Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
लिंक नेहमीचीच होती म्हणुन
लिंक नेहमीचीच होती म्हणुन दिली नव्हती:
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/282910.html
यातील सुरुवातीच्या २३ ओळी बघा.
त्यांचे क्षेत्ररक्षण बेसुमार (की बेमिसाल?) होते - त्या ही मुळे धावा कमी झाल्या. पण धोनीचे काही फटके मस्त होते. धावायची सवय त्याला राहिलेली दिसत नाही.
क्रिक इन्फो प्रमाणे, धोणी नि
क्रिक इन्फो प्रमाणे, धोणी नि द्रवीड दोघांनाहि क्रॅम्प्स येत होते. धोणी शतक करू शकला नाही कारण क्रॅम्प्स मुळे त्याला फलंदाजीहि नीट करता येत नव्हती. कदाचित् द्रवीडचे हि हेच कारण असावे, म्हणून तो पण हळू हळू, जपून, जास्त कष्ट न घेता, खेळत असेल.
शेवटची मुख्य जोडी खेळतीये. एक
शेवटची मुख्य जोडी खेळतीये. एक विकेट पडली की मग टेल एन्डर्स. जिंकणार. रायडर - टेलर असताना उगीच टेन्शन आले होते.
जय ओझा!
किवी १२४/८ ... सही ..खुर्दा
किवी १२४/८ ... सही ..खुर्दा करुन टाका....
स्वतःच्या बॉलिंगवर बॉन्ड्रीला
स्वतःच्या बॉलिंगवर बॉन्ड्रीला पळत जाउन क्षेत्ररक्षण करण्याचा अनोखा क्षण पाहिला.
केदार, कोण हा महान प्राणी...
केदार, कोण हा महान प्राणी...
जिंकलो बाबा एकदाचे... १ नं
जिंकलो बाबा एकदाचे... १ नं असल्याची लाज राखली.
शेवटी सहाव्या टेस्ट मध्ये
शेवटी सहाव्या टेस्ट मध्ये एकदाचे जमले क्रीस मार्टीनला.
भारताविरुद्ध बदक.
आपण जिंकलो पण सिरीज मध्ये
आपण जिंकलो पण सिरीज मध्ये नैतिक विजय न्यूझिलंडचा. (हे म्हणायला आम्हाला खूप बर वाटतय, खूप खूप वर्षांपासून अस म्हणायची तीव्र इच्छा होती. नाहितर आमचा आपला फक्त नैतीक विजयच असायचा पूर्वी, सनी बेदीच्या काळात). असो.
द्रविडला चांगली प्रॅक्टिस झाली हे बर झाल. आता सा.आ. विरूद्ध तोच उपयोगी होईल. साथ देणार्या खेळपट्ट्यांवर आपले वेगवान गोलंदाज काय करतात हे बघणे मजेच ठरेल. एका टेस्ट मॅच मध्ये आपण सा.आ. ला २०० मधे खोलल्याचा आनंद (श्रीनाथ प्रसाद) चेहर्यावरून जाईस्तोवर आपला १०० च्या आत ऑल आउट झाला होता. खरे "कसोटी" सामने बाहेरच्या मैदानावर. ढोणी बुवांची कसोटी. वर्ल्ड कपच्या आधी आत्मविश्वास वाढ्वणारा विजय हवा. कुणाचा फॉर्म जाउ नये, दुखापती होउ नयेत ही इच्छा. .
हो विक्रम नैतिक व खर्या
हो विक्रम नैतिक व खर्या विजयी संघांची अदलाबदल झाली ते एक बरे झाले.
आफ्रिकेत द्रविड चा फॉर्म उपयोगी पड्णार हे खरे. केदार म्हणतोय त्यावरून सचिन ला सांगायला पाहिजे की ज्या पद्धतीने गेली तीन-साडेतीन वर्षे खेळतोय ते आता पुन्हा बदलायला जाउ नको
या सामन्यात धोणीने पण हात
या सामन्यात धोणीने पण हात मोकळे केले, त्याच्या ९८ धावांच्या खेळीत टिपिकल धोनी शॉट्स होते. टाकदीच्या जोरावर फटके मारत होता. त्याचा पण फॉर्म परत आला तर चांगल आहे, रैना साहेबांना सांगायला हवं, चेतेश्वर पुजारा तयार आहे त्यांची जागा घेण्यासाठी.
हरबाला मॅन ऑफ द सिरीज मिळाले ते पण फलंदाजी मुळे
धोनीला बोलिंगबद्दल मॅन ऑफ द
धोनीला बोलिंगबद्दल मॅन ऑफ द सिरिज कधी मिळणार?
कोण हा महान प्राणी >> भज्जी.
कोण हा महान प्राणी >> भज्जी. लै जोरात पळाला आणि रन्स वाचवले.. कारण लाँग ऑफला कोणीच नव्हते.
आजपासून अॅशेस मालिकेला
आजपासून अॅशेस मालिकेला प्रारंभ झाला. गॅबाच्या उसळत्या खेळपट्तीवर इंग्लंडची पहिली फलंदाजी करताना दमछाक झाली. पीटर सीडलची हॅटट्रिक हे आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य , त्याने ६ बळी घेतले. इंग्लंड कडून कूक, बेल व पीटरसन यांनीच काय तो थोडाफार प्रतिकार केलाय. इंग्लंडचा स्कोर २६० सर्वबाद झाला.
