क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> बिचार्‍याचं साफच खच्चीकरण होतंय

सध्या पाँटिंग व त्याची टीम बॅड पॅचमधून जात आहे. पण त्याच्यासारखा जिनीयस यातून लवकरच बाहेर येईल. १५१ कसोटीत ३९ शतके व ५६ अर्धशतके ही काही सामान्य खेळाडूची कामगिरी नाही. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पाँटिंग पुन्हा फॉर्मात येईल.

मास्तुरेजी, मी देखील अनेक वेळा पाँटींगची मनापासून तरफदारी करून इथंच टपल्या खाल्या आहेत !

>> मास्तुरेजी, मी देखील अनेक वेळा पाँटींगची मनापासून तरफदारी करून इथंच टपल्या खाल्या आहेत !

मला पाँटिंग फारसा आवडत नाही. परंतु तो या दशकातला पहिल्या दहातला (किंवा पाचातला) फलंदाज आहे हे नक्कीच.

२ बाद २३३. भारत ४ थ्याच दिवशी डावाने हरण्याची चिन्हे आहेत. ज्या खेळपट्टीवर भारतीयांना नीट उभे सुध्दा राहता येत नव्हते, त्याच खेळपट्टीवर आफ्रिकेचे सर्व फलंदाज आरामात खेळून खोर्‍याने धावा जमवत आहेत.

झहीर खान, न्यूझीलंडचा जेसी रायडर ही मंडळी १-२ सामने खेळले की यांचा हात किंवा तंगडी दुखावते आणि पुढचे ६ महिने हे बाहेर असतात. ही मंडळी सलग ३-४ महिने कधी फिट होती का? भारताने आता झहीरखान ६ महिन्यातून फक्त १-२ च सामने खेळेल हे गृहीत धरून त्याच्यावर विसंबून राहणे बंद केले पाहिजे व नवीन गोलंदाजांचा विचार केला पाहिजे.

मला तरी आज विकेट पाटा वाटत आहे. ४०० ची लिड देऊन तिसर्‍या दिवशी मध्यावर आपल्याला खेळायला मिळेल असे वाटतेय. मॅच आपण वाचवू. (आणि काही चमत्कार होऊन ३०० ची लिड मिळाली तर नक्कीच मॅच वाचवू.) पण आपले बोलर्स मात्र काही साथ देत नाहीत असे वाटते. ( निदान आज तरी मॅच हारल्यासारखी बोलिंग टाकत आहेत.)

श्रीलंकेची मॅच आठवा. बहुतेक दौर्‍यात आपण नेहमीच पहिल्या मॅच मध्ये वाईट खेळत आलो आहोत. नंतर डिवचल्या सारखे उत्तर दिले आहे. त्यामुळे डोन्ट वरी बी हॅपी!!

<<मला तरी आज विकेट पाटा वाटत आहे>> आपली गोलंदाजी प्रभावी नाही हे मान्य करूनही आज
विकेट गोलंदाजाना अजिबात साथ देत नाहीय, असं मलाही जाणवतं. त्यामुळे, कदाचित सामना अगदीच एकतर्फी न होण्याचीही अशादायक शक्यता आहे.
[ आज क्षेत्ररक्षण करताना कॅमेरा त्याच्याकडे केंद्रीत झाल्याचं गंभीरला कुणीतरी खुणावून सांगितलं; मग संवयीप्रमाणे गंभीरने गोड हंसून हंळूच कॅमेराकडे हात केला. पण बिचार्‍याला हे माहित नव्हतं कीं मॉर्केलने अगदीं ठरवून त्याचा कसा "मामा" केला होता हे परत परत दाखवून, त्याचं रसभरीत वर्णन करून मगच त्याची छबी दाखवली जात होती ! बिचारा !! ]

सा.आ. च्या एकाही फलंदाजा साठी आपल्या गोलंदाजांकडे डावपेच आहेत असे वाटले नाही. त्या उलट सेहेवाग, गंभीर ला अगदी ठरवुन गोलंदाजी केली.

दिवसभर शॉर्ट पिच बोलिंग केलेली दिसत आहे. फास्ट पिच मिळाले की स्विंग मिळतोय का ते शोधण्यापेक्षा बाउन्सर्स टाकायची फार जुनी खोड आहे आपल्या बोलर्सना. कॅप्टन दिवसभर तेथेच उभा असून यात कसा फरक पडत नाही ते कळत नाही.

ऑस्ट्रेलियाच्या "तिसर्‍या" बोलर ने सहा विकेट्स काढल्या आणि लीड मिळवून दिला. आपला वशिल्याने किंवा कोट्याने आलाय का? की इतर सगळे जखमी असल्याने? आगरकर सुद्धा चालला असता त्याच्या ऐवजी.

