क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अंपायरला कंटाळा आला बहुतेक भारताची बॅटींग बघून..
आणि धोणी ला आता यष्टीरक्षणाचा अन ईतरांना क्षेत्ररक्षणाचा कंटाळ आला असावा.. अजून डाव घोषित करत नाहीये..

सुकी Lol

हरभजन सिंग व लक्ष्मण यांचे अभिनंदन. लक्ष्मणने परत एकदा ऐन वेळी चांगली फलंदाजी केली व हरभजनला साथ दिली! किंवा (हरभजनने लक्ष्मणला साथ दिली?!)

मद्याच्या नशेत पूर्ण धुंद झालेल्या एखाद्या माणसाला कोणीतरी खाडकन मुस्काटीत मारल्यावर त्याची धुंदी उतरून तो शुध्दीवर येतो. तसेच भारताच्या दुसर्‍या डावात मार्टिनने ५ बाद १५ अशी भारताची अवस्था करून सर्व फलंदाजांचे डोळे उघडले. आता तरी सुधारा.

आय पी एल, २०-२०, ५०-५० इ. प्रकारांमुळे कसोटी सामने प्रेक्षकांना, नि इथल्या लिहिणार्‍यांनाहि, कंटाळवाणे वाटतात की काय माहित नाही.

द्रवीड, तेंडूलकर, लक्ष्मण (पहिला डाव) यांच्यावर हळू खेळल्याबद्दल टीका झाली. वास्तविक तिघेहि अनेक कसोटी सामन्यात खेळलेले आहेत, अनेक धावा केल्या आहेत, सर्व प्रकारची गोलंदाजी खेळलेले आहेत. तेंडूलकर व द्रवीड तर संघाचे कप्तानपण होते म्हणजे कसोटी सामन्यातील खेळाचे डावपेच त्यांना माहित असणार.

तेंव्हा एकदा फलंदाजीला आल्यावर कसे खेळावे हे त्यांना सांगायची आपली काय लायकी! फार तर कप्तान म्हणून धोणीने किंवा कोच म्हणून, (कोण कोच आहे त्याने) सांगावे.

आपल्याला संथ खेळ पहावत नसेल तर पाहू नये.
मी फक्त हायलाईट्स बघतो. म्हणून मला त्रास होत नाही.

>>> पहिल्या इनिंगला रडत खडत का होईना शतक मारल्याने विल्यम्सन्चा ११ वर सोडलेला सोपा कॅच व नेहमीच्या स्तायलीत वीरूला केलेला रन आउट द्रविडला माफ होउ शकतो का?.

>>> द्रविड बरोबर सेहवाग हमखास धावचित होतोच... कारण द्रविड चे रनिंग बिटविन विकेट्स अत्यंत कमकुवत आहे

सेहवाग धावबाद झाला तेव्हा तो नॉनस्ट्रायकर एंडला होता. चेंडू फलंदाजाच्या समोरच्या बाजूला (म्हणजे कव्हर, एक्स्ट्रॉकव्हर, पॉईंट, मिडॉफ, मिडॉन, स्क्वेअरलेग इ. ठिकाणी) मारला असल्यास धाव घेण्याचा कॉल हा फलंदाजाने द्यायचा असतो तर तो फलंदाजाच्या मागे गेल्यास (म्हणजे थर्डमॅन, फाईनलेग इ. ठिकाणी) धाव घेण्याचा कॉल हा नॉनस्ट्रायकरने द्यायचा असतो. काल द्रविडने चेंडू एक्स्ट्रॉकव्हरला मारला होता व धाव घेण्याचा कॉलही दिलेला नव्हता व त्यामुळे तो स्वतः पळालाच नाही. सेहवाग स्वत:च धाव घ्यायला पळाला व बाद झाला.

(सामन्याची क्षणचित्रे बघून हे माझे मत बनलेले आहे. चूकभूल देणे घेणे.)

>>> एक शतक सोडता द्रविड भाऊंचे दिवस जवळ आले आहेत असे वाटते.

