इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
हळदीचे ते खोड म्हणवे लागेल,
हळदीचे ते खोड म्हणवे लागेल, ते धावते खोड असते. आले हळदीचे कूळ एकच, त्यात सोनटक्का, गलांगल असे अनेक प्रकार येतात.
ओल्या हळदीचे लोणचे करतात ना?
ओल्या हळदीचे लोणचे करतात ना? मस्त लागते कसे करायचे ते अर्थातच माहीत नाही.
अनिल हळदीची छान माहीती दिलीत.
अनिल हळदीची छान माहीती दिलीत. मला वाटायच की ओली हळद लावली की हळद ये ते आल्या प्रमाणे.
सावली मी खालील प्रमाणे करते हळदीच लोणच.
हळद आणि थोड्या आल्याच्या बारीक फोडी करायच्या. त्या फोडींना थोडे साधे मिठ आणि थोडे काळे मिठ चोळायचे. आता हे मिश्रण हव्या असणार्या बरणीत भरायचे. मग ते मिश्रण बुडेल इतका लिंबाचा रस त्या फोडींवर टाकायचा आणि झाकण घट्ट लावुन १०-१५ दिवस मुरत ठेवायचे. मी मुरल्यावर शक्यतो बरणी फ्रिज मध्ये ठेवते त्यामूळे खराब होण्याची शक्यता कमी होते.
माझ्या घरातली २ जास्वंद
माझ्या घरातली २ जास्वंद !
आता त्यात काय विशेष असे नाही.
पण आता झाडाला चक्क फळ आली आहेत.
गेली २ वर्ष ही माझ्या कडे आहेत पण पहील्यांदाच आली. खरं म्हणजे जास्वंदाला फळ आलेली मी पहील्यांदाच बघितली. नंतर नेट वर बघितल्यावर,जास्वंदाला पण फळ लगते हे कळले.
माझ्याकडे झाडाला कळ्या आल्या की लगेच मुंग्या आणि छोटे किटक येतात. मी सतत साबणाचे पाणी, हिंग,हळद, नीम तेल शेवटी किटकनाशके वापरुन बंदोबस्त करत असे. ह्या वेळेस कंटाळा केला. बहुतेक त्याचे "फळ" मला मिळाले
दिनेशदा, धन्यवाद ! गावाकडे
दिनेशदा,
धन्यवाद !
गावाकडे शेतातली हळद काढण्याच काम सध्या चालु आहे, त्याची आठवण म्हणुन !
आदिती,
छान फोटो !
मी नुकतचं पांढरी जास्वंद लावली आहे !
माझ्याकडे हळदीच्या फूलाच्या
माझ्याकडे हळदीच्या फूलाच्या पुष्पकोषाचा फ़ोटो आहे. तो टाकतो रात्री.
माझ्या गोव्यातल्या घराच्या मालकीण बाई, हळदीची लागवड करायच्या, आणि मग ती वर्षभर वापरायच्या.
अनिल, पेव वगैरे बद्दल पण लिही ना.
जागू त्या लोणच्यात ओले मिरीचे लोंगर पण छान लागतात, तसेच त्यात आंबेहळद पण घालतात. ओली हळद किसून लोणचे केले तर जास्त चवदार होते पण किसणीला एवढा पिवळा राप चढतो कि निघता
निघत नाही.
आदिती, मी पण जास्वंदीच्या फळाबद्दल लिहिणार होतो. सगळ्याच झाडांना नाहि धरत फळे. पण हि फळे विकसित झालेली (म्हणजे आत बिया वगैरे तयार झालेली ) नाही बघितली कधी. तूमच्याकडे होतात का ?
अदिती, खूप छान दिसत आहेत
अदिती, खूप छान दिसत आहेत जास्वंदी जास्वंदाचे फळ पहिल्यांदाच पाहिले. ह्यात काय बिया आहेत का?
मी आत्तापर्यन्त जास्वंदीचे फळ
मी आत्तापर्यन्त जास्वंदीचे फळ कधिच बघितले नव्हते. इतके दिवस मला वाटत होते की कळी आहे.
आत बघते बिया तयार होतात का. आता आजुबाजुल पण जर चौकसपणे बघतेय बाकीच्या झाडांनापण फळ लागली आहेत का. अजून काही दिसली नाहीत.
आदिती जास्वंदिचा रंग खूपच छान
आदिती जास्वंदिचा रंग खूपच छान आहे!
जास्वंदी सुंदर. फळ पण
जास्वंदी सुंदर. फळ पण पहिल्यांदाच बघितली. माझ्याकडे पण ते छोटे किटक येतात जास्वंदीवर. काय करायचं ते जायला?
जागू धन्यवाद. आई किसुन करते लो़णचं. आईला रेसिपी विचारुन टाकेन इथे.