ऑस्ट्रेलिया २०४-४ म्हणजे एकंदर आघाडी २८०च्या वर !<<पण त्यांनी इंग्लंडला ४ थ्या डावात किमान ३०० धावांचं लक्ष्य द्यायला हवं. तरच ते जिंकतील.>> मास्तुरेजी, ऑसीजमध्ये हसी करतोय [आत्ता ५५वर खेळतोय] तशी इंग्लंडच्या पीटरसननेच कांही अफलातून खेळी केली तर; नपेक्षा, तुमचं हेही भाकित खरं ठरणार बहुतेक !

सेहवागच्या थर्ड मॅनला त्याच्यासाठी खास लावलेल्या क्षेत्ररक्षकाकडे बिनचूक झेल देण्याच्या कौशल्याचे मला खूप कौतुक आहे. आठवा.... पाकिस्तानातला तो अनिर्णित सामना ज्यात राहुल द्रविड सलामीला आला होता आणि फक्त सलामीच्या भागीदारीचा (पंकज रॉय-मांकड-४१३) विक्रम मोडण्यापुरते खराब हवामान असतानाच हे दोघे(द्रविड-सेहवाग-४१०) पुन्हा फलंदाजीला उतरले होते.
सामना संपल्यावर तर सेहवागने कोण पंकज रॉय आनि विनू मंकड असे म्हणून आणखी एक रेकॉर्ड केला होता.
आता हा रेकॉर्ड द. आफ्रिकेच्या स्मिथ मॅक्केन्झी -४१५ यांच्या नावे आहे.

खिलाडूवृत्ती जराही नसलेला खेळाडू या यादीत पाँटिंग ऑल टाइम टॉप.

केदार दुर्दम्य आशावाद म्हणजे काय ते तुमच्या पोस्ट्स वाचून कळते.(अर्थात माझ्या मनात पण तेच आहे, पण लिहायचे धाडस होत नाही)

वाटत नाही आफ्रिका पाचशेच्या आत तंबूत जाईल.. तो नवीन गोलंदाज उनाड-कट स्लो आहे.. इशांत पण फार काही प्रभावी वाटत नव्हता काल.. इतक्या दिवसांनी subcontinent च्या बाहेर आल्यावर हे होणारच होतं .. इन्जुरी आणि फॉर्म ह्यांच्या अनियमिततेमुळे सगळेच भारतीय वेगवान गोलंदाज निष्प्रभ वाटायालेत हल्ली..

गोलंदाजी साठी आता एक चांगला वेगवान गोलंदाज हवा जो बराच वेळ भारतासाठी खेळू शकेल..

>>> मॅच आपण वाचवू. (आणि काही चमत्कार होऊन ३०० ची लिड मिळाली तर नक्कीच मॅच वाचवू.)

सामना वाचविण्याकरता द्रविड व लक्ष्मणला २००१ साली भारतात ऑसिजविरूध्द खेळले तसे खेळावे लागणार. दुसर्‍या डावात सेहवागबरोबर द्रविडला सलामीला आणावे. तिसर्‍या क्रमांकावर लक्ष्मण, ५ व्या क्रमांकावर धोनी व ६ व्या क्रमांकावर गंभीरला खेळवावे.

>>> इन्जुरी आणि फॉर्म ह्यांच्या अनियमिततेमुळे सगळेच भारतीय वेगवान गोलंदाज निष्प्रभ वाटायालेत हल्ली..

श्रीसंथ आणि इशांत या खेळपट्टीवर निदान आफ्रिकन फास्ट बॉलर्सच्या निम्म्याने तरी कामगिरी करतील असे वाटले होते.

सचिनच्या विक्रमात उनाडकटची भर

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध प्रथमच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या १९ वर्षीय जयदेव उनाडकटमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खात्यामध्ये आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू झाल्यानंतर उनाडकटचा जन्म झाला असून, भारतीय क्रिकेटच्या इतिहास प्रथमच हा अनोखा योगायोग नोंद झाला आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7121793.cms

ऑस्ट्रेलिया २८४/८. हसी पुन्हा एकदा आस्ट्रेलियाचा लक्ष्मण ठरलाय. ३६५ धावांचे लक्ष्य इंग्लंडला हरविण्यासाठी पुरेसे आहे.

इंग्लंड ८१-५ व पीटरसनही बाद. ऑसीज जिंकल्यातच जमा धरायला हरकत नसावी !
भारत १२७-० [ २५ षटकं]. तरीपण सेहवाग व गंभीर ऑफचा चेंडू सोडायचाच नाही अशी शपथच घेऊन आलेत. दोन जीवदानं व बघणार्‍या आमचा जीव घाबराघुबरा ! विकेट खरंच पहिल्या दिवसाच्या मानाने अगदीच मवाळ , भारतीय फलंदाज आपली किर्ति वाढवूं शकतील अशी !! बघुं काय होतंय .

