्कतमधे हा खुप दिसायचा.
याच्या सुगंधाचे वर्णन म्हणजे गूळाच्या गरम पाकात लवंग, दालचिनी, वेलची ची पावडर टाकल्यासारखा.

साधना, मी योगेशला तूझासाठी गाणी दिली होती. त्यामूळे त्याच्या बदल्यात त्याला काही द्यायची गरज नाही.

मी योगेशला तूझासाठी गाणी दिली होती. त्यामूळे त्याच्या बदल्यात त्याला काही द्यायची गरज नाही.>>>>दा, ये नॉ चॉल्बे Happy

साधना, मी योगेशला तूझासाठी गाणी दिली होती. त्यामूळे त्याच्या बदल्यात त्याला काही द्यायची गरज नाही.

योगेश तुम्हारा पर्दाफाश......

दुष्ट आहात.
पटकन ओळखून काय टाकता ?

ठिक आहे बाबा, तु उद्या नारळीच्या झावळांचा फोटू टाक आणि विचार हे काय आहे ते.. मग मी त्या डायपरवाल्या अ‍ॅडमधल्या आईसारखे, बराच वेळ हा आंबा का चिक्कू, की काही भलतेच नवीन सापडले ???? असे डोके खाजखाजवुन मग नारळ म्हणुन सांगेन..... मग होईल ना तुझे समाधान????

याच्या सुगंधाचे वर्णन म्हणजे गूळाच्या गरम पाकात लवंग, दालचिनी, वेलची ची पावडर टाकल्यासारखा

मस्त वर्णन... मला इथेच सुवास आला.....

अरे वा इथे ओळखा पाहू चा खेळ चाललाय का ?
चला हि फूले ओळखा. माझ्या माहीतीप्रमाणे हि फूले महाराष्ट्रात दिसत नाहीत. या झाडाची, पाने, फूले, फळे, मूळे आपण खात नाही. पण या झाडापासून मिळणारे एक उत्पादन, तूम्हा सगळ्यांच्या परिचयाचे आहे.

मला तर एकदम चाफाच वाटला.. plumeria / franjipani.. पण तुम्ही इथे होत नाही म्हणताहात म्हणजे चाफा नक्कीच नसणार. पण कळ्यांची रचना, पाने वगैरे एकदम शेम टु शेम...

मायबोलीवरचेच काहि जूने फोटो इथे परत देतोय,
खास असूदे साठी, मोहरी

moharee.jpg

आणि हे सगळे राणीच्या बागेतील फूलांचे फोटो

कनकचंपा

kanakachampaa.jpg

गायत्री

gayatree.jpg

गोरखचिंच

gorakh.jpg

अनोखे गुलाबी फूल

gulabi_0.jpg

तिथलीच केशरी फूले

raneebag110508_127.jpg

विषवल्ली

vish.jpg

जांभळा कांचन

kanchan.jpg

साधना ते झाड कसलं सुंदर आहे. मी भारतात परत आले की तुझ्याकडुन मागणार Happy
बाकी सगळीच फुले सुंदर.

माझे झब्बु......

पांढरा कांचन -

रक्तकांचन

गुलाबी कांचन

कांचनाचे फोटो काढताना एवढी हवा होती की खुप प्रयत्न करुनही नीट फोटो जमला नाही. उद्यापरवा परत जाऊन फोटो काढेन.

आणि हा माझा लाडका चाफा -

हा खरेतर माझ्या लेखात टाकणार होते, पण त्याआधीच तुम्हाला दाखवायचा मोह आवरता येत नाहीये, म्हणुन टाकतेय.. आपण काही सुंदर पाहिलेय तर ते कधी इथे येऊन तुम्हा सगळ्यांना दाखवते असे होऊन जाते अगदी.

एकाच झाडावर आधी गुलाबी आणि मग पांढरी झालेली फुले -

एकदम सोपे आहे हे ओळखा पाहु.....

एक सोडुन दिलेला प्रयत्न -

हे कुठले फुल हो दिनेश?? घाटात सगळीकडे आहे.

हे त्याचे झाड - पानांवरुन अंदाज येईल कदाचित

कदाचित गुलाबी बहावा असेलही. पण मला बहावा म्हटले की उजळलेली झुंबरेच आठवतात....

झरबेरा -

हे बहुतेक मुंगीचे घरटे आहे -

ह्या कमळांचा फोटो टाकायचा मोह आवरतच नाहीये, काय करु??? ही माझ्या घराशेजारच्या फुलराणीतली -

आणि हे कमळांनी भरलेले शांत निवांत तळे... वरची कमळे यात कुठे पहुडलीत ते शोधा आता

माझ्या बागेतली कुंदा, गुलाब (एकाच झाडावरचे, दर दिवशी रुप वेगळे) आणि विषवल्ली -

आणि हे मात्र ओळखुन दाखवा - अगदी सोप्पे आहे -

बस्स आता.. कितीही फोटू टाकले तरी नो समाधान...

साधना, हे एकदम सोपे ओळखा पाहु मधले ते 'शेवगा'.... Happy

हे शेवटचे कसले बरं... नविन पानं येताहेत ना? गुलमोहोरासारखी वाटतायत.

शेवग्याच्या शेंगा दिसताहेत... Happy

पण शेवटचे ओळखा मात्र... अगदी तोंपासु आहे.. एवढा मोठा क्लु दिल्यावर लाळ न गाळता ओळखा लवकर...

सावली अवश्य.. याच्या एका शेंगेतुन १०० झाडे बनवता येतात. खुप वाटलीत मी ही झाडे. फुले आल्यावर हमखास फोन येतोच झाडांच्या सासरहुन... Happy

दिनेश, परवा ब्युटीफुल पिपल पाहात होते. एक दिवस पाऊस पडल्यावर वाळवंट फुलांनी भरुन जाते. त्या असंख्य अगणित फुलांमध्ये माझे डेझर्ट रोजही होते Happy

मामी, you have given correct answer i guess.... कोकोचेच फुल आहे बहुतेक, त्या झाडाचे नैसर्गिक काहीच न खाता मानवनिर्मित पदार्थ आपण खातोय तो म्हणजे चॉकलेट.....

Pages