आदिती मीही पहिलांदाच पहाते
आदिती मीही पहिलांदाच पहाते जास्वंदीला फळ. खुप छान नविन माहीती दिलीस.
दिनेशदा, सावली आता मी पण किसुन करेन.
नॅपा व्हॅली म्हणजे वाईन
नॅपा व्हॅली म्हणजे वाईन कंट्री. तिथल्या द्राक्षाच्या बागा बघण्यासारख्या आहेत अगदी. त्यातल्याच ह्या बागा.
आणि ही दुरून दिसणारी बाग.
आर्च त्याच्या बाजुला गावठी
आर्च त्याच्या बाजुला गावठी गुलाब दिसताहेत. द्राक्षही छान जवळून फोटो हवा होता. सध्या बाजारात द्राक्षाला सुरुवात झालेय पण अजुन कोवळीच दिसतात ती.
ही फळे पण लोणावळ्याच्या
ही फळे पण लोणावळ्याच्या डोंगरात सापडली. पण तिथल्या कातकरणींना पण ह्याचे नाव माहीत नाहीत. आणि ती खात नसल्याचही त्यांनी सांगितल.
आर्च, वाईनरीमधे जाउन वाईन न
आर्च, वाईनरीमधे जाउन वाईन न पिता, दाक्ष खायला मागितली, तर लोक वेड्यात काढतात नाही ?
तिथे हॉप्स चे वेल बघितले का ? मला त्याचा फोटो बघायचा आहे.
जागू, हि फळे सुकल्यावर पण असाच आकार ठेवत असतील. घरी सजावटीसाठी छान आहेत.
आपल्याकडे फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री हे पुस्तक दोन भागात उपलब्ध आहे पण त्यात फक्त फूलांचेच फोटो आहेत. पाने आणि फळांचे केवळ वर्णन आहे. त्यावरुन नवख्या माणसाला बोध होणे कठीण आहे.
शिवाय फोटोमधल्या फूलांचा रंग आणि प्रत्यक्षातील रंग, यात कधीकधी तफावत आढळते.
मी मागच्या पानावर पामच्या एका झाडाचा फोटो टाकला होता, त्यातली पाने न गाळण्याची पद्धत हि एक स्ट्रॅटेजी आहे. खास करुन माऊंट केनयावरची झाडे, ती अवलंबतात.
बाकिच्या ठिकाणी काही महिन्यांचा हिवाळा असतो. खूपदा हिवाळ्यात दिवस थोडा आणि कधीकधी मोजक्या तासांचाही असतो. त्या काळात सूर्यप्रकाशच नसल्याने, पाने अन्न तयार करु शकत नाहीत. आणि आधीच कमी असलेल्या पाण्याच्या साठ्याचे बाष्पीभवन करुन, ते वायाही घालवतील. म्हणून या काळात पानांना रजा दिली जाते. उन्हाळ्याची चाहूल लागताच, पालवी फूटायला सुरवात होते.
वरची पद्धत प्रदिर्घ उन्हाळ्यात ठिक आहे, पण जिथे रोजच्या रोज कडाक्याची थंडी आणि सूर्यप्रकाश असतो, तिथे अर्थातच काहि वेगळे उपाय करावे लागतात.
त्या पर्वतावर रोज रात्री शून्याखाली तपमान जाते. त्यासाठी पानांची रचना अशी केली जाते कि ती बर्फात गोठणार नाहीत. पानातले बरेचसे पाणी मागे घेतले जाते. आणि ते खोडात येते. पण उंच खोड असल्याने, त्यातले पाणीही गोठण्याचा संभव असतो. तर त्या खोडातील पाणी वाचवण्यासाठी, अशी आपल्याच पानांची दुलई घेतली जाते.
पाने अशी अंगावर बाळगल्याने थंडीपासून रक्षण होत असले तरी एक तोटा असा असतो, कि सुकलेली पाने मातीत कूजून जी पोषक द्रव्ये झाडाला मिळतात, ती मिळत नाहीत. या सूकलेल्या पानांत पाणी झिरपत असल्याने थोडीफार पोषक द्रव्ये त्यात विरघळतातच. ती परत मिळण्यासाठी या उभ्या खोडाला, सूक्ष्म मूळे फूटतात. एरवी खोडाला ती द्रव्ये शोषणे जमणार नसते. म्हणजे या चेंगटपणात, एक शहाणपणा आहे.
अश्या पानांच्या पसार्यात अर्थातच पाखरे आश्रयाला येतात. पण निसर्गात असे फूकट देणे घेणे सहसा नसते. पाखरांच्या उत्सर्जनातूनही झाडाला पोषक द्रव्ये मिळतातच.
