Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विक्रमा... डावाचा पराभव असेल
विक्रमा... डावाचा पराभव असेल तर चौथा डाव खेळावाच लागत नाही... त्यामुळे तसे सामने आपोआपच बाद होतात...
> हो बरोबर आहे, पण डिटेल पाहिल्या शिवाय पहिली बॅटिंग कुणाची आहे ते कळत नाही. व तोच मास्तुरेंचा प्रश्न होता.:)
अखेर पावसाच्या व्यत्ययानंतर
अखेर पावसाच्या व्यत्ययानंतर मॅच सुरु झाली आहे.. आणि शेवाग महाराज स्कोअररला कोणताही त्रास न देता तंबूत परतलेले आहेत..... टॉस हारण्याची धोनीची सवय कधी बदलणार?????? किती धावा होणार देवालाच माहिती.. आधीच आफ्रिकेतले पीच... त्यात पाऊस पडलेला... आणि परत वरती डेल स्टेन गोलंदाजी करणार...
काही होणार नाही, घाबरायला
काही होणार नाही, घाबरायला नको. १ च तर गेली आहे. और ९ बाकी है!
भारतीय टीम विषयीचा आत्मविश्वासाचा अभाव मिडियामध्ये (व एकुणच सर्व भारतीय क्रिकेट प्रेमी मध्ये) दिसतो. जणू काही दक्षिण अफ्रिका आपली सडकून काढणार आहेत. मला स्वतःला अजून तरी ह्या दौर्यात खूप मानसिक त्रास होईल असे वाटत नाही. (अफ्रिकेला अफ्रिकेत कमी लेखत नाही पण स्वतःला कमी लेखायची गरज नाही असे वाटते) हा दौरा मागील रेकॉर्ड बदलणारा ठरावा.
केदार ३ गेले रे... गंभीरला तर
केदार ३ गेले रे... गंभीरला तर ठरवून काढला... आणि द्रवीड चांगला खेळेल असे वाटत असताना गेला.. आता साहेब आणि स्पेशल मॅन काय करतात ते बघायचे..
साहेब एकटा गड लढवताहेत. काय
साहेब एकटा गड लढवताहेत.
काय पुढे???
तेही गेले!!!!
तेही गेले!!!!
७१/६ आनन्द आहे!!
७१/६ आनन्द आहे!!
केदार , तू तुझे स्टेटमेन्ट
केदार , तू तुझे स्टेटमेन्ट मागे घे पाहू...
बाळू जोशी. | 16 December,
बाळू जोशी. | 16 December, 2010 - 07
केदार , तू तुझे स्टेटमेन्ट मागे घे पाहू...
>> एवढ्या फास्ट नको हे काय २०-२० आहे. पहिली टेस्ट तर पुर्ण होउ दे.
<<एवढ्या फास्ट नको हे काय
<<एवढ्या फास्ट नको हे काय २०-२० आहे. पहिली टेस्ट तर पुर्ण होउ दे.>> सहमत. सराव सामना नाही शिवाय बरंचसं क्रेडीट पावसालाही आहे. मी तरी या संघावर आताच ताशेरे ओढायला नाही धजणार !
अरेरे.. भारताचा सर्वात स्टार
अरेरे.. भारताचा सर्वात स्टार फलंदाज 'हरभजन' पण गेला..
झक्की दिसेनात कुठे ते?
अशा विकेटवर गोलंदाजीसाठी झहीर
अशा विकेटवर गोलंदाजीसाठी झहीर नाही ही काळजी करण्याची गोष्ट. हरभजन या परिस्थितीत रन-आऊट !!
Sacha dressing roomla aaplya
Sacha dressing roomla aaplya 4s ne message pathvat hota kee etke kaahi avaghad naahi tension gheu naka. Pan aaple lok mhanje!
भाउ, मैदान झाकले असल्याने,
भाउ, मैदान झाकले असल्याने, पावसाचा काय परिणाम होतो?
अरेरे, हरभजनची सेंचुरी हुकली!
अरेरे, हरभजनची सेंचुरी हुकली! लवकरच तो सचिनला गाठणारे, त्याचं सचिनला जाम टेन्शन आहे असं ऐकून आहे.
खरच ! हरभजनची सेंचुरी हुकली!
खरच ! हरभजनची सेंचुरी हुकली! मस्त खेळत होता.
<<भाउ, मैदान झाकले असल्याने,
<<भाउ, मैदान झाकले असल्याने, पावसाचा काय परिणाम होतो?>> विकेट झाकलेली असते , मैदान नाही; पण मैदानात मुसळधार पाऊस झाला तर विकेट जरी पावसामुळे भिजली नाही तरी दमटपणा येऊं शकतो. व मुख्य म्हणजे हवेतल्या दमटपणामुळे चेंडुच्या स्विंगला खूपच मदत मिळते. हे आपलं माझं "जनरल नॉलेज", एक्सपर्टीज नाही.
[वातावरण असंच राहिलं तर उद्यां आपल्या गोलंदाजानी चमक दाखवून माझ्या म्हणण्यात थोडंतरी तथ्य आहे असं दाखवावं, एव्हढीच प्रार्थना !]
