निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले फुल आहे त्याचे नाव, घोडेगुई Lavadula bipinnata तसं ते कॉमन आहे.
दुसरे फुल नीट दिसत नाही, पण ते कदाचित निळगोंडा Neuracanthus trinervius असू शकेल.
निवडुंगावरची वेल मात्र नाही ओळखता आली, कदाचित तो अमरवेलीसारखा एखादा प्रकार असेल, बांडगूळ पण सहसा निवडुंगावर नसतात.

या गुलाबी थंडीत एक झाड अगदि गुलाबी झालय.याचि ओळख आहे का?
DSC04047.JPGDSC04054.JPG

हे एक गुलमोहराच्या कुळातील झाड.हि फुले कि फळे ते माहित नाहि. पण असे बॉल्सचे डेकोरेशन ते नाताळसाठी अंगभर मिरवतय.
DSC04061.JPGDSC04064.JPG

हे एक सदाहरित झाड. याचि फळे मोठ्या चिक्कूसारखी दिसतात.झाडाखाली याचि सुकलेली फ्ळे तीन दलात फुटून पडलेली दिसतात.
DSC04046.JPG

दिनेशदा.. धन्स.. ती मराठी नावे मस्तच वाटताहेत.. पण प्रचि २ मधले Neuracanthus trinervius जातीचे असावे.. नेटवर चेकले.. रचना सारखी दिसतेय.. पण पाकळ्यांची रचना वेगळीय..

जागू.. ते गुलाबी गुच्छ इंटरेस्टींग वाटताहेत. प्रत्यक्षात बघताना सही दिसत असेल ना.. नाव सांगा रे कोणीतरी पटकन.. Happy

Red 004.jpgRed 0079.jpg
ए ते गणेशवेलीच नाही वाटत आहे. हे बघून सांगणार का प्लीज ? माझ्या आठवणीप्रमाणे गणेशवेल अजून नाजूक असते. की हा जंगली व्हर्जन आहे ?

तो गुलाबी टॅबेबुया आहे. याचेच लाल आणि पिवळे प्रकारही असतात. पिवळा बेळगावला मुबलक बघितला.
दुसरे आहे ते चेंडूफळ. ठाणे कोर्टाच्या आवारात एक मोठे झाड आहे. घाटकोपरला श्रेयस सिनेमाजवळ पण आहे.
ते तीन दलाच्या फळाचे झाड, गोव्याला पाट्टो भागात बघितले होते. त्याचे फूल बघायला मिळाले असते तर नाव शोधता आले असते.
असुदे, नाजूक पानांची ती वेल असते तिला चित्तरंजन म्हणतात. फूले गडद गुलाबी आणि पंचकोनी असतात. पण अनेकजण तिलाच गणेशवेल समजतात.

असुदे, दोन्ही फार वेगळ्या वेली आहेत. यामधेच (म्हणजे इथे ज्याचा फोटो आहे त्यामधे) पिवळा प्रकारही असतो.
जयु, फोटोत दिसतेय ते फूल (खरे तर या प्रकाराला तांत्रिकदृष्ट्या फूलांचा गुच्छ म्हणायला हवे) अगदी खालच्या फोटोत केस झडलेले दिसतेय ते फळ.

छान चर्चा आणि छान धागा. निवांतपणे सगळे एकदा वाचायचे आहे.
Flowers of India या लिंकवर बहुतेक फुलांची (alphabetically) नावे दिली आहे. यात फुलांची प्रचलित नावे, उपयोग, बॉटेनिकल नावे दिली आहे. आपणा सर्वांना नक्कीच उपयोग होईल. Happy
http://www.flowersofindia.net/catalog/alphabet.html

हा माझ्याकडुन "सोनबहावा" Happy

छान लिन्क आहे जिप्सि.
@दिनेशदा,यो-रॉक्स ..... जयु आणि जागु वेगवेगळ्या आहेत. (JFI ). Happy

हा आहे बहरलेला पिवळा टॅबेबुया. स्थळ : महावीर उद्यान, कोल्हापूर

हा सोनबहावा पुण्यात खुप दिसतो. पुणे विद्यापीठाच्या जवळ असलेल्या अभिमानश्री सोसायटीबाहेरच्या रस्त्यावर याची बरीच झाडे बघितली आहेत. ऐन बहरात असताना काय सुंदर दॄष्य दिसतं. झाडावरती आणि रस्त्यावरती पिवळ्याधमक फुलांची रास असते.