द्रविड अजून २ महिन्यांनी ३८ वर्षांचा होईल. त्याची निवृत्ती जवळ आली आहे. त्याच्यापेक्षा गंभीरने स्वत:ची फलंदाजी व फिटनेस जास्त गंभीरतेने घ्यावा असे मला वाटते. २०१० सालात गंभीर बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे. जखमी झाल्यामुळे २-३ वेळा त्याला गॅप घ्यावी लागली आहे. ही चांगली लक्षणे नाहीत. मुरली विजय पॅड बांधून विंगेत उभा आहे.

पहिल्या ३ कसोटींच्या यशानंतर रैनासुध्दा अपयशी ठरत आहे. स्लिपमध्ये किंवा यष्टीरक्षकाकडे झेल देण्याची सवय त्याला बदलणे आवश्यक आहे. नाहीतर पुजारा पुन्हा एकदा आत येईल.

धोनीच्या फलंदाजीबाबत तर सध्या सगळाच आनंद आहे. त्यामुळे सेहवाग, सचिन व लक्ष्मण हे तीनच भरवशाचे फलंदाज संघात आहेत.

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार येत्या ३० दिवसांत कॉमकास्ट वर नीओ क्रिकेट दिसणार आहे Happy

असामी | 28 October, 2010 - 16:40 नवीन
असे काय नसते. whitewash चा अर्थ "एखाद्याला खोडुन टाकणे".>>हो बरोबर आहे पण ते इतरत्र, cricket मधे brown wash/black wash हे शब्द मी वर लिहिलेय त्या अर्थाने वापरतात (white wash चे specialised स्वरुप समजा हवे तर) अगदी Us मधेहि त्यालच sweep/clean sweep म्हणतातच कि.
१. जेंव्हा WI team Eng ला १९८४ आणि १९८५ मधे ५-० धुवत होती तेंव्हा white wash म्हणत नसत (black wash म्हणत).
२. ८६ मधे आपण पहिल्या दोन टेस्ट्स जिंकल्यावर तिसर्‍या edgebaston च्या आधी "India to enforce brownwash ?" अशा बातम्या होत्या. १९९३ मधे Eng vs India series ची DVD "Bombay Brown wash" म्हणून मिळते.
३. अगदी ज्या series बद्दल वर बोलणे सुरु होते त्याबद्दलची हि बातमी बघा.

http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournaments/aus...

>>>>

You are right! my bad! never knew about this one.

योग | 8 November, 2010 - 00:32
लक्षमण अन भज्जी चे शतक झाल्यावर डाव घोषित करेल बहुदा.
धोणी संघात का आहे:
नाणेफेक, डाव घोषित करणे, सामन्यानंतर दोन शब्द बोलणे वगैरे या साठी

>>>

नाणेफेकीसाठी नक्कीच नाही Happy

Top 5 worst dismissals -

http://www.facebook.com/video/video.php?v=1523721346755

५ व्या dismissal मध्ये शेन वॉर्नचा ६० हून अधिक अंशातून वळलेला चेंडू केवळ अफलातून.

२ र्‍या व ५ व्या विकेटमधला फलंदाज ओळखता नाही आला.

दुसरा इन्झी आणि पाचवा स्ट्राउस. तो व्हिडीओ माझ्याकडे आहे.

इन्झमाम त्या सुमारास बर्‍याच वेळा विनोदी पद्धतीने आउट झाला होता. हे वाचा, माझी रिक्षा
http://fromthefarend.com/cricket/?p=39

मास्तुरे तुम्ही दिलेल्या लिंकमधले सगळेच आऊट आचरट ह्या प्रकारात मोडणारे आहेत.. आणि फारेंड च्या लिंक मधले इंझीचे प्रकार आचरटपणाच्या ही बाहेरचे आहेत..