१ च तर गेली आहे. और ९ बाकी
१ च तर गेली आहे. और ९ बाकी है!>>>
बाजो, केदारच्या स्टेटमेंटमधे छोटा बदल करा. ९ च तर गेले आहेत और १ बाकी है. काय वाट लावलीय राव.
तिकडे इंग्लंडची पण वाट लावली. पण ३ LBW लागोपाठ?
काही होणार नाही, घाबरायला
काही होणार नाही, घाबरायला नको. १ च तर गेली आहे. और ९ बाकी है! >>> दिवसा अखेर परिस्थीती नेमकी उलटी झाली...
<<या खेळपट्टीवर इंग्लंडला
<<या खेळपट्टीवर इंग्लंडला सुद्धा फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे.>> मास्तुरेजी, इंग्लंड ११९-५. भाकिताबद्दल अभिनंदन.
जरा भारताबद्दलही असं बोलून ठेवा ना आजच्यासाठी !
भाऊ तुमचे वॉर्नचे कार्टुन सही
भाऊ तुमचे वॉर्नचे कार्टुन सही आहे. लिज हर्ले चिकणी दिसलीय भारतीय साडीत. आता म्हणे वॉर्न सचिनला ख्रिसमस प्रेझेंट म्हणुन अंडरविअर देणार आहे. बहूतेक सचिनच्या सवयीमुळे वॉर्नच जास्ती डिस्ट्रॅक्ट झाला होता.
इंग्लंड १४१-५. जॉनसन [ ६२
इंग्लंड १४१-५. जॉनसन [ ६२ धावा,४ विकेट] ऑसीजचा विघ्नहर्ता ठरणार बहुतेक. आता आपला हिरो कोण ठरतोय पाहुया !
कांदापोहेजी, धन्यवाद. <<बहूतेक सचिनच्या सवयीमुळे वॉर्नच जास्ती डिस्ट्रॅक्ट झाला होता.>> वॉर्नच्या "संवयी " खूपच अधिक सांसर्गिक असूनही सचिनला त्याची लागण झाली नाही, हे आपलं भाग्यच म्हणायचं !!
कापो, एलबी तर बरेच क्लीन
कापो, एलबी तर बरेच क्लीन वाटतायत. पीटरसन चा नीट रिप्ले दिसला नाही. कॉलिंगवूड चा तिसर्या अंपायरने दिला ना?
आजोबा, माझे चार मार्क
आजोबा, माझे चार मार्क तुमच्यामुळे गेले ! सचिन तुमचा लाडका असला ,तरी "सेंच्यूरीअन" हे नाव सचिनमुळे त्या शहराला दिलं, असं मला कां सांगितलंत ?
भाऊ सहीच. असो गंडले इंग्लंड
भाऊ सहीच. असो गंडले इंग्लंड पण १८७ वरच.
फारएंडा हाफीसात मॅच बघायची सोय नाहीये रे.
जॉनसन - १७.३ षटकात ३८ धावा
जॉनसन - १७.३ षटकात ३८ धावा देऊन ६ बळी !
<<या खेळपट्टीवर इंग्लंडला
<<या खेळपट्टीवर इंग्लंडला सुद्धा फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे.>> मास्तुरेजी, इंग्लंड ११९-५. भाकिताबद्दल अभिनंदन.
जरा भारताबद्दलही असं बोलून ठेवा ना आजच्यासाठी !
या खेळपट्टीवर ४ थ्या डावात फलंदाजी करणे खूप अवघड आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकतील असं वाटतंय. पण त्यांनी इंग्लंडला ४ थ्या डावात किमान ३०० धावांचं लक्ष्य द्यायला हवं. तरच ते जिंकतील.
द. आफ्रिकेला सुध्दा या जिवंत खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड जाणार आहे. पण झहीर खेळत नसल्याने व उनाडकटचा हा पहिलाच सामना असल्याने आपल्याइतकी त्यांची वाईट अवस्था होणार नाही. श्रीसंथ आपला हुकमी एक्का ठरेल असं वाटतंय.
खरंच झहीर हवाच होता आज. पण
खरंच झहीर हवाच होता आज. पण उजाडायचंच असलं,तर कुणा कोंबड्याच्या आरवण्याने आज उजाडेल ते नाही सांगता यायचं !;):डोमा:
ऑसीज दूसर्या डावात ६४-३. पाँटींग १ वर बाद ! बिचार्याचं साफच खच्चीकरण होतंय !!
दिवस अखेर ऑस्ट्रेलियाकडे २००
दिवस अखेर ऑस्ट्रेलियाकडे २०० धावांची आघाडी आहे. त्यांना सामना जिंकण्याची चांगली संधी आहे.
ऑसीजची स्थिती मजबूत आहे, २००
ऑसीजची स्थिती मजबूत आहे, २०० धावांची आघाडी आणि ३च विकेट्स गेल्यात. इंग्लंडला अवघड जाणार आहे चौथी इनिंग.
इकडे आपले गोलंदाज पाट्या टाकतायत. सनी गावस्करांनी लिहिलय तसं आधी सराव सामने खेळायची गरज होती भारताला.
Pages