ईशांत शर्मा आणि श्रीसंथ
ईशांत शर्मा आणि श्रीसंथ दोघेही हॅटट्रीकवर आहेत! असे आधी कधी झाले आहे?
इंग्लंडनी ऑसीजची सलग दुसर्या
इंग्लंडनी ऑसीजची सलग दुसर्या टेस्ट मध्ये वाट लावलीये... पीटरसनचे दुहेरी शतक जबरीच झाले... ऑसीज बॉलर संपले आहेत किंवा इंग्लंडचे फलंदाज जबरदस्त फॉर्म मधे आहेत...
ऑसीजची गोलंदाजी सध्या
ऑसीजची गोलंदाजी सध्या संपल्यातच जमा आहे. २००७ मध्ये मॅक्ग्रा व २००९ मध्ये ब्रेट ली निवृत्त झाला. ब्रॅकनही निवृत्त झाला. मिशेल जॉन्सनचा फॉर्म हरवला आहे. क्रेझा व हॉरिट्झ या फिरकी गोलंदाजांचा देखील फॉर्म हरवला आहे. होप्स, सिडल व हिल्फेनहॉस फारसे चांगले नाहीत. शेन टॉटला घेत नाहीत व घेतले तरी तो फारसा चांगला नाही. त्यांच्याकडे एकच चांगला गोलंदाज आहे. तो म्हणजे बॉलिंजर. एका गोलंदाजाच्या जीवावर सामने जिंकणे अवघड आहे.
त्यांची फलंदाजी देखील ढेपाळली आहे. पाँटिंग व क्लार्क अजिबात फॉर्मात नाहीत. उरलेल्यांकडे सातत्य नाही. हॅडिन, कॅटिच, वॉटसन, हसी हे अधूनमधून खेळतात.
एकंदरीत त्यांचे अॅशेस व २०११ च्या विश्वचषकात काही खरे दिसत नाही.
अॅलिस्टर कूकने या
अॅलिस्टर कूकने या मालिकेपूर्वी चांगली खेळी करणार असल्याचे वक्त्यव्य केले होते, ते त्याने पहिल्या दोन कसोटीत तरी खरे करून दाखवले. पहिल्या कसोटीतील त्याचे द्विशतक लाजवाबच होते. आज केपीने ऑसीजचे कंबरडे मोडलेय. आत्ता ऑसीजनी दुसर्या डावात प्रतिकार केला तरच टिकतील.
आजच्या दिवसाचा खेळ संपला
आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑसीज मॅच वाचवतायेत का? एवढेच बघणे बाकी आहे..
अजूनही १३७ धावानी ऑसीज
अजूनही १३७ धावानी ऑसीज पिछाडीवर आहेत. मायकेल हसी ४०वर खेळतोय व तो असेपर्यंत इंग्लंडला विजयासाठी झगडावं लागणार आहे. तरी पण २३८-४ वरून आता सामना वाचवणं आतांच्या ऑसीज संघाला जरा कठीणच आहे !
भाउ, एक चित्र येऊन जाउ द्या!
भाउ, एक चित्र येऊन जाउ द्या!
ओह गॉड, हमें व्ही.व्ही.एस.
ओह गॉड, हमें व्ही.व्ही.एस. लक्ष्मण नही दिया, बारिश भी नही भेजी, अभी कल क्या हसी भी उडायेंगे ?
झक्कीजी, पटकन सुचलं तें आग्रहास्तव टाकलंय. बघा जमलंय का तें.
-भाऊ
वाह...सही आहे एकदम !
वाह...सही आहे एकदम !
आवडले भाऊ
आवडले भाऊ
भाऊ
भाऊ
भाउ, धन्यवाद. छानच आहे.
भाउ, धन्यवाद. छानच आहे. नेहमीप्रमाणेच.
चित्र आवडले भाउ
चित्र आवडले भाउ
सचिन विरुद्ध शोएब
सचिन विरुद्ध शोएब अख्तर
http://www.youtube.com/watch?v=T2AoT6thymY&feature=player_embedded
अरे हे न्यू झीलंडचे लोक अजून
अरे हे न्यू झीलंडचे लोक अजून भारतात काय करताहेत? जपानी लोक असते तर हाराकिरी केली असती. दुसरे कुणि असते तर रातोरात चंबूगबाळे बांधून पळून गेले असते. अजून किती मार खायचा आहे? किती अपमान करून घ्यायचा? जा म्हणावे घरी. पुढच्या वर्षी जरा सराव करून मग या! सगळे एकतर्फी सामने! काही मजा नाही!!
सगळे एकतर्फी सामने!>> असंच
सगळे एकतर्फी सामने!>>
असंच गाफील राहुन भारतीय टीम ने बर्याच फायनल हरल्याचा ईतिहासपण आहे. लीगच्या सर्व मॅच घसघशीत जिंकुन फायनलमध्ये सुफडा साफ... अर्थात ह्या वन-डे सेरीजला फायनल तर नाही पण निदान या दौर्याची शेवटची मॅच भारताने जिंकावी.
Pages