तिथे जमिनीलगत वाढणार्या झाडांच्या आणखी काही यूक्त्या आहेत. कोरफडीसारखे दिसणारे एक झाड तिथे भल्या मोठ्या कमळासारखा आकार धारण करते.
त्यातली कडेची पाने हि जून आणि कडक असतात. वाढ होते ती मूख्यत: मधल्या भागातून. हा भाग अर्थातच मऊ असतो. पण तो रात्रीच्या गोठवणार्या थंडीत तग धरु शकत नाही. म्हणून कडेची पाने त्यावर घुमटासारखी घट्ट बंद होतात, आणि रात्री मधल्या भागाचे रक्षण करतात. (असे एक झाड मला लेक नैवाशा ला पण दिसले.) सकाळी सूर्य वर आला कि हि पाने हळूहळू उमलतात.
दिनेशदा, तुम्ही
दिनेशदा, तुम्ही वनस्पतीशास्त्राचा खूपच सखोल अभ्यास केलेला दिसतोय. तुमच्यामुळे आम्हाला किती छान माहिती मिळतेय!!
दिनेशदा खुप सुंदर. इथेही
दिनेशदा खुप सुंदर.
इथेही कोरफडीसारखी मोठ्या आकाराची कमळ केलेली झाडे दिसतात पण रात्री मिटत नसतील ती बहुधा.
दिनेशदा, वनस्पतीत देखील किती
दिनेशदा,
वनस्पतीत देखील किती अभ्यासपुर्ण रचना दडलेली आहे, हे तुमच्या मुळेच तर कळतयं आम्हांला !
अनिल, जितके बघतो आणि वाचतो,
अनिल, जितके बघतो आणि वाचतो, त्याने मलाच आश्चर्यचकित व्हायला होतेय. त्यातले काही इथे खरडतोय एवढेच. आता बाभळीवर एक लेख टाकतो.
हा आहे हळदीचा पुष्पकोष. यात
हा आहे हळदीचा पुष्पकोष. यात पिवळी जांभळी फूले येतात.
साधारण आपल्याकडच्या घाटात, हे फूल तूम्ही अनेकदा बघितले असेल. देखणे दिसत असले तरी हे फूल चापलुसी करते, कशी ते माहिती आहे का ? (मग लिहिन ... )
दिनेशदा हळदीचे फुल मीही
दिनेशदा हळदीचे फुल मीही पाहीले आहे.
हे खालच फुल नाही दिसण्यात आल.
जागू, हे फूल अगदी सहज दिसते.
जागू, हे फूल अगदी सहज दिसते. हा फोटो चोरला घाटातला आहे पण सावंतवाडी, अंबोलीला पण दिसते. इतर ठिकाणी घाटात रस्त्याच्या कडेला असतेच.
याचे नाव Melastoma .
झाडाचे परागकण अतिसूक्ष्म असले तरी त्या प्रत्येक परागणात झाडाचे गूणसूत्र असतात. असे गूणसूत्र असलेले परगकण निर्माण करण्यासाठी झाडाला बरीच पोषकद्रव्ये जमवावी लागतात. हे झाड ज्या ठिकाणी वाढते तिथे त्याचीच वानवा असते. बरं हे परागकण, किटकांच्या अंगावर फासावे लागतातच. त्याशिवाय त्यांचा प्रसार कसा होणार ? पण फसवणूक तर करता येते ना ?
आता समजा आपण किटक असलो, तर या फूलातले परागकण कुठे असतील, असे आपल्याला वाटेल. आपण सगळे जण त्या पिवळ्या पुंकेसरांकडे बोट दाखवू, किटकांना पण तसेच वाटते. पण त्या पिवळ्या पुंकेसराकडे जाण्यासाठी जांभळ्या दांडोर्यावरच उतरावे लागणार ना ?
खरी गोम इथेच आहे. पिवळे आहेत ते आहेत फसवे परागकण. म्हणजे ते भरपूर दिसत असले तरी खरे नव्हेत. खरे परागकण आहेत ते जांभळ्या दांडोर्यावर. पिवळे कण म्हणजे नूसतीच पावडर आहे. त्याच्याकडे झेपावणार्या किटकाच्या पोटावर नेमक्या जागी आणि नेमक्या प्रमाणावर खरे परागकण चिकटवले जातात
अरे पण हे सिक्रेट आपल्या आपल्यातच बरं का, किटकांना सांगू नका !
या फोटोत त्याचे फळही दिसेल...
निसर्गप्रेमींनो.. मागच्याच
निसर्गप्रेमींनो.. मागच्याच आठवड्यात मी साल्हेर मुल्हेर (बागलाण प्रदेश - महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील) ट्रेक करुन आलो.. तिथे मला दिसलेली सुंदर फुले इथे देतो.. मला तरी प्रचि विभागापेक्षा इथे पोस्ट करणे महत्त्वाचे वाटले.. तुमच्याकडून माहिती मिळाली तर उत्तमच..