दुसर्‍या कसोटी सामन्याबाबत खालील निर्णय घेण्यात आले आहेतः

तिसर्‍या दिवशी तेंडूलकर, द्रवीड मिळून धावसंख्या २४३ पर्यंत नेतील. तेंडूलकर ६१ वर बाद होईल. नंतर लक्ष्मण व द्र्वीड मिळून धावसंख्या २७८ पर्यंत नेतील. लक्ष्मण २६ धावांवर धावचित होईल. मग रैना व द्रवीड डाव २८० पर्यंत नेतील आणि द्रवीड २२ धावा काढून बाद होईल. पुढे रैना व धोणी प्रत्येकी एक शतक करतील. चौथ्या दिवसाच्या जेवणाच्या वेळेस्तवर भारताची धावसंख्या सर्वबाद ५२३ अशी होईल.

सर्व लोक द्रवीडची स्तुति करतील की एका बाजूला भिंतीसारखा उभा राहून त्याने तेंडूलकर व लक्ष्मणला साथ दिली. त्यामानाने तेंडूलकर ने त्याचा फायदा घेऊन जलदगतीने धावा काढण्या ऐवजी वेळकाढूपणा केला असे मांजरेकर सांगेल.

चौथा दिवस संपेस्तवर न्यू झीलंडच्या नाबाद १२५ धावा होतील, पण पाचव्या दिवशी चहापानपर्यंत न्यू झीलंडचा दुसरा डाव २३२ सर्वबाद असा संपेल. सेहवाग, रैना व तेंडूलकर प्रत्येकी तीन गडी बाद करतील. एक जण धावचित होईल.चहापानानंतर पहिल्या ४५ मिनिटात गंभीर व सेहवाग धावसंख्या नाबाद ३८ पर्यंत नेतील. पण पुनः एकदा साईट स्क्रीन हलल्यामुळे त्याचे लक्ष विचलित होऊन तो त्रिफळाचित होइल. पुढे गंभीर, तेंडूलकर, लक्ष्मण व रैना धावचित होतील व खेळ संपण्यापूर्वीच्या शेवटच्या षटकात भारताच्या ५ बाद ५८ धावा झाल्या असतील. शेवटचे मॅकलमचे षटक द्रवीड बाद न होता, निर्धाव खेळेल व सामना अनिर्णित राहील. चौथ्या चेंडूला त्याने मारलेला चेंडू चक्क पाच मीटर दूरपर्यंत गेला होता, पण धोणी आपल्या बाजूला दोन्ही पाय, व बॅट क्रीजच्या आत घट्ट रोवून उभा राहिला. सेहवाग २५, गंभीर ११, तेंडूलकर ५, लक्ष्मण ७, द्रवीड २ नाबाद, धोणी ४ नाबाद. इतर ४,

अश्या रीतीने द्रवीडने पुनः एकदा सामना वाचवला म्हणून त्याचे कौतुक होईल.

Happy Light 1

भज्जी ८५ नाबाद, लास्ट सेशनमध्ये धुतल. ५ सिक्स, शेवटच्या २०-२५ ओव्हर पाहिल्या जागुन Happy

भज्जीच्य डोक्यातले गियर उलटे फिरलेत..... विकेट घ्यायच्या सोडून धावा काढतोय... आज परत एक शतक ते पण नाबाद... आणि विकेट कोण घेणार.. श्रीशांत...

मॅच ड्रॉच्या दिशेने... झहीर खान पोटदुखीमुळे बाहेर गेलाय.... तेव्हा न्यूझीलंडच्या १० विकेट बाद करणे अशक्यप्राय दिसते आहे... काल द्रवीड आणि लक्ष्मणनी निवांत खेळून बर्‍यापैकी वेळ खाल्ला...

उद्द्या सकाळी त्यांना ३५० च्या आतमधे गुंडाळल आणि आपल्याला ३ तास मिळाले तर जिंकू शकतो. आणि हे शक्य आहे. Happy

रैना, साहेब मिळून करतील त्यांना ३०० च्या आत सर्वबाद. म्हणजे करायलाच पाहिजे. 'फलंदाजीत दिवे लावले, आता गोलंदाजी तरी नीट करा. हरभजन सुद्धा तुमच्या सारखा शतक काढतो, तुम्हाला त्याच्याहून चांगली गोलंदाजी करावीच लागेल!!' असे धोणी, कोच, सगळे, सांगतील त्यांना.
गंभीरला मात्र तंबूतच ठेवा नि एखादा चांगला क्षेत्ररक्षक घ्या.