२०११ च्या विश्वचषकासाठी भारताचे संभाव्य ३० खेळाडू -

महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर , सुरेश रैना , गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग , विराट कोहली , झहीर खान , हरभजन सिंह , आशिष नेहरा, युवराज सिंग , विराट कोहली , शिखर धवन , पियुष चावला , चेतेश्वर पुजारा , आर. अश्विन , रोहीत शर्मा , अजिंक्य रहाणे , श्रीसंत , इशांत शर्मा , विनय कुमार , रवींद्र जाडेजा , प्रज्ञान ओझा , मुरली विजय , सौरव तिवारी , वृध्दिमान सहा , अमित मिश्रा , प्रवीण कुमार , मुन्नाफ पटेल, युसुफ पठाण, पार्थिव पटेल

शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, रविंद्र जडेजा, मुरली विजय, वृध्दिमान साहा यांना कुठल्या बेसिसवर घेण्यात आले ते काही समजले नाही. इरफान पठाण संघात नाही याचे जरा आश्चर्य वाटले. द्रविड सुध्दा नाही. पण तो असता तरी त्याला पहिल्या ११ त संधी मिळणे शक्य नव्हते.

इरफान पठाण ला हल्ली भाव मिळत नहीये आजिबात.. ३० मधे पण दिसत नाहीये ..

बाय द वे , सेहवाग आणि गंभीर दोघेही तम्बूत परतले आहेत... पण पिच मात्र व्यवस्थित वाटते आहे.. टेस्ट वाचवणे अगदीच अशक्य नाही..

<<शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, रविंद्र जडेजा, मुरली विजय, वृध्दिमान साहा यांना कुठल्या बेसिसवर घेण्यात आले ते काही समजले नाही>> पहिल्या यादीला तरी "कोटा" पद्धत लागणारच ना !
[आणि मास्तुरेजी, तुमची विराट कोहलीवर एव्हढी मेहेरनजर कां ? बेधडक दोनदा घातलंय त्याचं नाव !!! ]):डोमा:

शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विनय कुमार, रविंद्र जडेजा, मुरली विजय, वृध्दिमान साहा यांना कुठल्या बेसिसवर घेण्यात आले ते काही समजले नाही. >> 'महेंद्र-हट्ट' बेसिस ... Proud

इंग्लंड ११४-८. मालिका १-१ झाली कीं पुढचे सामने अधिक रंगतदार होतीलच. या विजयामुळे ऑसीज फॉर्मात येतील हे खरं पण पाँटींगला बिचारा म्हटल्याबद्दल आता मला माझ्याच थोबाडीत मारून घ्यायची पाळी न येवो !
<<टेस्ट वाचवणे अगदीच अशक्य नाही..>>षडजपंचम, देव करो, तुमच्या तोंडात साखर पडो !!

इंग्लंडचा २६७ धावांनी पराभव करीत ऑसीजनी मागील पराभवाचे उट्टे काढले. सर्वच आघाड्यांवर चमकले ते. भाऊंनी लिहिलय तसं शेवटचे दोन्ही सामने रंगतदार होणार अगदी.

आज द्रवीडने म्हटलय तसं सामना वाचवू शकतो या मानसिकतेनेच खेळायला उतारयला हवं.

>>पहिला डाव सर्वबाद १३६. दुसरा डाव ४५०+ ने पिछाडीवर असताना नाबाद १३७
cricket is a funny game..
साहेब, द्रविड, लक्षमण तीघांमध्येही या खेळपट्टीवर ऊभे राहून शत़क ठोकायची क्षमता आणि अनुभव आहे.
रैना खेळलाच आणि धोणी ने देखिल नेहेमीप्रमाणे सकारात्मक फलंदाजी केली तर सामना वाचवणे सहज शक्य आहे. अर्थात आफ्रिकेला भारताचे सर्व बाद करायला दोन दिवसात "आठ चेंडू" पुरेसे आहेत.
आपल्याला मात्र दोन दिवस खेळून काढायचे आहेत म्हणजे जवळ जवळ १००० चेंडू. Happy

>>> इंग्लंडचा २६७ धावांनी पराभव करीत ऑसीजनी मागील पराभवाचे उट्टे काढले.

नाणेफेक जिंकूनसुध्दा क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची स्ट्रॉसची चूक महागात पडली. त्याऐवजी फलंदाजी घेतली असती तर आज इंग्लंड २-० ने पुढे राहून अ‍ॅशेस त्यांच्याकडेच राहिल्या असत्या.

भारताला सामना वाचविणे खूपच अवघड आहे. त्यासाठी आजचा संपूर्ण दिवस व उद्या चहापानापर्यंत खेळून किमान ५०० धावा वाढविल्या पाहिजेत (म्हणजे दुसर्‍या डावात किमान ७०० धावा केल्या पाहिजेत). असे होणे जवळपास अशक्य आहे. भारताचा डावाने पराभव होतो का नुसताच पराभव होतो व साहेब ५० वे शतक करतील का एवढीच उत्सुकता आता शिल्लक आहे.

Pages

Back to top