प्रचि १
-----------
प्रचि २
-----------
प्रचि ३
-----------
प्रचि ४
--
<
-------------
प्रचि ५
(ही धोतरा फुलाची जात का ?? एकात एक अशी फुलाची रचना आहे..)
--------------
(त्याच झाडाला लागलेले फळ)
---------------
---------------
---------------
प्रचि ६
(निवडुंगवर पडलेले बर्फरुपी फुले.. ! या फुलांचे झाड या निवडुंगावर फैलावले होते..)
------------
-------------
Yo.Rocks-- किति सुंदर फोटो
Yo.Rocks-- किति सुंदर फोटो आहेत हे? निळ्या रंगाचि फुले तर छान आहेतच. पण ति निवडुंगावरचि फुले काय सुपर्ब आहेत.
मुंबईत स्वस्त आणि मस्त
मुंबईत स्वस्त आणि मस्त फुलझाडे मिळण्याचे ठिकाण म्हणजे वाकोला. कलिना युनिव्हर्सिटीतून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला येताना लागणार्या रस्यावर दोन्ही बाजूला ही रोपे विकायला ठेवलेली आहेत. डोळे, मन तर खुश होतच पण किंमत ऐकून खिसाही हसतो. दोन वर्षांपूर्वी लेकीच्या वाढदिवसाच्या पार्टीला रिटर्न गिफ्ट म्हणून एक प्राण्यावरचे पुस्तक आणि कुंडितील झाड द्यायचे ठरवले होते. पार्टी ऑर्गनायझरने एका-एका झाडाचे १२० रुपये सांगितले. मी सरळ वाकोल्याला गेले. एका देखण्या लाल पानांच्या झाडाची निवड केली. मला ७५ झाडे हवी होती त्यामुळे किंमत आणखी कमी केली. त्यालाच ती प्लॅस्टिकच्या कुंड्यातून लावून द्यायला सांगितली. एका कुंडीमागे केवळ २७-२८ का काय रुपये पडले. आणि लोकं अजून झाडं कशी वाढताहेत हे मला आवर्जून सांगतात.
नविन वर्षाच्या सगळ्यांना
नविन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.
सर्व निसर्ग प्रेमिंनी संकल्प करुया की शक्य तितकी झाडे लावुन त्यांची निगा राखु. अर्थात ज्यांना शक्य असेल त्यांनी तरि.
यो, सुंदर फूले. पहिल्या २
यो, सुंदर फूले. पहिल्या २ फूलांची नावे बघावी लागतील. ३ मला फ्रेंच झेंडू वाटतोय. नंतरची दोन गणेशवेल. नंतरची आहेत धोत्र्याची. फळही धोत्र्याचेच.
निवडूंगावरची ती वेल आहे. तिचे पण नव बघावे लागेल.
मामी, तिथल्या झाडवाल्यांना मी अनेक वर्षे बघतोय. पुर्वी मोजकी झाडे असायची त्यांच्याकडे. आता बराच मोठा संग्रह असतो. त्यांचा धंदा वाढतोय, म्हणजे मुंबईत जास्तीत जास्त लोक झाडे जोपासत आहेत तर. चांगली गोष्ट आहे. आणि रिटर्न गिफ्ट म्हणून झाड देणे फारच छान.
आज मी द ग्रेट रिफ्ट व्हॅलीत, मसाई मारा च्या दिशेने ४०० किलोमीटर्स चा प्रवास करुन आलो. सवडीने लिहितो.
जागू, झाडे लावायचीच, आणि आहेत ती जोपासायची देखील. मग तिच आपल्याला जोपासतील.
प्रज्ञा.. तो बहरलेला निवडुंग
प्रज्ञा.. तो बहरलेला निवडुंग आम्ही किती वेळ बघतच बसलो होतो.. तिथे इतर ठिकाणीसुद्धा (फक्त मुल्हेर किल्ल्याच्या वाटेवर) निवडुंगव्यतिरीक्त काही झाडांवर या फुलांचा पिसारा फुलला होता.. लांबून पाहिले की बर्फवृष्टी झाल्याचे भासत होते..
दिनेशदा.. थँक्स.. मी त्या प्रचि नं २ बद्दल खूप उत्सुक आहे.. खूप वेगळेपण जाणवले त्या फुलांमध्ये.. नि हो त्या बर्फरुपी फुलांचे नावही तितकेच महत्त्वाचे..
यो, सगळीच फुले खास रे प्रचि
यो, सगळीच फुले खास रे
प्रचि ४ गणेशवेलच
यो, ४थे प्रचि खास जमलेय.
यो, ४थे प्रचि खास जमलेय. गणेशवेलीचे फूल आहे ते.
Pages