योगेश, बहावा आणि सोनबहावा वेगवेगळे असतात का? मला फोटोतली फुले बहाव्याची म्हणून माहिती होती. आणखी पण रंग असतात का बहाव्यात?

खरंतर बहाव्याचा हा सीझन नाही, पण रत्नागिरीला अवेळी फुललेला हा सोनबहावा दिसला आणि तो टिपला. साधना म्हणते त्याप्रमाणे खरंच ऋतुचक्र बदलायला लागलेत कि काय?? Uhoh

अगं त्याच्या शेंगेवर लक्ष ठेव आणि सुकली की आतल्या बिया काढुन नवीन रोपे तयार कर. तुला बागेत खुप सुंदर रचना करता येईल याची..

दिनेश टॅबेबुयाच्या फोटोसाठी धन्स... मी त्या गुलाबी फुलांना टिकोमाचाच एक प्रकार समजलेले. माझ्याकडे होते एक लहान रोपटे पण उत्साहाच्या भरात त्याच्यावर रोगोर जरा जास्त मारले गेले.

साधना तु दिलेल्या झाडाला फुल आलेय ग.>>>>कुठलं झाड दिलंय?? मला पण पाहिजे Happy
:प्रचंड हट्ट करणारा बाहुला:

पिवळा टॉब्युबिया पण पाहिला आहे.
पण गुलाबी आणि पिवळ्यामद्ये फरक आहे. गुलाबी हिवाळ्यात (नोव्हेंबर ,डिसेंबर) बहरतो.त्याचि पाने साधारण बदामाकृती ,संयुक्त असतात.
पिवळा उन्हाळ्यात बहरतो. त्याचि पाने साधारण लांबट,झुबक्याने असतात.
मग ती एकाच कुळातील झाडे आहेत का?

adenium.JPG

हे घे आणि जळ आता शक्य तितके..

तुझ्यासाठी बिया आणते. झाडही आहे, त्याची पाने गळलीत सगळी, पण कुठेतरी गुलाबी झलक दिसतेय.... त्याला पाने आली तर आणते, नाहीतर पाने नाहीत म्हणुन तु झाडच फेकुन देशील...... Happy

हे घे आणि जळ आता शक्य तितके..>>>> Proud
तुझ्यासाठी बिया आणते.>>>>>झाड नही तो झाड के "बिया" हि सहि. Happy

मला काही सब्जा/तुळशिच्या जातीतली रोपे लोणावळ्यात आढळली. ह्याला साधारण सब्जाच्या पानांसारखाच वास आला. शिर्डीच्या देवळात वगैरे ह्या रोपट्यांचे तुरे वाहील्यासारखे काहीतरी आठवतय. नक्की काय नाव आहे ह्याच ?
sabja.JPGsabja1.JPG

अवांतर:
तुझ्यासाठी बिया आणते.>>>>>साधना आपण स्मगलिंग/बार्टर सिस्टिम करूया Proud तु मला झाड किंवा बिया दे त्याबदल्यात मी तुला सुमन कल्याणपूर यांची
१. काल राती स्वप्नामधे एक राजा आला, मज मोहुन गेला
२. वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी पल्याड माझं गाव रे, मला पोचीव घरा
३. दारी पाऊस पडतो, रानी पारवा भेटतो, आला आला गं सुगंध मातीचा, दारी पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला गं सुगंध मातीचा

हि तीन अप्रतिम गाणी देतो.

बोलो "डिल" मंजूर???? Happy

वा.... काय सिस्टिम आहे रे तुझि....... (मी उगाच एवढे मोठे वाढलेले झाड जागुला दिले, तेही शेंगासकट.. तुला दिले असते तर गाणी अजुन वाढली असती......... Happy )...

विचार चालु आहे........

विचार चालु आहे........>>>>बघ विचार करून एका झाडाच्या बदल्यात तीन तीन गाणी. Happy Lol

Pages