द्रवीड व लक्ष्मण आहेतच सामना अनिर्णित ठेवायला.

बघू, हे तरी ऐकतात का ही आजकालची पोरे!

श्रीलंकेविरूध्दच्या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी ख्रिस गेलने नाबाद ३३२ धावा केलेल्या आहेत (४३४ चेंडू, ३४ चौकार, ९ षटकार). गेलने लाराचा ४०० धावांचा विक्रम मोडावा. फारा दिवसांनी श्रीलंकेला असा जोरदार चोप मिळाला.

सचीनने अजुन ११ धावा काढल्या असत्या तर सध्याच्या फलंदाजांपैकी त्याची सरासरी सर्बाधीक झाली असती. सातत्याने उच्च सरासरी राखणे कमालीचे कठीण असते. पहिल्या १२ मध्ये सध्याचे कुणीही नाही. But these are exciting times. पुढच्या ११ पैकी तब्बल ८ अजुनही मैदानांमध्ये आपल्या बॅटी परजतांना आढळतात.

(आजच जर्मनच्या धड्यात वाचत होतो की मित्रांप्रमाणेच देवाचा उल्लेख एकेरीत करायचा असतो. त्याला अनुसरून सचीनला एकेरी मध्ये संबोधले आहे. नाहीतर सचीन ब्रिगेडवाले धावुन यायचे ...)

नाहीतर सचीन ब्रिगेडवाले धावुन यायचे>>> Lol

आशिष, येथे लिन्क द्यायची विसरला आहेस का कोणती?

द्रविड बद्दल वाईट वाटते. सचिन ने १९१ मारल्या असत्या तर (ते शतक कितवे ही असते तरी) हा बाफ भरून वाहिला असता. मीही आलो त्यात. काल फक्त शतक झाले का बघितले आणि सकाळी द्विशतक झाले का ते. तो खेळत असताना सारखा बघत नव्हतो. कदाचित सचिन चे हुकल्याने लोक टर्न ऑफ झाले.

या सिरीज मधली सर्वात महत्त्वाची खेळी तो खेळून गेलाय. आपण मॅच जिंकणार हे गृहीत धरून. येथून नाही जिंकली तर त्याची काहीच चूक नाही त्यात.

मी द्रविडला खेळताना बघत होतो. द्रविडचे काही फटके आत्मविश्वासपूर्ण होते, त्याचा पूर्ण डिफेन्स (दोन अपवाद सोडून) आत्मविश्वासपूर्ण होता पण इतर धावा, स्पेशली कट ह्यामध्ये त्याचा अजुनही फॉर्म खराबच आहे की काय अशी शंका येत होती. ही सिरीज द्रविडसाठी चांगली आहे, पण त्याच्या खेळी मात्र थोड्याश्या विचारात टाकणार्‍या आहेत.

पण एकुणच आपला खूप वेळ गेला असे माझे मत आहे. अजून त्यात सहज ७५ + धावा निघाल्या असत्या. (खेळलेल्या बॉल्स मध्ये)

गेल्या दोन्ही मॅच मध्ये मला सच्या नेहमीचा नाही वाटला. खूप दडपणाखाली खेळतोय की काय असे वाटले. आणि टेन्शन घेऊन समोर वगैरे येऊन त्याने आउट होणे माझ्यासाठी अनाकलनीय होते.

आज तसाही तुलनेत नवीन बॉल असल्यामुळे शर्मा, श्रीशांत काही तरी मुव्हमेंट दाखवतील असे वाटते. खासकरुन श्री. कालही कदाचित त्याला विकेट मिळाली असती. आणि आज स्ट्रॅटेजी आखताना श्री - ओझा, इशांत - ओझा असेही कॉम्बीनेशन ठेवले तर बहर येईल. काल बॉल मस्त वळत होता. ( ते पण व्हिटोरीचा !! )

बघू काय होते. जर जिंकलो नाही तर मात्र नाचक्की होईल असे वाटते. दोन दिवस अन फक्त ९ विकेट!

Pages